Skip to main content

रेंगाळतो आहे..

आजतोवर वाचलास तु
हा एक योगायोग आहे
एक नजर टाक बाहेर
तुझा मृत्यु दारात रेंगाळतो आहे

भरल्यापोटीचे तुझे भुकेचे डोहाळे
काही केल्या संपत नाहीत
डोळे उघडुन बघ जरासे
गरजुंची आज दैना आहे
एक नजर टाक बाहेर
तुझा मृत्यु दारात रेंगाळतो आहे

अपेयासाठी रांगा लावुनी
काय तु कमावतो आहेस?
आज तु वाचलास परि
तु उद्याचे बुकींग करुन ठेवतो आहेस

जीवाचा आटापिटा करत
तुझ्याच हितासाठी
देव स्वतः झुंजतो आहे
तरीही क्षुल्लक कारणे देऊन
तु रस्ते धुंडाळतो आहेस

क्षणभर नजर टाक बाहेर
तुझा मृत्यु दारात रेंगाळतो आहे..

-दिप्ती भगत
(९मे,२०२०)