Skip to main content

कॉंग्रेसची संस्क्रूती

मित्रांनो , आपण भारतात राहतो म्हणजेच लोकशाहीप्रणीत देशात राहतो तरीही राजकारणात घराणेशाही का? कॉँग्रेस पक्षात आज नेहरुंपासून घराणेशाही नांदत आहे . नेहरु - इंदिरा -राजीव -संजय - सोनिया आणि आता राहूल. यांनी सारा भारत देश पोखरुन टाकला आहे . शिवाजी महाराजांच्या राज्यातले पुढारी आज पदासाठी गांधी घराण्याचे तळवे चाटतात ही अत्यंत शरमेची बाब आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान केव्हाच संपला . आज या कॉंग्रेस सरकारने जगात भारताची प्रतिमा अडाणी ,उदासिन केली आहे. आज या भारतात इतके हल्ले होतात तरी हा देश गरीब गाईप्रमाणे सहन करतो . आरोपीँना शिक्षा न होता त्यांची बडदास्त ठेवली जाते . इथले मंत्री आज प्रचंड घोटाळे करीत आहे. कोणामुळे ? या कॉँग्रेसमुळे! ज्यावेळी भारत-पाकिस्तान फाळणी झाली होती त्यावेळेस याच कॉँग्रेसने पाकिस्तानला 55 कोटी दिले होते याचा उपयोग त्यांनी तेथील हिँदूंवर अत्याचार करण्यात केला . आज या देशात बेकारी , महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे .शिक्षण चांगले नाही शिक्षणमंत्री वर्षाला बदलतो.
महाराष्ट्रातही तिच गत आहे. चव्हाण , देशमुख , पाटील , पवार या मुठभर लोकांच्या हातात सत्ता असुन ते मग्रूर झाले आहेत.

आडकित्ता Sat, 29/10/2011 - 20:57

घराण्याचे तळवे चाटतात

तळवे म्हंजे काय?
घराण्याचे तळवे कुठे अस्तात?
ते चाटल्याने काही क्षार / व्हिटॅमिन वगैरे मिळतात काय? (ते एक जनावरांचे खारी चाटणे असे प्रकर्ण अस्ते तत्सम)

धनंजय वैद्य Sun, 20/05/2012 - 16:57

या कॉँग्रेसच्या लोकांमुळे आपले हे हाल आहेत. त्या पंडित नेहरुनी जर गळचेपिपणा केला नसता तर आज जवळ जवळ पुर्ण काश्मिर आपले असते. तसेच कारगिल युध्दही झाले नसते व जवानांना प्राण द्यावा लागला नसता. घराणेशाहिचे दुसरे नाव कॉँग्रेस आहे.

नितिन थत्ते Sun, 20/05/2012 - 17:45

हा पण पुण्य नगरी पेप्रातला लेख आहे का?

नितिन थत्ते Sun, 20/05/2012 - 20:51

आम्हाला हल्ली काँग्रेसचे लोक ममता, मुलायम वगैरेंचे तळवे चाटताना दिसतात बॉ.

क्लिंटन Mon, 21/05/2012 - 09:06

आपण भारतात राहतो म्हणजेच लोकशाहीप्रणीत देशात राहतो तरीही राजकारणात घराणेशाही का?
लोकांनी एकाच घराण्यातील नेत्यांना वारंवार निवडून दिले असल्यामुळे राजकारणात घराणेशाही आहे असे वाटायचा संभव आहे.पण सत्य परिस्थिती तशी नाही.

कॉँग्रेस पक्षात आज नेहरुंपासून घराणेशाही नांदत आहे
आपल्याला नेता म्हणून कोण पाहिजे हे ठरवायचा अधिकार त्या पक्षातील लोकांचा.पक्षाने कोणाला नेता म्हणून निवडावे हे इतरांनी का सांगावे?

यांनी सारा भारत देश पोखरुन टाकला आहे
म्हणजे नक्की काय केले आहे?

शिवाजी महाराजांच्या राज्यातले पुढारी आज पदासाठी गांधी घराण्याचे तळवे चाटतात ही अत्यंत शरमेची बाब आहे.
तुमचा नक्की आक्षेप कशावर आहे? तळवे चाटण्यावर की गांधी घराण्याचे तळवे चाटण्यावर?एका देशभक्त पक्षात मात्र इतर राज्यांमधील पुढारी पदासाठी महाराष्ट्राच्या उपराजधानीत असलेल्या "रेशीमबाग" का काहीतरी म्हणतात त्या ठिकाणी बसलेल्या ढुढ्ढाचार्याचे तळवे चाटतात. ती पण शरमेची बाब आहे की इतर राज्यातील नेत्यांनी महाराष्ट्रातील कोणाचे तरी तळवे चाटले म्हणून ते चांगले?

महाराष्ट्राचा स्वाभिमान केव्हाच संपला .
हो का? बरं बरं.

आज या कॉंग्रेस सरकारने जगात भारताची प्रतिमा अडाणी ,उदासिन केली आहे
काय सांगता?

आरोपीँना शिक्षा न होता त्यांची बडदास्त ठेवली जाते
दोषी म्हणायचे आहे का तुम्हाला?

इथले मंत्री आज प्रचंड घोटाळे करीत आहे. कोणामुळे ? या कॉँग्रेसमुळे!
इतरांवर दोष ढकलून दिला की किती चांगले असते ना?या मंत्र्यांना परत परत निवडून कोण देतो?तुम्ही आम्हीच ना?मग या घोटाळ्यांमध्ये आपला काहीच दोष नाही?मते देताना अक्कल कुठे पेंड खायला गेली होती?वेळ आल्यावर मताधिकाराचा योग्य वापर करायचा नाही आणि नाकातोंडात पाणी गेले की मग हवेत कोणीतरी उपोषण करायला आणि "जनठोकपाल" बिलाची मागणी करायला!!

ज्यावेळी भारत-पाकिस्तान फाळणी झाली होती त्यावेळेस याच कॉँग्रेसने पाकिस्तानला 55 कोटी दिले होते याचा उपयोग त्यांनी तेथील हिँदूंवर अत्याचार करण्यात केला
काय सांगता?

आज या देशात बेकारी , महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे .शिक्षण चांगले नाही शिक्षणमंत्री वर्षाला बदलतो.

खरं की काय?

महाराष्ट्रातही तिच गत आहे. चव्हाण , देशमुख , पाटील , पवार या मुठभर लोकांच्या हातात सत्ता असुन ते मग्रूर झाले आहेत.
नाही हो सत्ता आपल्याच हातात आहे.

त्या पंडित नेहरुनी जर गळचेपिपणा केला नसता तर आज जवळ जवळ पुर्ण काश्मिर आपले असते.
गळचेपिपणा म्हणजे काय? बोटचेपेपणा का?१९४७-४८ सालच्या युध्दामधील घटनांचा तारीखवार अभ्यास करा असा नम्र अनाहूत सल्ला देतो.म्हणजे असे विधान तुम्ही नंतर करणार नाही.

धनंजय वैद्य Mon, 21/05/2012 - 10:33

क्विँटनजी तिकडे अमेरिकेत राहुन तुम्हाला आम्हांविषयी ते काय वाटणार! तुम्हाला ते कॉँग्रेसच जवळचे वाटणार हे स्वाभाविक आहे. पण ज्या लोकांचे प्राण आज जाताएत त्याला जबाबदार कोण तर तुम्ही म्हणाल की धनंजय वैद्य! अहो पण सगळे समोर असुनही तुम्ही सत्य नाकारत आहात. अजुन सांगतो , कारगिलच्या वेळी याच कॉँग्रेसवाल्यांनी देशाची , सरकारची साथ द्यायची सोडुन पोळी भाजुन घेतली. घ्या!

श्रावण मोडक Mon, 21/05/2012 - 10:52

समस्त ऐसीअक्षरेकरांना नम्र विनंती. हा धागा असाच चालू राहू द्या... अधूनमधून कामांतून कंटाळा आला की उघडून वाचता येतो. थोडं हसता येतं... ;-)

टांगापल्टी Mon, 21/05/2012 - 15:09

हाहाहा
एखाद्या अभ्यासू विद्यार्थ्याने एखादा पेपर कंटाळा आल्यासारखा लिहीला असे वाटते.
=))
मनोरंजनाबद्दल हाबीणंदण.

तिरशिंगराव Tue, 23/04/2013 - 20:11

असं काही फक्त काळं आणि पांढरं नसतं हो! वाजपेयी एका निवडणुकपूर्व मुलाखतीत म्हणाले होते की, 'आम्ही निवडून आलो तरी परिस्थितीत फार फरक पडणार नाही. जोपर्यंत ही व्यवस्था बदलत नाही तोपर्यंत हे असेच चालणार.' ही मुलाखत तूनळीवर बघितली होती. आता संदर्भ शोधावा लागेल.
सर्व समाजच भ्रष्ट झालेला असताना कोणा विशिष्ट व्यक्तीला दोष देता येणार नाही.
आपल्या मेंदूवर कितीही धूळ बसली तरी चालेल, पण तो कुणाकडूनही धुवून घेऊ नये.