काय करावे या किड्याला ?

काय करावे या किड्याला
साला लिहिता लिहु देत नाही
डोक्यात बरेच येत असते
पण डोळ्यांना पाहु देत नाही.

सुचत असते पान उघडल्यावर
'हे'...'हे'...लिहायचे..
पण बसले एकदा लिहायला
की..ते-तेच का रहायचे..?

कुठे जातो विरुन एकदम
लेखनाचा अट्टाहास..?
का होतो मनात मात्र
लिहुन झाल्या सारखा भास?

या वैतागावर मी नक्की
उपाय काय शोधू..?
दुष्ट माझ्या या प्रतिभेला
कुठल्या तळातुन खोदू?

माहितीये मला तीही लाबाड
माझ्या इतकिच आळशी आहे.
खालच्या बाजुनी भोक पडलेली
ती पाण्याची कळशी आहे.

वरुन मेली भरलेली
ती कल्पनांशी जुळते
जमिनीवर टेकली,उचलली काय..
सारखी खालुन गळते.

म्हणुनच साला होत असतो
कल्पनांचा अव्याहत र्‍हास
साठा मात्र होत नाही
हाच आहे खरा त्रास...

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

प्रश्न- काय करावे या किड्याला?
उत्तर- पेस्ट कंट्रोल करुन घ्यावे.
अवांतर- या कंटकाचा रहिवास नेमक्या कुठल्या ठिकाणी असतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/