ग्रामीण भागाचे लेखनातील चित्रण आणि वास्तव

लेख आवडला!
शिवाय ननि म्हणतात तसही वाटतच.
एकूण विसाव्या शतकातलं परिचित साहित्य वगैरे असू दे नैतर मागील वीसेक वर्षात अमेरिकेत गेलेल्या पब्लिकचे विविध ब्लॉग.
"रम्य" वगैरे आटह्वणी. "संथ" , "निवांत" आणि "प्रसन्न" हे फक्त गावच असतं.
हे गाव कोकण किंवा गोव्यातच असतं.(फार्फार तर पुणे -कोल्हापूर मधला समृद्ध कृषी असलेला, हरित पश्चिम महाराष्ट्र)
ह्यांच्या गावतही लोकं अगदि उपाशी वगैरे नसतात.
.
.
.
च्यामारी, आम्ही गावाकडे पाहतो तेव्हा कमालीचं दारिद्र्य आणि १९८० च्या दशकात विलास रकटे असलेले दोन चित्रपट "निखारे" आणि "प्रतिकार" ह्याच्यात दाखवलय तसलच गाव दिसतं राव.

व्यवस्थापकः या ठिकाणी दिलेल्या प्रतिसादावर सुरू झालेली ही उपचर्चा मुळ धाग्यावर अवांतर/समांतर असल्याने वेगळी काढत आहोत. इथे यावर अधिक विस्ताराने चर्चा करता येईल

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

रम्य गाव हे को़कणात नि गोव्यात असतं असं म्हणताना अनेकांना पाहिलं आहे. म्हणजे ते विदर्भात तसं नसतं असं म्हणत नाहीत, पण त्याचा उल्लेखच न आल्याने प्रतिमा बनून जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

धिस इज़ व्हॉट इज़ कॉल्ड कल्चरल मोनॉपॉली. अशी प्रतिमा करून ठेवण्यात मीडियाचा लै मोठा वाटा आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समीकरणात कोकणस्थ ब्राह्मण वरचढ ठरल्याने त्यांच्या जाणिवांना अग्रक्रम मिळणे साहजिकच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोंकणस्थ ब्राह्मणांना काही म्हणा.. काही फरक पडत नाही.

पण आमच्या कोंकणास काही म्हणू नका हो.

नायतर आम्हाला मुंबई ठाणेसकट कोंकण वेगळा काढून द्या. आमचे आम्ही पाहतो. तुम्ही जा तिकडे घाटावर.

द्ळिद्र कोंकणातही आहे.. पण सुखही आहे. तेच अन्यत्र सापडत नाही लोकांना. ती कोंकणाची खासियत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदम व्हॅलीड मत आहे.
-------------------
जेते इतिहास आपल्यासारखा लिहितात असे मानले तरी तो काय साराच टाकाऊ नसतो. कोकणस्थांनी प्रामाणिकपणे आपल्या गावांचे वर्णन केले नसते तर कोकणस्थ वाचकांनीच त्यांना पहिले हाड थू केले असते.
---------------
इतके झिडकारण्याची वृत्ती असेल वेगळे कोण राज्य समर्थनीय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कोंकणस्थ ब्राह्मणांना काही म्हणा.. काही फरक पडत नाही.

होलियर दॅन दाऊ वृत्तीचा आहे म्हणून सोंग आणतोय म्हणून आपल्यावर टिका होईल म्हणून शाकाहारी जसा मांसाहार्‍याना "समान" म्हणू देतो तसलं हे अल्ट्रा डिफेन्सीव विधान आहे. कोणी कितीही काहीही कशीही टिका करा, आम्ही शांतपणे ऐकून घेऊ. धन्य.
काहीही म्हणा? का? कै फरक पडत नै?
-----------------------------------
अर्थातच इथे फक्त "ते महत्त्वाचं नाही" एवढंच म्हणायचं होतं हे कळतंय. पण तरीही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कोकणात सुख आहे आणि अन्यत्र नाही म्हणणं म्हणजे हॅ हॅ हॅ.

कोकणची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत हे अमान्य कोणीच करत नाहीये. पण अन्यत्र सुख नसेल तर कोकण सोडून पेशवे घाटावर आलेच नसते, नै Wink

कोकणाला स्वतःचे लेखक, कवी, इ. लै भेटले अन्य प्रदेशांच्या तुलनेत. दुसरं काही कारण नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तसं नाही. मराठवाड्यावर मी ठामपणे कॉमेंट करु शकत नाही, पण कोंकणात आणि कोंकणाबाहेर एकसमान आणि दीर्घकाळ राहण्यामुळे इतकं नक्की सांगतो की कोंकणात एक सरासरी समाधान आहे लोकांमधे ते अन्यत्र दिसलं नाही. परसाच्या आसपास येईल तेवढा लाल भात आणि नाचणीवर ढेकर देऊन, बनियन पोटाच्यावर सरकवून वाडीत शांत आरामखुर्चीत बसणे अन आहे त्यात समाधानी असणे ही संकुचित वृत्ती असेलही, पण कोंकणात अतिश्रीमंत जसे नव्हते तसेच भिकारीही नव्हते. एका तपाहून जास्त काळ तिथे काढला आणि नंतर तितकाच देशावर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडक्यात कोकणात इन्कम डिस्पॅरिटी कमी दिसतेय तुलनेने. मुळात प्रदेश तुलनेने अनुत्पादक, त्यामुळे इन्कम डिस्पॅरिटी कमी असणारच. त्यात नवल नाही.
पण असं समाधान बंगालमध्येही पाहिलेलं आहे. जिथे अन्य ऑप्शनच जास्त नसतात तिथे असे 'समाधान' येणे फार भारी इ. वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फार भारी नसेल, पण ते आहे.

