Skip to main content

शिव-हरी जोडीद्वारे व्हायोलिनचा वापर

टीपः मी संगीततज्ज्ञ नाही. प्रश्न सामान्य रसिकाचा आहे.

संतूरवादक शिवकुमार शर्मा यांचे अलीकडेच निधन झाले. संतूर हे त्यांनी लोकप्रिय केलेले वाद्य. त्यांनी हरीप्रसाद चौरसिया यांच्यासह काही चित्रपटांना संगीत दिले. प्रत्येक संगीतकाराची एक ओळख तयार होते.माझ्या कयासाप्रमाणे, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी डफली, खंजिरी, तबला या वाद्यांचा वापर भरपूर केला. नदीम -श्रवण यांनी व्हायोलीन चा वापर खूप केला. शिव-हरी यांनी संतूर, बासरी यांचा वापर खूप केला. व्हायोलिनचा वापरही केला असावा. व्हायोलिन संगीतकारांसाठी आवश्यक असावे. दोन कडव्यांमधली जागा भरणे, ध्रुवपद व कडवे यांच्यातील जागा भरणे याकरता त्याचा वापर होत असावा.

प्रश्न असा - शिव-हरी जोडींने मोठ्या प्रमाणात व्हायोलिन वापरले आहे का ? असेल तर कृपया कोठे वापरले आहे, त्या बोलपटाचे नाव सांगावे.

स्पर्धा का इतर?