Skip to main content

विचार

विचार विचार अन विचार..
नुसते मेंदूचे चक्र
कृती मात्र शून्य
परिस्थिती नाही
का ती निर्माण करण्याची कुवत
का बोथट झाल्या जाणीवा
का मेल्या सर्व भावना
का विसर स्वप्नांचा
का मंदावली जिद्द
का लगाम बसला वेगाला
का बदलल्या प्राथमिक गरजा
का वर्तमानातच समाधान
का भविष्य झाले धूसर
का.. का.. अन का..?
विचारच फक्त.......
होतील कधी कृती पूर्ण..