नील आर्मस्ट्राँगला श्रद्धांजली
पृथ्वीबाहेरील खगोलीय वस्तूवर मानवजातीच्या वतीने पहिलं पाऊल टाकणारा नील आर्मस्ट्राँगचे आज निधन झाले. नील मरतेसमयी ८२ वर्षांचा होता.
चंद्रावर पहिलं पाऊल कोणी टाकायचं याचा निर्णय नीलच्या निर्णयक्षमता आणि शांतपणे संकटांवर मात करण्याच्या वृत्तीमुळे सहज करता आला. अपोलो ११ हे चंद्रावर माणसं नेणारं पहिलं यान. ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यात अडथळे येत होते; ऐनवेळी यान कुठे उतरवायचं हे नीलने ठरवलं. त्यामुळे चंद्रावर पहिलं पाऊल टाकण्याचा मान त्याला मिळाला.
कोरियन युद्धात १९५० च्या दशकात नेव्हीची जेट्स उडवणारा पायलट म्हणून प्रसिद्ध असण्याऐवजीही आज नील आर्मस्ट्राँग मानवजातीचा चंद्रावर गेलेला पहिला प्रतिनिधी म्हणून प्रसिद्ध आहे आणि राहिल. नील आर्मस्ट्राँगला श्रद्धांजली.
संबंधित बातम्यांचे काही दुवे:
बीबीसी
वॉशिंग्टन पोस्ट
नासाच्या संस्थळावर असणारं नीलचं चरित्रः
http://www.nasa.gov/centers/glenn/about/bios/neilabio.html
प्रतिक्रिया
श्रद्धांजली !
श्रद्धांजली !
http://shilpasview.blogspot.com
जायन्ट लीप घेणारा माणसाचा
जायन्ट लीप घेणारा माणसाचा प्रतिनिधी हरपला.
मनःपूर्वक श्रद्धांजली!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
नील आर्मस्ट्राँग यांना
नील आर्मस्ट्राँग यांना श्रद्धांजली !
अवकाशविज्ञानाच्या इतिहासाचे एक पान पलटले.
मानवी इतिहासातल्या एका सोनेरी
मानवी इतिहासातल्या एका सोनेरी क्षणाचा साक्षीदार हरवला. अवकाशात घेतलेल्या झेपेत कुठेतरी रुतलेलं, कोरलं गेलेलं पहिलं पाऊल त्याचं होतं. चंद्रावर जाण्याचं स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी हजारो लोक झटले. हजारो वर्षांच्या ज्ञानसाधकांची आणि तंत्रविशारदांची मेहेनत त्या स्वप्नाच्या मनोऱ्याचा पाया म्हणून होती. या स्वप्नाच्या सत्यतेचं प्रतीक म्हणजे चंद्रावर खरोखर पाऊल ठेवणारा नील आर्मस्ट्रॉंग. त्याची जीवनज्योत मालवली असली तरी ती स्वप्नाची मशाल धगधगते आहे. या निमित्ताने या सर्वव्यापी ज्ञानयज्ञासाठी स्वतःच्या आयुष्याची समीधा वहाणाऱ्या सर्वांनाच मानाचा मुजरा.
अदिती लेखातील माहीती आवडली.
अदिती लेखातील माहीती आवडली. हे माहीत नव्हते की नील यांनी यान कोठे उतरवायचे याचा निर्णय घेतला. राजेश घासकडवी यांचा प्रतिसाद खूप आवडला.
नील आर्मस्ट्राँग यांना श्रद्धांजली.
अदिती लेखातील माहीती आवडली.
अदिती लेखातील माहीती आवडली. हे माहीत नव्हते की नील यांनी यान कोठे उतरवायचे याचा निर्णय घेतला. राजेश घासकडवी यांचा प्रतिसाद खूप आवडला.
नील आर्मस्ट्राँग यांना श्रद्धांजली.
तो
तो काळ अजूनही लक्षात आहे. दुसर्या दिवशी ही बातमी केसरीत वाचली.सरज्योतिषी नानासाहेब ह्या घटनेवर विश्वास ठेवायलाच तयार नव्हते.विज्ञानाचा आविष्कार,अमेरिकन लोकांच्या जबरदस्त इच्छाशक्तीवर महाजनींनी एक सुंदर लेख लिहिलेला आठवतोय.(नेहरूवादी)गोविंदरावए तळवलकरांचा लेखही बरा होता पण त्यात रशियाचेच कौतुक जास्त होते.अमेरिका आणि तो सोवियेट युनियन. अवकाश शास्त्रात जे काही चालू होते ते विचारता सोय नाही.
(मति कुंठित झालेली) रमाबाई
महाजनी, गोविंद तळवळकर
महाजनी, गोविंद तळवळकर वगैरेंचे तत्कालीन लेख वाचायला आवडतील.
जालावर कुठे मिळतील का वाचायला?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
छान
चांगली माहिती. त्याने कोरियन युद्धात भाग घेतला होता, हे ठाऊक नव्हते. श्रद्धांजली!
@रकु - .(नेहरूवादी)गोविंदरावए तळवलकरांचा लेखही बरा होता
सदर लेख वाचलेला नाही त्यामुळे त्यावर नो कमेन्ट. पण (नेहेरूवादी) गोविंदराव, ही माहिती नवीनच!
तसे ते नेहेरूद्वेष्टेही नाहीत. पण ते मात्र स्वतःला (एम एन) रॉयवादी म्हणवून घेतात, असे वाटते.
अवकाशात जाणारे बरेचसे लोकं
अवकाशात जाणारे बरेचसे लोकं सैनिकी शिस्तीतले दिसतात. अवकाशात जाण्यासाठी शरीर आणि मनची पूर्वतयारी सैनिकी शिक्षणातच होत असावी.
कोरीयन युद्धाबद्दल मलाही माहित नव्हतं. मृत्युच्या बातम्यांमधे हा उल्लेख सापडला. तसंही आपण भारतीय बहुदा कोरियात तेल नाही त्यामुळे कोरियन युद्धाबद्दल फार जागरूक नसतो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
सोनेरी पाऊल काळाच्या उदरात
नील आर्मस्ट्राँगला श्रद्धांजली.
मानवी इतिहासातले एक सोनेरी पाऊल काळाच्या उदरात अदृष्य झाले.
अवांतरः भारतीय पुराणांनुसार चंद्रावर जाणारा पहिल्या मानवाचे नाव बाहुबली होते (आर्म-स्ट्राँग नावाने ते सिद्ध झाले.)
थोर मानव
त्यांचे नांव इतिहासात कायमचे कोरले गेले. माझी श्रद्धांजली.
काही लोकांनी चंद्रावर उतरल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन ढळले होते अशा अफवा उठवल्याचे स्मरते.
आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.
खरडवहीत चौकशी झाल्यामुळे ...
अपोलो ११ खरोखर चंद्रावर उतरलं होतं का यासंदर्भात अनेक Conspiracy theories मांडण्यात आल्या आहेत. त्या शंकांचं निराकरण नासाच्या संस्थळावरही केलेलं आहे. इथे वाचता येईल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कसला पॅशनेट प्रतिसाद आहे.
कसला पॅशनेट प्रतिसाद आहे. एरवी विदरट, अॅनॅलिटीकल, फॅक्टसबद्दल आग्रही, काटेकोर मोजमापाबद्दल सजग, राघांकडून इतक्या भावनापूर्ण प्रतिसादाची अपेक्षा नव्हती. मला अतिशय आवडलेला एक प्रतिसाद म्हणऊन याची वाचनखूण मी साठवीन. आत्ता परत वाचला आनि तितकाच आवडला.
ह्म्म्म्म मन आणि चंद्र
ह्म्म्म्म मन आणि चंद्र ज्योतिषातील जोडी.
आजच योगायोगाने नील
आजच योगायोगाने नील आर्मस्ट्राँग ची आठवण एका वेगळ्या कारणासाठी आली होती. ती अशी:-
त्यावेळची एक मजेशीर घटना चांगलीच लक्षात आहे. १९६९ साली, नील आर्मस्ट्राँगने ,चन्द्रावर पाउल ठेवले. ही बातमी ऐकुन, आम्ही कॉलेजमध्ये गेल्यावर, " We want holiday,We want holiday " चा घोष लावला. आमच्या लेक्चररांनी सर्वांना अगोदर जागेवर बसविले आणि सांगितले,' मी कोणालाही एकच प्रश्न विचारीन, उत्तर बरोबर आले, तर सुट्टी, नाहीतर नेहमीचे सर्व पिरियड अटेंड करावे लागतील." आम्ही उत्साहाने कबूल झालो. प्रश्न साधा होता," चान्द्रयानात बसून गेलेल्या तिघांची नावे फक्त सांगा." आणि सरांनी डोंगरे नावाच्या मुलाला उभे केले. तसा हा डोंगरे हुशार खरा, ( शेवटच्या सेमिस्टरला माझ्याबरोबरच तोही फर्स्ट्क्लास मध्ये पास झालेला ), पण सामान्य ज्ञानात इतका कच्चा असेल असे वाटले नव्हते. वस्तुत: आठ दिवसापासून पेपरमध्ये ह्या बातम्या येत होत्याच. पण आमच्या दुर्देवाने त्याला तिन्ही नावे सांगता आली नाहीत आणि आम्हाला झक मारून सायंकाळी सहा वाजेपर्यंत कॉलेज अटेंड करावे लागले. असो, गेले ते दिवस !
तुमचे सर हुशार होते. चंद्रावर
तुमचे सर हुशार होते.

चंद्रावर यान उतरवण्यासाठी सपाट जागा लागणार (सी ऑफ ट्रॅन्क्विलिटी वगैरे). ती "डोंगरें" ना माहिती नसणार हे हेरून सरांनी त्याला प्रश्न विचारला असावा.
आणि तुम्हां मुलांच्या तंगड्या तुमच्याच गळ्यात टाकल्या!!!
अक्षरमित्र ह्यांचा अनुभव
अक्षरमित्र ह्यांचा अनुभव गंमतीशीर.
पिडांकाका,
(नंदनशी नुकतीच भेट झाली का काय?)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मजेदार आठवणी
मजेदार आठवणी अक्षरमित्र.
>नीलच्या निर्णयक्षमता आणि शांतपणे संकटांवर मात करण्याच्या वृत्तीमुळे सहज करता आला.>
जर का ते यान परत उडलंच नसतं तर फक्त अपडेटस देण्यापलिकडे काहीच करता आलं नसतं त्याला मरेपर्यंत आणि इकडे हळहळ
हो
होय, कालच पहिल्यांदा भेट झाली....
कोटीभास्कर असला तरी माणूस उत्तम आहे!!!!
----------------------

सांगोवांगीच्या गोष्टी सांगतोय, ह्यालाच विदा म्हणायचा असल्यास आमची हरकत नाही!
श्रेणी देणार्या अनामिकास,
स्क्रू यू!
अंनिस त श्रद्धांजली, शुभेच्छा
अंनिस त श्रद्धांजली, शुभेच्छा हे शब्द वर्ज्य मानले जातात. त्याला आदरांजली सदिच्छा असे शब्द वापरतात. असे शब्द वापरणे म्हणजे अजून 'कच्चे मडके' आहे असे जेष्ठ श्रेष्ठ लोक समजतात. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र दिवाळी अंकाला सुद्धा दिवाळी अंक न म्हणता वार्षिक विशेषांक म्हटले जाते.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
न ट्रोलान्च्या भाषेत
नीलच्या कुटुंबियांच्या व इतरांच्या जखमा भरून येण्यासाठी माझ्या सहवेदना. देव करो अन तो चन्द्रावर खरच गेला असो....
दुर्दैवाने थापाड्या विज्ञानिकांची संख्या आज या जगात भोंदू बाबांपेक्षा जास्त वाटते पण त्याना बड्या कंपन्यांचे /देशांचे पाठबळ असल्याने सामान्य माणूस यांच्या फस्वेगीरीपुढे निष्प्रभ आहे
actions not reactions..!...!
व्हाय बट?श्रद्धांजली,
व्हाय बट?
श्रद्धांजली, शुभेच्छा आणि दिवाळी अंक या शब्दांत काय प्रॉब्लेम आहे? (अमुकतमुकचा 'बळी दिला', शेळी जाते जिवानिशी, ओनामा केला वगैरे वाक्प्रचारही वापरत नसावेत.)
आणि वार्षिक विशेषांकच काढायचाय तर दिवाळीलाच कशाला काढायचा? हे म्हणजे "मी नाही त्यातली..."चा प्रकार वाटतो.
दादा सांडग्यांच्या चाळीची आठवण झाली.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
पर्यायी शब्द असताना आपण असे
पर्यायी शब्द असताना आपण असे अंधश्रद्ध शब्द कशाला वापरायचे? असे त्यांचे म्हणणे असते. पण डॉ दाभोलकर मात्र अशा शब्दोच्छला बद्दल म्हणायचे की मग मी भीतीने गर्भगळीत झालो असे कुणी म्हणाले तर तू तर पुरुष आहेस तुला कसला आलाय गर्भ? असे आपण म्हणतो का?
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
सहमत आहे. आणि विशेषांक तरी
सहमत आहे. आणि विशेषांक तरी दिवाळीसारख्या अंधश्रद्धांच्या सणाला कशाला काढायचा? किंबहुना कोणत्याही विशेष दिवशी विशेष अंक काढणं हेही अंधश्रद्धेचंच लक्षण. त्यापेक्षा रँडम नंबर जनरेटर वापरून रँडम तारीख काढावी आणि काढावा अंक.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
हिंदू नास्तिकता
श्रद्धांजली वाहायला मला त्रास होत नाही; RIP म्हणताना कधीमधी प्रश्न पडतो. नास्तिक असले तरी हिंदू नास्तिक आहे मी.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हा दिवाळी अंक दिवाळीनंतरच
हा दिवाळी अंक दिवाळीनंतरच येतो. नोव्हेंबर डिसेंबर वार्षिक विशेषांक म्हणतात त्याला. जाहिरातींचे अर्थकारण सांभाळावे लागते म्हणुन दिवाळीच्या वेळी विशेषांक काढावा लागतो.अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रास हार्दिक सदिच्छा असा प्रत्येक जाहिरातीच्या वर डिफॉल्ट मजकूर असतो.
गमतीने अंनिसतल्या शुभांगी नावाच्या एका मैत्रिणिला मी सदांगी म्हणतो.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
रिप म्हटलं की त्या मृताच्या
रिप म्हटलं की त्या मृताच्या आत्म्याला यमराजाने देहापासून टरकावून काढलं आहे असं चित्र डोळ्यांसमोर येतं.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.