बाजारपेठ न-नैतिक असते का?

मायकेल सँडेल हे हार्वर्ड विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत. ‘जस्टिस’ हे त्यांचं पुस्तक गाजलं होतं. ‘व्हॉट मनी कान्ट बाय’ हे त्यांचं नवं पुस्तक या वर्षी प्रकाशित झालं आहे. बाजारपेठेच्या नीतिमत्तेच्या मर्यादा काय आहेत याचा हा शोध आहे असं पुस्तकाचं वर्णन केलं जात आहे.

पुस्तकातली काही उदाहरणं निश्चित रोचक आहेत. उदाहरणार्थ – ‘वॉलमार्ट’ या बलाढ्य अमेरिकन साखळीदुकानातला एक कर्मचारी एका ग्राहकासाठी टीव्ही संच मोटारीमध्ये ठेवायला जात असता अचानक कोसळला. आठवड्याभरात त्याचं निधन झालं. ‘वॉलमार्ट’नं त्याचा विमा उतरवला होता. कंपनीच्या आवारात कर्मचारी मेला तर कंपनीला पैसे मिळतात अशी त्यात तरतूद होती. त्यानुसार ‘वॉलमार्ट’ला त्याच्या मृत्यूनंतर पैसे मिळाले. "janitors insurance" किंवा Stoli किंवा COLI या नावानं असा विमा किंवा हे धोरण ओळखलं जातं.

शाळा, हॉस्पिटल अशा अनेक ठिकाणी कोका-कोला किंवा मॅकडोनल्ड अशा कंपन्यांनी शिरकाव करून घेतला आणि अमेरिकन लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या. कॅलिफोर्नियातल्या एका तुरुंगात ८२ डॉलर भरले की तुम्हाला एका रात्रीसाठी चांगली खोली मिळते. दक्षिण आफ्रिकेत दीड लाख डॉलर मोजले की एका नष्ट होऊ घातलेल्या जातीच्या गेंड्याची शिकार करता येते. टक्कल करून त्यावर “Need a change? Head down to New Zealand” असा संदेश गोंदवून घ्यायला एअर न्यूझीलंड लोकांना पैसे देते.

अशा अनेक उदाहरणांच्या मदतीनं सँडेल आपला मुद्दा मांडतात. त्यांच्या मते बाजारपेठेच्या शक्तींनी एक नैतिक सीमा ओलांडली की अशा गोष्टी शक्य होतात. सँडेल हे समाजवादी नाहीत आणि बाजारपेठेला त्यांचा तात्त्विक विरोध नाही. पण बाजारपेठेची मूल्यं जिथे लागू व्हायला नकोत अशा मानवी आयुष्याच्या अनेक पैलूंना ती हळूहळू भिडायला लागली आणि त्यातून काही गोंधळ निर्माण झाला असं त्यांचं मत आहे.

लेखकाची मुलाखत - http://www.pbs.org/newshour/bb/business/jan-june12/makingsense_06-11.html

पुस्तकातला अंश - http://www.huffingtonpost.com/michael-sandel/what-money-cant-buy_b_14421...

पुस्तकाची काही परीक्षणं -
http://www.guardian.co.uk/books/2012/may/17/what-money-cant-buy-michael-...
http://www.independent.co.uk/arts-entertainment/books/reviews/what-money...
http://www.newstatesman.com/economics/economics/2012/05/review-what-mone...

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

हा विषय गहन असल्याने पुस्तक न वाचता मत नोंदवणे योग्य नाही. विनिमयाच्या न-नैतिकतेविषयी प्रस्तुत लेखकाचा आक्षेप असावा, असे सकृद्दर्शनी (फक्त पीबीएसवरची मुलाखत वाचून) वाटत नाही. आक्षेप पैशांमध्ये किंमती ठरवल्या जाण्याविषयी असावा. पैशांच्या विनिमयाशिवायही विनिमयव्यवस्था अस्तित्त्वात असतात. पैशांमुळे या विनिमयव्यवस्थांमध्ये असलेल्या त्रुटी कमी होतात असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाजारपेठ आणि नैतिकता या दोन परस्परविरोधी संकल्पना आहेत का?

बाजारपेठच काय नैतिक आणि काय अनैतिक याचा फैसला करते.

(बाजारपेठेला डान्सबार, पब हवे आहेत म्हणून बाजारपेठ ढोबळेंना व्हिलन ठरवते आणि नैतिकतेच्या नव्या व्याख्या बनवते. उद्या चॅस्टिटी बेल्ट हे उत्पादन बाजारपेठेला विकायचे असेल तर बाजारपेठ नैतिकतेच्या वेगळ्या व्याख्या बनवेल).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बाजारपेठ नैतीक नसते. जी असते तिला न-नैतीक म्हणायचं की अनैतीक हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळात नैतिकतेचीच स्थल-काल-व्यक्ती निरपेक्ष व्याख्या शक्य दिसत नाही, मग बाजारपेठच काय कोणतीही गोष्ट नैतीक-अनैतीक-ननैतीक हे ज्याच्या त्याच्या दृष्टीकोनावर अवलंबून असावे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एका मराठी संस्थळावरच्या चर्चेत "पैसा हा रिसोर्स आहे" असे बिनविरोध म्हटलेले वाचून चमकलो होतो. बहुसंख्यांचे मत तसे असेल तर वरील प्रश्नाला काहीच अर्थ राहात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पीबीएस मुलाखतीतून :

A market economy is a tool, a valuable and effective tool, for organizing productive activity. But a market society is a place where almost everything is up for sale. It's a way of life where market values seep into almost every sphere of life, and sometimes crowd out or corrode important values, non-market values.

