स्वीस बँकेत खाते

चिंटूदादा डुकराच्या आकाराचा गल्ला घेऊन आपल्या आजोबांकडे गेला. त्यांच्या कानात जाऊन फुसफुसत म्हणाला, " आजोबा आजोबा, तुम्हाला माहित का? स्वीस बँकेत खातं काढणं सोप्प आहे."
आजोबा आपल्या नातवाच्या गल्ल्याकडे निरखून पाहात म्हणाले," मग आपल्याला काय त्याचं?"
चिंटूदादा पुन्हा फुसफुसला," तुम्ही माझंही खातं स्वीस बँकेत उघडून द्याना."
आजोबा हसत म्हणाले," का रे बाबा, तुला का स्वीस बँकेत खाते उघडण्याची गरज पडली?"
चिंटूदादा इकडे-तिकडे पाहात कोणी नसल्याचा अंदाज घेत आजोबांचे कान आपल्या तोंडाकडे खेचत हळूच म्हणाला, "तुम्हाला माहित नाही ? इन्कम टॅक्सवाले कधीही छापा ताकून माझा गल्ला जप्त करू शकतात्.सध्या वातावरण खूपच खराब आहे. म्हणूनच म्हणतो. लवकरात लवकर स्वेस बँकेत खातं उघडून द्या म्हणजे झझंट्च मिटून जाईल."
आजोबा टिव्हीवरचा फालतू कार्यक्रम पाहून बोर झाले होते. नातवाचं फुसफुसनं त्यांना मोठं मनोरंजक वाटलं. त्यांनी त्याला मोठ्या प्रेमानं चिंटूला पुढ्यात ओढलं आणि म्हणाले, " पण चिंटू, इन्कमटॅक्सवाले तर ब्लॅकमनी ठेवणार्यांुवरच छापा टाकतात. त्यांचे पैसे जप्त करतात. तुला रे कसली काळजी. "
चिंटूदादा म्हणाला," तुम्ही कुणाला सांगू नका, माझ्या गल्ल्यातसुद्धा ब्लॅकमनी आहे. म्हणून तर मी टेन्शनमध्ये आहे."
आजोबा मोठे डोळे करत म्हणाले," तुला कुणी सांगितल?"
चिंटूदादा पुन्हा आजोबांचा कान आपल्याकडे खेचत म्हणाला," पप्पा-मम्मी रोज रात्री नोटा मोजताना म्हणतात. हे ब्लॅकमनी नसते तर आपलं जगणं मुश्किल झालं असतं. आपण उपाशी मेलो असतो. या गल्ल्यातसुद्धा त्या ब्लॅकमनीचेच पैसे आहेत."
आजोबांच्या माथ्यावर आता चिंतेची लकेर उमटली. पण ते सध्या चांगल्या मूडमध्ये होते. ते चिंटूच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले," पण बाळा तुला तर हे व्हाईतमध्ये मिळत आहेत. त्यामुळे तुला कालजीचं काही कारण नाही. जी माणसं चोरीचा, गोलमालचा पैसा बाळगतात, तीच माणसं हा पैसा स्वीस बँकेत ठेवतात. तुझा तर पैसा शुद्ध पॉकेटमनीचा आहे."
चिंर्टूदादाचा घरात सगळ्यांमध्ये अधिक विश्वास आजोबांवरच होता. म्हणूनच आपल्या गुप्त गोष्टी तो आजोबांनाच शेअर करत असे. तो पुन्हा आजोबांच्या कानात आपलं छोटंसं तोंड खुपसून म्हणाला," तुम्हाला आणखी काय काय सांगू. काही शुद्ध-बिद्ध काही नाही. मीसुद्धा कधी कधी पप्पा-मम्मीच्या पाकिटमधून पैसे चोरून यात टाकत असतो. शिवाय मम्मीची चुगली पप्पांना आणि पप्पांची मम्मीला न करण्यासाठी मी लाच घेतो. रामूसोबत माल आणायला बाजारात जातो. यात तो गोलमाल करतो. यातसुद्धा त्याच्याकडून मी कमिशन खतो. माझ्या मित्रांची कामे पप्पांकडून करून घेतो, यातली दलाली सोडत नाही. हेरा-फेरी करण्याचं माझं वय नाही पण वेळ आल्यावर तेही करीन. आणि आजोबा, हा सगळा ब्लॅकमनी मी या गल्ल्यात ठेवला आहे. मग सांगा, स्वीस बँकेत खातं खोलणं किती महत्त्वाचं आहे. "
आता आजोबांचे होश उडाले. त्यांना विश्वासच वाटत नव्हतं. पण चिंटू खरं सांगत होता. त्यांनी चेहर्या्वर नाराजीचा भाव आणत म्हणाले," चिंटू, चांगली मुलं, असं बोलत नसतात. तुला हे कुणी शिकवलं? " पण नातू महाशय त्यांच्या बोलण्यावर कमालीचे नाराज झाले. विद्युत गतीनं त्याने आजोबांच्या पुढ्यातून उडी मारली आणि म्हणाला,"मला माहित होतं, मला माहित होतं, तुमच्यासारख्या खडूस म्हातार्याजच्या बस की बात नाही. मी तर मम्मी-पप्पांनाच सांगेन स्वीस बँकेत खाते खोलायला. " एवढे म्हणून चिंटूदादा आपल्या हातात डुकाराच्या आकाराचा गल्ला सांभाळत चालता झाला. आजोबा भावी पिढीकडे अवाक हो ऊन पाहात राहिले. .

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

देशात एकूणच नैतिक मुल्यांचा र्‍हास कसा होत चालला आहे ह्याचे ह्या विनोदी कथेत दर्शन घडते.

टारेंद्र (आता)पैसापुरे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरे गिरवीन की....

लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न्यू जनरेशन
मनी मँटर्स

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

चिंटुचा मी आजपासुन फॅन झालो..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांनी चेहर्या्वर नाराजीचा भाव आणत म्हणाले," चिंटू, चांगली मुलं, असं बोलत नसतात. तुला हे कुणी शिकवलं? "

"चांगली मुले असे करत नसतात" असे म्हटले नाही, हे लक्षणीय आहे. खरे तर हेरीफेरीला लागल्यानंतर चिंटूने "करणे आणि बोलणे" यांच्यात सूक्ष्म फरक करणार्‍या आजोबांचे आभार मानले पाहिजेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजोबा प्रॅक्टिकल Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

#meru

मस्त

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कै च्या कै!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला.

आजच्या लोकसत्तेत हा लेख प्रसिद्ध झालाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0