Skip to main content

अडगळ

अडगळीतील कप्पा
आणि आठवणींची धुंदी.
ओठावर हासू
आणि आसवांची गर्दी.
तेव्हा उडालेले पक्षी ..
आणि अजून त्यांचं भिरभिरणं
भेटलं तर घरटं ..
नाहीतर अजून फिरणं.
काहींचं घरटं बांधणं ..
अन आपलं आयुष्य सावरणं.
काहींच दाराला कुलूप लावणं..
आणि मांडलेल सार आवरणं.