जर्मनी - स्वित्झर्लँड : लोक

१.तयारी | २.अन्न | ३.लोक | ४.वास्तव्य | ५.प्रवास व घटना | (६.समारोप)
----
फिरताना मला एक खूप उत्सुकता असते ती जिथे जातोय तिथल्या लोकांबद्दल. प्रत्येक भागातील लोकांच्या वागण्यात काही ठराविक लकबी असतात, सवयी असतात, काही वैशिष्ट्ये असतात. त्यात मला एकूणच माणसे बघायला आवडतात. त्यात जर्मनीत जिथे राहिलो त्या शहरांत, गावांत, उपनगरात अस्ताव्यस्त बागडायची संधी मिळाल्याने वेगवेगळ्या माणसांचे नमुने दिसले. त्यातीलच काही वेचक काही प्रमाणात वेधक व बर्‍यापैकी रोचक अशा व्यक्तींचे अनुभव इथे देतो आहेच त्याच बरोबर सामान्य लोकांचेही निरीक्षण मधूनच डोकावेल.

जर्मनीत शिरल्या शिरल्या सारे जग उंच आहे आणि आपण तेव्हडे लिलिपुट त्यांच्या राज्यात फिरत असल्याचा फील येतो. स्त्रिया व पुरूष उंच असतातच व दरवाजे, खोल्यांची उंची, रेल्वेत हात धरायचे दांडे, रेल्वेडब्यात बॅगा ठेवायचे रॅक्स, दिव्यांची बटणे सारे काही आपल्या सामान्य सरावापेक्षा अधिक उंचीवरच असते. त्यामुळे सुरवातीला सगळे जग आपल्याला खाली रोखून बघते आहे असे वाटत होते. इमिग्रेशन, कस्टम वगैरे सोपस्कार आटोपून आम्ही फ्रँकफुर्टात शिरल्यावर, सिमकार्ड बदलणे, सोबतचे ट्रॅवल कार्ड वापरून एटिएममधून पैसे काढणे वगैरे सोपस्कार पार पाडल्यावर आम्हाला 'फ्रँकफुर्ट कार्ड' घ्यायचे होते (हे घेतले की पुढील २ दिवस फ्रँकफुर्टातील - व परिसरातील सर्व प्रवास त्यात कव्हर होणार होता). ते टूरिस्ट इन्फर्मेशन सेंटरला मिळते हे माहिती होते. पण ते सेंटर कुठे आहे हे मात्र शोधावे लागणार होते. आणि आमची जर्मनांबरोबर संभाषण करायची वेळ अपेक्षेपेक्षा बरीच लवकर आली. आम्ही भल्या सकाळी पोचल्याने कित्येक दुकाने उघडलेली नव्हती. त्यामुळे तिथेच उंडारणार्‍या जन्तेला विचारणे भाग होते. अनेकांना विचारूनही कोणालाही इंग्रजी येत नव्हते (का बोलायचे नव्हते कोणास ठाऊक?), शेवटी मेघनाने पाठवलेल्या पीडीएफमध्ये डोके खुपसून धीर करून एकाला पत्ता विचारला. तर तो हसायला लागला आणि अस्खलित इंग्रजीत त्याने डायरेक्शन्स दिली (माझे जर्मन बोल बरोबर होते की नव्हते हे गुलदस्त्यातच राहिले, पण बहुदा अधिक अत्याचार नको म्हणून त्याने आपले इंग्रजी बाहेर काढले ;)). पुढे मात्र पत्ता माहीत असल्याने हॉटेलात ट्रेन, ट्राम वगैरे बदलत बदलत विनासायास पोचलो. आमच्या पाठीवरच्या मोठाल्या सॅक, की अशा सॅक घेतलेल्या इंडियन व्यक्ती, की अशा सॅक घेऊन ट्राममधून प्रवास करणारे प्रवासी; तेथील लोकांनी बघितले नसावेत की काय कोण जाणे - पण मंडळी आमच्याकडे वळून वळून बघत होती.

हॉटेलात सामान टाकून, खाऊन बाहेर पडलो आणि पाठीवर सामान नसताना तेच शहर वेगळेच दिसू लागले. पुन्हा मुख्य शहरात आलो आणि सोबत आणलेल्या मॅपवरून वेगवेगळी ठिकाणे बघू लागलो आणि जसजसे आत शिरत गेलो जर्मन लोकांना निरखत गेलो नवा जर्मन समोर येत गेला. एक रस्ता क्रॉस करायला उभा होतो. शेजारी दोन आज्या काठ्या टेकत येऊन उभ्या राहिल्या. बराच वेळ सिग्नल पडेना, शेवटी त्यापैकी एक आजी नी आमची नजरानजर झाली. त्या आजीबाईंनी बहुदा त्या सिग्नल्सबद्दल आमच्याशी बोलायला सुरुवात केली असावी. मला अर्थातच एकही शब्द कळला नाही. पण आजी माझ्या प्रतिक्रियेची वाट न बघता काहीतरी हातवारे करत सांगत होत्या. मला जर्मन येतेय की नाही, मी पर्यटक आहे की तिथलाच आहे याची पर्वा करायची गरजही त्यांना वाटत नव्हती. मलाही गंमत वाटत होती. मी नुसताच मंद स्मित देत उभा होतो. इतक्यात सिग्नल पडला. आजीबाई काठी टेकत तुरुतुरु पुढे गेल्या. आम्ही एक चर्च बघून बाहेर आलो तोवर त्याच आजी वर बघत एकट्याच बोलत उभ्या होत्या. नीट बघितले तर समोरच्या इमारतीत तिसर्‍या मजल्यावरील आपल्या मैत्रिणीशी खाली रस्त्यावर उभं राहून मुक्तकंठाने (अगदी कमरेवर हात वगैरे ठेवून) साभिनय गप्पा चालू होत्या. आम्ही समोरच्या एका बाकड्यावर बसून त्या गप्पा 'बघू' लागलो. आपल्या चाळीत अशा खाली नळावर ताटकणार्‍या बायका नी वर कपडे वाळत घालणार्‍या बायकांतील प्रेमळ संवाद अनेकदा ऐकले आहे. त्याचीच जर्मन आवृत्ती मोठी रोचक होती. दोघी खिदळत होत्या, डोळे वटारत होत्या. काही वेळातच तिसरी शेजारीणही दुसर्‍या मजल्यावरच्या खिडकीत आली नी यांच्या 'त्रि-स्तरीय' संवाद सुरू झाला. इतक्यात एक पोरगा (उंचीवरून वय कळणे कठीण) आजीच्या बाजूने जात होता. तिच्या ओळखीचा असावा. दोघांमध्ये काहीतरी बोलणे झाले. तर त्या आजीने त्या पोराच्या कुल्ल्यावर चापटी देऊन "चल लबाड, टळ इथून" सारखी एक्सप्रेशन देत काहीतरी बोलल्या मुलगाही खट्याळ एक्सप्रेशन देत पळून गेला. एकूणच मोठा 'मराठमोळा'सीन जर्मनमधून चालला होता.

जर्मन मंडळींचे खुलेपण आम्हाला वारंवार जाणवू लागले. हेडलबर्गला फनिक्युलर रेल्वेतून डोंगर माथ्यावर जाण्यासाठी थांबलो होतो. तिथे आमच्या सोबत दोन जर्मन कुटुंबे गाडीची दारे उघडायची वाट बघत होती. तिथे पहिल्यांदा आमच्या लक्षात आलं की आतापर्यंत जितकी जर्मन कुटुंबे बघितली आहेत ती सगळी किमान दोन मुलांसकट आहेत. त्यापैकी एकाला तुटके इंग्रजी येत होते. त्याने आपणहून चौकशी केली. इंडिया - ताज - नमस्ते - गौरीच्या डोक्यावरील टिकली या लाइनवर अगदी प्रेडिक्टेबल चर्चासंवाद घडून गेल्यावर इतर "खर्‍या" गप्पा फुलू लागल्या. आम्हाला एक मुलगी आहे हे समजल्यावर लगेच तिच्या फोटोची मागणी झाली. "सो क्युट" चे जर्मन चित्कार झाले. एकूणच त्या ग्रुपमधील बायकांना बरीच उत्सुकता होती, नी या पठ्ठ्याचे भाषांतर करताना नाकी नऊ येत होते. मात्र एक खास जाणवत होते की जर्मन स्त्री व पुरूष दोघेही कुटुंबवत्सल आहेत. आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन फिरणे, त्यांच्यासोबत क्वालिटी वेळ घालवणे सर्रास दिसते. कित्येक बाप आपल्या पोरांना डोक्यावर/कडेवर घेऊन तिथल्या म्युझियम्समध्ये प्रत्येक वस्तूबद्दल, स्थळाबद्दल काहीतरी समजावताना दिसतात, मुलांना घेऊन 'घोडा-घोडा' करणारे बापच काय आयासुद्धा इथल्या पार्कांमध्ये बघायला मिळाल्या. आजवर मी बघितलेल्या पाश्चात्त्यांत आणि जर्मनांत अजून एक मोठा फरक असा की हे मुलांना 'कडेवर' घेतातच, शिवाय एकूणच मुलांबद्दलचा बाऊ फारसा नसतो. मुलांचा गालगुच्चा घेतलेला, रस्त्यात भेटलेल्या शेजारणीने मुलांच्या केसांवर सहज असा हात फिरवलेला वगैरे क्रिया दिसणे फार कठीण नव्हते. (आम्रविकेत असे नव्हते. इतरांच्या मुलांशी जीभ वेडावून खेळणे सोडाच, त्यांच्या मुलांना स्पर्श केलेलाही आवडायचे नाही तिथे. शिवाय मुलांना बाबागाडीत टाकले नी चोखणी दिली की पालक उंडारायला तिथे मोकळे असायचे.) इथे आम्ही त्या फनिक्युलर रेल्वेने डोंगरावर गेलो होतो. तिथे एका टोकावर बसायला एक लाकडी ओंडका टाकलेला होता, नी तिथून ३-४ फुटांवर दरी होती. तिथे आमच्याच बरोबर आलेल्या कुटुंबातील ४-५ वर्षांचे एक मुलगा व मुलगी मस्त बागडत होते. इतक्या खोल दरीच्या इतक्या जवळ खेळणार्‍या मुलांकडे पालकांचे लक्ष होते पण सारखे अरे इथे जाऊ नकोस, हे करू नकोस, तिथून आताचा आता मागे हो असे काहीही ओरडणे नव्हते. ती मुलगी दरीच्या अगदी जवळ गेल्यावर तिला हाक मारताच तीही हट्ट न करता मागे आलेली बघून मात्र मी थक्क झालो! (माझ्या डोळ्यापुढे साध्या प्राणिसंग्रहालयामध्ये सुद्धा मोकळ्या प्राण्यांमध्ये पोरांना सोडले आहे अशा आकांताने पोरांना जपणारे आपले पालक नको नको म्हणत असताना डोळ्यासमोर येत होते. अर्थात आपली हात पाय झाडत थयथयाट करणारी पोरेही तिथे दिसली नाहीत म्हणा. मात्र नक्की कसली उपज कशातून झाली आहे हे कसे समजावे? Wink )

डोळा या अवयवाचा उपयोग बघण्याबरोबर संभाषणासाठी जर्मनीत बरेचदा करावा लागला. याचे मुख्य कारण भाषा नी आपली काहीश्या चढ्या सुरात बोलायची सवय. अनेकदा असे व्हायचे की बसमध्ये, ट्रेनमध्ये, ट्राममध्ये मी व गौरी बसलो असायचो व समोर दुसरे जोडपे. सुरवातीच्या जुजबी बोलण्यावरून बहुतेक वेळा एकमेकांच्या भाषा येत नाहीत हे स्पष्ट होई. अशावेळी मग खाणाखुणा आणि एखाद्या इंग्रजी शब्दाची पेरणी हाच मार्ग उरे. अशावेळी गौरी मला किंवा मी गौरीला आपल्या नेहमीच्या आवाजात (जो त्यांच्यासाठी काहीसा मोठा आवाज होता) मराठीत बोललो की त्यांना आमच्यात आर्ग्युमेंट झाल्याचा संशय येई बहुदा. मग त्यातील पुरूष मला किंवा बाई गौरीला डोळा मारून "लग्नात हे चालायचेच!" अशा अर्थाचे किंवा "तुमच्यातही हे असे चालते तर!" अशा अर्थाचे भाव उमट(व)त. मग आपणही डोळ्याला डोळा परतवून त्याला प्रत्युत्तर द्यावे लागे. डोळ्याच्या भाषेचा असा उपयोग करण्याचा योग बर्‍याच काळाने आला हे मात्र खरे!

हेडलबर्ग हे युनिव्हर्सिटी टाऊन असल्याने तेथील रंगत, 'जान' काही औरच आहे. मुळात हे शहर अगदी लहानसे, त्यात एकच मुख्य रस्ता. संध्याकाळ झाली की तो असा काही रंगात यायचा की बस्स! नशिबाने आम्ही तिथे होतो तेव्हा संध्याकाळीसुद्धा पाऊस नव्हता. हवाही सुखद होती. लगेच हाटेलांच्या बाहेर टेबले लागली होती. जवळ जवळ प्रत्येकाच्या हातात एक टंपर भरून बियर होती. काही वेळात नाक्यानाक्यावर मित्रांची टोळकी हास्य विनोदात बुडू लागली. अगदी आपल्यासारखे टाळ्या दे, एकमेकांची भंकस कर, खोड्या काढ सारखे प्रकार चालू होतेच. लहान मुले तर सार्वजनिक कारंज्यात उतरून पाण्यात खेळत होती (नी त्यांचेही पालक त्यांना ओरडत नव्हते). काही वेळात तेथील चौकात काही वादक जमले आणि मग त्यांनी गिटार अतिशय उत्तम प्रकारे वाजवायला सुरुवात केली. आणखी मंडळी जमली. ड्रमरने साथ सुरू केली. काही वेळात बर्‍यापैकी लोक जमल्यावर त्याने एक कायसेसे उडत्या चालीचे गाणे सुरू केले. ते बहुदा खूप प्रसिद्ध गाणे असावे, समोरच्या बर्‍याच लोकांना येत होते. मग सगळा जमाव गाऊ लागला. तो विनामूल्य चालू असलेला मोहक दंगा इतका विलक्षण होता की त्या ठेक्यावर एकमेकांसोबत झुलायला परिचयाच्या ठिगळांची अजिबात गरज नव्हती नी वातावरणातील कैफ अजमावायला हातातील बियर निव्वळ कारणमात्र होती, आमच्यासारख्या 'कोरड्या'ना त्या वातावरणात भारून चिंब करण्याची जादू त्या शहराने साधली होती!

इथे भेटलेल्या लोकांमध्ये तेथील स्थानिकांसारखेच जगातील वेगवेगळ्या भागांतून आलेले पर्यटकही होते. काही आमच्यासारखे एकटे-दुकटे फिरणारे हॉस्टेलकर होते तर काही बसमधून फिरणारे कळपातील समाजशील प्राणी होते. अर्थातच समाजशील प्राण्यांमधे आढळणारे गुणावगुण त्यांनाही लागू होतेच. हेडलबर्गला आम्ही सकाळी नाश्त्याला बाहेर पडलो होतो तेव्हा आम्हाला एक ग्रुप दिसला,तो भारतीयांचा आहे हे समजायला जवळ जाण्याचीही गरज नव्हती. त्यांच्या टूर कंपनीने भल्या सकाळी अगदी थंड पडलेल्या शांत हेडलबर्गला आणले होते. (खरे हेडलबर्ग म्हणजे फक्त किल्ला, नदी, फनिकुलर रेल्वे नाही हे आम्ही आदल्या रात्रीच्या तुफान गात्या-नाचत्या मजेनंतर समजून चुकलो होतो. त्यामुळे इथे संध्याकाळी न आणणार्‍या टूर कंपनीची अधिकच चीड आली). त्यात ती मंडळी पुढे गेल्यावर आम्ही नदीकिनारी जात होतो तर वाटेत 'लेज्' आणि 'बुमर' ची पाकिटे पडलेली दिसली. त्यावरील किंमत रुपयांत होती. अतिशय वाईट वाटले. अशी मंडळी भारताचे नाव खराब करतात का? इतर देशांतील पर्यटकी असे वागतात का? वगैरे माहिती नाही पण उगाच खजील वाटत राहते हे खरे.

स्टुटगार्टच्या शोल्स प्लात्झवर आम्ही असेच फिरत होतो. एकमेकांचे फटु काढणे चालले होते. इतक्यात दोन आज्या जवळ आल्या नी काहीतरी बोलू लागल्या. आम्हाला अर्थातच काही समजले नाही. मग माझ्या हाताकडे बोट दाखवून काहीतरी मागू लागल्या की काही तरी द्यायचे होते काही समजेना.
"नो वी डोन्ट वॉन्ट एनिथिंग" असे आम्ही त्यांना सांगू लागलो.
शेवटी त्यापैकी दुसर्‍या कांकूंनी माझ्या हातातील क्यामेरा धरला. "यू? फोटो?" असे विचारले. मग आमच्या भांबावलेल्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आमच्या दोघांचा एकत्र फोटो काढू का? असे त्या विचारत होत्या. त्यांचे वय नी शक्ती बघता त्या क्यामेरा घेऊन आमच्याहून अधिक वेगात पळून जातील अशी शक्यता न वाटल्याने त्यांना क्यामेरा सुपूर्त केला व फटु काढून घेतला. असे आमचे आपणहून फोटो काढायला तयार असणारे, काही ट्राम स्टेशन्सवर तिकीट मशीन्सवर जर्मनीतच सूचना असल्यावर आपल्याला तिकिटे काढून देणारे, बस ड्रायव्हर आणि आपल्यामधल्या इंटरप्रेटरचा रोल आपणहून निभावणारे अनेक अज्ञात जर्मनीकर भेटले. जर्मनीला जाण्यापूर्वी "गोर्‍या नसलेल्या लोकांशी जर्मन्स बोलत नाहीत" किंवा "हीन नजरेने बघतात - बोलतात" वगैरे माहिती काही तिथे (टूर सोबत) जाऊन आलेल्यांनी दिली होती. किमान आम्हाला तसा अनुभव आला नाहीच उलट अत्यंत सलगीने व उबदार वागणुकीचाच अनुभव सर्वत्र आला.

स्वित्झर्लँडमध्ये इंटरलाकेनला आम्ही शहराहून दूर बसने उगाच फिरायला गेलो होतो. दुरून एक बोट येताना दिसली. ती पकडण्यासाठी पोर्टचा रस्ता माहिती नव्हता. विचारायला काळं कुत्रंच काय, कोणत्याही रंगाचा कोणताही प्राणी नव्हता (आणि दिसला असता तरी भाषेचा उपयोग किती झाला असता हा प्रश्न अलाहिदा). मग आम्ही नाकासमोर खाली उतरणार्‍या गल्लीतून खाली धावत जायला सुरुवात केली. अगदी लहान गल्ल्यांतून जात असताना, तिथे जाग नव्हती असे आम्हाला म्हणता येऊ नये या उद्देशाने बसलेले एक भले थोरले मांजर समोर आले. ते बरेच मोठे होते. त्याला बघून गौरी थबकली. ते गौरीला बघून थबकले. या गडबडीत बोट आहे का गेली हे ही समजेना. त्या मांजरीला हाकलले तरी समोर एक कुंपण होते. त्या कुंपणामागे एक हॉटेल होते नी त्याच्या मागे कदाचित बोट असण्याची शक्यता होती. आम्ही उडी मारून कुंपण ओलांडले नी बघितले तर खरंच हॉटेलसमोरच बोटीचा पोर्ट होता. मात्र तोवर बोट सुटली होती, नांगर काढला होता, बोट हालली होती. आतील एका स्टाफशी माझ्यासोबत नजरानजर झाली. आम्ही धावत येताना बघून त्याने खुणेनेच आम्हाला विचारले की यायचंय का? आम्ही हो म्हटल्यावर - मान/हात हालवल्यावर त्याने कसलासा भोंगा वाजवला. सगळा स्टाफ डेकशी धावला. बोट पुन्हा मागे वळवली, दोर्‍या टाकल्या गेल्या, शिडी/ब्रिज टाकला गेला नी बोट मागे का वळली हे बघायला सगळे प्रवासी अप्पर डेकला जमले होते. आम्हाला बोटीत शिरताना एकदम सेलेब्रिटी असल्यासारखे फिलिंग येत होते. सगळे आमच्याकडे बघत होते, आमच्यासाठी बोट मागे वळवली होती. बाकी काही असो, स्विस लोकांच्या या गेश्चरने आत कुठेतरी सुखावलो हे नक्की.

सतत बॅगा उचलून की काय माहिती नाही पण ट्रीपच्या उत्तरार्धात गौरीचा एक खांदा दुखू लागला होता. सोबत असलेल्या क्रीमने, पेन किलर्सने उपयोग होईना. बाझेलला ती आराम करत असताना मी जवळच्याच एका मेडिकल शॉपमध्ये गेलो होतो. तिथल्या एका कर्मचारी मुलीला मी बायकोच्या दुखण्याबद्दल सांगितलं. तिथे एक-दोन स्प्रे व काही क्रीम्स सुचवली. त्या स्प्रे व/वा क्रीम बरीच मोठी होती. व त्यामुळेच बरीच महागही. मी माझी अडचण तिला सांगितली, म्हटलं मी दोन-चार दिवसच जर्मनीत आहे - शिवाय बजेट ट्रीपवर आहे, तर या क्रीमची लहान ट्यूब मिळेल का? तर तिने "ओ यू आर हॉस्टेलर?" विचारले म्हटलं हो "तर ती आतून जाऊन दोन वेगळ्या ट्यूब घेऊन आली. "टेक धिस. इट्स फ्री ऑफ कॉस्ट अ‍ॅन्ड हॅव सेम इफेक्ट". तिचे आभार मानून बाहेर आलो. आता मी हॉस्टेलर होतो म्हणून की काय माहिती नाही पण त्यांचं असं आपणहून फ्री ट्यूब देणंही सुखावह होतं.

