आपली चंद्र रास कोणती?

Choices

You are not eligible to vote in this poll.

1.75
Your rating: None Average: 1.8 (4 votes)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

निरयन व सायन दोन्ही चंद्र रास

निरयन व सायन दोन्ही चंद्र रास वृषभ
निरयन व सायन दोन्ही लग्न रास कुंभ

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

माझी रास मेष.

माझी रास मेष.

अय्या!!! ५ खेकडे आहेत इथे :)

अय्या!!! ५ खेकडे आहेत इथे (स्माईल)

व्वा!!

कालवण बनवूया का???

फक्त वाचकांच्या राशी जाणून

फक्त वाचकांच्या राशी जाणून घेउन काय होणार? प्रश्न विचारणार्‍याची रास (म्हण्जे तुमची) आणि मिळाणारी उत्तरं यांचही काही गणित असावं का?

वाचक,प्रश्नकर्ते आणि ऐसीअक्षरे संस्थळ यांचंही त्रैराशिक असणार म्हण्जे (स्माईल)

माझी चंद्ररास : मिथुन

by limbutimbu

>>>> फक्त वाचकांच्या राशी जाणून घेउन काय होणार?
आधी कुठल्या पोस्ट मधे म्हणल्याप्रमाणे, नेटसारखी आधुनिक इलेक्ट्रॉनिक सुविधा वापरुन अशा सोशल फोरमवर वावरणार्‍यांचे राशीपरत्वे संख्यात्मक अंदाज घेता येईल. त्यापुढे जाऊन, रविरास व नेपच्युनचा प्रभाव तपासता येईल. (खरे तर सरळ सरळ जन्मतारीख्/वेळ्/ठिकाण विचारुन घेतल्यास असे संख्यात्मक विश्लेषण करुन बघता येऊ शकेल, मात्र त्यास "माहिती पुरविण्याबाबत मर्यादा" असल्याने तो उपाय करता येत नाही. तसे नस्ते तर यच्चयावत वेड्यांची इस्पितळे/हॉस्पिटले येथिल पेशण्ट्स्चा डाटा गोळा करुन देखिल संख्यात्मक अभ्यास करता आला असता, पण भारतात ते शक्य नाही, इथे हॉस्पिटले जन्मतारीख कळवतात हेच विशेष आहे, १९६०/७० च्या दरम्यानचे अमेरिकेतील एक बर्थ सर्टीफिकेट पहाण्यात आले, त्यावर बाळाच्या फोटोसहित, तारीख व वेळ देखिल दिलेली होती. पण ते अमेरिकेत, कारण त्यान्च्या डॉलरवर देखिल "आम्ही देवावर विश्वास ठेवतो" अशा अर्थाचे लिहीलेले अस्ते. भारतात ते शक्य नाही. सबब मग असे फुटकळ कौल काढून अन्दाज बान्धत अभ्यास करावा लागतो.

>>>>> प्रश्न विचारणार्‍याची रास (म्हण्जे तुमची) आणि मिळाणारी उत्तरं यांचही काही गणित असावं का? <<<
नक्कीच असते, पण ते फारच ढोबळमानाने! त्याव्यतिरिक्त, जन्म नक्षत्र, तसेच हे क्षेत्र सोशल्/सार्वजनिक मानले असता, सार्वजनिक यशस्वी वावरासाठी उपयुक्त अन्य ग्रहान्चे पाठबळ कुंडलीमधे कसे आहे यावर बाकि सर्व अवलम्बुन आहे. जसे की सामाजिक प्रतिष्ठा/आदर/मानसन्मान यांचा कारक रवि हा ग्रह, अन हाच ग्रह जर कुंडलीत नीचेचा असेल, तर अशाने सोने जरी पुढे केले तरी बाकी "समाज" यल्लोयल्लोडर्टीफेल्लो म्हणत ते सोने झिडकारतील.
माझे बाबतीत म्हणाल, तर या पोस्टला देखिल "निरर्थक" असा मायनस शेरा मिळाला तरी मला यःश्किन्चित नवल वाटणार नाही. कारण मूळ कुंडलीत रवि नीचेचा आहे.
असो.
बायदिवे, माझी चंद्ररास व लग्नरास, दोन्हीही मिथुनच!

माझी लग्नरास मिथुन :) ,

माझी लग्नरास मिथुन (स्माईल) , चंद्ररास कर्क.

by limbutimbu

>>>>पण कौलाचा हा धागा काही अभ्यासाकरता काढला आहे कां? असा प्रश्न मनात आला <<<<
नेमका प्रश्न! याचे उत्तर हो असेच आहे. मात्र याचे स्वरुप ढोबळमानाने राहील. नेट वर वावरणार्‍यांचे राशीद्वारे सन्ख्यात्मक विश्लेषण होऊ शकते का ते बघणे हा उद्देश आहे. कौलाची (पर्याय विषयान्ची) मर्यादा पाळत, चंद्र रास, रवि रास, याचबरोबर हर्षल-नेपच्युन यांचे राशीपरत्वे कालखण्ड विचारात घ्यावयाचे आहेत. इलेक्ट्रिक वा इलेक्ट्रॉनिक्स मधे वावर असणार्‍या व्यक्तिंवर चंद्रराशी सोबतच, रवि नेपच्युन व काही प्रमाणात हर्षलचा प्रभाव असतो, ते तपासायचे आहे. वरील कौल, हा केवळ नविन साईटवरील विषयप्रवेश आहे. यापुढेही अशाच प्रकारचे कौल मला काढायचे आहेत.

छोटे निरीक्षण: काल पहिल्यावहिल्या तत्काळ आलेल्या सहा मतांपैकी, एक विरोधी वा रास माहित नाही, बाकी पाचामधे दोन बुधाच्या राशीचे, तर दोन शुक्राच्या राशीची व एक गुरूच्या राशीची होती. रवि/मंगळ/शनि तसेच चंद्र राशीच्या मतांची अनुपस्थिती होती.
पैकी बुध हा नाविन्य/चिकित्सा/उत्सुकता/चंचलतेचा द्योतक मानला जातो, त्यामुळे विशेष नाही की बुधाच्या राशीचे (मिथुन/कन्या) मतदान सर्वप्रथम झाले.
शुक्राच्या राशी, वृषभ, तुला, यान्नाही नाविन्याची आवड असते, मात्र ते सावधपणे वागू पहातात. त्यांचे बुधासारखे नसते, बुध म्हणजे कसा? उत्सुकतेपोटी अर्धवट कापलेल्या ओन्डक्याची पाचर काढुन पहाण्यार्‍या व त्यामुळे शेपुट अडकवुन घेणार्‍या माकडासारखा! (जीभ दाखवत) (माझी रास बुधाचीच आहे)
गुरुच्या राशी, धनु व मीन, पैकी मीन रासही बर्‍यापैकी उत्सुक अस्ते, नाविन्याची आवड असणारी असते. शिवाय, असले धार्मिक विषय त्यान्च्या विशेष औत्सुक्याचे असतात. मात्र ते आपला आब राखुनच असतात, विनाकारण पुढेपुढे करत नाहीत. परिस्थिती आजमावुन मगच पुढे सरसावतात. (यास धनु राशीचा लग्नपरत्वे थोडा अपवाद होतो, ते कायमच धनुष्य ताणून बसलेले अस्तात)
असो.
गमतीत घ्या, मात्र मतदान खरेखुरे करा ही नम्र विनंती.
धन्यवाद

बायदवे मी या धाग्यावर विनोदी

बायदवे मी या धाग्यावर विनोदी प्रतिसाद दिला, पण त्याच्याही आधी मतदान केले आहे. माझी रास कन्या आहे.

by limbutimbu

धन्यवाद (स्माईल)
(पण जाता जाता, तुमच्या विनोदी प्रतिसादा मागे-पुढे घडलेले "रामायण" देखिल बघा... (दात काढत) )

आपला समाज अजून

आपला समाज अजून राशीचक्रासारख्या खुळचट कल्पनांमध्येच घुटमळतोय हे पाहून गंमत वाटली.

------------------------
घणघणतो घंटानाद

by limbutimbu

>>>>> आपला समाज अजून राशीचक्रासारख्या खुळचट कल्पनांमध्येच घुटमळतोय हे पाहून गंमत वाटली. <<<
राशी व ग्रहनक्षत्रान्चा प्रभाव याबाबी खुळचट की क्से, या करता देखिल स्वतंत्र चर्चेचा धागा उघडण्याचे मनात आहे. आपणांस उघडता आला तर फारच चांगले.
खरे तर, कौला मधे एकावेळेस एकच मत सध्यातरी देता येते आहे, ज्यावेळेस अनेक पर्यायान्ना मत देता येइल, त्यावेळेस, अंधश्रद्धानिर्मुलनवाल्यान्करता देखिल काही कौल काढता येतिल. (स्माईल) मी काढीन याची खात्री बाळगा.

तुम्हीच उघडा हो, सुमार धागे

तुम्हीच उघडा हो, सुमार धागे काढण्यात आणि टुकार कौलं फाडण्यात तुम्ही पटाईत आहाच नाहीतरी.

------------------------
घणघणतो घंटानाद

आमची रास...

आमची रास काहिही असुन दे...पण तुम्ही आमच्या राशीला आलेले आहात एवढं निश्चित..

ह्.घ्या.

--मयुरा.

by limbutimbu

>>>> पण तुम्ही आमच्या राशीला आलेले आहात एवढं निश्चित.. <<<
LOL तसही असेल, अहो पण माझ्या राशीला येथे कुणी राहुकेतूचे अवतार "निरर्थकपणे" ग्रासत आहेत, जरा त्यान्चा समाचार आधी घेऊदे!

आय्ला!

बैल अन खेक्ड्यांची मेजॉरिटी हाय्ब्वा हितं.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

कर्क

डोळ्यात टचकन पाणी येणारी, आईवेडी, भावनाप्रधान, चंद्र ज्या राशीचा स्वामी आहे ती रास - कर्क (स्माईल)

माझी पण

अरेच्चा, माझी पण कर्कच.

- तिरशिंग डबडबणे

हँसनेके दिन भी मैंने रो के गुजारे
भोर भी आँसकी किरन ना लायी |

मत दिले आहे. पण कौलाचा हा

मत दिले आहे. पण कौलाचा हा धागा काही अभ्यासाकरता काढला आहे कां? असा प्रश्न मनात आला.

>>>> मत दिले आहे. पण कौलाचा

>>>> मत दिले आहे. पण कौलाचा हा धागा काही अभ्यासाकरता काढला आहे कां? असा प्रश्न मनात आला. <<<<
अर्थात. कौलाकरता केलेले मतदान सत्य आहे असे गृहित धरुन, नेटविश्वात कोणत्या राशीच्या व्यक्ति जास्त संख्येने वावरतात याचा अंदाज घ्यायचा होता.

राशी अर्थात चंद्रराशी

राशी अर्थात चंद्रराशी बरोबर?
कारण रवी-रास, शुक्र-रास, मंगळ/शनि/गुरु/बुध रास तर भिन्न भिन्न असतीलच की.
आपण चंद्र रास का निवडलीत? खरं तर या फोरमवर बुधाचा प्रभाव पहावयास हवा नाही का?

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

राशी...

तुमची शंका बरोबर आहे.
जन्मकालिन जन्मस्थळाच्या पूर्वक्षितीजावर जी रास उदित असेल, ती रास "लग्नरास" धरली जाते.
तर जन्मकालिन चंद्र ज्या राशीत ती चंद्र रास.
पाश्च्यात्यात जन्मकालिन रवि (सायन)ज्या राशीत असतो त्या राशीला महत्वा देतात.
बाकी ग्रहही कोणत्यानाकोणत्या राशीत असतातच.
परंतु, लग्न राशीवरुन व्यक्तिची देहयष्टी/मूळ प्रवृत्ती/प्राकृत इत्यादी बघतात. तर चंद्र राशीवरून,व्यक्तिस जन्मतः उपलब्ध झालेले प्राकृत/देहयष्टी/प्रवृत्ती/साधनसंपत्ती/बुद्धिमत्ता तो प्रत्यक्षात कशाप्रकारे वापरेल ते बघतात.
रवि आत्माकारक ग्रह मानला जातो. पाश्चात्य पद्धतीत चंद्रा ऐवजी रविकुंडली बघतात. भारतात मात्र चंद्र मनाचा कारक, व व्यक्ति उपलब्ध साधनांचा वापर कसा करेल याबाबत व्यक्तिच्या मनाचा अंदाज घेण्यासाठी चंद्र कुंडली बघतात, तर प्रतिष्ठाविषयक/मूळ प्रवृत्ती/तब्येत इत्यादीकरता रविकुंडली आवश्यक वाटल्यास बघतात.

by limbutimbu

कौल काढल्यापासुन आत्तापर्यन्त मतदान व प्रतिसाद दिलेल्या सर्वान्चे आभार.

१६

१६) अंधश्रद्धा वाढविणारे असले खुळचट कौल अ‍ॅडमिन बन्द का नाही करत?
मी बहुदा कौलांच्या वाट्याला जात नाही पण इथे अगदीच रहावले नाही म्हणून वरच्या पर्यायाला मत दिले आहे. (डोळा मारत)

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

'सायन' की 'निरयन'? :P

'सायन' की 'निरयन'? (जीभ दाखवत)

by limbutimbu

निरयन

by limbutimbu

<श्रेणी पद्धतीबाबत मी इतका साशंक का आहे, याचे वरील पोस्टला मिळालेली श्रेणी हे उत्तम उदाहरण आहे

>>>>by limbutimbu (Score:-1 निरर्थक) Tue, 01/11/2011 - 17:45 |
>>>>निरयन
>>>>limbutimbu

मिहिर यान्नि, सायन की निरयन हा प्रश्न विचारला, हा पूर्णपणे राशी ठरवितानच्या, खगोलशास्त्रीय मोजमापान्चे परिमाणासंदर्भातील आहे, व इच्छुक गुगल करुन याबाबत माहिती मिळवू शकतात.
मिहिर यांचे प्रश्नास, मी पुन्हा तपासून घेऊन "निरयन" असे उत्तर दिलय.
आता या उत्तरास "निरर्थक" वा मायनस वन श्रेणी देण्याची (बे)अक्कल कोणाची? का?
बर, प्रश्न विचारलेल्या मिहिर यान्चे पोस्टला मायनस श्रेणी नाही दिलेली, पण उत्तराला मात्र मायनस श्रेणी! हे कसले आक्रित? की पोस्ट लिम्बुटिम्बुची आहे ना, मग हाणा मायनस श्रेणी, असे तर नाही?
त्यातुन, ही श्रेणी कोणी दिली हे मला कळत नसल्यामूळेच, दुसरीकडे कुठेतरी मी "अशा प्रकारे श्रेणी देणे म्हणजे लपुन लपुन पाठीमागुन खडे मारण्यासारखे वाटते" असे लिहीले, ते चूक काय? आता हा मला लपुन बसून खडा मारलाय की स्वतःची नसलेली (बे)अक्कल पाजळवलिये? अन कुणी? का?
असो, मला फरक पडत नाही मायनस आकड्यान्नी. मात्र श्रेणी देताना, पोस्ट टाकून मगच श्रेणी देण्याची सक्ति व्हावी, व तशी श्रेणी कुणी का दिली याचे स्पष्टीकरण कुणालातरी कुठेतरी देण्याचे उत्तरदायित्व असावे असे वाटते.

मतपरिवर्तन!!

अरेच्या!!

>>>>by limbutimbu (Score:1 माहितीपूर्ण) Tue, 01/11/2011 - 17:45 |
>>>>निरयन
>>>>limbutimbu

असे 'मत' परिवर्तन झालेले दिसते आहे. परमेश्वराची लीला अगाध आहे!!

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

याला मी उत्तर दिलं पण सबमिट

याला मी उत्तर दिलं पण सबमिट करताना सर्व्हर एरर येते आहे आणि प्रत्येक वेळी परत टाईपावं लागतंय.

निरयन हे सरळ प्रश्नाला सरळ उत्तर आहे. त्याला निरर्थक श्रेणी देण्याची गरज नव्हती. कोणी काय विचाराने दिली असेल ते सांगता येत नाही. पण मी तरी त्या पर्टिक्युलर उत्तराला श्रेणी देऊन वर आणू इच्छितो आणि आत्ताच तसं करत आहे. पण एका व्यक्तीला एकदाच श्रेणी देता येत असल्याने अजून एका श्रेणीची गरज आहे.

by limbutimbu

गवि, तुमच्या प्रयत्नांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
मात्र धाग्यावरिल एकुणच पोस्ट्सचे अवलोकन केले तर कुणीतरी एक वा अनेक, जाणूनबुजून खोडसाळपणे "निरर्थक" अशा श्रेणी माझ्या पोस्टना देत सुटले आहेत. अशा कम्पुशाहीला तुम्ही एकटे तोन्ड देऊ शकत नाही. श्रेणी देण्याचे अधिकार असलेल्या ८० जणान्पैकी, काही मोजकेच वीर असे असतील, पण त्यामुळे सर्व ८० जणान्कडे संशयाची सुई जाते आहे.
असो. आपण चान्गल्या प्रामाणीक पोस्टी टाकत रहाणे हाच यावरील उपाय आहे, नाही का? (स्माईल)

प्रकाटाआ

दोनदा प्रकाशित झाल्यामुळे प्रकाटाआ

------------------------
घणघणतो घंटानाद

आपण चान्गल्या प्रामाणीक

आपण चान्गल्या प्रामाणीक पोस्टी टाकत रहाणे हाच यावरील उपाय आहे,

'चांगल्या' ह्या शब्दावर आमचा आक्षेप आहे.
आपल्या पोस्ट टुकार असतात पण तो तुमचा प्रामाणिक प्रयत्न आहे असे आम्ही मान्य करू इच्छितो.

------------------------
घणघणतो घंटानाद

by limbutimbu

>>>>'चांगल्या' ह्या शब्दावर आमचा आक्षेप आहे.
आपल्या पोस्ट टुकार असतात पण तो तुमचा प्रामाणिक प्रयत्न आहे असे आम्ही मान्य करू इच्छितो. <<<<

ठीक आहे, तुमचे लगेचचे उतावीळ मत कळले, पण आमच्या पोस्ट्स टूकार असतात की कसे, याबाबत बाकीच्या सभासदान्चे मत कळून घेण्यासाठी काही काळात अजुन एक कौल मी काढला तर कसे होईल? (जीभ दाखवत) (दात काढत)

याबाबत बाकीच्या सभासदान्चे मत

याबाबत बाकीच्या सभासदान्चे मत कळून घेण्यासाठी काही काळात अजुन एक कौल मी काढला तर कसे होईल

बघा, तुम्हीच सांगताय. म्हणजे येईलच एक टुकार कौल.

------------------------
घणघणतो घंटानाद

ठाणे.

ठाणे.

:)

वाववा!!! काय महत्वपुर्व विषयावर हा कौल आहे! (डोळा मारत)

आम्ही 'मतलो' आहोत (डोळा मारत)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हाण्ण तिच्या...

हाण्ण तिच्या... याचसाठी केला होता अट्टाहास... एक तरी कौल राशींवर यावा! (डोळा मारत)

by limbutimbu

हो ना? मग आलाय कौल, आता तुमचे बहुमुल्य (वा अमूल्य, जे काय असेल ते) मत टाका अशी नम्र विणंती (डोळा मारत)