Skip to main content

गावाचा पिंपळ आणि इतर क्षणिका

पिंपळाने सोडले
गावाच्या पाऱ्याला.
फ्लैट मध्ये आला
मनी प्लांट झाला.

(२)
वाळूचे मनोरे
वार्यात उडाले.
भग्न स्वप्नाची
अधुरी कहाणी.

(३)
कल्पनेला मिळेना
साथ शब्दांची.
कोरीच राहिली
वही कवितेची.

(४)
पुरोगामी प्रतिक्रिया पाहिल्यानंतर

काटा रुते कुणाला
हा दैव योग आहे.
भाला रुते कितींना
हा मोदी योग आहे.

तिरशिंगराव Fri, 13/08/2021 - 10:28

काही नम्र सुचवण्या:

१. तुम्हाला बहुधा 'गावाच्या पाराला' म्हणायचे असावे.

२. वाळुचे मनोरे आणखी कशात उडाले तरी मज्जा येईल.

३. वाचून बरं वाटलं.

४. हा मोद योग आहे, हे मीटरमधे चांगलं बसेल. शिवाय अर्थही बदलणार नाही. (मोदी = आनंदीआनंद हे आपलं गृहीत))