अल्टिमेटली समाधान, शांतता या दुर्मिळ गोष्टी आहेत.. त्या भारी, आव्हानात्मक, ऑबव्हियस, पर्याय नसल्याने किंवा कशाही मार्गाने अस्तित्वात असल्या तरी त्या असणं उल्लेखनीय आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समाधानाची हीच व्याख्या असेल तर मग ते उत्तर कर्नाटक अन द. महाराष्ट्रातही पाहिलेलं आहेच की. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोंकणात एक सरासरी समाधान आहे लोकांमधे ते अन्यत्र दिसलं नाही

अर्थातच हे तुमच्यासोबत झालं आहे. मी ती वाक्यरचना बदलतो.

कोंकणात एक सरासरी समाधान आहे लोकांमधे ते अन्यत्र नाही

असहमत.
भातशेती आणि मासे, इ, इ ला कमी कष्ट लागतात का म्हणून ते लोक जास्त निवांत "आणि म्हणून समाधानी" वाटतात का हे मला माहित नाही पण सो फार मी जितकी ग्रामीण, सेमी-ग्रामिण एरीया पाहिला आहे, कोकणच्या लोकांत विशेष समाधान निदर्शक काही दिसले नाही. उलट उलटेच दिसले. पण माझी इंटरअ‍ॅक्शन खूपच लिमिटेड होती. पण मनात प्रतिमा तशी नाही हे नोंदवावेसे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पेशवे या शब्दाला विरूद्ध शब्द म्हणून गैरपेशवे शब्द वापरतो. आज किती मराठी गैरपेशवे कोकणात (ममईला) जातात? उगाच नको ती तुलना नको. माणूस कुठेही जावो, त्याला आपला प्रांत, जात, धर्म, वेशभूषा, अन्न, निसर्ग, भाषा, इ इ हजारो गोष्टींबद्दल खूप ओलावा असतो. त्याची खिल्ली उडवणं चूक आहे. उकडीचे मोदक आणि १५०,००० यू एस डी ची नोकरी यांच्यात कैतरी एक निवड आणि नंतर दुसर्‍याला मिस करू नको हे काय विचित अपेक्षिणे आहे? आणि जास्त कोकणस्थ लेखक झाले यात त्या लेखकांचा, लोकांचा आणि तिथले निसर्ग सौंदय गायले जायचा संबंध काय?
-------------------
बाय द वे, तिथले लोक आणि निसर्गाला मिळणारी तुलनात्मक अनावश्यक जास्त प्रसिद्धी या अंगाने जात तुला कोकणस्थ लोक खडूस असतात आणि म्हणून त्यांना सुंदर निसर्ग मिळायला नै पाहिजे होता, किंवा आपलाच निसर्ग सुंदर म्हणतात (असं दुरान्वयेही सुचित करणारं तू काही लिहिलेलं नाहीस, उगाच गैरसमज नको) अशा काही भावना असतील तर जरूर लिही. त्यात जो काही युक्तिवाद आहे तो मी शक्य तितक्या सिंपथीने वाचेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कोकण आणि कोकणस्थ या दोहोंबद्दलही माझा आकस नाही. माझी आत्या रत्नागिरीस कैक वर्षे होती आणि तिथे मी अनेकवेळेस राहिलेलो आहे.

माझा मुद्दा फक्त इतकाच होता की कोकण अन्य महाराष्ट्रापेक्षा समहाउ जास्त युनिक आहे अशी प्रतिमा आज महाराष्ट्रापुढे आहे ती ऑब्जेक्टिव्हलि खरी नाही. प्रत्येक प्रदेश युनिकच असतो. पण कोकणातून कैक कोकणस्थ पुण्यात आले. पेशवाई आणि त्यानंतरही महाराष्ट्रात ते अग्रेसर झाले. त्यामुळे त्यांच्या जाणिवांना समाजात जास्त अग्रक्रम मिळाला. हे साहजिकच आहे, त्यात चूक काहीच नाही.

त्यामुळे झालं असं की बाकीच्या प्रदेशांना त्यांचा 'ड्यू' मिळाला नाही. याला उपाय म्हणजे आत्ताच्या लिट्रेचरवर टीका नव्हे, तर अन्य प्रदेशांनी अजून जास्त लेखन करणे हा आहे. सो दॅट महाराष्ट्राबद्दलची प्रतिमा अजून व्यापक होईल.

बाकी- तो मोदक अन दीड लाख डॉलरवाला प्रतिसाद माझा नव्हता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मोदक काय, गणपती काय.
अरे?
गणपतीचा साक्षात बाप मराठवाड्यात उपस्थित आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी कितीतरी मराठवाड्यात आहेत.
"मराठी अस्मिता " वगैरे मध्ये जे "जय भवानी..." येतं ना; त्यातली आई भवानी तुळजापुरास आहे.
कोकणात नै.
आमचे देव जास्त पावरफुल आहेत.
कोकणवाले आपल्या देवाला उग्गाच पुढे करुन र्‍हायलेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अरे बर्बाद झालो तरी बेहत्तर पण मुम्बैच्या हायकोडतात कोंकणाचा हक्क शाबीत करुन तुमच्या घाटाची धिंड नाय काढली तर गविशेट नाव नाय लावणार..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL
भारी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

महाराष्ट्राचं राजकीय केंद्र गेल्या हजारो वर्षांपासून पश्चिमेला सरकतंय अशी आपली एक लाडकी थेरी आहे.

सर्वांत अगोदरचं केंद्र म्ह. कृष्णाची सासुरवाडी- विदर्भ.

पुढे बुद्धकाळी-मौर्यकाळी अश्मक- ऊर्फ मराठवाडा. हे केंद्र लय वर्षे टिकलं. तेव्हापासून ते शिवकाळापर्यंत.

शिवकाळापासून ब्रिटिशकाळः पश्चिम महाराष्ट्र.

ब्रिटिशकाळ ते पुढे: मुंबै.

