कोण आवडे अधिक तुला?
हे विडंबन मी केलेले नाही. ईमेलने आले ते थोडे सुधारले नि इथे ढकलले.
व्हिस्की आणखी रम यातुनी, कोण आवडे अधिक तुला?
सांग मला रे सांग मला ||
व्हिस्की दिसते गोजिरवाणी, थोडा सोडा थोडे पाणी
बर्फ टाकुनि मजेत प्यावी, ग्लास भिडवुनि ग्लासाला
व्हिस्की आवडे अधिक मला ||
गोजिरवाणी दिसते व्हिस्की, परंतु असते भलती रिस्की
सकाळ होता डोके चढते, जाउ न देई कामाला
रम आवडे अधिक मला ||
काळी सावळी असते रम, थंडीमध्ये करी गरम
कोल्यामध्ये मिसळुनि घेता, कळे न काही कोणाला
रम आवडे अधिक मला ||
थंडीमध्ये करी गरम, नशेत नसतो काही दम
व्हिस्की घेता विमान उडते, सुसाट जाई आभाळा
व्हिस्की आवडे अधिक मला ||
व्हिस्की घेता भान न उरते, भेदभावना सारी सरते
व्हिस्की पिउनी मालक करतो, सलाम रात्री गुरख्याला
व्हिस्की आवडे अधिक मला ||
'तशी'च घेता रात्री भाई, थंडी वारा लागत नाही
सुखे बायको झोपे म्हणुनि, पुण्य लाभते पाप्याला
रम आवडे अधिक मला ||
नकोच रम, नकोच व्हिस्की, मदिरेहुनही विवाद रिस्की
थंडगार चल बियर पिऊ, काठोकाठ भरुनि पेला
बियर बरी रे तब्येतीला...
प्रतिक्रिया
आम्ही फक्त सोत्रींच्या कॉकटेल
आम्ही फक्त सोत्रींच्या कॉकटेल लेखमालेवर संतुष्ट होणार्यातले असल्याने पास
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!