Skip to main content

शेष

नेणिवेला जाणिवेने छेदता जे उरतसे
सकल ते समजून घेणे कधिच का सोपे नसे?

या क्षणी जे स्तंभ भासे, शूर्प ते पुढच्या क्षणी
पाहू मी गजरूप कैसे, नेत्र माझे झाकुनी

कोणी त्या म्हणतात माया; वास्तवाचा विभ्रम
कोणी त्या म्हणती अविद्या; म्हणती कोणी संभ्रम

वास्तवाचे रूप कैसे? कोण जाणे सर्वथा?
ज्ञेय-ज्ञाता भेद फिटता
शेष
आदिम
शांतता