Why do we judge people?
.
दुसर्याला बरे वाटावे म्हणून
दुसर्याला बरे वाटावे म्हणून नाही तर दुसरा आपल्या हार्श जजमेंटमुळे, अनाठाइ टीकेचा, वाळीत टाकले जाण्याचा विषय बनू नये म्हणून तर ठीक आहे? असे वाचले आहे की "नकार" (रिजेक्शन) हे खर्याखुर्या जखमेसारखेच त्रास देते. मेंदू दोहोंना समानच प्रोसेस करतो.
____
आवडले हे लिहील्याबद्दल धन्यवाद :)
असुरक्षितता, मत्सर. ज्या-ज्या
असुरक्षितता, मत्सर. ज्या-ज्या ठिकाणी मला दुसर्यांपेक्षा कमीपणाची भावना येते तिथे मी त्यांना जज करतो; खोट असो वा नसो, स्वतःचे स्टॅन्डर्ड्स लावून त्या निकषांवर दुसर्याला नामोहरम करुन स्वतःची असुरक्षितता झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो.
आपल्याला जे करायला जमत नाही त्या गोष्टीला नाक मुरडून स्वतःचा इगो वाचवण्याचा प्रयत्न.
होय मान्यच आहे की जजमेन्ट हा
होय मान्यच आहे की जजमेन्ट हा एक महत्त्वाचा बौद्धिक पैलू आहे. आहेच. अशी विच्छा आहे की "करुणा" व "जजमेन्ट"" या दोन पैलूंत "करुणा" हा पैलू "जजमेन्ट" पेक्षा प्राधान्यत्व घेइल.
____
कारण जजमेन्ट हा झाला पहीला टप्पा. दुसर्या टप्प्यावर व्यक्तीबद्दलचे आपले अर्धवट ज्ञान मान्य करुन, करुणेचा स्वतःतील अंश जागृत करणे. दुसर्या टप्प्यावर देखील बुद्धीची आवश्यकता आहे.
मुक्तक खूप आवडलं. खरय, असं
मुक्तक खूप आवडलं. खरय, असं केलं जातं. कारण समजावून घेण्यापेक्षा ते सोपं वाटतं. पण त्यात खुप काही गमावतो हे सुद्धा खरय.
@नगरीनिरंजन दुसर्^याला वेगळं काढणं हा न्यूनगंड आहे की आपण त्या घोळक्यातून बाजूला होणं हा न्यूनगंड आहे?
की
न्यूनगंड+असुरक्षितता-> दुसर्^याला वाळीत टाकणे आणि न्यूनगंड+स्वतःशी पटणे(सुरक्षितता)->आपण बाजूला होणे
असं असेल का?
दुसय्रास बरे वाटावे म्हणून
दुसय्रास बरे वाटावे म्हणून गोलगोल नर्मदेतले गोटे कशाला व्हायचे आपण?
मुक्तक आवडलं.