Skip to main content

पर्यावरण विषयावर माहिती हवी

जे विषय अगदीच परिचयाचे अथवा सतत वाचून चोथा झाले आहेत त्यांच्या बद्दल विकिपीडियावर कमी लिहिल जात असेल का अशी नेहमीच शंका येते. शाळा महाविद्यालय आपल गाव अशा विषयांना मराठी विकिपीडियन कमी हात लावताना दिसतात. तसाच अद्याप न लिहिला गेलेला पण मराठी विकिपीडियावर नवागत वाचकांकडून सातत्याने डिमांड मध्ये असलेला लेख विषय म्हणजे पर्यावरण हा होय. नवागत वाचकांकडून मराठी विकिपीडियावर या विषयीच्या लेखाची मागणी गेली बरीच वर्षे पुन्हा पुन्हा का होत असेल याच कारण बहुधा शालेय विद्यार्थी त्यांना शाळेतील निबंध लेखनासाठी अथवा प्रॉजेक्टसाठी मजकुर हवा असावा. का कोण जाणे मराठी विकिपीडियावर लिहिणार्‍या मंडंळींनी अद्याप पावेतो या बद्दल लिहिण्यास अद्याप पुढाकार घेतला नाही.

पर्यावरण, पर्यावरणशास्त्र, पर्यावरण अभियांत्रिकी या आणि संबंधीत विषयाबद्दल किमान दोन परिच्छेद ज्ञानकोशीय मजकुर लिहून मिळाल्यास हवा आहे. पर्यावरण प्रेमी शाळकरी मुलांच्या इंटरेस्टचा आदर राखून दोन एक परिच्छेदतरी लिहून द्यावा अशी विनंती आणि आशा आहे.

आपले या धाग्यावरील प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील. प्रतिसादांसाठी धन्यवाद.