बाझेलमध्ये आम्ही एक सिटी टूर घेतली होती. स्वीसपासमध्ये ती चकटफू असते हे आम्हाला आयत्यावेळी कळल्याने आनंद झाला होता. या टूरच्या कार्डावर एका मोहक तरुणीचा गाईड म्हणून फोटो होता. टूर इंग्रजी व जर्मन अशा दोन भाषांमध्ये होती. दिलेले ठिकाण (टिंग्वेलि फाऊंटन) शोधून आम्ही वेळे आधीच पोचलो होतो. तिथेही कित्येक स्थानिक दुपारच्या जेवणानंतर फिरायला आले होते, काही खात होते, मुले पाण्यात हात घालून खेळत होती. इतक्यात हातात कार्ड व गळ्यात आयकार्ड असलेली एक बाई आली. तरुण वगैरे अजिबात नव्हती मात्र 'गोड' बुटकीशी म्हातारी. आपलं नाव तिने सँड्रा असं सांगितलं. आमच्या ग्रुपला एकत्र केलं. आमच्या ग्रुपमध्ये एक जर्मन आजीबाई, दोन जर्मन तरुणी व आम्ही दोघे होतो. शिवाय एक तरुण शिकाऊ गाईड होती. सँड्रा लवकरच रिटायर होणार होती. आमची गाईड मजेशीर होती, छान नी भरपूर बोलायची इच्छा, ऊर्जा आणि आवड तिच्याकडे होती. प्रत्येक स्थळाबद्दल इतकी आवडीने बोलायची की त्या स्थळाबद्दल आपणही विचार करायला लागू. या फाऊंटनचे वैशिष्ट्य असे की त्या जागी जुने थिएटर होते. ते पाडून अधिक मोठे थिएटर नंतर बाजूलाच बांधले गेले, मात्र या फाऊंटनच्या जागी रंगमंच होता. त्या थिएटरच्या पार्ट्सचा वापर करून हे कारंजे बनवलेले होते. आणि मग आजीबाई भूतकाळात शिरल्या. या कारंज्याचा कोणता भाग कोणत्या नटाला, दिग्दर्शकाला, निर्मात्याला, नर्तकाला, गायकाला वगैरे समर्पित आहे हे त्या सांगू लागल्या नी त्यांची गाजलेली नाटके वगैरेबद्दल भरभरून बोलू लागल्या. "गेले ते दिन गेले" ही बोच इतकी वैश्विक आहे की मी काय सांगावे. त्या दिवसाबद्दल बोलताना गाईड खरेच हळवी झाली होती की ती स्वतः उत्तम अभिनेत्री होती सांगता येऊ नये, पण ते थिएटर तिथे असतानाचा खूप सुंदर आठवणींचा ठेवा शहराने गमावल्याची खंत तिच्या बोलण्यातून सतत दिसत होती. नी हे काळाच्या ओघात बासेलमधील विविध इमारतींत आलेले बदल समजावताना हाच भाव अनेकदा डोकावला. एका कॅथेड्रममध्ये "रेनिसान्स" नंतर केले गेलेले बदल सांगता काय-जगबुडी-आली छाप भाव मी कधीही विसरणार नाही. बासेलमध्ये मार्केटप्लास नावाचा रस्ता जुन्या काळातील नाला बुजवून केला आहे. मात्र तिथे काही शतके जुन्या इमारती आहेत. त्यापैकी २-४ इमारतींच्या जागी नवी ऑफिसेस आली आहेत - ती ही दिसायला साधारण सारखीच आहेत. खरंतर एरवी आमचं लक्षही गेलं नसतं , मात्र "हे बघा त्यांची छपरे बघा बाकी जुन्या इमारतींशी कशी विसंगत नी कुरूप आहेत" म्हणून लक्ष वेधल्यावर मात्र आम्हालाही खरोखरच जुन्यातील सौंदर्य अधिक प्रकर्षाने दिसू लागले. सँड्राला आपला जॉई संपतोय हे ही कुठेतरी जाणवत असावं. नवी गाईड माहिती 'उरकायच्या' मागे होती, तर सँड्राला "माझ्या या शहराबद्दल किती सांगू नी किती नको" असं झालं होतं. कित्येक शब्दांना "आमच्या या या जर्मन बोलीत" असं म्हणतात वगैरे ती बोलायची. त्यातील "आमचे"पण काही केल्या ओसरत नव्हतं. पुलं म्हणतात तो "साली ती सा नंबरची ट्राम ठेवायला पाहिजे होती" मधल्या कळवळ्यासारखाच "हातातून वाळू निसटावी तसा जुना ठेवा, जुना काळ निसटत आहे आणि आपण काही करू शकत नाही" अशी हतबलतेची म्हणा, जुन्याबद्दलच्या प्रेमाची म्हणा, 'आपल्या' काळातील उत्तम-उदात्ततेला नव्या पिढीने दाद न देण्याची म्हणा ही भावना सतत डोकावत होती. माझ्यासाठी ती म्हातारी गाईड जुन्या सरत्या संथ तरीही चवीचवीनं जगलेल्या काळाचं प्रतीक होऊन बसलीये. तिची आठवण झाली तरी मत काही क्षण कातर होतं!

(क्रमशः)
---
१.तयारी | २.अन्न | ३.लोक | ४.वास्तव्य | ५.प्रवास व घटना | (६.समारोप)

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

बाकिचे फुरसतीत वाचून सांगतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लेख नीट सावकाश चवीचवीने वाचला आणि तितकाच मस्त आवडला. फटू नसले तरी चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले. मागच्या लेखाप्रमाणेच हाही लेख एकदम फक्कड जमला आहे! पुढील भागाच्या आतुरतेने प्रतीक्षेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेख आवडलाच.

त्यातील "आमचे"पण काही केल्या ओसरत नव्हतं. पुलं म्हणतात तो "साली ती सा नंबरची ट्राम ठेवायला पाहिजे होती" मधल्या कळवळ्यासारखाच "हातातून वाळू निसटावी तसा जुना ठेवा, जुना काळ निसटत आहे आणि आपण काही करू शकत नाही" अशी हतबलतेची म्हणा, जुन्याबद्दलच्या प्रेमाची म्हणा, 'आपल्या' काळातील उत्तम-उदात्ततेला नव्या पिढीने दाद न देण्याची म्हणा ही भावना सतत डोकावत होती. माझ्यासाठी ती म्हातारी गाईड जुन्या सरत्या संथ तरीही चवीचवीनं जगलेल्या काळाचं प्रतीक होऊन बसलीये. तिची आठवण झाली तरी मत काही क्षण कातर होतं!

ही वाक्य आवडली खूप. एखाद्या म्हातार्‍या माणसाला स्मरणरंजनात गुंगलेलं पाहण हा फार सुंदर प्रकार असतो असं माझं मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अगदि नेमक्या शब्दात वर्णन केलंय. मला धडकी भरते कधी की अजून काही वर्षानी मला माझा जुना ठेवा, जुना काळ आठवणारच नाही. नव्या जमान्यात दिवस काढताना भूतकाळात रमणं चार घटका तरी सुखावह करेल. तेही हातातनं गेलं तर नुसता आला दिवस काढणं या पलीकडे हाती काहिहि नाही.

ऋषिकेश, तुझ्या या सुंदर उतार्‍याने मी भलत्याच ट्रॅकवर गेलोय.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

वाह! मजा येतेय. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मस्त लिहीलय _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

हिटलरबद्दल काही विशेष अनुभव?

हिटलरबद्दल जर्मनांपाशी सहसा काही बोलू नये, हळवा प्रांत, अशी एक जनरल दटावणीवजा सूचना असते. पण आमच्या हापिसातला एक रोचक अनुभव अगदी वेगळा. सांस्कृतिक आदानप्रदानाबाबत अत्यंत वरवरचं असं एक सेशन भारतीय आणि जर्मन सहकार्‍यांसाठी घेण्याची पद्धत असते. अशा एका सेशनमधे मी एक प्रश्न विचारायला म्हणून सुरुवात केली. पण त्याचा महायुद्ध आणि तत्सम दिशेशी असलेला संबंध जाणवून गप्प बसले. तर त्या जर्मन पठ्ठ्यानं मला सेशननंतर गाठलं. 'हां, काय विचारत होतीस...' असं. मग मीही सांगितलं स्वच्छ, अमुक विषयावर तुमच्याशी बोलायचं नाही, असं आम्हांला सांगतात. म्हणून मी गप्प बसले. तर म्हणे: छे, छे! तसं काही मनातही आणू नकोस. ते वीसेक वर्षांपूर्वीचं. आता आमच्या शालेय शिक्षणात अंतर्भाव असतो, हिटलर आणि त्यासंबंधी अपराधीपणाशी डील कसं करायचं या अभ्यासाचा. शिवाय 'प्रश्न विचारा' असं आम्हांला दामटून शिकवतात. प्रश्न न विचारण्यामुळेच हिटलर प्रकरण घडलं, असं मानतात, म्हणून. तर... नि:संकोच विचार...'

जर्मन गिल्टबद्दल मी वाचलं होतं. पण हा प्रत्यक्ष अनुभव अधिक रोचक आणि लक्षात राहिलेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

नाही अनुभव नाही. मलाही असंच सांगितलं गेल्याने (डखाऊ ट्रीपच्या गाईडनेही असंच सांगितलं की त्याबद्दलच्या आठवणी जर्मनांना आवडत नाहित) त्यामुळे शक्य असुनही तो विषय काढला नाही.

मात्र युद्धामुळे आपलं (एकुणच युरोपचं) किती नुकसान झालंय ही भावना अनेकदा दिसली. हेडलबर्गचा पडलेला बुरुज असो वा ठिकठिकाणी जुन्या इमारतींचे चाललेले रिस्टोरेशन असो, छ्या! युद्ध झालं नसतं तर चा भाव सर्वत्र होता.

शेवटी म्युनिकला ज्या कुटुंबासोबत राहिलो होतो, त्या बाईची मुलगी आर्किटेक्चर शिकतेय स्विसला (तिच्याशी भरपूर गप्पा झाल्या - त्याबद्दल 'वास्तव्य' मधे येईलच)तिच्याशी एकुणच स्विस घरांबद्दल बोलताना "स्विला एक बरंय, तिथे बॉम्ब पडले नाहित, त्यामुळे सगळी जुनी घरं पिढ्यान्-पिढ्या जपता आली, आमची घरंच काय माणसंही जपू शकलो नाही" अश्या अर्थाची खंत निसटलीच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मिपावरील निनाद -- मु पो जर्मनी ह्या आय डी चं लै वर्षापासून जर्मनीत वास्तव्य असल्याचं दिसतं.
त्यांच्या मिपावरील लिखाणातून जर्मन वातावरणाबद्दल जाणवलेला सूर असा होता की निदान त्यांना प्रौढ मंडळी तरी
हिटलरबद्दल बोलण्यास अनुत्सुक होती. कधीमधी तिकडं जाणं झालच, तर जर्मनांशी बोलण्यासारखे इतर लै विषय असतील;
हा विषय स्वतःहून काढायचा नाही; असं मी स्वतःला सांगितलं.

