Skip to main content

अनन्तयात्री

अनाम नक्षत्रातील तारा
झळाळताना गगनी
अनाहताच्या झंकाराची
दुमदुम आली कानी

इंद्रियगोचर अवघे अनुभव
एकवटोनी गेले
स्थूल सूक्ष्म जड चेतन यातील
भेदही गळून पडले

सुदूर बघता बघता अवचित
क्षितिज बिंदुवत उरले
अडले पाऊल कुंपण तोडून
अनन्तयात्री झाले