एक ठुमरी, एक भावना, एक राग : अनेक कलाकार.

लग्नानंतर नववधूला “बिदा” करणे हा भारतीय कुटूंबामधला एक अतिशय नाजूक ,कोवळा , भावोत्कट क्षण ! आयुष्याचा एक अध्याय पूर्ण करून नवा अध्याय सुरु करायला सासरी निघालेली मुलगी. आई –आणि ती मुलगी रडून आपल्या भावना व्यक्त करतात . पण दुर्दैवाने सगळ्यांनाच असे रडून मोकळे होता येत नाही. मग हया भावना व्यक्त करण्यासाठी कविता गाण्यांचा आधार घेण्यात येतो. “दाटून कंठ येतो” हे सिनेमा मधले गाणे किंवा “दमलेल्या बाबाची कहाणी” सांगणारे भावगीत सामान्यांच्या ह्याच अव्यक्त भावना स्पष्ट करतात आणि आपल्याला भावतात.
हिंदी चित्रपटात तर हया बिदाई प्रसंगाचा इतका अतिरेक झाला आहे कि त्यामधील भावना न दिसता अती सामान्य मेलोड्रामा उभा राहतो. असो.
ह्याच भावना व्यक्त करणारी एक प्रचलित ठुमरी आहे.”बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए”. आपल्या पैकी जाणकारांनी ही अनेक वेळा ऐकली असेलच आणि त्यांना परात ऐकायला निश्चित आवडेल. ज्यांनी हयापूर्वी ऐकली नसेल , त्यांना ही ठुमरी नक्की आवडेल.

बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए ( मी आता माहेरा पासून दूर जाते आहे )
चार कहार मिल, मोरी डोलिया सजावें (चौघा भोयांनी डोली घेतली आहे )
मोरा अपना बेगाना छुटो जाए ( मी आता परकी होणार )

ही ठुमरी गाण्याचा मोह सगळ्या गायकांना पडणे अगदी साहजिक आहे. आपण तिचा / चौघांना ऐकूया !
पंडीत भीमसेनजीनी पहा कशी मुलायमपणे उलगडून दाखवली आहे.
http://www.youtube.com/watch?v=8R2yZ6y3hh4

गिरिजा देवी हया एक प्रसिद्ध ठुमरी गायिका. बनारसी ढंगाने जाणारी त्यांची हीच ठुमरी , ह्याच भावना पण पूर्णपणे वेगळा आविष्कार.
http://globalmarathi.com/Music.aspx?SearchText=Bhairavi%20Thumri%20Babul%20Mora

ही ठुमरी भैरवी रागातील आहे. भैरवी हा पाण्या सारखा राग , ज्या भावना टाकल त्याचा पूर्ण न्याय होणार. थोडा कातर, थोडा पर्युत्सुक !

एव्हाना तुम्ही अंतरा ऐकला असेलच
आँगना तो पर्बत भयो और देहरी भयी बिदेश
जाए बाबुल घर आपनो मैं चली पीया के देश

( ज्या अंगणात मी खेळले बागडले ते आंगण आता माझ्या साठी “पर्वता” सारखे दुरून दिसणार , कठीण होणार आणि देहरी – देवडी / उंबरठा हा परदेस होणार. मी माझे माहेर सोडून “पिया” च्या घरी जाणार ).

तू नळी, स्नीप वर तुम्हाला हया ठुमरीचे, वेगवेगळया गायकांचे खूप दुवे मिलातीत , प्रत्येक गायकाने काही तरी वेगळे करून दाखवलेले तुम्हाला जाणवेल.

आता येथे एका तरुण कलाकार आरती नायक यांची ठुमरी ऐका. तीचभावना , तोच राग , तेच शब्द कसे नव्याने फुलून आलेत !

http://www.youtube.com/watch?v=umGSALNdujI

काही जुने म्हणून होत नाही , आपल्या संगीताची हीच तर खासियत आहे.

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

मनोज, तुमच्या लेखनातले दुवे कच्चे निघाले. ते दुवे पक्के कराल तर लोक तुम्हाला दुवा देतील ! (प्रत्येक दुव्यावर क्लिक केल्यावर फिरून पुन्हा तुमचाच लेख दिसतो आहे. दुवा कापून मग नव्या टॅबमध्ये डकवून मगच ऐकता येतो आहे.)

बाकी भीमसेन आणि हृदयनाथाङ्कडून ही भैरवी पूर्वी ऐकली आहे. अनेक ढ्ङ्गानी ती समोर येते यात शङ्का नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेक ढ्ङ्गानी ती समोर येते यात शङ्का नाही.

ढङ्गान्नी.

धन्यवाद. (बाकी चालू द्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्री. अमुक यांनी नमुद केलेले दुवे आता दुरुस्त केले आहेत.
टिपः दुवे देताना Insert / Edit Links या बटणाचा (टेक्स्टबॉक्सच्या वरच्या पट्टीतील डावीकडून चौथे बटण) वापर केल्यास 'दुवादान' अधिक सोपे जावे.

बाकी प्रतिक्रीया दुव्यावरील संगीत ऐकल्यावर देईनच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आत्ताच तीनही गायकांनी सादर केलेली ठुमरी ऐकली. मजा आली. तिघांच्याही आवाजाची जातकुळी वेगळी, आणि ठुमरी सादर करण्याची पद्धतही वेगळी आहे. मला भीमसेनांची आवडली पण त्याहीपेक्षा आरती नायकांची आवडली.

तुमचा हा उपक्रम उत्तम आहे. अजून अशाच अनेक गायकांनी गायलेल्या चीजा सादर केल्यात तर आम्हा कानसेनांचे कान तृप्त होतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिघांच्याही आवाजात ऐकायला आवडलंच पण आरती नायकांचं गाणं अधिक आवडलं. एक संशय असा येतो आहे की हे रेकॉर्डिंग नवं आहे. जुन्या रेकॉर्डींगमधे low frequencies येत नाहीत त्यामुळे नाही म्हटलं तरी श्रवणानंद मर्यादित होतो.

हिंदी सिनेमांनी केलेल्या अतिबाजारूपणामुळे एकूण अशा प्रकारच्या प्रसंगांबद्दल, त्यांच्या वर्णनांबद्दल अप्रीती निर्माण होते. अशा प्रकारच्या, एक प्रकारे कालबाह्य होत चाललेल्या प्रसंगांमधे निर्माण होणार्‍या, भावनाच उठवळपणा असावा का काय अशी शंका माझ्या बाबतीत या गायकांनी दूर केली आहे निश्चित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दुवे चुकल्या बद्दल क्षमा व प्रतिसाददिल्या बद्दल आभार .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल घरून दुव्यांवरील विविध गायकांचे संगीत ऐकले.. मेजवानी होती!
असेच धागे येत राहूदेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!