सूफी कव्वाल अमजद साबरी यांची पाकिस्तानात हत्या
गुलाम फरीद साबरी यांचे सुपुत्र आणि प्रसिद्ध सूफी कव्वाल अमजद साबरी यांची पाकिस्तानात हत्या झाली आहे . इस्लामी मूलतत्ववाद्यांचे सूफी लोकांशी काय वैर आहे ते समजत नाही , पण कदाचित पुढील कारणे असावीत: 1. सूफी समाजांत स्त्रिया आणि पुरुष धर्माच्या उन्मादात एकत्र नाचतात. संगीत आणि हे एकत्र नाचणे दोन्ही कर्मठांना मान्य नाही . 2. सूफी अनेकदा देवाचा मित्र किंवा प्रियकर असा उल्लेख करतात . कट्टर इस्लाम मध्ये हे मोठे पाखंड आहे . "देव हा "निर्मित" जगाच्या ("creation"च्या)पलीकडचा आणि तुम्हाला कधीही कळू शकत नाही असा आहे, त्याची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही " अशी कर्मठांची श्रद्धा आहे . 3. सूफी दर्ग्यांमध्ये त्या संतांची कंबर असते ; कबरीची पूजा कट्टर इस्लाममध्ये मोठे पाप आहे . ( मध्ये एक मोठा सूफी संत बाबा गंज शकर याचा दर्गा कट्टर लोकांनी बॉम्बने उडविला , त्यात 40 लोकही मेले. ). पाकिस्तानात असे सूफींचे हत्याकांड सतत चालू आहे . ४. आणि सूफी हे गावकुसाबाहेर रहाणारे, बेभरवशाचे (आणि धर्म आणि सुलतान यांची सत्ता न मानणारे) आहेत अशीही एक शंका कायम असतेच .
पूर्वी मी एकदा फिलाडेल्फिया जवळच्या सूफी ग्रुप मध्ये गेलो होतो . त्याची प्रमुख बाई (गोरी अमेरिकन) वीस वर्षे दिल्लीच्या सूफी दर्ग्यात (निजामुद्दीन औलिया) शिकत होती . पण "तुला जर सुन्नी इस्लाम मध्ये रस असेल तर तू चुकीच्या जागी आला आहेस. आम्हीं सूफी आमची स्फूर्ती जीझस ख्राईस्ट कडून जास्ती घेतो " असे तिने मला स्पष्ट सांगितले.
https://www.youtube.com/watch?v=Rwm2Pphcbjo
वहाबी इस्लामचा सत्यानाश होवो !
पाकिस्तानी तालिबान संपूर्ण उखडली का जाऊ शकत नाही ?
पाकिस्तानी तालिबानने याची जबाबदारी स्वीकारली आहे . ही संघटना अमेरिका गेली पंधरा वर्षे प्रयत्न करत असूनही , आणि पाकिस्तानी सरकारचा त्यात खरा-खोटा सहभाग असूनही संपूर्ण उखडली का जाऊ शकत नाही असे सर्वांना वाटते आहे . याचे खरे कारण म्हणजे 4.1 कोटी लोकसंख्येच्या पश्तून जमातीबरोबर जवळजवळ एकरूप असलेली ही संघटना आहे . 4.1 कोटी लोक तुम्ही मारू शकत नाही .
पाकिस्तानी तालिबान संपूर्ण उखडली का जाऊ शकत नाही ?
पाकिस्तानी तालिबानने याची जबाबदारी स्वीकारली आहे . ही संघटना अमेरिका गेली पंधरा वर्षे प्रयत्न करत असूनही , आणि पाकिस्तानी सरकारचा त्यात खरा-खोटा सहभाग असूनही संपूर्ण उखडली का जाऊ शकत नाही असे सर्वांना वाटते आहे . याचे खरे कारण म्हणजे 4.1 कोटी लोकसंख्येच्या पश्तून जमातीबरोबर जवळजवळ एकरूप असलेली ही संघटना आहे . 4.1 कोटी लोक तुम्ही मारू शकत नाही .
वाळवंटी संतांचा काय प्रॉब्लेम
वाळवंटी संतांचा काय प्रॉब्लेम आहे हेच कळत नाही. भारतात सुफी संतांना हिंदू सुद्धा प्रचंड मानतात. कागल मध्येतर वरती गैबीचा पीर आणि खाली गहिनिनाथांची समाधी असा मामला आहे. इस्लामपुरात बुवाफन उरुसात हिंदूच जास्त्ती असतात. आमच्या गावचा पीर तर आराध्य दैवत आहे सगळ्या गावाचा. शिवाय चित्रपट संगीत सुफी शिवाय पूर्णही होत नाही. इतकं वैविध्य घालून सगळी सफेद इस्त्री करायला ह्या वाळवंटी लोकांना काय मजा येते खुदा जाणे.
वाईट घटना
अतिशय वाईट झाले. पाकिस्तानात (आनि एकंदर इस्लामी जगतातच) सूफींना सन्मानाची वागणूक मिळत नाही हे वेळोवेळी दिसून आले आहे. साबरींच्या हत्येमागचे कारण कदाचित वेगळे असेल पण मुस्लिमांतल्या अनेक छोट्या आणि उदारमतवादी पंथांचा समूळ उच्छेद करण्याचा विडाच काही अतिरेकी मुस्लिम संघटनांनी उचलला आहे आणि त्यात अगणित मुसलमान मरत आहेत. खालिस्तान आंदोलनात निरंकारी शिखांवर असेच हल्ले होत असत. मला ती सुप्रसिद्ध कविता आठवते..अँड दे केम फॉर मी..
होय, वहाबी इस्लाम लवकरात लवकर शांत होवो.