कातरवेळ..

प्राचीला गच्ची जोडण्याचा आमचाही एक प्रयत्नः

आठवांचे सूर,
अश्रूंचे पूर,
लागे हूरहूर,
जीवालागी..

नि:शब्द बोलणे,
हळूच ते स्मरणे,
अव्यक्त भावना,
हृदयात...

मनात तू,
स्पंदनात तू,
जीवघेण्या श्वासात तू,
ध्यानीमनी...

दिशा सांजावल्या,
गोकुळे बहरली,
परि एकलेपण,
कातरवेळी...!!

- सुधीर बागुल, मस्त कलंदर

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

प्राचीला गच्ची जमलीय बरं

जोक्स अपार्ट कविता आवडली
ऊगाचच जडशीळ शब्द वापरुन भावविव्हल होण्यापेक्षा साध्या सोप्या शब्दात चांगल व्यक्त झालय

सुधीर बागूल मस्त कलंदर हे काय कळल नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

कोणत्याश्या त्या वृत्तात लिहीण्याचा क्षीण प्रयत्न आहे काय?

हाताशी मोबाईल, पायाशी इंटरनेट आणि हवी त्या माणसांशीच जोडलेलं असण्याची वर्ष फार जास्त नाहीत. पण तरीही कातरवेळी एकटेपणा येतो काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दोन-दोन कवीवर्यांनी मिळून लिहिलेली कविता तिसरं कडवं सोडल्यास मस्त जमलीये

तिसरं जरा श्ब्दबंबाळ (आणि वृत्ताला सोडून) वाटतं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

काल मी आणि सुधीर सहज* गप्पा मारत असताना पहिल्या चार ओळी सुचल्या. दुसरं कडवं सुधीरने सुचवलं. नंतर याला मग फक्त स्मरणरंजन असं न ठेवता काही कारणाने कधीही न परतून येणार्‍या जोडीदाराची वाट पाहात असलेल्या व्यक्तीचं 'गर्दीतलं एकटेपण' करावं असं ठरलं. त्यातून शेवटचं कडवं आलं. माझ्या मते कविता तिथेच पूर्ण झाली होती. पण एवढ्यातून एकलेपण अधिक प्रकर्षाने जाणवत नाही असं सुधीरला वाटलं, आणि म्हणून मग ते मीटरमध्ये न बसणारं पण आमच्यामते भावनेला पूरक असं ते तिसरं कडवं लिहिलं.. ते ओघात न आल्याने 'गटात न बसणारं' वाटतंय!

अदिती, संपर्काची साधने जवळ असली तरी जिची वाट पाहिली जात आहे ती व्यक्ती कधीही परतून येणार नाही. म्हणून ते रितेपण आणखी भकास होतं, असं कवींचं म्हण्णं आहे.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे