नाविन्यतेचा धसका!

नाविन्याची ओढ, सृजनशीलता, उपक्रमशीलता, वेगळी वाट, आउट ऑफ दि बॉक्स थिंकिंग, इत्यादी शब्दांच्या बद्दल वाकडे तिकडे कुणी बोलत असल्यास वा लिहित असल्यास बहुतेकांना राग येतो. या गोष्टींबद्दल निगेटिव्ह काही ऐकून घेण्याइतकी सहनशीलता आपल्यात आता नाही. याबद्दल काही बाही लिहिणार्‍यांना आपण सर्रासपणे मूर्खात काढतो. हे शब्द आजच्या युगाचे परवलीचे शब्द झालेले आहेत. स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स, नारायण मूर्ती, रिचर्ड ब्रॉन्सन, टाटा, अंबानी, किरण मुजुमदार, मायकेल डेल सारख्या उपक्रमशील उद्योजकांनी या शब्दामागील संकल्पनांचा पाठपुरावा केल्यामुळेच Fortune 500 च्या यादीत त्यांची नावं झळकत असतात. नवीन काही करून दाखवावे अशी ओढ असलेल्या तरुणांना ही नावं भुरळ पाडणारी आहेत. यांच्या पावलावर पाऊल ठेऊन चालल्यास आपणही भरपूर कमाई करू हा एक आशावाद त्यामागे दडलेला असतो. या नांवांचा इतका गवगवा झाला आहे की आपण सृजनशीलता वा उपक्रमशीलतेच्या विरोधात एक शब्दही उच्चारू शकत नाही. तरीसुद्धा सृजनशीलतेचे, उपक्रमशीलतेचे बाहेर कितीही कौतुक होत असले तरी सर्व सामान्य मात्र मनातल्या मनात या गोष्टींची धास्ती घेत आहेत, हेही मान्य करावे लागेल.

सामान्यपणे आपल्याला धोका पत्करणे आवडत नाही. धोका नेहमीच आपल्याला अस्वस्थ करत असतो. आर्थिक गुंतवणूक, करीअर, इत्यादींच्या बाबतीत आपण नेहमीच जास्त जागरूक असतो. बिनधोक जग, कुठलेही चढ - उतार नसलेले आयुष्य, यांची आपल्याला ओढ असते. अनिश्चिततेची भीती वाटत असते. कुठल्याही प्रकारची अनिश्चितता आपल्या आयुष्यात डोकावू नये यासाठी आपले प्रयत्न चालू असतात. किंबहुना आपल्या जगण्याचे उद्दिष्टच अनिश्चितता दूर करणे हेच असते. आपण आपल्या सवयी, आपली जीवनशैली, आपले व्यवहार, आपल्या आवडी - निवडी, स्टेटस्को मेंटेन करण्याभोवतीच फिरवत असतो.

मुळात सृजनशीलतेची गोष्ट वेगळी असते. त्यात नवीन काही तरी सतत घडत असते. संभाव्यतेबद्दलच्या कल्पना करत असताना, नवीन समीकरणाची जुळणी करत असताना, किंवा वापरात असलेल्या उत्पादनांना नवे स्वरूप देताना, काही वेळा त्या अशक्यप्राय वाटू लागतात. मुळात या नवीन उत्पादनांची चाचणी घेतलेली नसते व चाचणी नसणे म्हणजे अनिश्चितता! ही अनिश्चितता जीवघेणी असते. अत्यंत भीतीदायक असते. व या भीतीची आपण कल्पनाही करू शकत नाही. याव्यतिरिक्त अपयशाचा शिक्का बसल्यास चार जणात नाचक्की होण्याची भीतीसुद्धा त्यात भर घालते. हाती घेतलेल्या कामात पहिल्याच झटक्यात यश मिळेलच याची खात्री कुणीही देऊ शकत नाही. व अपयशाचा शिक्का कुणालाही नकोसा असतो.

