मागणे

झुकव डोके, खाली मान
आणि सावर, स्वतःचे भान ||

इंद्रधनुष्य आपले नव्हे
करडे दु:ख आपल्या सवे ||

फाकव ओठ, डोळे पूस
फिरव पाठ, बदल कूस ||

भुते झोपली राहूं देत
गोष्ट संपून जाऊं देत ||

पूर्वप्रसिद्धी: 'मनोगत' (ऑक्टोबर २००७)

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

लयीची किमया, थोडक्या शब्दांत दिलेल्या कठोर आज्ञार्थी शब्दांतून साधलेली आहे. या कठोर आणि त्रोटकपणातून सत्याचा कडवटपणा साठवलेला आहे.

अजून येऊ द्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0