नेक्ष्ट इज व्हॉट?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

महाराष्ट्राचं राजकीय केंद्र गेल्या हजारो वर्षांपासून पश्चिमेला सरकतंय अशी आपली एक लाडकी थेरी आहे.
थेरी रोचक आहे खरी. पण राजकीयच नै सोबत सांस्कृतिक भाषा वगैरे सगळं कस येतच ओघान ? Sad

नेक्ष्ट इज व्हॉट?
कै प्रश्न इचारत राजा तु, वेश्टर्न हौ की वेश्टर्न ! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजकीयच नै सोबत सांस्कृतिक भाषा वगैरे सगळं कस येतच ओघान ?

कारण राजकीय नेतृत्वच बाकीच्या सगळ्या गोष्टी डिक्टेट करत असतं- तो एलीट क्लास सर्व 'टेस्ट' घडवत असतो. यादव-महानुभाव काळातली साहित्यिक मराठी ही मराठवाड्याकडची होती. पुढे शिवशाही-पेशवाई काळात हे केंद्र प.म. मध्ये शिरले. पेशवाईत पुण्यात शिफ्ट झाले अन ब्रिटिशांनीही तेच कायम ठेवले, आजतागायत तिथेच आहे. साहेब नस्ता तर महाराष्ट्राची राजधानी पुणेच झाली असती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खरं म्हणजे, कोंकण हा महाराष्ट्राचा भाग नंतरच झाला. मूळ "महाराष्ट्रा"ची सीमा सह्याद्रीपाशीच संपते आणि घाटमाथ्यानंतर थेट समुद्रापर्यंतची ती अरुंद कोंकणपट्टी.

म्हणूनच तर आजदेखिल "पश्चिम महाराष्ट्र" म्हणताना त्याच्याही पश्चिमेला असलेला कोंकणप्रांत त्यात जमेस धरला जात नाही. पश्चिम महाराष्ट्राची सीमा सह्यादीपाशीच थांबते.

माझ्या अल्प माहितीनुसार, देवगिरीच्या यादवांची एक शाखा महिकावतीस (केळवे-माहिम) येथे राज्य स्थापून राहिली तेव्हापासून कोंकणाचे "महाराष्ट्री"करण सुरू झाले.

आजच्या घडीला उत्तर कोंकण प्रांत (ठाणे-रायगड-रत्नागिरी) हा (भाषिक दृष्ट्या) पूर्णपणे "महाराष्टाळ"लेला आहे. तर तळकोंकण (सिंधुदुर्ग) हा (भाषिक दृष्ट्या) कोंकणीशी इमान राखून आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोकणचे महाराष्ट्रीकरण इ. म्हणताना त्याची एक वेगळी आयडेंटिटी गृहीत धरण्यात आलेली आहे. एसेम कत्र्यांनी कोकणी ही वेगळी भाषा असल्याचे सिद्ध केले, कोकणी चळवळीही अन्य लोकांनी बर्‍याच राबवल्या. त्यामुळे ते एक पोलिटिकल स्टेटमेंट आहे. एकदा राजकीय अस्तित्वासाठी लढायचे म्हटले की भाषिक, सांस्कृतिक, सामाजिक हे सर्वच अ‍ॅस्पेक्ट्स त्यात वापरले जातात.

कोकणी ही सध्या एक वेगळी भाषा आहे असे लिंग्विस्ट म्हणतात खरे. पण हे एक अर्ग्युमेंट कोकणप्रांताच्या तथाकथित वेगळ्या आयडेंटिटीला सिद्ध करण्यास पुरेसे आहे काय?
शिवाय केळवे-माहीम इ. ठिकाणचा राजा यादव घराण्यातला नव्हता. मराठीतला इ.स. १०१२ सालचा महाराष्ट्रात सापडलेला सर्वांत जुना शिलालेखही कोकणात रायगड जिल्ह्यात सापडला, दिवेआगरचा इ.स. १००० सालच्या आसपासचा ताम्रपटही मराठीतच आहे. त्यामुळे यादवांनी याचे महाराष्ट्रीकरण केले इ.इ. म्हणण्यात काही अर्थ नाही. असला लिंग्विस्टिक इंपीरियलिझम जुन्या काळात भारतात कधीच नव्हता. ती युरोपियन विचारांची देणगी आहे. यादवांचे 'महाराष्ट्रा'तले शिलालेख मराठीत, तर 'कर्नाटका'तले कन्नडमध्ये असत. रोमन साम्राज्यागत ऑस्कन, उम्ब्रियन, इ. भाषांना पूर्णपणे गिळंकृत करून लॅटिन एके लॅटिन असा प्रकार भारतात कधीच नव्हता. याबद्दल शेल्डन पोलॉकचे विचार मुळातूनच वाचण्यासारखे आहेत.

अन तळकोकण भाग हा कोकणीशी इमान राखून आहे हे कोकणीची गोवाकेंद्रित व्याख्या केल्यावर (भौगोलिक सान्निध्यामुळे इ.इ.) स्वयंस्पष्टच होत नाही काय? ते एक असो. परंतु या भागाचे महाराष्ट्राशी, मराठी स्फीअर ऑफ इन्फ्ल्युअन्सशी काहीच नाते नाही/इन्सिग्निफिकंट नाते आहे हा टोन तर्कदुष्ट आहे.

कोकणचे महाराष्ट्रीकरण ही संज्ञा सद्यकालीन चष्म्यातून जुन्या वस्तुस्थितीकडे पाहिल्यामुळे निर्माण झालेली आहे. अनेक सरसकट गॄहीतके लावल्याने त्या संज्ञेला माझा आक्षेप आहे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तरी आजकाल अनास्पुरे, रितेश देशमुख वगैरे मंडळींमुळे मराठवाडा थोडा तरी दिसतो. तमाशाबिमाशाच्या चित्रपटात कोल्हापूर, सातारा, सांगलीशिवाय पान हालत नाही. मात्र आमचे दादा कोंडके गेल्यापास्नं पश्चिम महाराष्ट्राचा (ग्रामीण पुणे, अहमदनगर वगैरे) अनुशेष वाढला आहे. एखादा टिंग्या वगैरे चित्रपट येतो तो पण रडका, कलात्मक वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रितेश पी एम ओ आहे. Person of Marathawada Origin. त्याच्यावर मराठवाड्याचा कै प्रभाव नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पीएमो ROFL

पर्सन ऑफ मिरज ओरिजिन सुद्धा फिट्ट बस्तंय की ओ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सहमत. विदिन महाराष्ट्र सुद्धा स्टेरिओटैप फिक्स पडलेले आहेत. त्यात मराठवाड-विदर्भ आत्ता आत्ता धड दिसू लागलेत नीट. त्यांचा पुरेसा परिचय होणार, मग एखादा स्टेरिओटैप पडणार अन मग कोणीतरी तो भंगणार..मुळात स्टेरिओटैप असणं हेच परिचयाचं मापन आहे. परिचय नै तर स्टेरिओटैप येणार तरी कुठून?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

निसर्गसौंदर्याच्या बाबतीत कोकण यूनिकच आहे. टोटली यूनिक आहे.
--------------
पेशवे किंवा अजून कोणी कुठे आल्याने कोकणाचं काही मार्केटींग नै झालं. तिथली लँडस्केप भिन्न आहे अन्य महाराष्ट्रापेक्षा. आणि सुंदर पण आहे. समुद्र, उंच डोंगरांच्या रांगा, वेगळा आहार, पिके, इ इ इ . बाकी सारे महाराष्ट्राचे परिसर समान आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कोकण लै भारी आहे असं माझंही मत आहेच. पण प्रत्येकाची फीचर्स वेगळी. त्यात ग्रेडेशन करणे मूर्खपणा आहे असं माझं प्रामाणिक मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"खूप वर्ष झाली ; मॉल्स पाहिले; भौतिक सुखं मिळाली पण पुन्हा उकडीचे मोदक मिळाले नैत " असलं कैतरी अमेरिकन पी आय ओ च्या ब्लॉगवर पाहतो नेहमीच.
जीव तळमळतो वगैरे.
ढेकणीच्या आम्ही इथेच असूनही खाल्ले नाहित की.
काही जीव वगैरे तळमळायची गरज नै.
फार तलमळ मळमळ असेल तर ये इकडं आणि गीळ हवे तेवढे; नैतर घे उकडून स्वतःला.

आणि तसेही खान्देशी झणझणीत किम्वा इतर काही चवी असतात हे ह्या कोकणस्थी ढोल ताश्यात ऐकूच जात नै.
"वा. वा.
काय तो आमचा कोकण.
वावा. काय ते आमचं जंगल.
कित्ती छान ते.
आम्ही डोंगरावर कसे राहयचो.
माकडासारखे झाडाला लटकत सहकुटुंब कसे टेक्डीच्या वरपर्यंत कसे जायचो.
काय लाइफ होती राव ती .
हाड थू ह्या लाइफच्या.
सालं वरच्या मजल्यांवर जायला लिफ्ट वापरतो. पण साली मजाच नै.
( माकडासारखा लटकून पाहिलच आहेस, आता जरा पालीसारखा सरपटात वगैरे जाण्याचा प्रयत्न कर की लेका.)

माझा कोकण काय छान.
अमेरिका किती घाण.

"
हे सगळं अम्रिकेत धा धा वर्ष बसून.
हे बरय साला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नक्की राग कशावर आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लोकांना मिळालेल्या/कमावलेल्या पैशावर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ओक्के मग चालु दे.
मला वाटलं कोकणाला काही बोलताय की काय? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सहमत आहे. एका तैंनी पुण्याहून मुंबैला आल्यावरही असाच एक ब्लॉग पाडला होता. त्यात दुर्वांकूर आणि सुधारसापासून सुरूवात करून "माझ्या डोक्यावरचं आभाळच बदलून गेलं"पर्यंत मजल मारली होती Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे बाबा.. त्यात मोदक मिळत नाहीत हा पॉईन्ट नसतोच मुख्य हायलाईट.. भौतिक सुखे मिळाली हा मुख्य हायलाईट असतो.. (बहुतांशी तिकडे मोदक मिळत नाहीत हेही सत्य नसतं.. फक्त ते गणपतीपुळ्याच्या भटजींच्या घरी शेणाने सारवलेल्या जमिनीवर इ इ इ नसतात हे दु:ख म्हणायचे.)

आता हल्लीच्या आपल्या यशस्वी आयुष्याचे वर्णन करताना स्टारबक्स किंवा तत्सम कॉफीस्थाने, पिझ्झा आदिची तारांकित ठिकाणे, उंची शँपेन यांचे उल्लेख करुन त्या तुलनेत कॉलेजच्या बाहेरची कटिंग चहा, ट्रेकवरचा झुणका अन (शिळी) भाकरी, कोकम सरबत आदिची महती सांगायची इतकेच. (खरे म्हणजे उलटे Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विहिरीत डुंबायचो त्याची मजा माझ्या स्वतःच्या स्विमिंग पूलमध्ये पोहोताना येत नाही हे राहिलं का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आणि तेव्हाची सायकल सफर आणि अत्ताची जीम मधे जाऊन करावी लागणारी 'सायकलींग' .... हे ही!
(च्यायला अडवलं कोणी आहे ... जा ना सायकलवर आजही, कर सायकल सफरी ... कशाला नसती रडरड... असले नी अश्या रडरडीचे ढीगानी फॉरवर्ड्स येतात तेव्हा चिडचीड होते - पण दुर्लक्ष करायला शिकल्यापासून आनंद आहे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिझनेस मीटिंग्ज, सततच्या फ्लाईट्स, प्रेझेन्टेशन्स, फाईव्ह स्टार / सेव्हन स्टार हॉटेलांतली डिनर्स वगैरेमधे ते थालिपीठ हरवून गेलंय..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्को नक्को गवी Wink

(थालपीठ हरवून बसलोय म्हणायचं आणि पुढच्या क्षणाला त्या ५ स्टार हाटेलतल्या डायनिंग टेबलाचे नी त्यावरच्या काँटीनेंटल डिशेसचे फोटो फेसबूक वर शेअर करायचे..नाहितर ते फायस्टार हॉटेल्च्या सांडसा पर्यंत जाणारे गुगल मॅप शेअर करायचे ..शेवटी मी कसं 'ळॅवीश' लाइफ जगतोय ह्याचं प्रदर्शन करायचं - हिप्पोकार्टे साले)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिप्पो-कार्टे>>> क्या बात है घनु. एकच नंबर! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

.नाहितर ते फायस्टार हॉटेल्च्या सांडसा पर्यंत जाणारे गुगल मॅप शेअर करायचे

हाहाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माकडासारखे झाडाला लटकत सहकुटुंब कसे टेक्डीच्या वरपर्यंत कसे जायचो.

माकडासारखे सहकुटुंब लटकणारं चित्र कल्पून ह.ह.पु.वा झाली. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

५ च्या वर मार्मिक देता येत नाहीत हे दु:ख आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

>>हे सगळं अम्रिकेत धा धा वर्ष बसून.

असंच काही नाही. कुठल्याही (मराठी) सेलिब्रिटीला आवडता पदार्थ विचारला तर हमखास (आईच्या हातचा) पिठलं भात असं उत्तर येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

वेल, असं म्हणणं दुर्दैवी वाटलं. याचं कारण -
१. अगदी काही क्लालिटेटिव निकष काढले तरी कोकण इतर महाराष्ट्रापेक्षा खूप जास्त निसर्ग सौंदर्य असलेला निघण्याची प्रचंड संभावना आहे. (मला आहे असेच म्हणायचे आहे पण त्या वरचढ ब्राह्मणांनी केलेल्या इमेज मेकिंगचा बळी नाही आणि आय वान्ट टू बी फेअर म्हणून संभावना वैगेरे).
२. कोकणस्थ ब्राह्मण कितीही वरचढ असेल तरी घाणेरडा निसर्ग सुंदर म्हणून सेल करू शकत नाहीत.
३. माझ्या निरीक्षणाप्रमाणे ते स्वतः सोडले तर उर्वरित जवळजवळ सारेच मराठी लोक त्यांच्यावर खार खाऊन असतात. सबब त्यांचं कोणतं म्हणणं लोकांनी स्वीकारलं असलं तर त्यात मेरीट असायला पाहिजे.
४. मुंबई रग्गड श्रीमंत असूनही कोकण आजही भिकार आहे. म्हणजे तिथल्या जाणिवांना अग्रक्रम मिळालेला नाही.
-------------------
सबब, व्यक्तिश मला वाटते कि कोकण (जास्त) सुंदर (मंजे ते पॅस्टोरल ब्यूटी, इ इ ) आहे ही मेरिट बेसड फॅक्ट आहे.
-----------------
याचा अर्थ लातूरच्या गावांचे सौंदर्य साहित्यात येऊच नये असा होत नाही इतकीच खंत मांडायची होती. मी राहिलेले गाव अप्रतिम सुंदर होते (आता वाट लागलेली आहे).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रो-कोकण लिहिणं भडकाऊ असतं कि काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

विदर्भ काय नि मराठवाडा काय, त्या प्रांतांना स्वतःचे असे लै लेखक लाभले नैत हे एकमेव कारण आहे ते प्रांत 'अज्ञात' राहण्याचं. तिथे लेखकांचं पीक असतं तर कोकण सोडून लोकं मराठवाड्यावर मर मिटली असती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

व्यंकटेश माडगूळकरांच्या, मिरासदारांच्या लेखनात प. महाराष्ट्राचं बर्‍यापैकी चित्रण दिसतं.

कोकणी लेखकांनी कर्णिक, पेंडसे, दळवी यांनी आपल्या (संकुचित) अनुभवांचं पक्षी कोकणातल्या जीवनाचं चित्रण केलं असंही म्हणता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अरुण साधू आणि महेश एलकुंचवार हे दोन दणदणीत लेखक असताना विदर्भ-मराठवाड्याचं चित्रण करणारा लेखक नाही म्हणता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तुलनेने कमी म्हटलंय याची नोंद घ्यावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरुण साधूंच्या मराठवाड्यापेक्षा अरुण साधूंचाच चीन फेमस आहे.
( "ड्रॅगन जागा होताना" आणि "ड्रॅगन जागा झाल्यावर" ही दोन्-चार दशकांच्या फरकानं आलेली पुस्तकं)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

'मुखवटा'ही खूप प्रसिद्ध आहे. आपण कुठली प्रसिद्धी 'मानतो' ते आपल्यावर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

संकुचित इ.इ. शब्दयोजना माझी नाही.

बाकी सहमत आहेच. पण तुलनेने जास्त लेखक कोकणाला लाभले असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुमची नाय हो.... मीच म्हणतो आहे.

कोकण सुंदर आहे कारण तिथे विकासच आला नाही. कोकणातून ४००००४, ४२१२०२, ४११००२, ४११०३० इथे जाणार्‍यांनी कोकणाचं काहीच भलं केलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सहमत आहे. विकासच नाय त्यामुळे वरिजिनल सौंदर्य टिकून आहे. अन्य ठिकाणी जुनं बर्‍यापैकी हरपलं आहे-आधी तरी कधी होतं का असं विचारण्याइतपत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१

पन्नासएक वर्षांपूर्वी पनवेल, महाड आणि दिवेआगर वगैरे ऑलमोस्ट आयडेंटिकल असतील. आज पनवेल हे कोकण आहे असे कोणी म्हणणार नाही.

नैसर्गिकरीत्या अर्थातच रायगड जिल्हा रत्नागिरीच्या मानाने अधिक रखरखीत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

export होत राहिली लोकं.
import झाली नाहित फारशी.
त्यामुळं गुदमरल्यासारखं वाटलं नसावं.
मुंबैचं तेवढं उलट आहे. फक्त import-incoming सुरुये म्हणून बोंबललं म्याटर.
(आज मुंबैची उपनगरं वगैरे असणार्‍या जागा पूर्वी स्वतंत्र गावं होती.
चांगली कोकण स्टाइल सुरेख, निवांत सुशेगाद होती असं ऐकलय.
मुंबैच्या कोलाहलानं सगळ्यांनाच गिळलं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पण तुलनेने जास्त लेखक कोकणाला लाभले असं वाटतं.

तुलनेने कमी असले तरी त्यात एक पु.ल. देशपांडे आहेत... आणि त्यातच सगळं आलं. (ते सगळ्यात भारी/श्रेष्ठ वगैरे असं नाही पण त्याचं साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचलं आणि म्हणून त्यांच्यामार्फत कोकण)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पु. लं.चा एक अंतू बर्वा सोडला, तर कोकणावर काय लिहिलंय त्यांनी? बुचकळ्यात पडलेय मी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

त्यांच्या मुलाखती-भाषणं-लेख वाचा ऐका.
बाकी नावं काहीही असू देत केशव भिकाजी जोशी वगैरेंचीही भावविश्वं कोकणी आहेत.
(असण्यात चूक काही नाही. मला प्रचंड आवडतात.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अगं पण तेच किती फेमस आणि बरंच काही को़कणाबद्दल आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक नंबर लोक्स. आता इथे देश विरुद्ध कोकण होऊन जाऊदे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोकण शत्प्रतिशत भारी आहे मराठवाडा, खानदेश, विदर्भ यासगळ्यांपेक्षा. अगदी पुण्यापेक्षा भारी म्हटलं तरी चालेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हिरवाई अन समुद्र सोडलं तर काय आहे?

हिरवाई पहायची तर आमच्या सातारा-कोल्लापूर-भीमाशंकर इ.इ. कैक ठिकाणी आहे.

समुद्र नाही- मान्य.

पाण्याचा खेळ पहायचा तर धबधबेही आहेतच.

माशांचे प्रकार नाहीत- मान्य.

अजून बोला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हिरवाई अन समुद्र सोडलं तर काय आहे?

आमरसात आंबा सोडला तर काय भारी आहे या सारखा प्रश्न आहे हा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

नॉट एग्झॅक्टलि. हिरवाईबद्दल तर साफच अमान्य आहे.

समुद्राबद्दल तेवढं मान्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आमच्ं नाशिकही फार सुंदर हो... Smile
नाशकाहून त्रबंकेश्वरास जाताना वाटेतला निसर्ग - वा वा, पावसाळ्यात असे होते की कूठे कूठे थांबावे... (आर्थात बर्‍याच ठिकाणी शहर अतिक्रमण करतय ह्या निसर्गात). आणि हवमान ही खासच हो... अजून तरी नाशकात आय.टी. ची लागण पसरली नाहीये... नाहीतर त्याचंही पुणं होण्यास वेळ लागायचा नाही...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टंकायलाही देशावर यायला लागलं ना रे रताळ्या.
फुकट कोकणी मासे खाण्यापेक्षा तिकिट काढून कोलकात्याला जाउन गोड्या पाण्यातले मासे खाल्लेले परवडले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हॅ हॅ हॅ.

कोकणातनं सगळे देशावर येतात. देशातले कोकणात जात नैत कुणी. साहेबानं मुंबै केली म्हणून, नायतर कोण जात होतं तिथं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे भुसनळ्या, एखादी व्यक्ति छान दिसते म्हटल्यावर लग्न का केलं नाहीस रताळ्या अस विचारण्यासारखं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कोकण शत्प्रतिशत भारी आहे मराठवाडा, खानदेश, विदर्भ यासगळ्यांपेक्षा. अगदी पुण्यापेक्षा भारी म्हटलं तरी चालेल.

एकदम मनातलं बोल्लात हो. रत्नागिरिस, चिपळूणात, खेड मधे, कुडाळ मधे काही दिवस आजोळी मजेत गेलेले आहेत. त्याच्या सुमधुर आठवणी आहेत. त्यामुळे कोकणाबद्दल खास जागा आहे. पावसला, पुळ्याला, लांज्याच्या देवीला (कालभैरव योगेश्वरी) सुद्धा गेलेलो आहे अनेकदा. लई मंजे लई मजा.

रविंद्र पिंगे उत्कट पणे लिहायचे कोकणाबद्दल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोकण अतिशय सुंदर आहे.
कोकणातून देशावर येताना हिरव्याकंच बनातून नी डोकावणार्‍या लाल कौलारू घरांतून अचानक रखरखीत भुभाग, भरपूर प्लास्टिकचा कचरा, खोपटी नी त्यावर चक्क पत्रे, बटबटीत जाहिराती, सांडपाणी वगैरे (झाडीअभावी लख्खपणे) दिसू लागतं - डोळ्यांना चांगलंच खुपू लागतं. आणि समुद्र!! त्याची सर बाकी महाराष्ट्रातील कशालाच येऊ शकत नाही

महाराष्ट्रात मी जितका फिरलोय त्यात तरी कोकणाच्या सौदर्याला तोडीस तोड काहि मिळालं नाही

