चिन्ह... नग्नता विशेषांक! नग्नतेचा सन्मान...........

मुक्ता फळे यांच्या लेखनाने आठवण झाली, `चिन्ह' च्या नग्नता विशेषांकाची. त्यावर लिहिलेला, अन ह्याआधी लोकसत्ता - लोकरंग - पुस्तकाचे पान येथे प्रसिध्द झालेला लेख जसाच्या तसे इथे देण्याचा मोह झाला...

११.०९.२०११
आजवर जे केवळ झाकलेल्या स्वरूपातच बघण्याची सवय असते ते अचानक उघडं-वाघडं होऊन समोर येतं, तेव्हा नक्की काय घडतं?
वृत्तपत्रं-दूरदर्शनच्या असंख्य चॅनेल्सवरील मालिका-चित्रपट ह्यांसारख्या दृश्य माध्यमांतून, भावनांना उत्तेजक करणारी बटबटीत-भडक-उथळ-बाजारू नग्नता घरात येऊन पोचलेली असण्याचा हा काळ! `आपली मनं आणि नजरा निर्ढावलेली आहेत' अशी जणू आपली खात्रीच झालेली असते. तरीही अशावेळी आपल्याला दचकायला होतं? की गपकन डोळेच मिटून घेतो आपण? की किलकिल्या नजरेने आपलं कुतुहल शमवतो? की डोळे टक्क उघडे ठेवून ‘जसं आहे तसं’ बघतो?

सतीश नाईक-शर्मिला फडके ह्यांनी संपादित केलेला ‘चिन्ह- नग्नता विशेषांक’ जेव्हा आपण उघडतो तेव्हा शारीर-सौंदर्याच्या दर्शनाने (बाजारू प्रदर्शनाने नव्हे!), आश्चर्य आणि कुतुहल ह्यांनी भरलेली आणि भारावलेली आपली नजर प्रत्येक पानावरील मजकूर समजून घेत आणि चित्र बारकाईने न्याहाळत रहाते.
‘नग्नता- चित्रातली, मनातली’ ह्या शीर्षकाचा यथार्थ उलगडा पानागणिक होतो. खोलवर रुजलेल्या मनातल्या समजुतींना कधी धक्के बसतात, कधी स्पष्टता येते तर कधी जुनीच समजूत नव्याने आकळते.

‘नग्न शरीर’ म्हणजे व्यावसायिक डॉक्टरांसाठी एक ‘यंत्र’ असतं, नर्तकासाठी एका आकाराद्वारे दुसरा आकार निर्माण करणारं ‘माध्यम’ असतं, तर चित्रकारासाठी एक ‘मॉडेल’ असतं.
कलावंत-शिक्षक-विद्यार्थी चित्रकार(अकबर पदमसी, प्रभाकर कोलते, सुधीर पटवर्धन, सुहास बहुळकर, देवदत्त पाडेकर), लेखक(भालचंद्र नेमाडे, प्रतिभा रानडे, मेघना पेठे, कविता महाजन) , नृत्यांगना(पार्वती दत्ता), मानसशास्त्र-तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, सेक्सॉलॉजिस्ट डॉ. प्रकाश कोठारी... निरनिराळ्या क्षेत्रात कार्यरत असणार्‍या ह्या व्यक्ती आपापल्या भूमिकेतून जेव्हा ‘नग्नता’ ह्या एकाच विषयाबद्दल लिहितात तेव्हा त्याची व्याप्ती किती मोठी आहे ह्याचा प्रत्यय येतो.