व्यवस्थापऩाचे धडे देणार्‍या शैक्षणिक संस्था किंवा वैयक्तिक जबाबदारीवर निर्णय घेणारे उद्योजक सृजनशीलतेचे वरवरून कितीही कौतुक करत असले तरी प्रत्यक्ष व्यवहारात नवीन कल्पना समोर आल्यास फेटाळण्याकडेच बहुतेकांचा कल असतो. अगदी शाळा - कॉलेजच्या पातळीवरसुद्धा याचा आपल्याला अनुभव येतो. एखादा विद्यार्थी नवीन काही तरी सुचवत असल्यास शिक्षकाला ते रुचणार नाही. खरे पाहता शिक्षणाचा मूळ उद्देशच सृजनशीलता असताना त्यालाच येथे पायदळी तुडवले जात असते.

IIT वा ICSR सारख्या संशोधनाला उत्तेजन देणार्‍या संस्थेतील प्रवृत्तीसुद्धा यापेक्षा वेगळी नसते. एखाद्या विद्यार्थ्यानी नवीन कल्पनेचा मागोवा घेण्याचे ठरविल्यास, तुरळक अपवाद वगळता, उत्तेजन दिले जात नाही. फंड्सची कमतरता, पुरेशा वेळेचा अभाव, पाठ्यक्रम संपविण्याची घाई, लालफितीचा कारभार असल्या कारणामुळे त्याचा अपेक्षाभंग होतो. (थ्री इडियट्स चित्रपट आठवा.) मुळात तंत्रज्ञानाचा विकास अपघात, आपत्ती, धोका नसलेल्या सोई सुविधा समाजास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने होत असतो. विकासाची बीजं सृजनशीलतेत असतात. नवीन कल्पना राबविण्यात असतात. परंतु यांच्यासाठी संधीच देत नसल्यास वा मिळत नसल्यास प्रगती होणार कशी? या सर्व प्रकारामुळे सृजनशील संशोधक नाराज होण्याची शक्यता जास्त. तरीसुद्धा वैयक्तिक महात्वाकांक्षेतून काही होत असले तरी उत्पादनाच्या गुणवत्तेची खात्री देता येत नाही. म्हणूनच सृजनशीलतेबद्दल पूर्वदूषित दृष्टिकोन बाळगून अशा संस्थेतून बाहेर पडलेले महत्वाच्या पदावर पोचून स्टेटस्को मेंटेन करण्यात धन्यता मानतात.

परंतु सृजनशीलतेबद्दलचे औदासीन्य या जगाच्या इतिहासाला नवा नाही. आज जगात वापरात असलेल्या बहुतेक तंत्रज्ञानांना सुरुवातीच्या काळात फार मोठा विरोध सहन करावा लागला. संपर्क साधनं, घर बांधणी, रस्ते बांधणी, वाहन सुविधा, संगणक व्यवस्था, कृषी उद्योग, आहार उत्पादन, रोगोपचार, औषधी व्यवस्था इत्यादी क्षेत्रातील प्रत्येक छोट्या - मोठ्या सुधारणेसाठी सृजनशील संशोधकांना झगडावे लागले. उपक्रमशील उद्योजकांना खस्ता खाव्या लागल्या. मात्र नंतरच्या काही काळानंतर समाजाला त्यांचे महत्व पटले. परंतु अंत:स्फूर्तीतून आलेल्या कल्पनांचा अजूनही तिरस्कार होतच आहे. म्हणूनच अल्बर्ट आइन्स्टाइनला खालील प्रकारचे विधान करावेसे वाटले.
“The intuitive mind is a sacred gift and the rational mind is a faithful servant. We have created a society that honors the servant and has forgotten the gift.”