अन्यत्र मी बघितलेल्यापैकी हिरवाईत उत्तर बंगाल, कोस्टल कर्नाटक, कोस्टल दक्षिण तमिळनाडू व अर्थात गोवा भाग कोकणास तोडीस तोड वाटला. केरळच्या सौंदर्याची प्रत नी प्रकार वेगळा आहे म्हणून तुलना टाळतोय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तेरेखोल, मांडवी, पेरियार, शरावती ह्या प्श्चिम वाहिनी नद्या नुसत्याच वाहून जातात.
लाल माती इतकी ग्रेट असती तर सगळीकडे पसरली असती.
काळी घट्ट असणारी चिकण माती जिंदाबाद.
कृष्णा-कोयना, झालच तर गोदावरी-कावेरी अगदि तुंगभद्रा सुद्धा जिंदाबाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लाल मातीला कुठे ग्रेत म्हटलंय? मी लाल कौलं छान दिसतात, पत्र्यांपेक्षा खचितच! असं म्हटलंय
त्यावर बोल. बाकी बेताल लेखनावर पास

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कर्नाटकच्या दगडाधोंड्यांचीही आपली एक अलग खासियत आहे. शिवाय धारवाड-बेळगाव-लोंढा हा भाग मला मिरजेखालोखाल प्रच्चंड आवडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रकाटाआ, कारण बॅट्यला माहितीये Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

विशुद्ध चेष्टा म्हणून "खुंदल खुंदल के " दंगा घालित होतो.
"खूप वर्ष झाली ; मॉल्स पाहिले; भौतिक सुखं मिळाली पण पुन्हा उकडीचे मोदक मिळाले नैत "
ह्या वाक्यानं सुरु होणारा प्रतिसाद काही अमेरिकेत स्थिरस्थावर झालेल्या व कोकणची नॉस्टॅल्जिया स्टाइल आठवण काढणार्‍या ब्लॉगर्सची चेष्टा म्हणून लिहिला.
म्याटर थट्टेत अहए, मस्करीत आहे; तोवर थांबतोय.
चर्चेत भाग घेतलेल्यांचे मनःपूर्वक आभार.
तुमची चर्चा सुरु राहू द्यात हवी तर, मी फारसा मधे पडणार नै.
.
.
शुद्ध चेष्टा करण्याचा प्रयत्न होता. (हिंदित सांगायचे तर "मैने चेश्टा करने की चेश्टा की है ")
कोकणप्रेमींना सॉरी म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हॅट साला
आधी मजा करायची आणि नंतर असं लिहून आपली प्रतिमाही जपायची!
हीच हीच का ती "घाटावरची" संस्कृती!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ओ हॅलो- घाटावर म्ह. मराठवाडा नव्हे.

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

. प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ते प. म. बद्दल लागू आहे फक्त. या हिशेबाने तर विदर्भालाही घाटावरच म्हणाल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

च्यायला.. बळंच..

पीडाच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थायलंड किंवा फिलिपिन्सचे (विशेषत: दक्षिण चिनी समुद्राकडचे) काही किनारे पाहिल्यावर कोंकण आणि गोवा हीच सौंदर्याची परिसीमा नाही हे कळतंच.
बाकी स्वतःचा गाव प्रत्येकालाच सुंदर वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परिसीमा नसली तरी एखादी सुंदर सीमा पावसकर, सैतवडेकर, नार्वेकर वगैरे देखील दिसू शकते कोंकणात. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोकणातला निसर्गच नाही तर कोकणस्थ पोरी पण जास्त सुंदर असतात (जनरल पोरी म्हणणार पोरे सुंदर असतात हे पण आलेच, पण मी आपले आपले लिहितोय.) असे जनरल निरीक्षण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तळकोंकणात.

१०० परसेंट बायको मटेरियल. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही को वर अनुस्वार देता. माझं स्पेलिंग चुकतंय का? कोंकण हा हिंदी उच्चार आहे असे मत आहे.
------------------
बाय द वे, हा तळकोकणातला तळ कोठून चालू होतो? आणि तळकोकणी आणि छतकोकणी पोरींमधे (पुन्हा, आपापला रस) दृष्य फरक असतो का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कोंकण हाच मूळ उच्चार आहे कोकणात राहणार्‍यांच्या बोलीतला. देशावर निरनुनासिकीकरण झाल्याने त्याचं कोकण झालं इतकंच. साहेबाने konkan केल्यामुळे हिंदीत कोंकण असा उच्चार झाला, नायतर या हिंदीवाल्यांना काय झेपतंय धड उच्चार करायला. त्यांची जीभ जड असते लैच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

देशावर्चा कडबा टेस्टी अस्तो
त्यातनं पो चांगला येतो
S)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

नक्की काय प्रॉब्लेम आहे? हॉ?
- हेच की हे लोक बालपणीचा काळ सुखाचा म्हणून रडतात आणि पोराबाळांना इंडियात आणायला मात्र कांकूं करतात?
- प्रत्यक्ष भेटणं, लोकांना वेळ देणं हेच सोशल मिडियापेक्षा कसं खूप महत्त्वाचं आहे हा संदेश फेसबुक,व्हॉट्सॅप्वर टाकतात?
- भारतातल्या गटाराच्या कडेला असलेल्या भजीच्या गाडीचं नाव घेऊन उसासे टाकतात आणि जमिनीला हात लागला तर लगेच हात मात्र हँड सॅनिटायझरने धुवडतात?
- 'सिंगल स्क्रीन थेटर बाकी सब खेटर' हे घोषवाक्य धा धा डालराचं तिकिट काढून सिनेमे बघताना आरडून ओरडून सांगतात?

