Skip to main content

एका फुलाची गोष्ट (गूढ कथा)

आश्रमात स्वामी त्रिकालदर्शी ध्यानावस्थेत बसले होते, मला पाहताच त्यांनी डोळे उघडले, क्षण न गमविता मी प्रश्न विचारला, स्वामीजी, वातावरण लय तापलंय, काय निकाल लागेल काहीच कळत नाही.

स्वामी त्रिकालदर्शी: वत्सा तुझ्या समाधाना साठी एक कथा सांगतो, एका पुष्प वाटिकेत गुलाबाचे सुंदर फुल उमललेले होते. एक द्वाड मुलगा सायकल चालवीत तिथे आला. सुंदर गुलाबाच्या फुलाला पाहून त्याने आपल्या हाताने देठा सकट गुलाबाचे फुल उपटले. सायकलवर स्वार होऊन तो घरी पोहचला. पूजा घरात पूजा करीत असलेल्या आईच्या हाती त्याने फुल दिले. गुणाचा माझा पोर म्हणत आईने प्रेमाने हात त्याचा पाठीवर फिरविला आणि नमो-नमो म्हणत ते गुलाबाचे फुल देवाच्या चरणी अर्पित केले. दुसऱ्या दिवशी पहाटे निर्माल्य झालेले फुल तिने रस्त्यावर फेकून दिले. अनेक वर्ष रस्त्यावर झाडू लावल्या मुळे अस्थमासम आजाराने ग्रस्त झाडूवाला खोकलत-खोकलत झाडू लावत होता. त्याने कचऱ्या सोबत गुलाबाच्या फुलाला ही उचलून कचरा गाडीत टाकले. स्वामीजी थांबले आणि प्रश्नार्थक नजरेने मजकडे बघितले. मी म्हणालो, स्वामीजी माझ्या सारख्या अल्प ज्ञानी जीवाला, काहीच उमगले नाही.

स्वामीजी ने स्मित केले आणि म्हणाले ‘नादान है, बच्चा’ आणि डोळे मिटून पुन: समाधिस्थ झाले.

Node read time
1 minute
1 minute