या सैद्धांतिक मुद्द्याशी बरेचजण सहमत होतील असं वाटतं. कोणत्या गोष्टी non-market values आहेत त्याविषयी मात्र मतभिन्नता असू शकते. उदाहरणार्थ (अमेरिकन) काँग्रेसमधल्या लॉबिइंगसाठी बेघर लोकांना रात्रभर रांगेत उभं राहायला लावणं, हे कदाचित प्रश्न विचारण्यासाठी खासदारानं पैसे घेण्याच्या भारतातल्या प्रकाराइतकं सगळ्यांना गैर वाटेलच याविषयी खात्री नाही; कारण आपल्यासारख्या समाजात श्रीमंतांचे कष्ट कमी करण्यासाठी अनेक ठिकाणी गरीब लोक असे झटताना दिसतील. कार्बन ट्रेडिंगद्वारे श्रीमंत देशांनी अधिक प्रदूषण करण्याच्या 'सुविधे'साठी गरीब देशांना पैसे देणं याविषयीही तसंच म्हणता येईल. खेळाच्या सामन्याला अधिक किमतीच्या स्कायबॉक्स आणि सर्वसामान्यांच्या जागा यांतला फरक, किंवा सामाजिक स्तरानुसार पालकांनी मुलांना वेगळ्या शाळांत पाठवणं हेही अनेकांना खुपणार नाही. थोडक्यात, लेखकाच्या ह्या भूमिकेशी भारतातला उच्च- आणि मध्यमवर्ग सहमत होताना मला तरी दिसत नाही :

Democracy does not require perfect equality, but it does require that citizens share in a common life. What matters is that people of different backgrounds and social positions encounter one another, and bump up against one another, in the course of everyday life. For this is how we learn to negotiate and abide our differences, and how we come to care for the common good.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नैतिक, अनैतिक की न-नैतिक हे पुढचे प्रश्न आहेत हो. मुळात नैतिकता ही विशिष्ट व्यवस्थेच्या अंतर्गत डिफाईन होते (असा आमचा समज आहे). असे असेल तर बाजारपेठ या संकल्पनेला सामावून घेणारी एखादी व्यवस्था वा संकल्पना आहे का की जिच्या संदर्भात नैतिकतेचा विचार होईल. मुळात एक संकल्पना ही व्यवस्था असू शकते का? की व्यवस्थेचे मॅनिफेस्टेशन ही व्यवस्था असते? मॅनिफेस्टेशन ही व्यवस्था असेल तर बाजारपेठ या संकल्पनेबाबत नैतिकता, न-नैतिकतेचा विचार करण्याऐवजी अमूक एका बाजारपेठेच्या नैतिकतेबाबत विचार करणे क्रमप्राप्त होते असे आपले आम्हाला वाटते. नि असे असेल तर मग त्याबाबत घेतलेला निर्णय हा सर्वसमावेशक असण्याची किंवा त्याबाबत सर्वसाधारण विधान करता येण्याची शक्यता फारच कमी आहे असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

थोडं अधिक विवेचन कराल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

<......संकल्पना ही व्यवस्था असू शकते का?>

"कोणतीही व्यवस्था ही मूळात अव्यवस्था असते" ह्या वाक्याचा व्यत्यास सिध्द करायचा असल्यास बाजारपेठ ही व्यवस्था असते असे मानायला तुमची काही हरकत नसावी. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याच विषयावर इकॉनॉमिस्टच्या नवीन अंकात आलेला लेख.

लेखातून (तिरका ठसा माझा)
...Mr Sandel poses two objections consistently. One is inequality: the more things money can buy, the more the lack of it hurts. The other Mr Sandel calls “corruption”: buying and selling can change the way a good is perceived.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>बाजारपेठ या संकल्पनेला सामावून घेणारी एखादी व्यवस्था वा संकल्पना आहे का की जिच्या संदर्भात नैतिकतेचा विचार होईल. <<

http://en.wikipedia.org/wiki/Market_system मधून उद्धृत -

A market system is any systematic process enabling many market players to bid and ask: helping bidders and sellers interact and make deals. It is not just the price mechanism but the entire system of regulation, qualification, credentials, reputations and clearing that surrounds that mechanism and makes it operate in a social context.

In economics, market forms are studied. These look at the impacts of a particular form on larger markets, rather than technical characteristics of how bidders and sellers interact.

Heavy reliance on many interacting market systems and forms is a feature of capitalism, and advocates of socialism often criticize market features.

न-नैतिकता किंवा नैतिकता आणि बाजारपेठ याविषयी नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ पॉल क्रूगमन (स्रोत - http://krugman.blogs.nytimes.com/2010/09/28/economics-is-not-a-morality-...)

economics is not a morality play. It’s not a happy story in which virtue is rewarded and vice punished. The market economy is a system for organizing activity — a pretty good system most of the time, though not always — with no special moral significance. The rich don’t necessarily deserve their wealth, and the poor certainly don’t deserve their poverty; nonetheless, we accept a system with considerable inequality because systems without any inequality don’t work.

माझ्या माहितीनुसार मिल्टन फ्रीडमन या अर्थशास्त्रज्ञाच्या मते बाजारपेठा (आणि त्यामुळे भांडवलशाही ही व्यवस्था) न-नैतिक असतात. पटकन शोधता याचा किंचित उल्लेख इथे आढळला.

इंग्रजी उद्धृतांच्या अतिवापराबद्दल क्षमस्व.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||