गेल्या 50 वर्षात या विधानात बदल करण्यासारखे आपल्या देशात काहीही घडले नाही. व यातील प्रत्येक शब्द न शब्द खरा आहे, हेच प्रकर्षाने जाणवत आहे.
ठेविले अनंते तैसेची रहावे|
चित्ती असू द्यावे समाधान||
या संतवचनापासून आपली सुटका नाही!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2.333335
Your rating: None Average: 2.3 (3 votes)

इतर लेखांप्रमाणेच हाही आवडला.
बादवे, सर्जनशील हा शब्द सृजनशील असा असायला हवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अवांतरः
नृत - नर्तन
कृत - कर्तन
तसे
सृज - सर्जन
'सर्जनशील'च बरोबर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नाविन्यता हा शब्द खटकला.
नाविन्य = नवता = नविनपणा = नवेपणा = नविनता (पण नाविन्यता म्हणजे पिवळे पीतांबर).

बाकी, 'सर्जनशीलता', 'सृजनशीलता' दोन्ही बरोबर आणि एकाच अर्थाचे आहेत असे वाटते. (मराठीतले सर्जन म्हणजे इंग्रजीतला सर्जन नव्हे. ;))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाविन्यता हा शब्द खटकला.
नाविन्य = नवता = नविनपणा = नवेपणा = नविनता (पण नाविन्यता म्हणजे पिवळे पीतांबर).

पण या सगळीकडे 'वि'ऐवजी 'वी' हवे असे वाटते. नावीन्य बरोबर वाटते. विशेषणाचे 'य' लावून नाम करताना पहिल्या अक्षरात 'आ' मिळवला जातो. बाकीच्या अक्षरात बदल केला जात नाही असे वाटते. उदा. उदासीन-औदासीन्य, सफल-साफल्य इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवीनपणा आणि नवीनता असे वाचावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“The intuitive mind is a sacred gift and the rational mind is a faithful servant. We have created a society that honors the servant and has forgotten the gift.”

!
हे, आणि एवढेच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"हे आणि एवढेच" याच्याशी सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परंतु सृजनशीलतेबद्दलचे औदासीन्य या जगाच्या इतिहासाला नवा नाही. आज जगात वापरात असलेल्या बहुतेक तंत्रज्ञानांना सुरुवातीच्या काळात फार मोठा विरोध सहन करावा लागला. संपर्क साधनं, घर बांधणी, रस्ते बांधणी, वाहन सुविधा, संगणक व्यवस्था, कृषी उद्योग, आहार उत्पादन, रोगोपचार, औषधी व्यवस्था इत्यादी क्षेत्रातील प्रत्येक छोट्या - मोठ्या सुधारणेसाठी सृजनशील संशोधकांना झगडावे लागले. उपक्रमशील उद्योजकांना खस्ता खाव्या लागल्या. मात्र नंतरच्या काही काळानंतर समाजाला त्यांचे महत्व पटले. परंतु अंत:स्फूर्तीतून आलेल्या कल्पनांचा अजूनही तिरस्कार होतच आहे.

हे खरे (जरी मानले), तरी मग प्रश्न असा उरतो, की जर हा असा मानवी इतिहासाचा (आणि स्वभावाचा) भाग आहे, तर स्वीकारा ना त्याला. तक्रार कशाबद्दल आहे? असा मानवी समाजाचा भाव असूनही आपल्यातून सृजनशील माणसे जन्मतातच ना? मग त्यात आनंद माना की राव. बाकीच्या जडत्वाने जखडलेल्या लोकांना नावे ठेऊन नेमका कशाचा सोहळा साजरा करायचाय?

ठेविले अनंते तैसेची रहावे|
चित्ती असू द्यावे समाधान||
या संतवचनापासून आपली सुटका नाही!

