आपले वाङमयवृत्त – जून २०१२

मे २०१२ अंकाचा परिचय - http://www.aisiakshare.com/node/896

जून महिन्याच्या अंकाच्या मुखपृष्ठावर हेन्री मूर या ब्रिटिश शिल्पकाराचं शिल्प आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बॉम्बहल्ल्यापासून बचाव करण्यासाठी बांधलेल्या जमिनीखालच्या आसऱ्याचं हेन्री मूरनंच काढलेलं चित्र मलपृष्ठावर आहे. अंकात दीपक घारे यांनी मूरचा परिचय करून दिला आहे. ब्रिटिश समाजाच्या तत्कालीन नैतिकतेला भेदणाऱ्या या शिल्पकारानं विसाव्या शतकात जागतिक कलेवर ब्रिटिश मोहोर उठवली होती.

बीजिंगला एका पुस्तक मेळाव्यासाठी गेलेले असताना चंद्रकांत पाटील यांना दिसलेला (आणि न दिसलेला) चीन त्यांनी एका लेखात वर्णन केला आहे. ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या राजकुमार तांगडे लिखित आणि नंदू माधव दिग्दर्शित नाटकाविषयी मुकुंद टाकसाळे यांनी लिहिलं आहे. अनिल धाकू कांबळी यांच्या तीन कविता अंकात आहेत.

लोकवाङमय गृहानं प्रकाशित केलेली महेंद्र कदम यांची ‘आगळ’ ही कादंबरी ललित मासिकानं आपल्या मे महिन्याच्या अंकात ‘लक्षवेधी पुस्तकं’ या यादीत समाविष्ट केली होती. त्या निमित्तानं ललितमध्ये संजय भास्कर जोशी यांनी त्या कादंबरीविषयी लिहिलं होतं. तो लेख या अंकात पुनर्प्रकाशित केलेला आहे. पुण्यात नुकत्याच झालेल्या युवा साहित्य-नाट्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अच्युत गोडबोले होते. त्यांच्या अध्यक्षीय भाषणातला निवडक मजकूर ‘साहित्य आणि समाजभान’ या शीर्षकाखाली या अंकात वाचता येईल.

एकोणिसाव्या शतकात महत्त्वाचं वैचारिक लिखाण करणाऱ्या स्त्रियांपैकी ताराबाई शिंदे आणि पंडिता रमाबाई बऱ्याच जणांना परिचित असतात. पण महात्मा फुल्यांची विद्यार्थिनी मुक्ताबाई किंवा नाशिकचे मिशनरी फरार यांच्या पत्नी तितक्या परिचित नसतात. मुक्ताबाईंच्या एका भाषणाला गेल्या अंकात प्रसिद्धी मिळाली होती. मिसेस फरार यांचा ‘कुटुंबप्रवर्त्तननीति’ (१८३५) आधुनिक मराठीतला पहिला स्त्रीलिखित ग्रंथ म्हणून ओळखला जातो. ‘स्त्रीशिक्षण, सत्यता, प्रामाणिकता इत्यादीविषयी’ या शीर्षकाखाली या पुस्तकातल्या एका उताऱ्याचा अंकात समावेश केलेला आहे.

जूनचा अंक आणि आधीचे अंक http://www.lokvangmaygriha.com/avv.html या दुव्यावर वाचता येतील.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

माहितगार यांच्यामुळेच 'आपले वाङमयवृत्त'ची ओळख झाली होती. दर महिन्याला नवा अंक आला की माहितगारांकडून संक्षेपाने आढावा येणार अशी खुणगाठ बांधली आहे. आणि या आढाव्याची वाट पाहत असतो.

चांगला आढावा.. आता यावेळचा अंक वाचूनच वाटल्यास अधिक लिहितो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पहिली शिल्पांची चित्रे आवडली. शेवटचं दफ्गडी शिल्प एकटंच सुटं पाहिलं असतं तर तितकाच अस्वाद घेऊ शकलो असतो का असा विचार मनात आला (आणि उत्तर नकारार्थी आलं.. ही माझी मर्यादा जाणवली) मात्र आस्तेकांना 'अ‍ॅझटेक' केलेले खटकले.

पाटलांचं चीन ठिकठाक! घटनांची यादी आहे.. वर्णनात्मक भाग जास्त.. विचार कमी
टाकसाळ्यांचा लेखही ठिकच वाटला. संप(व)ला खरा.. पण जसा सुरू झला तसाच संपला.. इतरांच्याच प्रयोगाची, संपादकीयाची वगैरे ओळख करून देत.. स्वतःच काही न देताच संपला..

'अनिल धाकू कांबळी' यांच्या तीनही मुक्तछंदातल्या कविता अतिशय आवडल्या. अगदी वाचनीय.

आतापर्यंतचा अंकतरी अपेक्षेला उतरत नाहीये यापुढला बघुया कसा वाटतोय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!