बौद्धिक प्रगल्भता...

वैचारिक अथवा बौद्धिक प्रगल्भता ही शब्दांचा फक्त उथळ अर्थ घेऊन येत नसते, शब्दांचा नेमका भावार्थ कळणं देखील महत्वाचं असतं...
ज्याप्रमाणे पाण्याचा केवळ पृष्ठभाग बघून त्याच्या खोलीचा नीट अंदाज लावता येत नाही, तसंच काहीसं असतं हे...
दोन-चार ओळींची नीटनेटकी जुळवणी जमली, निबंध किंवा ग्रंथच लिहिला, मोठ-मोठाल्ली पुस्तकं वाचली की माणूस "प्रगल्भ" होतो असा जर तुमचा समज असेल तर मला तो पूर्णपणे मान्य नाहीये... हो, पण याने प्रगल्भ होण्यास हातभार लागेल हे बऱ्यापैकी माझ्या बुद्धीला पटण्यासारखं आहे...
माझ्या मते, एखाद्या माणसात प्रगल्भता जर कुठून येत असावी तर ती तुम्ही दररोज वावरत असलेल्या सभोवतालीतून, समाजातून, भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीतून... आणि त्याहूनही, एखादी व्यक्ती खरंच कशातून प्रगल्भ होत असेल तर ती गोष्ट म्हणजे "अनुभव", मग तो अनुभव कसलाही असो त्याने फारसा फरक नाही पडत...
प्रत्येन गोष्टीतून, अनुभवातून आपण काही ना काहीतरी शिकत असतो, नवीन काहीतरी आत्मसात करीत असतो... म्हणूनच ह्या साऱ्या गोष्टी आपल्या वागण्या-बोलण्याला, आपल्या व्यक्तिमत्वाला नक्कीच प्रभावित करत असतात...
मी तर म्हणेन की "प्रगल्भता" ही महासगरासारखी आहे आणि अनुभव, पुस्तकं ह्या बाकी साऱ्या गोष्टी पाण्याचा थेंबांसारख्या आहेत... त्यामुळे अशा दोन-चार पाण्याच्या थेंबांनी महासागर तयार होऊन जाईल हे कुणालाच पटण्यासारखं नाहीये... काय, बरोबर ना...?
आणि ह्या महासागराला ओत-प्रोत भरवण्यासाठी करोडो-अब्जो पाण्याच्या अशा थेंबांची आवश्यकता असते, हेही तितकंच खरं... पण त्या प्रत्येक थेंबाला कमी लेखून अजिबात चालणार नाहीये, कारण "थेंबे-थेंबे तळे साचे..." (हे तर आपणा सर्वांना तोंडीपाठ आहेचं, तेही अगदी लहानपणापासून...) आणि तळ्याचे रुपांतर मग महासागरात होईलंच...
आणि तात्पर्य हेच की, प्रगल्भतेचा केवळ "आव" आणून पुरेसं नसतं...
म्हणूनच सांगावसं वाटतंय की, प्रत्येक गोष्टीतून, प्रत्येक अनुभवातून काहीतरी "सकारात्मक" घ्या आणि आपल्या महासागरात ही पाण्याची थेंबं ओतत राहा...
आज ना उद्या, कधीतरी हा "प्रगल्भतेचा महासागर" नक्कीच भरेल याची शास्वती मी देतो ( * )...
------------ ( * अटी लागू...) Smile

टीप - अशा विषयावर वरीलप्रमाणे चार-दोन ओळी लिहिल्या की माणूस प्रगल्भ होतो, हेही सिध्द होत नसतं... वरील मजकूर फक्त माझी मतं, माझे विचार आहेत... ते मी कुणावरच लादू शकत नाही... आपापला दृष्टीकोन असतो... आणि मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे, कदाचित हे सारं पाण्याचा एखाद्या थेंबा इतकंही नसावं... म्हणून कृपया आपला "गैरसमज" होता कामा नये...

- सुमित

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

सदर लेखास प्रतिक्रिया न देऊन, ऐअकरांनी आपली प्रगल्भता दाखवली, असे म्हणावे काय? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रगल्भता असून-नसून फरक काय पडतो? हे या निबंधाच्या संदर्भात मला नीट कळलेले नाही.
अधिक अनुभव घेता अनुभवाचे संचित वाढेल, हे म्हणणे काहीसे द्विरुक्तीचे आहे. थेंबे-थेंबे महासागर साठेल, हे म्हणणे अपूर्ण वाटते. सामान्य मनुष्याच्या हयातीत जे काय अनुभवांचे संचित होऊ शकते, ते महासागर-रूपकास पुरेसे आहे काय?

- - -
निबंधाचा एक धागा "प्रगल्भतेचा आव" असा आहे. हा लेखाचा मूळ हेतू असावा, असे वाटते. खूप अनुभवाचे संचित असले, तर खरी प्रगल्भता, पण खूप अनुभवाचे संचित नसले, पण क्षक्षक्ष म्हणजे प्रगल्भतेचा आव, असा काहीसा फरक लेखकाच्या मनात असावा. तरी "क्षक्षक्ष" अलिखित-अध्याहृत आहे, नेमके काय आहे, ते कळत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0