Skip to main content

इलेक्शनी- चारोळ्या

आज सकाळी दिल्लीत निवडणूक होती. आमच्या भाग उत्तम नगर भागात, जिथे नावाखेरीज काहीच उत्तम नाही., सकाळी वोट टाकून आलो. थोडा-फार फेर-फटका ही मारला. अनधिकृत वस्तीतल्या गल्ली बोळ्यांत आज जे काही खुले आम दिसत होते, त्याला काय म्हणावं.......

(१)
प्रसाद घ्या
तीर्थ प्या
आटोत बसा
वोट आपला
असा विका.
(२)
नेता नोट
मोजतात.
नोट मते
मोजते.
(३)
गांधींच्या डोळ्यांत
एकच सवाल?
गुलाबी नोटेवर
फोटू का?