थोडक्यात, मेघनाला सेशनपूर्वी दिलेला डोस आणि निनादरावांचे अनुभव ह्यात साम्य जाणवतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

निनादला भेटायचं ठरलं होतां पण ऐनवेळच्या मोबाईल सिम बिघाडाने ते जमु शकलं नाही Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

युद्धामुळे आपलं (एकुणच युरोपचं) किती नुकसान झालंय ही भावना अनेकदा दिसली. हेडलबर्गचा पडलेला बुरुज असो वा ठिकठिकाणी जुन्या इमारतींचे चाललेले रिस्टोरेशन असो, छ्या! युद्ध झालं नसतं तर चा भाव सर्वत्र होता.
..............या वाक्यामुळे व त्याआधीच्या चर्चेमुळे वाचकांचा 'महायुद्धात किल्ल्याचे नुकसान झाले' असा गैरसमज होऊ शकतो, म्हणून बारीक सुधारणा -

किल्ल्याचे नुकसान तीन वेळा झाले. दोनदा वीज पडल्याने व एकदा युद्धामुळे. त्यातले युद्ध हे १६८८-७९ साली फ्रेन्चांबरोबर सुरू झाले होते.
याउलट, महायुद्धात हाइडेल्बर्गवर बॉम्बहल्ला न होण्याची (करण्याची) काही कारणे आहेत. गूगलून मिळतील.
----
विकीवरून सनावळी :
1537: destruction of the upper castle by lightning-bolt.
...
...
1688/1689: destruction by French troops.
1693: renewed destruction in the Palatinate succession war.
1697: (start) reconstruction.
...
...
1764: destruction by lightning-bolt.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत आहे.

- "लुक हूज बॅक" हे पुस्तक सध्या जर्मनीत बेस्टसेलर आहे म्हणे.

- आमच्या क्षेत्रातलं बैबल समजलं जाणारा ग्रंथ क्लाऊस व्होगेल नावाच्या जर्मनाने लिहिला आहे. काही कारणाने त्यावर प्रचंड टीका चालू आहे. त्यावर टिप्पणी करताना आमच्या एका जर्मन प्राध्यापकाने "We Germans have given lots of legacies to the world, many of them dubious. The world seems to be divided on this (book), but (पॉज घेऊन) at least it didn't kill anyone!" अशी मल्लीनाथी केली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

एकदा आमचे काही जर्मन मित्रमैत्रिणी जेवायला घरी आले होते. नंतर गप्पाटप्पा करताना नाझींचे स्वस्तिक आणि भारतीय स्वस्तिक यांच्यातल्या साम्यफरकाची चर्चा चालू होती म्हणून नवर्याने एका पेपर टॉवेलवर भारतीय स्वस्तिक चितारून दाखविले, चर्चा संपल्यावर जर्मन मित्र तातडीने तो टॉवेल बारीक फाडून कचर्यात टाकून आला आणि डोळे मिचकावून म्हणतो कसा "तुझ्या शेजार्यांच्या हातात पडला कागद तर म्हणतील..काल जर्मन जेवायला आले आणि काही खलबतं करत होते!"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हॉटेलात सामान टाकून, खाऊन बाहेर पडलो आणि पाठीवर सामान नसताना तेच शहर वेगळेच दिसू लागले.

Smile हा भाग आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडला हा भाग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान भाग. आधीच्या भागांपेक्षा जास्त आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. छान चालली आहे लेखमाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा भागही आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला चांगले लोक भेटले आणि तुम्हाला ट्रीपमध्ये मजा आली हे वाचून छान वाटले. पण माझा स्वित्झर्लँडचा अनुभव तितकासा चांगला नाही. (ऑपरा विनफ्रीच्या अनुभवासारखा).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्विस लोकांबद्दल फार जास्त अनुभव नाहित. एकतर आम्ही तिथे चारच दिवस होतो. पैकी २ दिवस बासेलला (जिथे कोअर स्वीस लोकांपेक्षा जर्मन व फ्रेंचांचा भरणा अधिक). उरल्या पैकी ग्रॅफेनॉर्ट हे इतकं छोटं खेडं होतं की आम्हाला फक्त एक माणूस दिसला Biggrin

तर इंटरनाकेनला पर्यटकच इतके होते की त्यांना बघुनच कंटाळा आला.

बाकी तुमच्या ब्लॉगवर म्हटलंय तसंच आम्हीसुद्धा "Coop" झिंदाबाद करत होतो, अपवाद इंटरलाकेनचा बर्गर जॉईंट तुलनेने स्वस्तही होता आणि मस्तही Smile

बाकी स्विस प्र चं ड महाग आहे व तेथील प्रसिद्ध ठिकाणी टुरिस्टांचा नको तितका बुजबुजाट आहे याच्याशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खुप सुंदर अनुभव Smile

काही वेळात बर्‍यापैकी लोक जमल्यावर त्याने एक कायसेसे उडत्या चालीचे गाणे सुरू केले. ते बहुदा खूप प्रसिद्ध गाणे असावे, समोरच्या बर्‍याच लोकांना येत होते. मग सगळा जमाव गाऊ लागला.

हे वाचून ते इमॅजीन करून खुपच हेवा वाटला, छान वाटलं Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"हे वाचून ते कल्पून पाहिल्यावर खूपच हेवा वाटला, छान वाटलं " असं म्हणायचय का ? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

होय रे होय तेच म्हणायचं होतं Smile (मनकवडा मनोबा Biggrin )

"कल्पून" शब्दाचा वापर करणार होतो पण का कोणास ठाऊक खूपच नाटकी वाटत होता तो शब्द, म्हणून जो शब्द अगदी मनापासून तोंडावर आला त्याचाच वापर केला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आणि त्यातली निरीक्षणं आवडली. सहज खुलेपणा, माणसांशी अधिक संवाद आणि तदनुषंगाने येणार्‍या बर्‍या-वाईट गोष्टी या बाबतीत युरोप शेवटी 'जुन्या जगाचाच' भाग असं बर्‍याचदा वाटत राहतं.

मग आपणही डोळ्याला डोळा परतवून त्याला प्रत्युत्तर द्यावे लागे. डोळ्याच्या भाषेचा असा उपयोग करण्याचा योग बर्‍याच काळाने आला हे मात्र खरे!

हा हा, मस्त! 'अपूर्वाई'तला प्रसंग आठवला Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

... या बाबतीत युरोप शेवटी 'जुन्या जगाचाच' भाग असं बर्‍याचदा वाटत राहतं.

असा विचार केलाच नव्हता.

ऋ, हा ही भाग आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>>> खरे हेडलबर्ग म्हणजे फक्त किल्ला, नदी, फनिकुलर रेल्वे नाही हे आम्ही आदल्या रात्रीच्या तुफान गात्या-नाचत्या मजेनंतर समजून चुकलो होतो.
असल्या वाक्यांनुसार आपण खरोखर जर्मनी पाहीली असे समजते. खरे पर्यटन हे त्या त्या ठिकाणाशी एकरूप झाल्यानंतरच समजते. तसे न केल्यास केवळ तेथील प्रेक्षणीय स्थळांना भेट दिल्याचे समाधान मानावे.

आणखी एक. या लेखमालेत फोटो नसल्याने वाचकांनाही त्यांच्या मगदूरानुसार 'कल्पता' येते.

फक्त पर्यटनाचे ढिगभर फोटो अन 'खुलभर वाक्ये' या असल्या कल्पनांना छेद देणारी एकुणच छान लेखमाला.

गंगाधर गाडगीळांच्या 'हिममय अलास्का' पर्यटनापेक्षा अनुभव चित्रीत करणार्‍या पुस्तकाची आठवण आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

छान चाल्लंय. प्रवासवर्णन म्हणजे टाईमटेबल व स्थळांची जंत्री किंवा प्रवासवर्णन म्हणजे प्रवासातल्या माझंच वर्णन असं नाही त्यामुळे वाचनीय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टाईमटेबल व स्थळांची जंत्री किंवा प्रवासवर्णन म्हणजे प्रवासातल्या माझंच वर्णन
हे असं असूनही वाचनीय असू शकत नाही काय ?
तसे नसणे हाच वाचनीयतेचा निकष आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

स्वतःचा जो प्रेफ्रन्स तोच स्वतःपुरता वाचनीयतेचा निकष असत नाही काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पूर्ण लेखमाला मस्त जमली आहे. अगदी निवांत वाचत आहे. फोटो टाकले नाही , हे बरच आहे असे वाटले. बाकी पुढच्या भागाची वाट बघतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कितीदा तेचतेच सांगाल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"अरे कीतीदा तेंच तेंच म्हणशील. तोपर्यंत तिचे लग्न होऊन तीस पोर देखील झाले असेल." !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

तीस पोर????

कलियुगातली गांधारीच म्हणावी लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

....तीस पोरं... असं नाही रे बाबा ते. बाय द वे, सध्याच्या काळात, म्हणजे गेल्या दोनेकशे वर्षात धर, १९ मुलं ऐकली आहेत. तीस अगदिच अशक्य नाही वाटत....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

जे काय असेल ते एकदाच सांगावे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पुनरुक्त प्रतिसाद हटवले आहेत Wink

(सोयीस्करपणे जोक न समजणारा व्यवस्थापक Blum 3 ) ऋ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आता ही चार वेळा पोस्ट झालेली प्रतीक्रीया डीलीट कशी करायची?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या चारपैकी कुठल्याही तीन संपादित करून तिथे प्रकाटाआ/डुकाटाआ असं लिहा.
म्हणजे न.बा. 'कीती वेळा सांगताय की प्रतिसाद काढला आहे' असं म्हणायला मोकळे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

प्रतिक्रीयांबद्दल आभार!
(प्रतिसादकांना त्या मिटवता येत नाहित म्हणून संपादकीय राईट्स वापरून) पुनरुक्त प्रतिक्रीया मिटवल्या आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सगळी लेखमाला आवडली, माहितीपण चांगली मिळतेय आणि तुमच्या (आणि आधीच्या भागात गौरीच्याही) नर्मविनोदी शैलीमुळे कुठेही रुक्ष होत नाहीये. सगळच्या सगळं तुम्ही नीट ठरवुन प्लान केलेली ट्रीप अधिकच आवडली. पुभाप्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उदाहरण देऊन कोणी विनोदी नि नर्मविनोदी मधील फरक विषद करेल काय?
नर्म काय असतं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्हाला जेव्हा Smile असं वापरावसं वाटेल ते नर्मविनोदी आणि Biggrin किंवा ROFL हे वापरावसं असेल ते विनोदी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

...थोडक्यात, 'सॉफ्ट' आणि 'हार्डकोअर'मधील जो फरक, तोच काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला नाही माहित या संज्ञांचे अर्थ. तुम्ही ते अर्थ विषद करा. मग मी सांगतो की तो तसाच फरक का.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आतून कडी लावून घेतल्यास ऑपॉप अर्थनिष्पत्ती व्हावी, असे सूचित करू इच्छितो.

(समझने वाले को, इ.इ. (चूभूद्याघ्या.))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी त्यातलाच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !