खरबड खरबड पाल...

खरबड खरबड पाल
ओबडधोबड गाल

जाडेभरडे डोळे
ना हाले ना डोले

शिकार करण्यासाठी
फिरते भिंतीवरती

जीभ करते लपलप
पोट करते धपधप

शिकार येते कोठून
कळते हवा चाटून

जवळ येताच किडा
किड्याचा करते विडा

खरबड खरबड पाल
बोला, हातात घ्याल ?

- ग्लोरी

field_vote: 
4.666665
Your rating: None Average: 4.7 (3 votes)

प्रतिक्रिया

हा हा हा!
जरा संथ प्रकारच्या चालीत फिट्ट बसतेय. आज घरी मुलीला दाखवतो ऐकवून.
आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जवळ येताच किडा
किड्याचा करते विडा

हे फक्कड..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ई ई ई

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा , माझ्याही तोंडात वाचल्या बरोबर ई ई असंच आलं .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पालींची बदनामी थांबवा!!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई!!!!!!!!!!!!!!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किती दिवसांनी ऐकलं खरं बडबड गीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद मित्रहो !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या आत्तापर्यंतच्या सर्व कविता आवडल्या होत्या. पण 'पाल' हा विषय माझ्या अंगावर काटा आणतो, म्हणून ही आवडली नाही. कारण पालीचा खरबड स्पर्श मी अनुभवला आहे.
भारतीय पद्धतीच्या संडासात बसले असताना, जर छतावरुन एकदम पाठीवर पाल पडली आणि तिने पंजाने तुम्हाला धरुन ठेवण्याचा प्रयत्न केला, तर तुमची काय तात्काळ प्रतिक्रिया होईल, तीच माझी झाली. तात्काळ उठून उभे राहिल्याने ती पूर्ण वाढीची 'वळवळ' खाली भांड्यात पडली आणि वर येण्याचा प्रयत्न करु लागली. प्रसंगावधान राखून मी साखळी ओढली म्हणून बरं झालं! नाहीतर तसेच बाहेर यावे लागले असते.
या अपघाताचा माझ्या 'बालमनावर' कायमचा परिणाम झाला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाप रे!!! हॉरिबल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे, तुमच्याकडच्या पाली संडासातसुद्धा यायच्या? पुण्यात आमच्याकडे कित्येक वर्षे पाली आहेत, पण (१) त्यांतील एकही कधीसुद्धा संडासात आली नाही (त्या सर्वांनी आपले कार्यक्षेत्र हॉल आणि बेडरूममधील ट्युबा आणि फार फार तर स्वयंपाकघर, एवढेच मर्यादित ठेवले), आणि (२) कधीही आमच्या अंगावर, जेवणात वा स्वयंपाकात उडी मारली नाही, वा अन्यथा आमच्यावर हल्ला केला नाही. (किंबहुना, आपले अंतर राखून असायच्या.)

तुम्हालाच असले अनुभव कसे काय येऊ शकतात? (मला वाटते, त्या पालींना तुम्ही 'आपल्यापैकी' वाटत नसावेत. अवर पाल्स वेअर यूज़्ड टू अस, अ‍ॅंड वी टू देम. अँड वी ह्याड अ‍ॅन अनरिटन म्यूच्युअल नॉन-अग्रेशन प्याक्ट.)

असो; यावरून एक विनोद आठवला. एकदा एक आशावादी आणि एक निराशावादी असे दोन मित्र रस्त्यातून चाललेले असता त्यांच्यात वाद होतो. निराशावादी आशावाद्याला म्हणतो, की कसे रे तुला सगळ्यात चांगले दिसू शकते? तर आशावादी उत्तरतो, की हे सगळे दृष्टिकोनावर अवलंबून असते; जर चांगले पाहायचेच असेल, तर काय वाट्टेल त्यात चांगले पाहता येते. निराशावादी म्हणतो, शक्यच नाही. एवढ्यात, आकाशातून चाललेले एक र्‍याण्डम पाखरू आशावाद्याच्या शर्टावर पसायदान करते. निराशावादी वदतो, आता याच्यात तू काहीतरी चांगले कसे पाहू शकतोस, ते दाखवच! त्यावर आशावादी म्हणतो, की हत्ती उडू शकत नाहीत, ही देवाची कृपा नाही का?