काय आहे, की - आम्ही पूर्वी निवडुंगावरसुधा कसे आनंदाने बसायचो हे सांगायचं असेल तर सध्या ढुंगणाखाली मऊसूत लेदर काऊच पाहिजेच!
त्याशिवाय मजा नाही बाबा! चालायचंच!
शेवटी माँटी म्हणालेच आहेत -

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

__/\__ ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झकास.
हेच्च म्हणायचय.
बादवे, तुम्ही दाखवलेल्या क्लिपांमधून जाणवलेली बाब :-
बाहेरच्या देशातही थिएटरचे कलाकार मोठ्याने बोलतात, लाउड मुद्राभिनय करतात.
रंगभूमीने अधिक मुद्राभिनय करणे, मोठा आवाज ठेवणे हे काही भारतातच होते असे नसावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तुमचं म्हणणं अगदी खरय अस्वल, परदेशस्थांनी त्यांच्या सुधारलेल्या रहाणीमानाबद्दल एक तर अपोलोजेटिक तरी रहायला हवं नाहीतर देशावरच्या भूतकाळाबद्दल उदासिन. साले दोन्ही करत नाहीत. frailty of human nature न काय! पण ही frailty of human nature अन्य कोणी दाखवली तर एकवेळ चालेल पण परदेशस्थांनी अज्जिबात दाखवू नये.
पटतय आपलं मह्णणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखादे गाव सुंदर वाटावे यासाठी ते फक्त निसर्गरम्य असुन चालत नाही ,क्लायमेटचाही परसेप्शनवर प्रभाव पडतो.
कोकण निसर्गरम्य आहे परंतु तेथील क्लायमेट दमट व रोगट आहे ,हवेतला सततचा कोंदट साचलेपणा, त्यामुळे आलेले डास चिलटे माश्या, पाण्याची मातकट चव, उंच झाडांच्या पडलेल्या शेवाळी सावल्या... यामुळे कोकण भकास वाटू शकते,
याऊलट पश्चिम महाराष्ट्राचा सह्याद्रीच्या पायथ्याकडचा व घाटमाथ्यावरचा भाग कोकणाइतका थ्रुआऊट निसर्गरम्य नसला तरीही, आल्हाददायक हवा, मॉडरेट ह्युमिडीटी ,मोजका पाऊस, उंचावर असल्याने(AVG 600 M )हवेचा हलकेपणा, कोरडी हवा असल्याने संसर्गजन्य रोगांचे कमी असलेले प्रमाण हे फायदे पश्चिम महाराष्ट्राला मिळतात.
तुलनेने मराठवाड्यात व विदर्भात अत्यंत कोरडे विषम हवामान ,निसर्गारम्यतेची वानवा यामुळे तेथील गावे तितकिशी रम्य कुणालाच वाटत नाहीत, अगदी तिथल्या लोकांनाही. ऑन एव्हरेज पश्चीम पश्चीम महाराष्ट्रात रम्य ग्रामिण जग आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

तुलनेने मराठवाड्यात व विदर्भात अत्यंत कोरडे विषम हवामान ,निसर्गारम्यतेची वानवा यामुळे तेथील गावे तितकिशी रम्य कुणालाच वाटत नाहीत, अगदी तिथल्या लोकांनाही.

हे काहीही अगदी. मराठवाड्यात खूप रम्य गावे आहेत. पुण्याच्या पत्रकारांनी दुष्काळात येऊन फटू काढले मंजे तुम्ही म्हणता तसं होत नाही. आणि मराठवाड्याच्या तुलनेत कोकणचं "हवामान" निव्वळ फालतू आहे.
-----------------
बाय द वे , हे घाट आणि कोकणी लोकांचं भांडण पाहून कळत नै कि सह्याद्रि कोकणात आहे कि नाही. नक्की सीमा काय आहे? नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत सह्याद्री आहे कि पलिकडे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

घाटमाथा कोकणाच्या जवळ आहे, पण तो कोकणात येत नाही. कोकणात सह्याद्रीच्या उपशाखा आहे ,परंतु मुख्य सह्याद्री घाटमाथ्यावरचा.
मराठवाड्यात रम्य गावे आहेत हे विधान हास्यास्पद वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

महाराष्ट्रात फक्त मराठवाड्यातच सर्वात रम्य सुंदर गावे आहेत. यात हास्यास्पद काही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मला ज्यात गावाचे चित्रण बर्‍यापैकी अस्सल वाटले होते असे काही चित्रपट
एक कप च्या: यातील कथा कणकवली च्या जवळच्या गावातील दाखवली आहे. बाहेरच्या लोकांना "साधारण कोकणा" तले वातावरण वाटते. तळकोकण वगैरे आणखी डीटेल लेव्हलला किती अ‍ॅक्युरेट आहे माहीत नाही.
देऊळः पुण्याजवळ हायवेवर असणारी खेडी आहेत त्यातील भाषा, कपडे व एकूण वातावरण यात एकदम अचूक वाटले. मी बहुतांश नाशिक रोड वरच्या गावांमधे फिरलेलो आहे व तेथे असेच सगळे बघितले आहे. मंचर, कळंब, नारायणगाव, जुन्नर ई.
टिंग्या - यातील खेडे व भाषा सगळेच बरोबर वाटल्याचे आठवते.
गाभ्रीचा पाऊस - हे मराठवाड्यातील असावे. तेथील लोकांना सांगता येइल किती अचूक होते, पण बाहेरच्या लोकांना तिथले वातावरण आहे असे सहज वाटेल.

हे चित्रपट पाहिलेल्या कोणाचे मत यापेक्षा वेगळे असेल तर जरूर सांगा. बाय द वे हे चारही चित्रपट आवर्जून पाहण्यासारखे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>गाभ्रीचा पाऊस - हे मराठवाड्यातील असावे. तेथील लोकांना सांगता येइल किती अचूक होते,

मराठवाड्यातील एका वर्गातल्या लोकांना दुसर्‍या वर्गाच्या वर्णनाच्या अचूकतेविषयी सांगता येईलच असे नाही. मी ठाण्यामुंबईत जन्मापासून राहिलो असलो तरी कोळ्यांच्या किंवा आगर्‍यांच्या वर्णनाची/त्यांच्या भाषेची अचूक माहिती मला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.