Skip to main content

गॅन्गबॅन्गपुरम्

सॉफ्ट आणि सिल्की सॅण्डलवूड क्रीमचं ऍनिमेशन
तुझ्यावरती फुगा फुटल्यासारखं येऊन आदळतं,
आणि तुझ्या अपरलिपची पोझिशन साधून
बांबूमुळे फाटलेल्या फ्लेक्सबोर्डचं
झाकण उचलून एक जण
बाहेर काढतो अलगद धडोत्तरी मुंडकं.

तिथून मी पॅन करतो तर
टीव्हीवर आणि थ्रीजीवर स्ट्रीम होत होत
तू काजळ घातलेल्या, लिपस्टिक लावलेल्या
केसांच्या खोप्यावर काही दागिने आणि
वेण्या चढवून, एण्ट्री विसरुन
विंगेत बरबट चॉकलेट खाणार्‍या
एका मुद्रेत मावेनाशी होतेस.

आम्ही रस्त्यांतून अवाक्.
आमचे ड्रायव्हर अवाक्.
आमच्या घरात, क्लबात
आम्ही सारेच दात दाबून
स्तब्ध.

तू फ्रेंच किस ने आम्हाला
ल्यूब्रिकंट हवा
पाठव.

आम्ही सारेच जंतू -
तुझ्या डेट्यामध्ये
साठव.

राजन बापट Fri, 28/10/2011 - 09:18

पुरातत्वमराठी आंतरजालपुरात आधुनिकोत्तर ग्यांगब्यांगरांचे स्वागत असो ! :) "आधी कळस मग पाया " या तत्वानुसार , ही कविता म्हणजेच एक विडंबन आहे. याची व्हर्जिनल - सॉरी , ओरिगिनल - कविता करायला मी केशवसुमार , राजेश घासकडवी यांना पाचारण करत आहे.

अबापट Tue, 30/10/2018 - 21:21

In reply to by राजन बापट

मुक्तसुनीत कधीतरीच येतात आणि गमतीशीर जोड्या लावून जातात असं
वाटलं मला. पण नन्तर वरची तारीख बघितली आणि उलगडा झाला. केशवसुमार आणि गुर्जी यांना एकत्र येऊन ओरिगीनल कविता केलेली बघायला मलाही आवडेल.
( मुक्तसुनीत: आगामी जोड्या कुठल्या ? बट्या आणि अजो , गब्बर आणि चिं जं ?)

अर्धवट Fri, 28/10/2011 - 09:22

स्वगत : मला एवढ्यानं निराश होउन चालणार नाही, चिकाटीनं आधुनीक कविता समजवून घ्यायचे प्रयत्न चालूच ठेवावे लागणार,

प्रकट : कुणी मदत करेल का हो?

आडकित्ता Fri, 28/10/2011 - 11:10

In reply to by अर्धवट

प्रकटः या बाबतीत मदत करीत नाहीत. आपला हात जगन्नाथ (सेल्फ हेल्प) अस्ते.
स्वगतः च्यायला आम्हाला समजलं तर तुम्हाला सांगू ना :(

गवि Fri, 28/10/2011 - 11:12

.....एकदम सुटत नाही हे मला मान्य आहे. पण प्रमाण रोज थोडंथोडं कमी करुन हळूहळू सोडता येते.. ;)

जोक्स अपार्ट.. कविता भन्नाट आहे.

तसा तर जल्ला मेला कायपन नाय समजला. पण कवितेचा नुसता नादच (आवाज या अर्थाने) मस्त आहे. लगे रहो जालिंदरबाबा..

श्रावण मोडक Fri, 28/10/2011 - 12:18

शरदिनीतैंची आठवण झाली. छान. छान...

प्रियाली Fri, 28/10/2011 - 17:30

In reply to by श्रावण मोडक

कवितेतलं जळ्ळं मला काही कळत नाही याचा अभिमान कधीकधी दाटून येतो तो यामुळेच. ;-)

श्रावण मोडक Fri, 28/10/2011 - 19:17

In reply to by वंकू कुमार

किती तो साळसूदपणा? ;)

राजन बापट Fri, 28/10/2011 - 19:34

In reply to by श्रावण मोडक

श्रावण , धिस इज अ केस ऑफ मिस्टेकन आयडेंटिटी ऑन युअर पार्ट.
- शरदिनीचा फॅन, कुरकरण्यांच्या व्यंकुचा परिचित आणि ऐसीअक्षरेचा अ‍ॅडमिन :)

श्रावण मोडक Fri, 28/10/2011 - 20:31

In reply to by राजन बापट

श्रावण , धिस इज अ केस ऑफ मिस्टेकन आयडेंटिटी ऑन युअर पार्ट.

ओह्ह... नो सर. अॅब्सोल्यूटली नॉट. कुरकरण्यांच्या व्यंकुनं फक्त शरदिनीतैंची आठवण करून दिली, एवढंच मला म्हणायचं आहे.
आयडींच्या नात्यात पडलो की आपण गोत्यातच जातो राव. म्हणून त्याबाबत मी दूरस्थच असतो. तुम्ही अंतस्थ आहात, त्यामुळं तुमचा प्रतिसाद मात्र माहितीपूर्ण आहे. तशी श्रेणी त्याला दिली आहे. :)

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 28/10/2011 - 19:36

In reply to by वंकू कुमार

शरदिनी ताई या एक जाल-कवयित्री आहेत. त्यांच्या कवितांमधले शब्द समजतात पण अर्थ लागत नाही.

मलाही या कवितेचा अर्थ समजला आहे असं काही मी म्हणणार नाही. कोणीतरी सांगा रे काय सुरू आहे ते!

शहराजाद Fri, 28/10/2011 - 23:20

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

त्यांच्या कवितांमधले शब्द समजतात पण अर्थ लागत नाही.

मलाही या कवितेचा अर्थ समजला आहे असं काही मी म्हणणार नाही.

चिंजं आणि धनंजय यांचे प्रतिसाद वाचल्यावर डोक्यात जरासा प्रकाश पऊ लागला आहे.

टारझन Fri, 28/10/2011 - 12:26

गॅन्ग्बॅन्ग्च्या निमित्ताने मराठी विश्वात क्रांती होतेय असे म्हणायला हरकत नाही.
(थ्रीसम प्रेमी ) टारू

बिपिन कार्यकर्ते Fri, 28/10/2011 - 18:25

मा**व!

टिन Fri, 28/10/2011 - 19:36

ए.अ.ला.त.श.
एक अक्शर लागेल तर शप्पथ! (पु.लं.- नस्ती उठाठेव)

क्रेमर Fri, 28/10/2011 - 21:31

माहितीचा लिंगगोंगाट दोन बायनरी ओठांच्या बायटीत लुप्तवण्याची कल्पना आवडली.

Nile Fri, 28/10/2011 - 22:40

किंचित अवघड-वलतं मला... तिच्या क्लिष्टतेनं म्हणतोय मी. तीचं रूप अजूनही कोवळं असतं तर चाललं असतं, पण क्लम्झीही आवडतचं काहींना.

धनंजय Fri, 28/10/2011 - 22:50

हिंस्र आणि विनोदी यांच्या मिश्रणामुळे रचना अस्वस्थ करते आहे.

पहिल्यांदा वाचता आवडली नाही, हे कबूल करतो. (आधी मलाही वाटले, की ही विडंबन-कविता आहे. म्हणजे कुठल्याशा कवितेचे किंवा शैलीचे विडंबन.) तिसर्‍या-चौथ्यांदा वाचताना आवडली. (विडंबन असलेच तर तथ्याचे विडंबन आहे. आणि असे विडंबन स्वतंत्र काव्य होय.)

मोटारगाडीमधून प्रवास करत असताना रस्त्याशेजारी दिसणार्‍या मोठमोठाल्या (स्थिर आणि चलत्) जाहिराती आठवल्या.

चिंतातुर जंतू Fri, 28/10/2011 - 22:53

काही समजलं नाही असे काही प्रतिसाद वर दिसले म्हणून माझ्या अल्पमतीनुसार अर्थबोधनाचा हा एक प्रयास...

