Skip to main content

अभंग

अज्ञाताच्या काठावर
शब्द धूसर होतात
अर्थ निरर्थाचे द्वैत
कल्लोळून होते शांत

अदृष्टाच्या नजरेला
दिठी भिडविण्या येतो
अज्ञेयाच्या अनुल्लंघ्य
उंबर्‍याशी थबकतो

अथांगाच्या डोहावर
अनाहताचे तरंग
नश्वरशा ओठावर
चिरंतनाचा अभंग