कलाकार म्हणजे नक्की कोण आणि कसा असतो? कलाकार म्हणून सर्वसामान्य माणसापेक्षा असलेलं त्याचं वेगळेपण नेमकं कशात असतं? कलाकाराची खरी ओळख त्याच्या कलेतून होते की त्याच्या माणूस म्हणून वागण्या-वावरण्यातून होते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रभाकर कोलतेंच्या ‘हुसेन आणि मी’ ह्या पहिल्याच लेखात मिळत राहतात. ‘हुसेनमुळे अनेक संधी गमावलेले’ कोलते त्याकडे कसं बघतात? ‘आपण खरंच काय अन किती गमावलं’ ह्याचा ताळेबंद न मांडता ‘हुसेन- कलावंत’ म्हणून त्याचा अंतर्बाह्य शोध घेत राहतात आणि एकीकडे सहजी म्हणतात, ‘हुसेनचं ‘हुसेनपण’ म्हणजे काय, हे जाणून घेताना नकळतपणे आपण स्वत:लाही जाणून घेतोय हे जाणवलं.’

‘आई-वडिलांचं आपल्यावर प्रेम आहे आणि आपण जशा आहोत तशा त्यांना आवडतो..’ नात्यांतील ह्या मूलभूत विश्वासाच्या बळावर, ‘मी भटकले, भरकटले तरी रस्ता कधीच चुकत नाही. हवं तिथं मी अचूक जाऊन पोचू शकते.’ असं म्हणणारी, मोनाली मेहेर. मूळ महाराष्ट्रात असणारी आणि आता परदेशात स्थायिक झालेली परफॉर्मन्स आर्टिस्ट. तिच्याविषयीचे ‘मोन्ताज’ आणि ‘मोना लॉग’ वाचणं, तिचं स्वत:ला घडवत रहाणं आणि तिच्या आविष्काराची झलक छायाचित्रांवाटे बघणं हा अनुभव विलक्षण आहे.

माणिक वालावलकर ह्यांनी संयोजन केलेल्या ‘ओलेती ते सरस्वती - अर्थात कलावंतांचं अभिव्यक्ती - स्वातंत्र्य’ ह्या परिसंवादातून ‘अभिव्यक्ती - स्वातंत्र्याबाबत कलाकाराची आणि समाजाची भूमिका काय असावी’ हे उलगडत जातं. मानवी मनाचे ‘जागृत आणि सुप्त’ असे दोन प्रकार असतात असं मानसशास्त्र सांगतं. ह्या अंकाच्या वाचनाने मनाचा ‘अंतर्मनातील समाजमन’ असा एक उपप्रकार लख्खपणे आपला आपल्यालाच जाणवतो. शिवाय संस्कारांच्या-समजुतींच्या थरांआड दडलेलं मन नग्न शरीराच्या दर्शनातून आपोआप उघडं होत राहतं.
डॉ. प्रकाश कोठारी म्हणतात, ‘माणसाचा जन्मच स्त्री-पुरुष समागमातून झाला आहे. लैंगिक संबंधांमधली सुखंदु:खं शतकानुशतकं त्यानं भोगली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणूस असो किंवा कलाकार असो, कुणालाही या संबंधांबद्दल व्यक्त व्हावसं वाटणं नैसर्गिक आहे आणि म्हणूनच साहजिकही. त्याचा सन्मान आपण ठेवायला हवा.’

एकोणिसशे एकोणीस साली भारतात सुरू झालेल्या ‘न्यूड क्लास’ मधील, ब्याण्णव वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीतील विद्यार्थी-शिक्षक-नग्न मॉडेल्स ह्यांचे कलामहाविद्यालयांमधील अनुभव सुहास बहुळकरांच्या ‘न्यूड’ल्स’ ह्या सविस्तर लेखात आहेत. पालकांनी केलेले तथाकथित चांगले संस्कार, चांगल्या सवयी, मनात इतके घट्ट रुतून बसलेले असतात की त्यापेक्षा वेगळं काही असू शकतं हे स्वीकारायला मन चटकन तयार होत नाही. ‘वस्त्रांआड प्रत्येक माणूस नग्न असतो’ हे जरी निखळ सत्य असलं तरीदेखील प्रत्यक्षात अशी नग्न व्यक्ती समोर उभी राहिली की मनाचा कसा गोंधळ उडतो हे वाचताना कधी हसू अनावर होतं तर कधी त्या मॉडेल स्त्रियांविषयी वाटणार्‍या करुणेनं मन भरून येतं.

अनोख्या विषयावरील ह्या विशेषांकाची सुरुवातही तशी विशेषच आहे. दोन मुखपृष्ठं, प्रत्येक मुखपृष्ठाची वेगळी कहाणी, संपादकीय, विशेष लेख, परिसंवाद आणि विशेष पुरवणी अशा भागांत हा अंक विस्तारला आहे. अनमोल कलाकृतींची, छायाचित्रांची आणि त्यांच्या रंगसंगतींची मूळ रुपं जशीच्या तशी दिसावीत ह्याकरता वापरलेला छपाईचा खास, उत्कृष्ट प्रतीचा कागददेखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रत्येक लेखकाच्या रंगीत छायाचित्रामुळे त्यांच्याशी जणू थेट गप्पा मारल्याचा फील येतो. त्याचप्रमाणे त्यांच्या लेखांतील चित्रांच्या यथोचित निवडीमुळे त्या-त्या लेखकाचे म्हणणे समजून घेणेदेखील सोपे होते. ज्या चित्रांच्या प्रदर्शनाने वाद निर्माण झाले अशी काही चित्रं (जसे की ‘ओलेती’, `Her Silver Throne'), `द किस’ सारखी नितांत सुंदर अनुभव देणारी शिल्पं, ‘न्यूड स्टडी’ करतानाची चित्रं, ‘न्यूड-क्लास’च्या विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रं, इ.
‘सुदर्शन’ कॅटलॉग हा अंकातील शेवटचा विभाग! ‘ह्यातील कलाकृती आणि संकलित करण्यात आलेली माहिती कलारसिकांना, कलासंग्रहकांना, कलाअभ्यासकांना सर्वच दृष्ट्या उपयुक्त ठरावी..’ संपादकांना वाटणारा विश्वास आपल्याही मनात एकीकडे पक्का होतो.

‘सेल्फ पोर्ट्रेट करताना जाणवतं की, स्वत:च्या देहाच्या आकारांकडे, रंगांकडेदेखील आपण यापूर्वी कधी असं पाहिलं नव्हतं.’ कविता महाजन हे जे म्हणतात त्याचीच पुनरावृत्ती करत म्हणावसं वाटतं, ‘ह्या अंकाच्या वाचनाने अन त्यापेक्षा जास्त, त्याच्या दर्शनाने स्वत:च्या देहाच्या आकारांकडे, रंगांकडेदेखील आपण यापूर्वी कधी असं पाहिलं नव्हतं’ हे लख्खपणे जाणवतं.

चित्रा राजेन्द्र जोशी.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

एका वेगळ्याच अंकाची छान ओळख! धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

सविस्तर प्रतिसाद देण्यासाठी जागा राखून ठेवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला.

'चिन्ह'च्या अंकाबद्दल फेसबुक आणि त्यांच्या संस्थळावरून बरीच माहिती मिळते, लेख सारांशाने वाचायला मिळाले आहेत. प्रकाश कोठारींचा लेख गेल्या वर्षीच्या रेषेवरची अक्षरेमधेही होता.

या अंकाच्या एका मुखपृष्ठाबद्दल मला शंका आहे. मला ते समजलं नाही. त्यात कोणी मदत करणार का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला वाटत अदिती मटाच्या रविवार पुरवणीत याबाबतीत लेख आला होता
अर्थात लिँकबाबत आनंद आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

वेगळा विषय.. चिन्हच्या या अंकाबद्दल विविध मते ऐकली-वाचली होती.
त्यामुळे विकत घेतला नव्हता नी लायब्ररीत गवसला नाही Sad
आता शोधायला हवा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चिन्ह ची अधिक चर्चा ईथे वाचता यॅईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

चांगला दुवा.. आभार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!