Skip to main content

जवळीक

भेटताना कुणीही
लांबून लांबून भेटत नाही
जवळ आल्याशिवाय
नाती कधी कळत नाहीत

नुसतेच पाहणे प्रेमाने
समाधान कधी देत नाही
मिठी शिवाय जवळीक
कधीच कशी वाटत नाही

द्वेषासाठी सुद्धा व्यवहार
करावेच लागतात
ते करताना मात्र थोडा
स्वार्थ डोकवावा लागतो

जवळ येऊन दूर जाणं
सोपं जात नाही
प्रेमासाठी खस्ता
उगाचच कोणी खात नाही

अरुण कोर्डे