आसाम दंगल

गेला जवळपास आठवडाभर आसाममधील कोक्राझार जिल्हा धार्मिक दंगलीच्या वणव्यात होरपळत आहे. चाळीसएक लोकं मृत्यूमुखी पडले आहेत. बोडोभूमी प्रादेशिक परिषदेचे मुख्यालय असलेला हा जिल्हा. सदर दंगलीला बांगलादेशमधील विस्थापित कारणीभूत आहेत असे सांगितले जात आहे. इतक्या दिवसांनी शेवटी आज आसामच्या मुख्यमंत्र्यांना यात लक्ष घालायला वेळ मिळाला आहे. उद्या पंतप्रधानही भेट देणार आहेत (म्हणे).

याच विषयावरचे काही दुवे:
लोकसत्ता अग्रलेख
मटा मधील बातमी
न्यू यॉर्क टाईम्स - India Ink

या प्रश्नाच्या बाबतीत मला अत्यंत कमी माहिती आहे जालावर उलटसुलट दावे, बातम्या आहेत. त्यामुळे असमंजस दुर झाला तर पहावे म्हणून हा चर्चा विषय टाकतो आहे:
-- सदर प्रश्न नक्की काय आहे? तो केवळ धार्मिक आहे असे वाटते का?
-- सदर प्रश्नाला काँग्रेस पक्षाचे धोरण कारणीभूत आहे असा ओरडा केला जातो. प्रफुल्ल कुमार महंत यांनी तर काँग्रेसचे राज्य आले की कशा दंगली होतात हे सोदाहरण दाखवायचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला यात काँग्रेस पक्षाच्या धोरणांचा दोष वाटतो का?
-- सदर प्रश्न जुना असेल असे वाटते. बांग्लादेश स्वतंत्र होताना भारताने मदत करण्यामागचे प्रमुख कारण हे विस्थापितच होते असे वाचल्याचे आठवते (बहुदा इंदीरा गांधीच्या स्वीय सचिवाचे पुस्तक होते). मात्र हा प्रश्न सुटलेला नाही हे स्पष्ट आहे. हा सोडवण्यासाठी कोणते प्रयत्न झाल्याचे वाचनात आले आहे काय / माहिती आहे काय? असल्यास कोणते?
-- बांगलादेशमधील नागरीकांबाबत तसेच बोडोंबाबत सरकारचे धोरण काय असावे असे वाटते?

मुळ विषयावर इन-जनरल टिपणी, पुरवणी, समांतर माहिती यांचे स्वागत आहेच

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

विकीलिक्स वरची ही तार रोचक आहे.
त्यात स्पष्ट म्हटले आहे की
August 21 attack on opposition leader Sheikh Hasina as symptomatic of a deterioration in the country's political culture, fueling instability in Bangladesh which contributes directly to violence in India's northeast.

म्हणजे सरकार दरबारी याची कल्पना आहेच तरी प्रत्यक्षात काही उपाय का योजले जात नाहीयेत कळत नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चर्चा वाचतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आसामचे आर्त हा लोकसत्तामधील आज्चा अग्रलेख देखील वाचनीय आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋ,

लोकसत्तातला अग्रलेख वाचला. थोडक्यात मुद्दे घेतलेले असले व एकांगी असला तरीही लेख आवडला.

वस्तुतः आसामात जो हिंसाचार झाला तो १९८० पासून सुरुच आहे. कधी कमी तर कधी जास्त.
मतांच्या लाचारीसाठी केंद्रसरकार सीमावादात नेहमीच अपयशी ठरत आलेली आहे, कदाचित यापुढेही राहीन.
असो,

मला लक्ष वेधायचे आहे ते आसाममधील स्थानिक नेतृत्त्वाकडे.
मुख्यमंत्र्यांनी काय केले यापेक्षा झळ पोहोचलेल्या कोकराझार जिल्ह्यातील स्थानिक नेतृत्त्व (सत्ताधारी आणि विरोधी) एकत्रित काम करु शकलेले नाही. जेव्हा जीवन मरणाचा प्रश्न येतो तेव्हा राजकारण बाजूला ठेवायचे असते आणि स्थानिकांच्या रक्षणाचे काम करायचे असते. देशाच्या हितासाठी कट्टर शत्रू देखील एकत्र येतात,हा इतिहास आहे. पण आसाम च्या बाबतीत स्थानिक आवाज दिसला नाही. क्रिया - प्रतिक्रिया या सुरु झाल्या तर त्याला अंत नसेन. मुळात स्थानिक नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात गोगईंचे सरकार पूर्णपणे अयशस्वी ठरले आहे.

जे बांग्लादेशातून घुसलेले आहेत, त्यांना कडक भूमिका घेऊन पुन्हा त्यांच्या देशात पाठवले पाहिजे. फाळणी झाली त्याच वेळी ही भूमिका स्पष्ट ठेवायला हवी होती. पण याची अंमलबजावणी झाली नाही. ज्यांना त्यांच्या देशाचे नागरिकत्व नको आहे व भारतात येऊन रहायचे आहे त्या सर्व नागरिकांनी कायदेशीर नागरिकत्व मिळवण्याची प्रक्रिया करायला हवी होती. भारत सरकारही तशी सक्षम व्यवस्था निर्माण करण्यात अपेशी ठरले हे ही सत्य आहेच. पण भारत मोठ्या प्रगतीकडे ठामपणे वाटचाल करतोय आणि त्याच बरोबर आर्थिकदॄष्ट्या सक्षमही होतो आहे. या गोष्टींमुळे बांगलादेशी घुसखोर , पाकीस्तानी घुसखोर येतच राहणार. चमकते सोने सर्वांनाच आकृष्ट करते हा नियमच आहे.

प्रश्न आहे तो आपल्या देशातील सीमा त्या सीमांवर राहणार्‍या नागरिकांसाठी सुरक्षित कधी होणार?
बोटचेपी भूमिका बाजूला ठेवून केंद्र सरकार व सर्व विरोधी पक्षांनी देशहिताच्या सर्व मुद्द्यांवर राजकारण बाजूला ठेवून एकत्रित रित्या काम करण्याची गरज आहे.
आसाम हा प्रश्न आताही शमवला या भ्रमात सरकार राहिले तर येत्या १५ वर्षांनंतर आसाम हा प्रश्न पूर्णपणे विकृत होण्याची शक्यता आहे व एलटीटीई जशी श्रीलंकेला जड झाली तद्वतच बोडो सेना भारताला जड जाईल याचा विचार भारताच्या सरकारी धोरणे आखणार्‍या कूटनीती तज्ज्ञांनी केला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0