शालेय निबंध लेखन कसे करावे ?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच ssc board च्या दहावी पर्यंतच्या मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांच्या अभ्यासक्रमात निबंध लेखन हा महत्वाचा भाग आहे. आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांकडून सर्वाधीक शोध कशाचा/कशासाठी घेतला जात असेल तर तो निबंध लेखना साठी.

हे खरयं की यातील काही विद्यार्थी नकलवण्यासाठी ही निबंध आंतरजालावर शोधत असतील पण बराच मोठा वर्ग निबंध लेखन शैली आणि निबंधाच्या विषया संदर्भाने मुद्दे गोळा करण्यासही आलेला असतो. अर्थात शालेय विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक आंतरजालावर स्वतः फार कमी लेखन करतात.

आपल्या मध्ये काही जण शालेय विद्यार्थ्याचे पालक असतील, काही जण शिक्षक असू शकतील तर निबंध लेखन कसे करावे ?
आणि काही विषयावरील सोदाहरण निबंध लेखन या धाग्याच्या निमीत्ताने मिळू शकल्यास विद्यार्थ्यांचाही फायदा होईल आणि महाराष्ट्रीय विद्यार्थी वर्ग मराठी संकेतस्थळांशी जरासा जोडला जाऊ शकेल असे वाटते म्हणून आपणा सर्वांना निबंध लेखन या बद्दल मार्गदर्शन आणि सहकार्याची विनंती आहे.

*या धाग्यावरील लेखन विकिप्रकल्पांसाठी मुख्यत्वे मराठी विकिबुक्स (पाठ्य) प्रकल्पासाठी वापरला जाण्याची शक्यता असू शकेल म्हणून आपले लेखन प्रताधिकार मुक्त गृहीत धरले जाईल.

* शुद्धलेखन विषयक अवांतर चर्चा या धाग्यात टाळून विकिबुक्स प्रकल्पात शुद्धलेखन विषयक लेखन आणि साहाय्य पुरवणे अधिक ऊपयूक्त ठरू शकेल. अनुषंगिक अवांतरा व्यतरीक्त इतर अवांतर चर्चा टाळण्यासाठी धन्यवाद.

* आपल्या प्रतिसादांसाठी धन्यवाद

* मराठी विकिबुक्स प्रकल्पातील निबंध लेखन कसे करावे ? मार्गदर्शन लेख

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

महाराष्ट्रीय विद्यार्थी वर्ग मराठी संकेतस्थळांशी जरासा जोडला जाऊ शकेल असे वाटते

आपला हेतू सुयोग्यच आहे पण विद्यार्थी संकेतस्थंळांशी जोडले गेल्याने असा काय फायदा (विद्यार्थ्यांचा अथवा संकेतस्थळांचा) होइल स्पष्ट कराल का?
थोडक्यात सांगते - बरेचदा संकेतस्थळांचे अ‍ॅडिक्शन लागते असा अनुभव्/धारणा आहे. लहान वयात हे अ‍ॅडिक्शन लागून असा काय मोठ्ठा फायदा होणार आहे? संकेतस्थळांवर चर्चिल्या जाणार्‍या संकल्पना विद्यार्थ्यांना कशा उपयोगी पडू शकतात हे सोदाहरण दिले तर अधिक आवडेल Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हम्म.. समस्या आहेतच, समस्यांना संधी म्हणून पहाणे हा समस्ये कडे बघण्याचा अनेक मार्गा पैकी एक मार्ग म्हणून बघता येतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

जालावरचं लेखन वाचता खरंतर 'शालेय स्वरूपाचं निबंधलेखन टाळण्यासाठी काय करावं' याबद्दल कोणी लेखन करणार असेल तर मला व्यक्तिशः अधिक आवडेल. अशा प्रकारचा (मला आवडेल असा) एक धागा हा - ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Smile

मी ठोकळेबाजपणा विरूद्ध भूमीका ह्या धाग्याचा दुवा मराठी विकिबुक्सवर निबंध लेखन कसे करावे ? येथे दिला आहे. त्या (ठोकळेबाजपणा) धाग्याला विर्द्यार्थी ऊपयोगी कसे बनवायचे यातही मदत करावी असे या निमीत्ताने आवाहन करतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

शाळेच्या निबंधाची सुरूवात एखाद्या प्रसिद्ध वक्तव्याने (कोट्स) किंवा कवितेने किंवा संस्कृत श्लोकाने केली की परिक्षकावर टॉप इंप्रेशन पडते असे आमच्यावर बिंबवण्यात आले होते (नी बहुदा परिक्षकांवरही!).

एकुणच लेखन हा पहिल्यापासुन आवडता प्रांत असल्याने त्यावेळी निबंधात बरे (पंधरपैकी दोन आकडी) मार्कही पडायचे. पण खास असा फॉर्म्युला काय सांगणार?!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माहितीपूर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

निबंध चांगला लिहिण्याचे तंत्र म्हणजे काही काळ अजिबात लिहू नका.
बोला भरपूर लोकांशी भरपूर बोला. बडबडे व्हा. तुमच्या बडबडीवर समोर कुनी वेगळी मतं मांडली तर तीही लक्ष देउन ऐका.
पेप्रातलं संपादकीय वाचा.वाचत रहा. थकेस्तोवर वाचत रहा.
(रद्दीच्या दुकानात जाउन मागील दोन चार महिन्यांचे तरी संपादकीय वाचवेत.)
ह्यानंतर लिहित सुटा. जे वाटतं ते; जसं वाटतं तसं लिहित सुटा.
जे लिहाल ते बर्‍यापैकी बरं असण्याची बरीच शक्यता असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बोला भरपूर लोकांशी भरपूर बोला. बडबडे व्हा. तुमच्या बडबडीवर समोर कुनी वेगळी मतं मांडली तर तीही लक्ष देउन ऐका.
पेप्रातलं संपादकीय वाचा.वाचत रहा. थकेस्तोवर वाचत रहा.
(रद्दीच्या दुकानात जाउन मागील दोन चार महिन्यांचे तरी संपादकीय वाचवेत.)
ह्यानंतर लिहित सुटा. जे वाटतं ते; जसं वाटतं तसं लिहित सुटा.
जे लिहाल ते बर्‍यापैकी बरं असण्याची बरीच शक्यता असेल.

आपण लिहितो ते बर्‍यापैकी बरं लिहितो, हे सांगण्याची ही पद्धत आहे का? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Wink
खडूस खवचट खेकडा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मनोबाजी विकि संस्कृतीही प्रगल्भतेसाठी सेंसॉरींग वगैरे करत नाही पण छोट्यांसाठीच्या सदरात टाकल्या नंतर, कृपया तरीही जरा....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

काय म्हणायचय ते समजलं नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तुम्ही शब्द प्रयोग विनोदाने केले आहेत त्या बद्दल काळजी नाही. पण एकदा सुरवात झाली की बर्‍याच पब्लिकला कुठे थांबायच ते भान राहत नाही. या धाग्यावर येणार्‍या ऊपयूक्त प्रतिसादांचा संदर्भासाठी उपयोग होणार संदर्भ दुव्यांवरून काही विद्यार्थी इथे पोहोचू शकतात. अभ्यास सोडून आपल्या सोबत त्यांचही अवांतर चालू होऊ शकते असा दूरचा विचार करून जरासे टोकले. म्हणजे चुकून कुणी विद्यार्थी या धाग्यावर पोहोचून अवांतर चर्चा वाचण्यात टायमपास करावयास लागला तर आमच्या प्रतिसादाने जराशी त्यास जाग यावी असा पुन्हा एक (दूवि =दूरचा विचार)

प्रतिसादांसाठी धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

ओके

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लॅकॉनिक रोगाची लागण तुम्हांलाही झाली वाट्टे Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माहितीपूर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

जागा चुकली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(ए जी गार्डिनर या निबंधलेखकाचे आभार मानून) :
समजा विषय "क्ष" असेल तर येणेप्रकारे परिच्छेद कल्पावे :
-------------------------------
"क्ष"विषय मनात यावा अशी रोजच्या व्यवहारातली घटना. या घटनेच्या संदर्भात "क्ष"विषयाबाबत काहीतरी प्रश्नचिन्ह असावे.

"क्ष"विषयाबाबत उलटसुलट मतप्रवाह अथवा वागणूक समाजात पुष्कळ ठिकाणी दिसते, अशी उदाहरणे. तसेच बराच काळ याबाबत उलटसुलट मतप्रवाह किंवा वागणूक दिसते, अशी उदाहरणे. येथे प्रसिद्ध व्यक्तींच्या वक्तव्यांची किंवा लेखनातली उद्धरणे देता यावी.