हेदेखील नकारात्मकच अर्थाने घेतलेले दिसते. म्हणजे या संतवचनावर समाजाच्या नकारात्मकतेची आणि नाविन्यतेच्या तथाकथित नावडीची जबाबदारी टाकलेली दिसते. हे वचन ज्या संताने दिले, त्या तुकोबांना अंतःस्फूर्तीचा झरा मानले जाते. की त्यांना काही अंतःस्फूर्ती होती हेच मान्य नाही? एकदा आइनस्टाइनच्या विधानाचा दाखला द्यायचा. त्यात म्हणायचे इंट्यूटिव्ह माइंडला रॅशनल माइंडपेक्षा खालचा दर्जा दिला गेलाय; त्याबद्दल खंतही व्यक्त करायची. लगेच तुकोबांच्या इंट्यूटिव्ह माइंडमधून स्फुरलेले वचन आपल्या रॅशनल माइंडने खोडून काढायचे. काय हे! स्वतःच एक विधान करायचे आणि लगेच ते खोडूनही टाकायचे असला गोंधळ या लेखात दिसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखातील मूळ आशयाकडे दुर्लक्ष करत केवळ वाक्यच्छल करण्याचा प्रयत्न करत असल्यास कुठल्याही लेखाबद्दल अशीच प्रतिक्रिया असू शकते.

संत तुकाराम यांचे रॅशनल विचार त्याकाळच्या हजारो - लाखो लोकांच्या इरॅशनल विचारांपेक्षा वेगळे होते, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. लेखातील आशय मानवी ऐहिक संपत्तीत भर घालणार्‍या विज्ञान, तंत्रज्ञान, औद्योगिक प्रक्रिया, आरोग्य विज्ञानातील प्रगत संशोधन, इत्यादी क्षेत्रातील सृजनशीलते विषयी आहे. काव्य, साहित्य, धर्म, तत्वज्ञान, इतिहास, मानव्यशास्त्र इत्यादी क्षेत्रातील सृजनशीलता हा वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकतो. (आणि या क्षेत्रातही रॅशनल विचार नक्कीच सापडतील.) परंतु आइन्स्टाइनला ऐहिकरित्या सुख समृद्ध करणार्‍या रॅशनल माइंडपासून इंट्यूटिव्ह माइंडपर्यंत झेप मारणे गरजेचे वाटले असावे.

एक लक्षात ठेवायला हवे की सृजनशीलतेची मक्तेदारी फक्त काही निवडक व्यक्तींची (वा समाजाची) असू नये. समाजाच्या संपत्तीत भर घालू शकणार्‍या सृजनशीलतेला उत्तेजन मिळत असल्यास समाजाची भरभराटी होते. मोबाइल फोन फिनलँडच्या नोकियाने जागतिक बाजार पेठेत आणून खोर्‍याने पैसा मिळविला. मायक्रोसॉफ्ट संगणकाच्या बाजारपेठेत पहिल्या क्रमांकाच्या स्थानावर आहे. इतरांनी सृजनशीलतेचा वापर करत श्रीमंत व्हायचे व आपण त्याचा वापर करण्यात समाधान मानायचे याला काही अर्थ नाही. या गोष्टी आपण का करू शकलो नाही वा करू शकत नाही याचाही विचार व विश्लेषण होणे गरजेचे आहे. (भरपूर गाजावाजा झालेल्या विद्यार्थ्यासाठीच्या स्वस्तातील आकाश iPad Tablet अजून का विद्यार्थांच्या हातात पडत नाहीत?) नवीन तंत्रज्ञान, नवीन उत्पादन इतर करत आहेत ना! आपण फक्त त्यांचा वापर करत त्यांना श्रींमंत करत राहायचे हा विचार पटत नाही.

यासाठी आपल्यातही मोठ्या प्रमाणात सृजनशील व्यक्ती हव्यात. त्यांच्या अफलातील कल्पनांना उत्तेजन देणारे संघ - संस्था हव्यात. व त्यामधून या समाजालासुद्धा काही लाभ मिळायला हवे. इतर ठिकाणी होत आहे, इतर व्यक्ती करत आहेत असे म्हणत आपल्यात फक्त ' चित्ती असू दे समाधान' हे योग्य वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केवळ वाक्यच्छल नाही. आपल्या लेखात नकारात्मकता भरलेली आहे. हे मिळत नाही, ते मिळत नाही, लालफितीचा कारभार, थ्री इडियट्स आठवा...इत्यादि. थ्री इडियट्स मध्येच, त्या लालफितीचा काहीही परिणाम न होता आपल्या मार्गाने शिखरावर चढलेला नायक दाखवलेला आहेच. 'चित्ती असू दे समाधान' हा अ‍ॅटिट्यूड बाळगणारा नायक परिस्थितीवर न वैतागता व्यवस्थित हसत खेळत मार्ग काढतो. आजूबाजूच्या परिस्थितीला दोष देत बसत नाही. मोबाइल वाल्या नोकियाने खोर्‍याने पैसा मिळवला, मायक्रोसॉफ्ट नंबर एकवर आहे, ठीक आहे. आपण त्याचा वापर करतो, हेही ठीक आहे. पण आपणही बर्‍याच गोष्टी करत असतो. चांगल्या गोष्टी करत असतो. आता तुम्ही विचाराल काय काय अशा गोष्टी करतो, तर त्याला काही अर्थ नाही. डोळे आणि कान उघडे ठेवले तर आपल्या भारतातही उडदामाजी काळे गोरे या उक्तीनुसार वाइटाबरोबर चांगल्या, सर्जनशील गोष्टी बर्‍याच बघायला मिळतात. धर्म तत्वज्ञान संगीत हे सोडा, अगदी भौतिक/ ऐहिक इत्यादि बाबतीत. सरकारी क्षेत्रापासून खाजगी क्षेत्रापर्यंत. अवश्य बघायला मिळतात.

स्प्लेंडर इन द ग्रास नावाचे भारत सरकारने प्रसिद्ध केलेले एक पुस्तक मध्ये वाचनात आले होते. विविध क्षेत्रांत नाविन्य दाखवून सामान्यांच्या आयुष्यात क्रांतिकारक बदल आणणार्‍या काही यशस्वी प्रशासकीय प्रयोगांविषयी सुंदर आणि वस्तुनिष्ठ लेख त्या पुस्तकात आहेत. त्यातील काही उदाहरणे - पुस्तकाचे पूर्ण नाव - स्प्लेंडर इन द ग्रास : इनोव्हेशन्स इन अ‍ॅड्मिनिस्ट्रेशन

1. e ticketing in Indian Rail
2. Right to Information
3. AGMARKNET
4. Reducing Maternal Mortality Rate and Female Infanticide
5. ASHRAYA - A proramme for the poorest of the poor
6. Trichy Community Policing Experience
7. Conservation of protected areas in Uttarakhand
8. The Niramal Gujrat Mission

ही काही मोजकी उदाहरणे. खूप काही सर्जनशील चाललेले आहे हो जगात, भारतात, सगळीकडेच. तुम्ही म्हणता तेवढी वाइट परिस्थिती नाहीये. आणि हो, ते "ठेविले अनंते तैसेची रहावे" किंवा "चित्ती असो द्यावे समाधान" याचा अर्थ तुम्ही लावता तसा "निष्क्रीयतेचा" नाही. ते अ‍ॅटिट्यूड विषयी आहे. एकच गोष्ट करताना ती समाधानाने करायची की वैतागाने याबद्दल केलेले ते भाष्य आहे. उगीच संतांना कशाला ठोकायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इन्ट्यूटिव्ह विचार आणि सृजनशीलता या दोन्ही समान आहेत का? मला वाटत नाही तसं. इंट्यूटिव्ह विचार करणारा माणूस सृजनशील असतोच असे नाही.

(या लेखाचा उद्देश या लेखापेक्षा वेगळा असावा असे वाटते. म्हणजे तिकडे आणि इकडे अशी तुलना करण्याचा हेतू नसणार असे वाटते).

एडिसनचे एक वचन उद्धृत करावेसे वाटते. जिनिअस इज वन परसेंट इन्स्पिरेशन अ‍ॅण्ड नाइन्टी नाइन परसेंट पर्स्पिरेशन. नुसते जिनिअस किंवा सृजनशील असण्याने फार काही होत नाही. त्या सृजनशीलतेला निरीक्षणाची जोड देऊन मगच त्या सृजनशीलतेला किंमत येते (आणि म्हणूनच ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे अमुक तमूक अश्या सृजनशीलतेला साहित्यिक मूल्यापेक्षा अधिक किंमत मिळत नाही). न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला याला काही किंमत नसते. न्यूटनने ते गणितात मांडून ग्रहांच्या गतीला/कक्षांना ते गणित लागू पडते हे दाखवून देण्यात त्याचे अधिक क्रेडिट असते. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावल्यावर दोन वर्षे तो प्रसिद्ध केला नव्हता असे ऐकले आहे. याचे कारण F=GMm/d2 या सूत्रातले d हे दोन वस्तूंमधील अंतर पृष्ठभागापासून की केंद्रापासून मोजायचे याची खात्री पटली नव्हती.

वर्षानुवर्षे औषध कंपनीत प्रयोग करून एखादे औषध शोधणारे सृजनशील म्हणावे का?

अवांतर १ : वैयक्तिक सृजनशीलतेने क्रांतिकारक शोध लावणारा आइनस्टाइन हा शेवटचा शास्त्रज्ञ असावा बहुधा.
अवांतर २ : नाविन्याचा धसका न वाटणारे खूप लोक आसपास दिसतात. उदा. दर ६ महिन्यांनी ते नवा अपग्रेडेड मोबाईल घेतात. Wink

(प्रॉडक्ट डिझाईनमध्ये काम केलेला सृजनशील) नितिन थत्ते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

वाचनिय लेख.
प्रभाकरराव-विज्ञान्,अभियांत्रिकी शाखांतील आपल्या भारतियांचे योगदान फारसे नाही असे मला(तुटपुंज्या) वाचनावरून म्हणावेसे वाटते.याचे कारण आपली जडणघडणच मुळी 'विचारल्य तेवढेच सांग.शहाणपणा नको' असले ऐकून झाली आहे. सध्या आय्.टी./एम्.बी.ए. लोकांची चलती आहे पण त्यातही चाकरी ईमान ईतबारे करणे ह्या पलिकडे ही मंडळी काही करत आहेत का? काही नविन चालू झालेल्या कंपन्या जरूर बघते पण त्या फार काळ टिकत नाहीत. थत्तेजी म्हणतात तसे नुसते इंट्यूटिव्ह असून चालत नाही.
(बी.ए.) रमाबाई

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'५० वर्षांत काहीच घडले नाही' हे मत तारतम्यानेच घ्यावे लागेल कारण आमच्या पिढीच्या पाहण्यात कितीतरी नव्या गोष्टी घडल्या आणि घडतही राहतील. त्याचबरोबर कितीतरी जुन्या गोष्टी टिकून राहिल्या आणि काही विस्मरणात गेलेल्या उफाळून आल्या समाजात.

नाविन्याकडे साशंकतेने पाहणे आणि नवे उपयोगी आहे असे वाटल्यावर ते कवटाळणे ही एक सार्वकालिक आणि स्थल-निरपेक्ष प्रवृत्ती असावी असे दिसते. म्हणून फार चिंतेचे कारण वाटत नाही.

काहीसे अवांतरः धसका नाविन्याचा? की नाविन्यतेचा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"गेल्या 50 वर्षात या विधानात बदल करण्यासारखे आपल्या देशात काहीही घडले नाही. व यातील प्रत्येक शब्द न शब्द खरा आहे, हेच प्रकर्षाने जाणवत आहे."
मला वाटत काहीतरी घडलेलं, घडवलेलं आहे गेल्या 50 वर्षात..पण अजून दखल घेतली गेली नाहीये. काही घडवणार्यांच्या बातम्या पहा:
http://www.goodnewsindia.com/index.php/gni/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घाई घाईने निर्मिलेले नवीन उत्पादन / संकल्पना अनेकदा सदोष असल्याचे जाणवते आणि मग पुन्हा जुन्याकडेच पावले वळतात. उदाहरणार्थ विण्डोज् विस्टा आले तरी अनेक जण (मी देखील) विण्डोज् एक्सपीच वापरत होते व आता विण्डोज् सेवन आले तरीदेखील अजुनही विण्डोज् एक्सपीच वापरीत आहेत (पुन्हा मी आहेच).

