अंगाई - गाई गाई

ऐसी अक्षरे वर लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न, त्यामुळे सुरवातीलाच एक विनंती, काही चुकले असल्यास जरुर निदर्शनास आणा पण त्या बरोबर उत्तेजना-पर सुचनाहि द्या Smile (इथले साहित्य खूप दर्जेदार असते त्यामुळे जरा काचरतच हा धागा टाकतोय!)

परवा आई तिच्या नातवाला (माझ्या छोकर्‍याला) झोपवत होती आणि त्याला झोपवताना ती "गाई गाई गाई गाई, बाळाला आमच्या झोपी येई" एवढंच म्हणत होती, अर्थात ३ महिन्याच्या मुलाला ते पुरेसं होतं पण मग मी असंच मनात पुढे तयार करत गेलो, यमक जुळवत गेलो आणि ही अंगाई तयार झाली. आता ही अंगाई चांगली की वाईट ह्या पेक्षा मला आनंद असा की माझ्या मुलासाठी मी 'स्पेशल' अंगाई बनवली हा आहे Smile आणि घरातही सध्या हीच अंगाई गायली जातेय Smile

गाई गाई गाई गाई
बाळाला आमच्या झोपी येई
झोपी येई जेव्हा होई
अंधाराची काळी शाई

गाई गाई गाई गाई
बाळाला आमच्या झोपी येई
झोपी येई जेव्हा काही
तारे लुकलुक करून पाही

गाई गाई गाई गाई
बाळाला आमच्या झोपी येई
झोपी येई जेव्हा येई
ढगातील चांदोमामा पायी

गाई गाई गाई गाई
बाळाला आमच्या झोपी येई
झोपी येई जेव्हा ताई
बाळाचा हळूच पापा घेई

गाई गाई गाई गाई
बाळाला आमच्या झोपी येई
झोपी येई जेव्हा गाई
आजी गोड गोड अंगाई

गाई गाई गाई गाई
बाळ आमचे झोपी जाई
झोपी जाई जेव्हा आई
बाळाला मऊ कुशीत घेई

-घनु

(मी प्रत्येक कडव्याला "identation" आणि प्रत्येक कडव्यानंतर काही "स्पेस" पण दिल्या होत्या पण मला त्या "पुर्वदृश्य" मधे दिसत नव्हत्या. काही मदत मिळेल का ह्यावर? मी FF-14 'ब्राउसर' वापरतोय)

field_vote: 
2.666665
Your rating: None Average: 2.7 (3 votes)

प्रतिक्रिया

सर्वप्रथम ऐसीअक्षरेवर स्वागत!

फारच छान अंगाई आहे..
चालीवर उत्तम बसते आहे.. छान नाद आहे! मी लावलेली सगळ्यात सोपी चाल वेळ झाल्यास रेकॉर्ड करून टाकतो इथे.
शब्दबंबाळ किंवा गायकी दाखवण्यासाठी लिहिण्यात आलेल्या चित्रपटातील अंगाईगीतांपेक्षा अशी सहज जमून आलेली अंगाई मलाही आवडते

मलादेखील काही महिन्यांपूर्वी अंगाई अशीच स्फुरली होती. ती इथे वाचता येईल

बाकी, क्रोममध्ये तरी स्पेसिंग बरोबर दिसतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद ऋषिकेश Smile

आणि हो, तुमची अंगाई वाचली आणि त्या प्रेरणेतूनच मला माझी अंगाई इथे द्यावी वाटली, अर्थात खूपच सुंदर रचना केली आहे तुम्ही Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदर अंगाई मी ज्या चालीत म्हटली त्या चालीत माझ्या आवाजात (!!) इथे रेकॉर्ड करून चढवली आहे.
वैधानिक इशारावजा सुचना: माझा आवाज आपापल्या जबाबदारीवर ऐकावा.

@घनु: आपली वेगळी परवानगी न घेता तसे गृहित धरून थेट रेकॉर्ड केले आहे. तुमचा आक्षेप असल्यास ते इस्निप्सवरून उडवायची विनंती करता येईल

अवांतरः थेट इथेच एम्बेड करता येते का कोणाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

घनू यांनी लिहिलेले सुरेख अंगाईगीत आणि तेही ऋषिकेश यांच्या साजेश्या आवाजात. अहाहाहा. गाईगाईगाईगाई. जणू आनंदघनू. 'झोपी होई जेव्हा होई' ओहोहोहो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला उधळायला फार फार आवडतं

अरे व्वा! खुप खुप धन्यवाद ऋषिकेश Smile छान चाल लावली आहे तुम्ही आणि छान वाटलं तुम्ही म्हंटल्याप्रमाणे लगेच रेकॉर्ड केलं Smile

कसलं भारी वाटतं आणि जेव्हा तुम्ही "कवी घनु" असं वैगरे बोलतात त्या रेकॉर्डमधे Biggrin भारीच!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवर स्वागत.
अंगाईच्या संदर्भात सोप्या शब्दांबद्दल ॠषिकेशशी सहमत. अंगाई आवडलीच.

(पांढर्‍या जागा बहुदा एचटीएमेलच्या गुणधर्मामुळे दिसत नाहीयेत)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपल्या बाळासाठी स्वतः रचलेली अंगाई गाण्यात नक्कीच अवीट आनंद असणार. अंगाई आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0