"क्ष"विषयाबाबत लेखकाचे अंतिम मत असणार आहे, त्याच्या विरुद्ध मतांचे हलक्या हाताने परिगणन. वस्तुतः "क्ष"विषयाबाबत "अमुक-तमुक" मुद्दे विचारात घेतले, तर लेखकाचा पटणारे मत उघड होते, ते मुद्दे ठसवणे. (१-२ परिच्छेद.)

"क्ष"विषयाबाबत मत लेखक म्हणतो तसे सार्वत्रिक झाले तर होणारे फायदे.

"क्ष"विषयाबाबत आता पटलेले मत सुरुवातीच्या घटनेला लागू करून त्या क्षुल्लक घटनेबाबतही द्विधा निस्तरावी. वाटल्यास शेवटचे वाक्य म्हणून पुन्हा सुटसुटीत वाक्यात निबंधातील "क्ष"विषयक मताचा सारांश द्यावा.
-------------------------------

वरील चौकट जरी वादग्रस्त निबंधविषयांकरिता असली, तरी निर्विवाद विषयांकरिता सुद्धा चालेल. उदाहरणार्थ "सार्वजनिक स्वच्छता" हा विषय "निर्विवाद" आहे (अंतिम मत "सार्वजनिक स्वच्छता असावी"). परंतु विर्द्ध मत म्हणून "सोय, कचरापेट्यांची अनुपलब्धता" वगैरे विरोधी मुद्दे म्हणून सांगता येतात.

क्वचित वादविवादाकरिता नसलेले "वस्तुनिर्देश" निबंध असले तरी बारीकसारीक फेरफार करून वरील चौकट वापरता येते. "माझा गाव" विषय असेल तर "ग्रामीण विरुद्ध शहरी जीवन" असा विषय कल्पून वरील चौकट मांडावी, आणि माझा गाव माझ्या अंतिम मताचे ठळक उदाहरण आहे, अशा प्रकारे प्रत्येक परिच्छेद मांडावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उदाहरण : सार्वजनिक स्वच्छता (सांगाड्यावर विवक्षित मुद्दे चढवून). जुळवलेली वाक्ये, पूर्ण बांधलेला निबंध मुद्दामून दिलेला नाही.
---------------------------------------------------------------------
(परिच्छेद १ : ) स्वच्छतेबाबत विरोधाभासी घटना, उदाहरणार्थ घर स्वच्छ केलेला कचरा गच्चीमधून गल्लीत टाकल्याचे बघितले. त्यामुळे शाळेचे कपडे खराब झाले

(परिच्छेद २ : ) वैयक्तिक स्वच्छता पण सार्वजनिक घाण दिसते तशी वेगवेगळी ठिकाणे - बसगाड्या, रेल्वे स्टेशने, देवळे, वगैरे. मो. क. गांधी वा गाडगेबाबा वा प्रचलित म्हणी वगैरेंची उद्धरणे द्यावी - ही उद्धरणे "अमुक करा"पेक्षा "अमुक समाजात दिसते" अशा प्रकाचची असल्यास ठीक. "अमुक करा" असेच उद्धरण ठाऊक असेल, तर "तेव्हासुद्धा असे म्हणण्याचा प्रसंग होता, त्यामुळे हा मुद्दा सार्वकालिक आहे" असे सांगता येते.

(परिच्छेद ३/४ : ) सार्वजनिक स्वच्छता असण्याविरुद्धचे अडथळे. आजकालच्या धाकाधुकीच्या आयुष्यात वेळ नसतो. काही सुविधा सरकारने पुरवायच्या असतात, त्या उपलब्ध नसतात. मग सार्वजनिक स्वच्छता पाळण्याच्या दिशेने मुद्दे कळकळीने/अधिक जोरदारपणे मांडावेत. सार्वजनिक स्वच्छता पाळल्यामुळे सोयच होते, वेळ वाचतो. लोकशाही देशात सरकार म्हणजे आपणच असतो. आपण वागणूक करू आणि आपल्या सरकारचे धोरण बदलेल.

