पोलिटिंगल भाग २ : मॉडेल मुख्यमंत्री

पोलिटिंगल - भाग १



महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री (मामु) श्री. देवेन्द्रनाना फडणवीस यांच्या डायरीतील एक पान



||श्री || || 108 वेळा नमो नमः ||



पहिल्याच ओळीला नेहमीसारखी चूक झाली. सवयीप्रमाणे श्री लिहून गेलो! उद्यापासून काळजी घेईन. खरेतर ही डायरीची आयडिया पृथ्वीराजबाबांची. शपथविधीनंतर शुभेच्छा देताना त्यांनी ही युक्ती कानात सांगितली. (त्यांना ही युक्ती मनोहरपंतांनी (त्यांच्या शपथविधीच्या वेळी कानात!) सांगितली होती म्हणे!)

रिमोटने कंट्रोल होणाऱ्या सर्वांना आपले मन मोकळे करण्यासाठी अदृश्य शाईने लिहिलेली ही डायरी फार उपयोगी पडते! तरीही चुकून कोणाला वाचता आलीच तर कंबख्ती नको म्हणून 108 वेळा नमो नमः लिहून टाकले. (मित्रांची दगाबाजी आणि हितशत्रूंची जाहिरातबाजी याविरोधात हा जालीम उपाय आहे असे बाबांनी - पृथ्वीराजबाबा नाही.. हे दुसरे!- सांगितलेय . लिहायला सुरुवात केल्यापासून आमचे २५ वर्षांपासूनचे मित्र एका दिवसात सरळ झाले! आता रोज एक असे अल्टिमेटम पाठवण्याचे काम करतात! ) असो!

आजचा दिवस फारच गडबडीत गेला. प्रातःस्मरणीय ज्ञानगुणसागर नरेन्द्रजी मोदीजींशी साधर्म्य असलेलं नाव ठेवल्याबद्दल मी सर्वप्रथम नमोजींचे आणि नंतर आईवडिलांचे मनापासून आभार मानले. माझे नाव राहूल असते तर 'केंद्रात नरेन्द्र आणि राज्यात राहूल' अशी स्लोगन देता आली असती का? तो विचार करता करता प्रा.ज्ञा. नमोजींचेही स्मरण अनायासे झालेच. ते असो!

आज आदरणीय अमितजी शहाजींनी 'रिसेप्शन' ठेवले होते. ढोकळा, फाफडा, उंधियो वगैरे सगळे गुजराती पदार्थ! खाऊन मळमळायला लागले! कुठे ताक मिळतेय का याची चौकशी केली तर तिथेही फक्त गुजराती कढी! आधीच मुंबईच्या (खरेतर पश्चिम महाराष्ट्राच्या) पाण्याने अपचन होते. त्यात हे असले बेसनाचे ज्वालाग्राही पदार्थ! विदर्भाचे राज्य वेगळे करून हा पश्चिम महाराष्ट्र गुजरातेलाच देऊन टाकला की बरे होईल. म्हणजे एक महागुजरात होईल, आणि दुसरे विदर्भराष्ट्र! मग मुंबईतले उद्योग अहमदाबादेला नेण्याचे उद्योगही करावे लागणार नाहीत. सुंठीवाचून खोकला जाईल.

नितीनभौ मात्र जोरजोरात चापत होते. एकदोनदा "अबे भैताडा, बोट लावून खा ना बे!" असे माझ्याकडे पाहून ओरडले. कुठे बोट लावायचे ते काही न कळल्याने मी एकदोनदा चटणीला बोट लावून ढोकळा खायचा प्रयत्न केला! शेवटी नितीनभौंना गुजराती पदार्थ आवडतात आणि मला नाही असे इंप्रेशन पडू नये म्हणून बळेबळे काही पदार्थ तोंडात कोंबलेच.

घरी आल्यावर हिने आराम पडावा म्हणून कायम चूर्ण दिले. (खरेतर मला त्रिफळा चूर्ण लागते पण कायम चूर्ण हा गुजराती ब्रँड असल्याने तोच वापरायचे ठरवले आहे.) आता काय 'होते' (आणि होते की नाही!) ते उद्याच कळेल!

बाकी शपथविधीच्या कार्यक्रमाचे अनेकांनी केलेले कौतुक वाचून आनंद झाला. विशेषतः शिवरायांच्या राज्याभिषेकाशी केलेली तुलना पाहून नागपुरात अनेकांना गदगदून आले. शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी उत्तरप्रदेशातून गागाभट्ट आले तसे माझ्या राज्याभिषेकासाठीही उत्तरप्रदेशातूनच आदरणीय अमितजी शहाजी यावे हा योगायोग जुळवून आणण्यासाठीच त्यांना गुजरातेतून तडीपार केेले आहे असे मी नागपुरशी फोनवर बोलताना सांगितले तेव्हा अनेकांना हुंदका आवरला नाही.

एकदोन संपादकांनी मी पूर्वी मॉडेलिंग करायचो तेही लिहिलेय. आता झोपण्यापूर्वी विचार करतो तर ते दिवस आठवतात. डायरेक्टरने सांगितले बस की बसायचे. ऊठ की उठायचे. मान वाकडी करुन वर बघायचे. हात पसरुन पोज द्यायची. डोक्याला फारसा ताप नसायचा.

मुख्यमंत्रीपदही फारसे वेगळे नाही. फक्त आमचे डायरेक्टर बदलले इतकेच!

असो!

टीपः चित्र जालावरुन साभार

field_vote: 
4.4
Your rating: None Average: 4.4 (5 votes)

प्रतिक्रिया

Smile
आता काय 'होते' (आणि होते की नाही!) ते उद्याच कळेल! ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेवटची ओळ जरा उगाच आली. खाली नवनीतछाप रसग्रहणबिहण लिहिल्याबिहिल्यासारखी. नायतर मजा येत होती! हे नियमित लिहायला घेतलंत ते बाकी बेष्ट केलंत. नि ती चित्र कुणी काढलेली आहेत? श्रेयाव्हेर नाही, म्हणजे तुम्हीच काढली असं धरायचं का? इन द्याट केस, भारीच.

***

'शेळीच्या शेपटावरून' असे नाव या सदरासाठी या ठिकानी या माद्यमातून सुचवन्यात येत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

चित्र माझी नाहीत. एवढं कुठं जमतंय. नाहीतर आम्हाला लोक अमुक म्हटले नसते का? Wink जालावर सापडलेली चित्रे आहेत. श्रेयअव्हेर टाकायला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता कसं, सदस्यनामाला साजेसं लेखन सुरू झालं. मज्जा आली.

(जाताना इकॉनॉमी क्लास येताना प्रायव्हेट जेट याबद्दल काहीतरी येऊ द्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा हा. छान लिहिलय.
बाकी सरकारं बदलल्यावर अतिशहाणा यांची लेखणी तळपायला लागली आहे. इतके दिवस आपलेच दात... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

छान!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ROFL _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्रिटिष णंदी ष्टैल एकदम! लय खंग्राट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बाय द वे, रिसेप्शन कुठल्या "होल" मधे ठेवले होते ते लिहले असते तर ज्यादा मजा आला असता.
"स्नेक" ची यादी फारच तुटपुंजी वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खवचट श्रेणी देणार्‍यांनो जन्ता माफ करणार नाही.
बायदवे : ज्या कोणी श्रेणी दिली त्याला "हलकट" अशी श्रेणी द्यायची होती ना ? खरं खरं सांगा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुटके साहेब ते जे कोण हरामी असतील ते असूद्यात. आम्ही आपले तुमच्या दोन्ही प्रतिसादांना मार्मिक श्रेण्या दिलेल्या आहेत याची क्रुपया करूण णोंद घेने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

थ्याँकू. थ्याँकू.
मला मिळालेल्या एकंदर श्रेणी पाहता मी फारच मार्मिक आणि विनोदी प्राणी आहे असे मलाच वाटायला लागले आहे.
उद्याच जाऊन मार्मिक आणि हास्यकथा मधे अर्ज देऊन येतो.

संपादक मंडळी : मला बी श्रेणीसुविधा उपलब्ध करुन द्या की राव ! तुमचं काय च्या पाणी असेल ते देउन टाकू ना ! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचं काय च्या पाणी असेल ते देउन टाकू ना !

श्रेणीसुविधा दिलेली आहे. व्यनिमधून बिल पाठवलेलं आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुफान! ROFL
आता या नव्या मुख्यमंत्र्याच्या शाब्दिक डायरी(या)चे कण असेच लीक होऊ देत (आय मीन बाहेर पडत राहोत) ही कमळाचरणी प्रार्थना (आपण सेफ खेळायचं.. कमळ म्हटलं की कसं नमो येतातही नी नाहिही!)

हर हर गादी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नागपूरकर झणझणीत तिखट पदार्थ खातात, कायमचूर्णाची गरज पडत नाही. बाकी मिरची भारीच लागलेली दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजा आली. जागोजागी लागलेले फलक बघता आता अमितजी नि काम भागत नाही -आता अमितचंद्ररावजीसहेब .......

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“We all know what to do, we just don’t know how to get re-elected after we’ve done it.” Jean-Claude Juncker