"मी, शिल्पकार माझ्या जीवनाचा !!"

न करीशी व्यर्थ चिंता तू
ठाऊक मज सामर्थ्य माझे !

कुणाशी कसे वदावे कसे वागावे
काय केल्याने काय होईल....
हि चिंता तयास
ज्याने क्रमिला पथ दुहेरी
माझा पथ सुर्यप्रकाशाहूनही स्वच्च्छ
कण भारही किंतु तयात नाही !
नकोत सला-मशवरा मजला
ठाऊक मज मार्गक्रमण माझे !
मान्यता जगात उदंड जाहल्या
त्या प्रती जगणारे अमाप ...
मी तर अव्यक्ताचा चाहता
जी माझी कृती तीच परिणती !
का कशाचीही बाळगावी मी भीती
ठाऊक मज अंतिम ध्येय माझे !!

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

प्रतिक्रिया

सर्वप्रथम ऐसीअक्षरेवर स्वागत!

या कवितेतली कल्पना तितकीशी पोचली नाही. क्षमस्व!
मजला, मज, वदावे वगैरे जुन्या शैलीतील शब्द वापरतानाच मधेच माझा, वागावे वगैरे नव्या शैलीतील शब्द आल्याने रचनेत गोंधळ झाल्यासारखा वाटला.. निदान वाचताना मला तरी गोंधळल्यासारखे वाटले.

असो. मात्र इथे येत रहा.. लिहित रहा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जीस्ट आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0