जर नवीन संकल्पना / उत्पादन यांच्या निर्मितीपुर्वी आवश्यक तेवढी तपश्चर्या / मेहनत घडली असेल व नवनिर्मिती निर्दोष असेल तर नक्कीच नवीन गोष्ट जुन्या गोष्टीला बाजूस सारते (रिप्लेस करते).

पुण्यातून टांगे हद्दपार झालेत कधीचेच. रिक्षातून लोक प्रवास करतात. परंतु रिक्षांना घालवुन देता येईल असा समर्थ पर्याय अजून तरी पुण्याच्या रस्त्यांना गवसला नाहीये. मध्यंतरी सहाआसनी रिक्षा आल्या पण तितक्याच त्वरेने त्या गेल्या. परंतु तीन आसनी रिक्षा अजुनही काही किरकोळ बदलांसह (टू स्ट्रोक ऐवजी फोर स्ट्रोक इंजिन तसेच गॅस कीट इत्यादी) पुण्यात आहेत.

टाईपरायटर, फॅक्स, टेलेक्स, टेलिग्राफ, ग्रामोफोन, एलपी रेकॉर्ड्स, कॅसेट्स वगैरे बाबी खालसा झाल्यात. कारण त्यांच्यात काही म्हणता काही फायदा दिसत नाही. याउलट केरोसीन स्टोव्ह सारखी उत्पादने अजुनही अनेक ठिकाणी वापरात आहेत (मी स्वतः वापरतो) कारण त्यांच्यात निदान काहीतरी फायदे आहेत.

आता, जुनी गोष्ट तितकीशी त्रासदायक नसेल तर नवीन पर्याय शोधण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. एकतर सगळेच नवीन म्हणजे बरोबर असे नव्हे. शंभर पर्याय शोधले तर त्यात एक बरोबर असणार. शिवाय संशोधनात बराच वेळ आणि पैसा खर्च होणार. इतके करून वर्तमानातील पर्यायापेक्षा तो सर्वच दृष्टीने सरस असायला हवा. तसे नसेल तर या मेहनतीचे फळ शून्य.

तात्पर्य, वर्तमान पर्याय फारसा कटकटीचा नसेल तर नवीन पर्याय शोधण्यात हशील नाही. जिथे वर्तमान पर्याय अतिशय त्रासदायक / महागडे आहेत अशा क्षेत्रात नवीन पर्याय शोधण्यास प्राधान्य द्यावे. तसे घडत देखील आहे. उदाहरणार्थ ऊर्जा क्षेत्र.

नवीन पर्याय शोधण्या / आजमावण्याबाबत लोकांनी घेतलेली सावधगिरीची भूमिका म्हणजे धसका नव्हे असे मला मनापासून वाटते. नाविन्यतेचा धसका घेतला असता तर आधीच मिसळपाव / मायबोली / मनोगत / मी मराठी / उपक्रम / मराठी कॉर्नर ही पाच सुस्थापित व एक धडपडणारे अशी सहा मराठी संकेतस्थळे असतानाही ऐसी अक्षरे या नव्या मराठी संकेतस्थळावर आपण लेखन केले असते काय?

अवांतर :- ३ इडियट्स या टुकार चित्रपटा मध्ये दाखविल्याप्रमाणे नावीन्यतेचे प्रयोग करणारे (जसे की वॅक्यूम क्लीनरने अर्भकास खेचून काढणे) मूर्ख गल्लोगल्ली दिसू लागले तर तमाम जनता असल्या नावीन्यतेचा धसकाच घेईल यात शंकाच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars