सबूर

सबूर
-(अष्टाक्षरी छंद)-
अवचित वाटेवर जुडलेले साथीदार--
काय त्यांच्या गाठोड्यांत?
काय खपल्यांच्या आड, कोण घाव काळजात
चिघळले काळ फार?
.
चिंधी जखमेची सोडू, सोडू पोतडीची गाठ
सारे उघड उघड…
तरी लपलेले जणू गोंधळात गडबड!
शोधू काळजीने वाट...
.
आशा-भीती एकसाथ, निरखून बघू आत
भांबावून खूप वेळ...
बोचू, खोचू, कधी क्लांत, कधी शांत, लावू मेळ,
सबूरीची आहे बात.
---
---
Slow Going
---
What all is crammed in sailors' chests
Of bunkmates met by chance?
What wounds we bear within our breasts
What abscesses to lance?
.
Undress the wound, unlock the lid,
And all is there, laid bare.
But jumbled, tumbled, open's hid:
Unless we sort with care.
.
We look within, with fear and hope -
But long we'll take to know...
We'll hurt, we'll heal, we'll feel, we'll grope:
And trust will come; but slow.
---
field_vote: 
3.75
Your rating: None Average: 3.8 (4 votes)

प्रतिक्रिया

इंग्रजी कविता तर अतिशय आवडली. कुठेतरी चर्र करून गेली. (कदाचित वैयक्तिक आयुष्याचे काही संदर्भ आठवले असल्याने असेल.). कविता येथे दिल्याबद्दल धनंजय यांची आभारी आहे.

भाषांतर मस्त जमले आहे. पण एक गोष्ट सुटली आहे ती म्हणजे "आयुष्यरूपी" अफाट दर्यावरचे हे दोन साथीदार आहेत. तेव्हा समुद्राच्या विशालतेचा,रौद्रतेचा किंवा निदान समुद्राचा उल्लेख आला असता तर .... अधिक समर्पक झाले असते असे माझे मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही कविता त्याच आशयाच्या पण वेगळ्या भाषिक संदर्भाच्या म्हणून स्वतंत्र-स्वयंपूर्ण-स्वयंसिद्ध आहेत असेही म्हणावेसे वाटते.
किंवा दोन्ही एकमेकांचे अनुवाद आहेत असे काहीसे..मूळ कविता कोणती आणि तिचा अनुवाद कोणता? -असा प्रश्न पडला.

दोन्ही कविता आवडल्या.रचना-कौशल्य तर आहेच पण आशयघनताही आहे.
डावे-उजवे करायचेच तर मराठीतील कविता किंचित डावी वाटते.

दोन्ही कविता एकाच (प्रस्तुत) कवीने केल्या आहेत किंवा कसे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

crammed in sailors' chests
Of bunkmates met by chance?

यामुळे इंग्रजी कवितेला एक वेगळं परिमाण लाभलं असं वाटलं. तसंच "we'll feel, we'll grope" मध्ये नात्यातली भावना आणि शारीर आकर्षण दोन्ही व्यक्त झाल्यासारखं वाटलं तेदेखील आवडलं. खपली, चिंधी आणि चिघळणं यांचा मराठीमधला वापर असाच शारीर आणि सर्रकन स्पर्श करून गेला. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सर्वांचे आभार.

@विसुनाना, इंग्रजी कविता ही आधी रचली, आणि मराठी कविता त्यानंतर रचली. मराठीतली रचना मोठ्या प्रमाणात अनुवादात्मक असली, तरी बराच वेगळेपणा असण्याबाबत स्वतःला मी ढील दिली होती.
@चिं ज - होय, खरे आहे. सेलर्स चेस्ट, आणि बंकमेट मुळे उपमा/रूपकाला वेगळे परिमाण मिळते. मराठी कवितेतल्या रूपकाची आणि इंग्रजी कवितेतल्या रूपकांची व्याप्ती अर्धीच जुळते.
@सारीका : समुद्राबाबत अतिशय भेदक निरीक्षण. या कवितेच्या सुरुवातीच्या एका अर्धवट आवृत्तीत समुद्रप्रवास हे रूपक अधिक विशद केलेले होते. ती होऊ घातलेली कविता अधिक बहिर्मुख होती. तर शेवटी ही जी समोर ठेवली आहे, ही कविता अधिक अंतर्मुख आहे. ती होऊ घातलेली कविता जर विकसित करू शकलो, तर बघितले पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंग्रजी कविता खूप खूप खूप आवडली.
मराठी त्याहून थोडी कमी. ती थोडी कृत्रिम वाटली. जुडणे हे क्रियापद तितकंसं आवडलं नाही. तसंच 'गोंधळात गडबड' ही रचनाही नाही आवडली.
समुद्र आणि शारीर संदर्भ याबाबात चिंज आणि सारिका या दोघांशीही सहमत.
अवांतरः
मला ही कविता वाचून माझ्याच या कवितेची आठवण झाली.

समोर हिरवंगार जंगल

कोण चूक कोण बरोबर काय न्याय काय अन्याय कसले हिशेब कसले जाब कसले जबाब - दे सगळे हलकेच सोडून
नि पाहा समोर पसरलाय अथांग वैराण प्रदेश
दगडधोंड्यांचा नि उन्हातान्हाचा नि सपाट उजाड माळरानांचा नि लालबुंद सोनेरी सूर्यास्तांचा
आपल्यासाठी - एकेकट्या असलेल्या आपल्यासाठी.
छातीत दाटून गच्च झालेला तो भीतीचा नि दुःखाचा हुंदका हळूहळू अगदी हळूहळू सैल करत ने,
पाहा, माझ्या स्पर्शातून कळेल तुझ्या आतल्या सगळ्या सगळ्या भित्यांना आणि शंकांना आणि प्रश्नांना
की त्यांना एकटं वाटायची गरज नाहीय आता,
अजून एका जिवालाही हे सगळं प्राणांतिक वाटतंय.
त्या सगळ्या प्रश्नांना सापडू देत अजून काही प्रश्न, मग निघून जातील ते एकमेकांच्या सोबतीनं इथेच कुठेतरी.
मग आपण उरू
आणि हे सारं उरेलच तरीही.
एकटे असू आपण दुकटे असूनही.
पण आता संध्याकाळीतली हुरहूर जाईल निवून.
हातात एक घामेजलेला हात असेल
आणि समोर हिरवंगार जंगल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वैराण प्रदेशातून जंगलाकडे प्रवास आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंग्रजी कविता आवडली..वैद्यकातले संदर्भ आले आहेत ते विशेषच..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंग्रजी कविता प्रगल्भ-त्रयस्थ पण निश्चित-आत्मविश्वासपूर्ण वाटली. मराठी रचना किंचित संकोचलेली पण ऊबदार वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त ठेका!
कशासाठी पोटासाठी च्या तालात मस्त म्हणता येते Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला मराठीच आवडली.कारण मला इंग्रजीच येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहूमताप्रमाणे इंग्रजी कविता आवडली.
मराठी भाषांतरात 'जुडलेले' हा शब्द उपरा वाटतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही