संक्रमण

अजुनि काही तास रेटले
राखीत शीर्ण स्मृतींचे कलेवर
अजुनि काही तास रेटविन
दाबुन कंठामधला गहिवर॥

जीर्ण व्यथा ही जाणीव तुडवे
वजन भयंकर आकाशाचे
पाण्यामधुनि तळपत फिरते
धूड अबलख या माशाचे॥

फुटक्या कंठामधल्या या टाहोला
पिचकी पेटी करते साथ
फुटक्या डग्ग्यावरच्या या थापेला
हवाच असला बोजड हात॥

अस्ताईवर परतुनि फिरलो
उपसुनि काळजातिल अंतरा
झळकता प्रकाश उरी साठवून
पक्षी जाय दिगंतरा ||

पूर्वप्रसिद्धी: 'मनोगत' (२००८)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

काही ओळींवर मर्ढेकरांची छाप दिसते.

(पण मर्ढेकरांच्या कविता वृत्ताच्या बाबतीत काटेकोर असतात.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0