महाराष्ट्रातील आजचे आणि उद्याचे आश्वासक नेतृत्व कोणते ?

यात सामाजिक आणि राजकीय नावे एकत्रच देणार आहे. मी पर्याय दिलेला क्रम जसा सुचला/आठवला तसा आहे. मला सर्वलोक माहितही नाहीत. आपणही नावे सुचवू शकता या दृष्टीने शक्यतो चर्चा आधी करा आणि मग मतदान करावे.

कौलांमध्ये अधिकाधिक नावे किती घेता येतात माहित नाही. शक्य तेवढी घेण्याचा प्रयास असेल. काही कारणाने घेता आली नाही तर गैरसमज नसावा. असाच स्वतंत्र कौल काढण्याचा पर्यायही सर्वांना आहेच.

शक्यतो सहभागी सदस्यांनी आपापसात व्यक्तीगत टिका टाळावी. चर्चा शक्यतो ऐसी अक्षरेच्या लेखन संकेतांच्या मर्यादेत ठेवावी हे वेगळे सांगणे न लगे. नावांमधील र्‍हस्व-दीर्घाच्या चूकाही कळवा

प्रतिक्रिया

कुठल्या क्षेत्रात?
[नागनाथ कोतापल्ले Vs निखील वागळे Vs अण्णा हजारे] अशा कुस्त्या खेळताना कुठले निकष लावायचे?

माझ्याही मनात आयडीआ ढोबळ स्वरूपातच आहे म्हणूनच सुरवातीस मतदान करू नका असे म्हटले आहे. बरीच मंडळी अराजकीय वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतीक क्षेत्रातून आहेत त्यातील बरेचजण सक्रीयपणे नेतृत्व देऊ इच्छितही नसतील पण प्रयत्न असा आहे की जर (प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष) नेतृत्व देऊ केले तर त्यांच्या मागे किती चाहते/फॉलोअर्स आहे याचा अदमास तेही राजकीय नेत्यांच्या सोबतीने तौलनीक यावा जेणे करून समाज मनातील प्रभाव तौलनिक स्वरूपात पुढे यावेत आणि समजून घेता यावेत. ज्यांना एकही कौल मिळणार नाही अशी नावे वगळण्याचाही विचार करेन असा सध्या मानस आहे.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

काही साहित्यिकांची नावं का आहेत ते समजलं नाही. त्यांनी काही भरीव काम (सामाजिक/राजकीय) क्षेत्रात केले आहे का?

बरीच मंडळी अराजकीय वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतीक क्षेत्रातून आहेत त्यातील बरेचजण सक्रीयपणे नेतृत्व देऊ इच्छितही नसतील पण प्रयत्न असा आहे की जर (प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष) नेतृत्व देऊ केले तर त्यांच्या मागे किती चाहते/फॉलोअर्स आहे याचा अदमास तेही राजकीय नेत्यांच्या सोबतीने तौलनीक यावा जेणे करून समाज मनातील प्रभाव तौलनिक स्वरूपात पुढे यावेत आणि समजून घेता यावेत

बाकी हे वाक्य समजायला वेळ लागला. ग्लुकॉन-डी घेतल्यावर जरा बरं वाटलं.

राखी सावंतच नाव नसल्यामुळे या पोलच्या ( वरील ओपीनिअन पोलच्या) मर्यादा स्पष्ट झालेल्या आहेत.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

प्रतिसादाला स्कोअर चांगला मिळतोय, अजून स्कोअर वाढला तर राखी सावंतांच नाव यादीत खरंच जोडाव लागेल अस दिसतय Smile

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

तुम्हाला 'अस्पष्ट' असे म्हणायचे काय?
राखी सावंत हे नाव असते तर 'मर्यादा' अधिक स्पष्ट दिसल्या असत्या.


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

आमचे नाव नसल्यामुळे बहिष्कार टाकलेला आहे.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रतिसादातून आपणास समर्थन प्राप्त होऊ लागल्यास आपलाही निश्चीत विचार करू, तेव्हा बहिष्कार घालण्यापुर्वी धडाडीने प्रचार करावा Smile अशी नम्र विनंती आहे.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

राखी सावंतच नाव नसल्यामुळे या पोलच्या ( वरील ओपीनिअन पोलच्या) मर्यादा स्पष्ट झालेल्या आहेत.

पूनम पांडे ला अनुल्लेखाने मारायचा यत्न आमच्या लक्षात आलेला आहे. केवळ ती "भैय्यी" / उत्तर भारतीय असल्याने.

ऐसे चेहरे ?

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

पांडेंची पुनम आणि चेहरे यांचा काय संबंध बॉ? Wink

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अगड्डी प्वाँईट्टे !!

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

बाई पुर्ण प्रोजेक्ट॑ची माहिती सांगू पाहताय नी हे आपले फक्त फेसबूक Value बघतात. याला काय अर्थ आहे ?

तुमच्या बोलण्यात विरोधाभास आहे.

पूनम पांडे अन चेहरा हे म्यापिंग बाय डेफिनिशन/कन्व्हेन्शनच चूक आहे. Wink

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भैय्यी नाय हो ! भय्याणी !

हे बघा गब्बर.. तुम्ही असाल रामगढचे किंवा चंबळ खोर्‍यातले. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बनवा पूनम पांडेंना तुमच्या नेत्या. इथे महाराष्ट्राच्या भवितव्याचा प्रश्न आहे.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

त्यामुळेच मी म्हणतो एखादे मराठी नाव येऊदे.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला एकुणातच या कौलाचे कारण/पाश्वभूमी समजलेली नाही.
"आश्वासक" नेतृत्त्व म्हणजे कोणत्या अर्थाने? कोणत्या पातळीवर? पक्षात? मतदारसंघात? राज्याचे? समाजिक प्रश्नांवरील चळवळीचे?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझ्या उत्तराने एका महाशयांनी ग्लुकॉन-डी घेतले म्हणे Wink म्हणून उत्तर देताना जरा घाबरूनच आहे तरी पण विचारता आहात तर, महाराष्ट्राकडे महाराष्ट्राला व्हिजन असलेले, सकारात्मक दिशेने नेणारे, डिसिसीव्ह नेतृत्व आहे का ? कौल काढताना खर म्हणजे माझ्या डोक्यात आधी केवळ राजकीय नावच होती, पण महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण असावा अशा प्रश्नाला लोकांनी कौल चटकन दिला असता पण व्हिजन असलेले, सकारात्मक दिशेने नेणारे, डिसिसीव्ह नेतृत्व या चारही गोष्टी एका व्यक्तीत कितपत मिळतील या बद्दल मी स्वतः आशवस्थ नव्हतो. देशाला स्विकार्ह नेतृत्व गुजराथेतून पुढे येऊ शकत , महाराष्ट्रातून का नाही ? याला माझा नर्व्हसनेस म्हणा हव तर पण या महाराष्ट्रातील राजकीय स्थितीला माझ मन समाधानी नाही, अंशतः सामाजिक वातावरण जबाबदार असतच मग इतर समाजात तरी त्यांच्या त्यांच्या क्षेत्राकरता तरी (अश्वासक) नेतृत्व कुठे दिसते आहे का हे पाहण्याचा प्रयत्न मात्र. डिसिसीव्ह शब्दावरून माघार घेऊन मी किमान होतकरू आश्वासक या संकल्पने पर्यंत माघार घेतली.

(दुसरेतर अप्रत्यक्ष प्रश्नातून मिळणार्‍या माहिती, सांख्यिकिय सर्वेक्षणातून मिळणारी मुख्यमाहिती अप्रत्यक्ष पणे समजून घेण्यात काही वेळा उपयूक्त ठरते.)

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

१. यात मेधाताईंचे नाव हवे होते असे वाटते
२. दिलेल्या नावातील सदानंद मोरे + कवाडे + राजु शेट्टी + पृथ्वीराज चव्हाण असे सामायिक नेतृत्त्व सुचवतो.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सदानंद मोरे + कवाडे + राजु शेट्टी + पृथ्वीराज चव्हाण हे काँबीनेशन सुचवण्या मागे असलेली आपली भूमीका समजावून घेणे आवडेल.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

युवा नेते आदित्य ठाकरे यांचे नाव दिसले नाही त्यामुळे 'सरां'ना पर्याय नाही असे वाटते. पण तरीही मी अवधूत गुप्ते यांना पाठिंबा देत आहे.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

(असंच काहीस माझ कौल लावताना झालं आणि भराभर राजकारणा बाहेरची नाव जोडली. इतरांनी आपल्या प्रतिसादाला विनोदी श्रेणी दिल्याने आदित्यभाऊंचे नाव जोडण्यात आमची अंमळ पंचाईत होत आहे त्यांचे नाव वेगळ्या प्रतिसादातून सूचवल्यास जरूर विचार करू. )

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

खुलासा.

सर म्हणजे प्रिं. मनोहर जोशी नव्हेत.........

सर हे एकमेवाद्वितीय.....

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अवकाशात ताण पैदा करणारे तेच का ते सर? की पाणिनीपासून ओडिसीपर्यंत सर्व विषयांवर लिहिणारे?

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पूनम पांडे हेच सद्य काळात योग्य नेतृत्व होऊ शकते. पूनम ह्यांनी वस्त्रउद्योग खात्याचा कारभार सांभाळावा असे मला वाटते.

™ ग्रेटथिंकर™

न्यूडिटी इज अ स्टेट ऑफ माइंड असं बहुधा त्या सांगतील. Wink

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

क्रिडा आणि सांस्कृतिक खात्यांचा अतिरीक्त पदभार ! (वाचकांनो ह.घ्या)

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

सोनवणी + आठवले.

उपरोक्त नावांना आपले समर्थन असण्या मागे काही आपली पार्श्वभूमीका असेल ती समजून घेण्यास आवडेल.

महाराष्ट्रात अरूण कांबळेंना बर्‍यापैकी सुप्त समर्थन प्राप्त असण्याची शक्यता आहे. सोनवणी, राजन खान व्यक्ती म्हणून चांगल्या आहेत पण अतीस्पष्टपणा आणि तटस्थता हे त्यांचे गुण मला व्यक्तीशः आवडतात पण नेतृत्व देणार्‍या व्यक्तीत राजकीय दृष्ट्या ते कधी कधी लायेबिलिटी म्हणून पुढे येऊ शकतात. अरूण कांबळें आवश्य्क तेथे स्पष्ट वक्ते असले तरी 'पॉलिटीकली राईट' स्वरूपाची भूमिका घेत असावे असे वाटते. लोकांना झेपेल एवढ्याच प्रमाणात रेटतात.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

महाराष्ट्रात महापालिका अथवा जिल्हापरिषद पातळीवर प्रॉमिसींग नेते दिसतात का ?

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

अजीतदादा पवार.

दादाच योग्य.पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात काढायची शमता त्यांचात आहे.

™ ग्रेटथिंकर™

शिवाम्बू किंवा मोरारजीकोला शुध्दीकरण प्रकल्पातून?

प्रांजळपणे सांगायचे झाले तर कोणत्याही राजकीय पक्षातील घराणेशाहीचा मी समर्थक नाही, अर्थात हे माझे व्यक्तीगत मत झाले. घराण्यातील मंडळी चांगले सामाजिक कार्य राजकीय लाभाच्या पदावर न जाता सुद्धा करू शकतात. तरीपण आपले समर्थन असण्या मागे काही (घराणेशाहीच्या समर्थना शिवाय) इतर पार्श्वभूमीका असेल ती समजून घेण्यास आवडेल. काही वेळा मिडियातून चांगल्या कार्यास प्रसिद्धी मिळत नाही. आपल्याला त्यांच्या आवडलेल्या कार्या बद्दल माहिती दिल्यास कौलात मतदान करणार्‍यांना त्यांची मते बनवण्यात मदतच होईल.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

समर्थनाचे कारण ग्रेटथिंकर आणि सलील यांनी अगोदरच दिलेले आहे. पुर्वी असे व्हिजन असलेला नेता क्वचीतच पाहायला मिळत असे. आता मात्र त्यांची संख्या वाढत आहे हे पाहून आनंद वाटतो.

संजूबाबा गांधीगिरीकरांना काही स्थान आहे की नाही?

या कौलाचा उद्देश सरळ सरळ आणि सकारात्मक आहे, उपरोध अथवा विनोदाच्या उद्देशाने का असेना इतर नावे सांगण्याकडे बराच कल दिसतो आहे. तेव्हा अशा नावांचा वेगळा कौल काढावा का किंवा निगेटीव्ह मार्कींग करता वेगळा कौल काढावा का ह्या बद्दल जरूर मार्गदर्शन करा.

थट्टा मस्करीचेही स्वागत आहे पण, या कौलाचा आश्वासक नेतृत्व शोधण्याच्या चांगल्या उद्दीष्टाला हातभारही आवर्जून लावावा. येथील कौलात एका पेक्षा अधिक नावे निवडता येतात मला वाटते तुमच्या पसंतीची क्रमवारीही लावता येते, हा केवळ मुख्यमंत्री कोण हवा असा मर्यादीत उद्देशाचा कौल नाही, तेव्हा नेहमीच्या त्याच त्या नावां पलिकडे जाऊनचीही नावे सुचवा चर्चा करा ही नम्र विनंती.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

हा कौल जून महिन्यात लावला होता. आता पावेतो केवळ ८ वोट आले आहेत. आता महाराष्ट्र विधान सभेची निवडणूक अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. किमान पंचरंगी असणार्‍या निवडणूकीचा कल कसा असेल कोण अधिक लोकप्रीय आहे हे समजण्यास हा कौल उपयूक्त असेल असे वाटते म्हणून धागा पुन्हा एकदा वर काढतो आहे.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.