'मानवी वर्तन आणि मेंदूविज्ञान' - सुबोध जावडेकर यांचे व्याख्यान

जनतंत्र-उद्बोधन-मंच (राष्ट्रवाद-अभ्यास-मंडळ) या उपक्रमाअंतर्गत 'मानवी वर्तन आणि मेंदूविज्ञान' या विषयावर सुबोध जावडेकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

वेळः रविवार दि. २५ मार्च सकाळी १०:१५
स्थळः ज्ञानप्रबोधिनी विनायक भवन, प्रबोध सभागृह, ५१४, सदाशिव पेठ. पुणे - ४११०३०.

विषय परिचयः

मानवी वर्तन आणि मेंदू यांतल्या परस्परसंबंधांचा ऊहापोह
सौंदर्य हे पाहणार्‍याच्या डोळ्यात असतं की तो त्या वस्तूचा गुण असतो?
प्रशिक्षण देऊन मेंदूची कार्यक्षमता वाढवता येते का?
आपलं नेहमीचं पाहणं सोडून इतरही काही प्रकारचं 'पाहणं' आपल्याकडे असतं.
निर्णय जाहीर व्हायच्या बर्‍याच आधी मेंदूत निर्णय झालेला असतो.
धैर्याचं केंद्र भीतीच्या केंद्राहून वेगळं असतं. त्याचं काम वेगळ्या प्रकारे चालतं.
शब्दाला जो विशिष्ट अर्थ चिकटला असेल त्या अर्थाकडे आपलं मन खेचलं जातं.
अनपेक्षित गोष्टीची नोंद मेंदू सहसा घेतच नाही.
आणीबाणीच्या क्षणी मेंदू नेणिवेच्या पातळीवर साठवलेल्या माहितीचा उपयोग करून घेतो.
माणसाचं मन वाचणारं यंत्र भविष्यात बनवता येईल.
मेंदूतलं नीतिनियमनाचं केंद्र तात्पुरतं बधीर करून नैतिकतेची व्याख्या बदलता येते.
सूड आंधळा नसतो. तो विचारपूर्वक घेतलेला निर्णय असतो.
प्रामाणिक लोक सचोटीनं वागतात कारण लबाडीनं वागायचं त्यांच्या मनातच येत नाही.

वक्त्यांविषयी: बी.टेक. (केमिकल) आय. आय. टी. मुंबई. विज्ञानविषयक लेखन अनेक वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध. विज्ञानविषयक अनेक पुस्तकं प्रकाशित.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

रोचक विषय. व्याख्यान ऐकायला आवडले असते, पण शक्य नाही. व्याख्यान झाल्यावर श्रोते ऐसीअक्षरेवर त्याची माहिती देतील व उद्बोधक चर्चा घडेल अशी आशा आहे.

अनपेक्षित गोष्टीची नोंद मेंदू सहसा घेतच नाही.

हे मात्र कळले/पटले नाही. उलट अनपेक्षित घटना माणसाला भविष्यातील तशाच स्वरूपाच्या घटनांकडे सावधपणे बघायला शिकवतात असे वाटते.

माणसाचं मन वाचणारं यंत्र भविष्यात बनवता येईल.

ही तर काहीजणांकरता फार महत्वाची बातमी ठरू शकते. मागे पाहिलेल्या एका टि. व्ही. शो मधे, एका बाईंची तक्रार होती, की पुस्तक वाचायला बेडवर बसले असता, चष्मा द्यायला, पंखा लावायला आणि नंतर पुस्तकाचा कंटाळा आला असता, टि. व्ही. लावायला, नोकराणीला बोलवायचे कष्ट होतात. माणसाचे मन वाचून त्यानुसार काम करणारे यंत्रमानव बनले, तर काय बहार येईल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> प्रामाणिक लोक सचोटीनं वागतात कारण लबाडीनं वागायचं त्यांच्या मनातच येत नाही. >>

हे पटले.
____
यावरून एक गोष्ट आठवली. एकदा एका विंचवाने एका माकडाला नदी पार करण्याची विनंती केली. मकड म्हणाले पण तू तर मला नांगी मारशील. विंचवाने ग्वाही दिली की तो नांगी मारणार नाही. पण नदीच्या मध्यात आल्यावरती मात्र विंचवाला रहावले नाही आणि त्याने नांगी मारलीच. मरता मरता माकड म्हणाले "अरेरे! मी तर मरणारच पण तू देखील मरणार" यावर विंचू म्हणाला "काय करू मित्रा माझा स्वभावच नांगी मारण्याचा, डंख करण्याचा."

तात्पर्य - स्वभावाला औषध नाही.
___
तद्वतच सज्जनांच्या स्वभावालाही औषध नाही हेच खरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुबोध जावडेकर हे माझे मित्र असल्याने त्यांनी वरील प्रतिक्रियांना उत्तर म्हणून त्यांच्या होणार्‍या भाषणाचा सिनॉप्सिस पाठवला आहे. तो मी प्रतिसादात, त्यांच्या परवानगीने देत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0