छायालेखक अशोक मेहता यांचे निधन

हिंदी चित्रपटसृष्टीतले एक महत्त्वाचे छायालेखक (सिनेमॅटोग्राफर) अशोक मेहता यांचं निधन झालं आहे. ते ६५ वर्षांचे होते. भारतीय समांतर चित्रपटांतल्या अनेक महत्त्वाच्या चित्रपटांत त्यांनी योगदान दिलं. काही ठळक नावं - ३६ चौरंगी लेन, त्रिकाल, मंडी, भूमिका, कलयुग, उत्सव, मिर्च मसाला, बँडिट क्वीन, इत्यादि. 'राम लखन', '१९४२ : अ लव्ह स्टोरी' अशा काही लोकप्रिय चित्रपटांचं छायालेखनही त्यांनी केलं होतं. त्यांच्याविषयी अधिक माहिती इथे मिळेल. शेखर कपूर त्यांच्याविषयी :

It is very rare that a director can say that his learning and career graph was propelled by his relationship with a DP. But I could say that openly and honestly about Ashok Mehta. I have only done one film with him unfortunately. And that is because Ashok refused to come with me to the West where I pursued my creative goals. He refused to be taken away from his roots here in India. I still wish he had come. I missed him a lot.

Ashok unlocked my creative potential in 'Bandit Queen'. He showed me how to be brave and not afraid of expressing myself through the camera and not just through actors and story/plot.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

निर्मितीक्षम असताना चाङ्गल्या कलाकाराचे आयुष्य सम्पणे हे खरोखरच दुर्दैवाचे असते. कायम काऊबॉय हॅट घालणारे मेहता त्याञ्च्या कामातून कायम लक्षात राहतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्री. मेहता कोण हे माहित नाही. तरीही श्रद्धांजली. पण या निमित्ताने त्यांच्याबद्दल अजून थोडी माहिती जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे त्यांचं महत्व, मोठेपण.

याहूनही महत्वाचे, माझ्यासाठी, .... छायालेखन म्हणजे काय? याबद्दल सविस्तर लिहावे जंतूने ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

+१ अगदी ह्हेच म्हणतो.. श्रद्धांजली वाहण्याआधि ती कोणाला वाहतोय ते व त्यानिमित्ताने त्यांचे कार्य कश्या स्वरूपाचे असते ते वाचायला अधिक आवडेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छायालेखन म्हणजे काय यावर अधिक माहिती इथे मिळेल. American Society of Cinematographers (ASC)नं केलेली व्याख्या तिथून उद्धृत -

a creative and interpretive process that culminates in the authorship of an original work of art rather than the simple recording of a physical event. Cinematography is not a subcategory of photography. Rather, photography is but one craft that the cinematographer uses in addition to other physical, organizational, managerial, interpretive and image-manipulating techniques to effect one coherent process

दिग्दर्शकाला अभिप्रेत असणारा भाव ओळखून सिनेमाच्या दृश्यपरिणामाची (ज्याला 'लुक' म्हटलं तर कळायला सोपं जाईल?) निर्मिती करणारा तो छायालेखक असं थोडक्यात म्हणता येईल.

भारतातल्या वेगळ्या छायालेखनाचं उदाहरण द्यायचं झालं तर पटकन गुरुदत्तच्या 'कागज जे फूल'साठी व्ही. के. मूर्तींनी केलेलं छायालेखन आठवतं. गुरुदत्तला अंधारात वहीदा पहिल्यांदा दिसते तेव्हाचा स्टुडिओ, 'वक्त ने किया' मधला स्टुडिओ आणि अखेरच्या सूर्योदयात दिसणारा स्टुडिओ ही छायालेखनातून आशयघनता आणण्याची करामत मूर्तींची. अशोक मेहतांच्या छायालेखनासाठी त्रिकाल, उत्सव आणि बँडिट क्वीन पाहा अशी शिफारस करेन. 'उत्सव'मध्ये मृच्छकटिकचा तलमपणा जिवंत करण्यात छायालेखन महत्त्वाचं ठरलं. 'त्रिकाल'मध्ये मोठ्या हवेलीत अडकलेल्या खानदानी बायकांच्या पिढ्या मेहतांच्या छायालेखनात अधिक गहिर्‍या झाल्या. त्याउलट 'बँडिट क्वीन'मधला मातकट रखरखीतपणा फूलन देवीच्या कहाणीला पूरक ठरतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||