Skip to main content

मी जगायला शिकलो.

निवृत्त झाल्यावरच मी आता कुठे जगायला शिकलो
मित्रांसोबत हसायला शिकलो
आपल्या मनासारखं जगायला शिकलो.
जीवनाला खूप बारकाईने समजल्यानंतर
आता मी त्याला आहे तसं स्वीकारायला शिकलो.
दु:खाचे रडगाणे न गाता
हसता हसता आनंदाने जगायला शिकलो.
जीवनाचे कठीण कोडे पडल्यानंतर
त्याला सहजपणे सोडवायला शिकलो.
लोकांच्या चेहऱ्यातील लपलेला खोटा चेहरा समजल्यानंतर
न रागावता आता त्यांना संयमाने हाताळायला लागलो
कोणी कितीही नावं ठेवली
तरी आपल्या मनासारखं जगायला शिकलो.
जीवनाचा खरा अर्थ कळल्यावर आता मी
माझ्यासाठी कमी आणि इतरांसाठी जास्त जगायला शिकलो.