(परिच्छेद ५ : ) हे मुद्दे वरील परिच्छेदापेक्षा वेगळे असावेत. रोगराई पसरणार नाही. (त्या गावा/शहराकरिता योग्य असल्यास) ओला-सुका कचरा वेगळा करून नेटकेपणे टाकल्यामुळे होणारा पर्यावरणाला फायदा. परिसर स्वच्छ-सुंदर असल्यामुळे मन प्रसन्न राहील.

(परिच्छेद ६ : ) आज सकाळी कचरा गच्चीतून टाकण्याऐवजी कागदी पिशवीत भरून कोपर्‍याच्या कचरापेटीत टाकणे किती सोपे. "सार्वजनिक स्वच्छता म्हणजे समाजपुरुषाची वैयक्तिक स्वच्छता" असे काहीतरी सारांश वाक्य.

---------------------------------------------------------------------

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे तंत्र म्हणून प्रचंड आवडलं.
पण ह्याने एक साचा बनेल ना लिखाणाचा.
उत्स्फूर्तता , वैविध्य कमी होणार नाही का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

साचा काहीसा आहे, पण कुठले मुद्दे आहेत, ते वाचकाला कितपत पटवून देतात, यावर निबंधाचा दर्जा खूप बदलतो.

वरील साचा थोडाफार या संगीत-साच्यासारखा आहे
आलाप (येथे तालवाद्य नाही. साधारणपणे खालच्या पट्टीतल्या स्वरापासून सुरू करून वरच्या पट्टीतले सूर रंगवत जावे.)
अस्ताई :
अन्तरा :
ताना, झाला :

हा साचा असला, तरी नावीन्यपूर्ण आणि भावणार्‍या रचनांकरिता प्रचंड वाव आहे.

निबंधाचा साचा संगीताच्या साच्यासारखाच सांधे साधलेला असावा. आलापातून अस्ताईकडे जाताना एकदम काहीतरी खाडदिशी थांबवून नवीनच काहीतरी सुरू केले असे वाटायला नको. त्याच प्रमाणे निबंधात एक परिच्छेद संपल्यावर दुसर्‍या परिच्छेदातला मुद्दा आपसूखच सुचला, असा तलम असला पाहिजे. गियर बदलताना गाडी गचकल्यासारखे भासायला नको. हे बहुतेक शाळकरी विद्यार्थ्यांना जमणार नाही : बहुतेक शिकाऊ गायकांना तरी संगीतात हे कुठे जमते? पण त्या शिकाऊ अवस्थेतही चौकट असल्याचा काही फायदा होतो, जेणेकरून ओबडधोबड का होईना, एक पूर्ण वस्तू वाचकासमोर ठेवता येते.

आणखी एक उपमा म्हणजे शिंपीकाम :
शर्टाला बाह्या, समोरचे दोन भाग, पाठ, खांद्याचा "योक" वगैरे तेच-ते भाग असतात. ही चौकट. (समांतर : निबंधाची चौकट)
तरी फॅशन-कलेकरिता भरपूर वाव असतो. (कलात्मक लेखन)
फॅशन/नावीन्य नाही, पण ग्राहकाच्या वापरासाठी सुयोग्य असे शर्टही शिवणे बहुतेक शिंप्यांना शिकवले पाहिजे. (वर्तमानपत्रातले स्तंभलेखन. तांत्रिक रिपोर्टचा बिगर-तांत्रिक गोषवारा समजावून सांगणारा लेख.)

या उपमेने थोडेसे पटावे : नावीन्यासाठी वाव आहे, पण नावीन्य नसले तरीही उपयोगी निर्मिती होते, अशा चौकटीचे प्रशिक्षण हे शालेय अभ्यासक्रमाचे सुयोग्य ध्येय असू शकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उदाहरण : माझा गाव (सांगाड्यावर विवक्षित मुद्दे चढवून). जुळवलेली वाक्ये, पूर्ण बांधलेला निबंध मुद्दामून दिलेला नाही.
---------------------------------------------------------------------
(परिच्छेद १ : ) उन्हाळ्याच्या सुटीमध्ये गावी गेलो. जाताना तिथे असण्याची हुरहुर होती, परंतु एका महिन्यानंतर आपल्या शहराची फारफार ओढ लागली होती, ही गंमत. या परिच्छेदात गावाचे नाव, आणि जिल्हा/राज्य असा उल्लेख असावा. पुढच्या परिच्छेदाकरिता प्रसिद्ध उद्धरण नसले, तर तसे उद्धरण (बालगीत सुद्धा चालेल) येथे द्यावे.

(परिच्छेद २ : ) माझा गाव आणि माझे शहर यांच्यात मला वाटणारे भेद येथे सांगावेत. विषय "गाव" असल्यामुळे शहराबाबत मुद्दे थोडेच आणि मोघम असावेत. "शहरात हे नाही", हे अध्याहृतच असते, सांगण्याची गरज नाही. मात्र गावाबाबत मुद्दे मोघम नसावेत, वस्तुनिष्ठ असावेत. ("गावांमध्ये शेते असतात" असे नव्हे, तर "माझ्या गावात मामाच्या परसामागे काळ्याशार मातीची शेते पार क्षितिजापर्यंत जातात.") गावाचा इतिहास सांगावा.

(परिच्छेद ३/४ : ) गावामध्ये असलेल्या काही गैरसोयी सांगाव्या. बरीच मुले शाळेत जात नाहीत. विजेचे काही खरे नाही. प्रत्येक मुद्द्यानंतर "हे नसले, तरी ते आहे" प्रकारे गावाचे समर्थन करावे. येथेसुद्धा मुद्दे मोघम नसून त्या गावाकरिता विवक्षित असले तर चांगले.

(परिच्छेद ५ : ) गावात आवडतील असे अधिक मुद्दे. परंतु हे मुद्दे फक्त एका गावाला नव्हेत तर खूप गावांना लागू असावेत असे. परंतु हे मुद्दे आपल्या विवक्षित गावाबाबत सुचले अशी वाक्य रचना असावी : "घाईगडबड नसल्यामुळे शांतपणे विचार करण्यास वेळ मिळतो. शेते, गुरे अगदी जवळून बघितल्यामुळे आपले अन्न-वस्त्र कुठून येते त्याबाबत जाणीव होते."

(परिच्छेद ६ : ) "सुटीमध्ये गावात जाऊन हे सर्व मिळवतो-अनुभवतो, ते वर्षभर शहरातल्या आयुष्यात पुरते." सारांश "असा माझा गाव - पुन्हा पुढच्या वर्षी हुरहुर वाटू लागेल, असे."

---------------------------------------------------------------------

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खालिल पत्त्यावर मी पूर्वी "वर्णनात्मक" लेखना बद्दल एक कार्यशाळेचा अनुभव लिहिला होता.
http://blumenkranz.blogspot.com/2008/03/blog-post.html

तसेच, निबंध लिहितांना बहुतेकांना "सूक्ष्म निरीक्षणात्मक" वाक्ये लिहण्याचा सराव नसतो, त्यामुळलेखन उथळ किंवा साचेबद्ध वाटू शकेल. उलट साच्यातच लिहूनही, लेखनाचा गाभा महत्त्वाचा असतो, त्यासाठी वर म्हटल्याप्रमाणे वाचन व निरीक्षण भरपूर हवे.
ह्यासाठीही एक "धडा" खाली देत आहे:

http://blumenkranz.blogspot.com/2009/01/blog-post.html

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखन करणे अवघड जाणार्‍यांसाठी सोप्पे करणारी हि छान कल्पना आहे, एका व्यक्ती(मत्व) अभ्यास प्रकारात केवळ काही सेंकद मुद्दाम पुसट केलेली चित्रे दाखवतात. आणि तुम्हाला चित्रात काय दाखवलय अस वाटत ते ५ मिनीटात लिहायच असतं असा काही प्रकार आहे.

एनी वे आपले ते ७ मुद्द्यांचे लेखन आपण कॉपीराईट मुक्त करू शकत असल्यास पहावे ही विनंती. त्यातील वर्णनात्मक भाग सोडून इतर मराठी विकिबुक्स प्रकल्पासाठी ऊपयूक्त ठरू शकेल असे वाटते.

अनुषंगिक अवांतरः
सध्या शालेय निबंध लेखन कसे करावे ? या धाग्याच्या माध्यमातून खूपच छान माहिती मिळते आहे.

आमरिकेत सॅट एसे (SAT essay) आणि पुस्तक वृत्तांकन Book report असे काही प्रकार आहेत असे कळले. त्या शिवाय इतरही शालेय लेखन कौशल्याचे प्रकार असल्यास त्या बद्दल आधीक माहिती हवी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0