पहिल्या कडव्यात बहुधा एका होर्डिंगवरच्या ललनेकडे निर्देश असावा. तिच्या ओठाच्या पोझिशनवर होर्डिंग फाटलंय आणि त्यातून (एखाद्या कामगाराचं बहुधा) मुंडकं दिसतंय. दुसर्‍या कडव्यात दुसर्‍या जाहिरातीतली (अजून एक) ललना आहे. ही जाहिरात टीव्ही आणि ३जी स्मार्टफोन्सवर दिसते आहे. म्हणून रस्त्यात असणार्‍या निवेदकाला जरा नजर वळवून (आपल्या फोनवर) तीही पाहता येते आहे. एकंदरीत विविध जाहिरातींतून दिलखेचक मुद्रा/शरीराविर्भावांतून पुरुषवर्गाला भुरळ पाडण्याचं काम चांगल्या रीतीनं पार पाडणार्‍या अनेकविध ललनांचा चोहोबाजूंनी होणारा भडिमार आणि त्यामुळे अवाक झालेला सर्व सामाजिक स्तरांतला पुरुषवर्ग हे या कवितेचे विषय असावेत. कवितेत 'तोंड' या अवयवाचं वेगेवेगळ्या अंगानं वर्णन करून प्रतिमांतली लैंगिकता अधोरेखित केलेली आहे. उदा: तोंडात घुसलेला बांबू आणि त्यामुळे निर्माण झालेल्या छिद्रातून बाहेर पडणारं मुंडकं, बरबटलेल्या तोंडानं चॉकलेट खाणं, फ्रेंच किसमधून लुब्रिकेटेड हवा सोडणं. लैंगिक प्रतिमांच्या या भडिमारामुळे स्त्रीची जी प्रतिमा निर्माण होते ती काहीशी अग्रेसिव्ह आणि कामातुर आहे. व्यक्तिगत आयुष्यात पुरुषवर्गाला कदाचित याचं काहीसं दडपणही येत असावं - म्हणजे अशा स्त्रीला आपण एक पुरुष म्हणून पुरे पडू शकू का अशी स्वकर्तृत्वाविषयी शंका. म्हणून 'तुझ्यासाठी आम्ही यःकश्चित असे एक डेटा पॉईंट केवळ असू' असं म्हटलेलं आहे.

वंकू कुमार Fri, 28/10/2011 - 23:02

In reply to by चिंतातुर जंतू

मार्केटमध्ये महिला वर्गाला स्वतंत्रपणे असण्याची गरजच नाही. मार्केट ने क्रयशक्तीच्या ल्यूब्रिकंट हवेत कस्टमरांना इतके मदांध करुन सोडलंय की शारीर महिलेला केवळ साधनाचं स्थान उरलंय महाराजा !

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 28/10/2011 - 23:32

In reply to by वंकू कुमार

मार्केट ने क्रयशक्तीच्या ल्यूब्रिकंट हवेत कस्टमरांना इतके मदांध करुन सोडलंय की शारीर महिलेला केवळ साधनाचं स्थान उरलंय महाराजा !

साधनाचं स्थान किंवा शारीर महिला सोडून आता इतरही प्रकारे स्त्रियांना अस्तित्त्व आहे जे पूर्वी नव्हतं किंवा नगण्य होतं. इतर प्रकारच्या स्त्रियांमुळे या स्त्रिया काही अंशी वेगळ्या दिसल्याने त्यांच्यावर लिखाण करणं हे त्यांचं महत्त्व का?

व्यंकटराव, लिहीत रहा. आज ना उद्या माझ्यासारख्यांना कविता थोडी थोडी समजू लागेल अशी (वेडी) आशा आहे.

सामो Tue, 30/10/2018 - 21:57

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रतिसाद आवडला. विशेषत:

साधनाचं स्थान किंवा शारीर महिला सोडून आता इतरही प्रकारे स्त्रियांना अस्तित्त्व आहे जे पूर्वी नव्हतं किंवा नगण्य होतं.

अर्धवट Sat, 29/10/2011 - 07:38

चिंजंच्या आणि व्यंकू यांच्या प्रतिसादामुळे बर्‍यापैकी कळलं असं वाटतंय. म्हणजे किमान गाभा तरी कळला आहेच, अर्थही लागतोय. रचना परत परत वाचतोय. आता अपील होतिये.

दोघांनाही धन्यवाद

अवांतर - व्यंकू आणि जंतू यांनी अशा प्रतिसादातून न कळलेल्या रचनेची हळूवार उकल केली तर आमच्यासारख्या कोरड्या माणसाच्या नशीबात चार चांगले थेंब पडूही शकतील.

प्रणव सखदेव Sat, 29/10/2011 - 11:58

वंकू साहेब आपण इथेही! :-)
असो. पण कविता आधीही वाचली होती. सररिअलिस्टिक म्हणता येईल अशी.
मार्केटसिस्टिमची बिगबँग.
आपण त्यात डिनचॅंग!

चिंजंश्रामो Sun, 30/10/2011 - 00:50

स्मार्टफोन, गाडी, गाडीला ड्रायवर, क्लब मेंबरशिप असं सगळं असून मार्केटला नावं ठेवणं फुकाची तक्रार वाटली. आमची दाद.