तर सांगण्याचा मतलब, तुमच्या संडासात वटवाघळे नव्हती, ही (मानत असाल किंवा नसाल, पण) परमेश्वराची काय कमी मेहेरबानी आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतीय पद्धतीच्या संडासात बसले असताना, जर छतावरुन एकदम पाठीवर पाल पडली आणि तिने पंजाने तुम्हाला धरुन ठेवण्याचा प्रयत्न केला, तर तुमची काय तात्काळ प्रतिक्रिया होईल, तीच माझी झाली.

पाल-पिटेशन्स???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाल-पिटेशन्स???

_____/\______

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल मुलीला वाचुन दाखवली.
तिला नाही आवडली. (तिलाही पाल नाही आवडत)

पण सगळी विस्फारलेल्या डोळ्यांनी ऐकली शांतपणे. शब्द डोक्यात बसलेत कारण काल रात्री पार्किंगमधील पाल दाखवताना तीने "ए बाबा, ती बग खल्बल खल्बल पाल!" असं सांगितलं Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

http://bashkalbadbad.blogspot.in/2009/03/blog-post_13.html

हे वाचले आहे का ?

हे ब्लॉगकर्ते म्हणजे 'न'वी बाजूच असणार.

रेडी रेफरन्ससाठी चोप्य पस्ते:

महाश्वेता



कसा मी रोज सकाळी उठून अर्ध्या झोपेत धडपडत धडपडत बेसिनपाशी जायचो आणि पालीला बघुन दचकायचो. नंतर आपली रोजची पालच आहे ते बघुन कसा सुखावायचो वगैर वगैरे सगळे आठवून दाटून कंठ आला एवढी आठवण आली की मग कविता करण्याशिवाय पर्याय नव्हता.


*किळसवाण्या सहित्यप्रकाराची ज्यांना किळस आहे त्यांनी कृपया वाचू नका



महाश्वेता


ओसरला हा संधिप्रकाश,
दिनकरास करकच्च रजनीपाश
झाल्या शुभंकरोत्या,
अन्‌ आटोपली स्तोत्रे


लावल्या खिडक्या
आपटली दारे,
घाबरल्या ताई, माई, अक्का
अन्‌ हादरले बाळूचे पप्पा,


फटीतून घुसले
भिंतीवर बसले,
चिलट म्हणावे का डास?
बघून त्या गट्ट्या बाळूस
पिपासूने बेत बनवला खास



अहा, ते गोबरे गाल
होतील कसे लाल
चावण्यास कडकडून
सर्वसज्ज हा डास


पण...


कडाडल्या वीजा
थरारली धरणी


चक्क चक्क चक्क चक्क,
आवाज भिंतीवरून
चक्क चक्क चक्क चक्क,
आवाज ट्यूबमागून


शक्ती ही दैवी कोणी
घोर ही रणरागिणी
रोखुन शीत हरितनेत्र
फुलवुनी लिबलिबीत गात्र
अवतरली ही महाश्वेता


पांढरीफट्ट, पांढरीफट्ट
रोवूनि पाय घट्ट
आली एक सुपाल


लांबवून जिव्हा चपळाईने
क्षणार्धातच हा घेतला घास,
पालोदरी विसावला पापी डास
पालोदरी विसावला पापी डास
*

यडपट कसा हा बाळू
मंद म्हणावे का द्वाड
पसरून भोकाड
म्हणतो आईगं, आईगं
आली पाल,

आली पाल




***

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही, बाष्कळ बडबड तर आपल्या ’जृंभणश्वाना’चा. फार तर जृंभणश्वानाचे नि ’न’वी बाजूंचं गेल्या जन्मी काहीतरी नातं असणार, इतकं म्हणीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन