सादगीभरा धर्मेंद्र..

ही हकिगत असेल काहीतरी १४-१५ वर्षांपूर्वीची..

अजय विश्वकर्मा हा माझा एक भैय्या मित्र. लहानपणापासूनच अत्यंत हुशार.. दहावींनंतर व्हिज्युअल इफेक्ट्स, ऍनिमेशन, एडिटिंग वगैरे विषयात प्रावीण्य मिळवलंन आणि नंतर तो चित्रपट व्यवसायाशी जोडला गेला. तिथे काही वर्ष उमेदवारी करून पुढे त्याने अंधेरीला स्वत:चा एक छोटेखानी स्टुडियो सुरू केला. एक छोटीशी पूजा ठेवली आणि त्या पूजेचं त्याने मलाही निमंत्रण दिलं..

"तात्या, बस थोडेही मेहेमान लोग आनेवाले है.. तुझे आना ही है.. बाद मे तुझे खाना खाकेही जाना होगा."

मी ठरल्यावेळेला तिथे पोहोचलो.. त्याने मला हौशीने त्याची यंत्रसामग्री वगैरे दाखवली.. फार नाही परंतु २०-२५ माणसंच तिथे आली होती.. मी दर्शन घेतलं, तीर्थ-प्रसाद घेतला. जरा वेळाने अगदी उत्तम भोजन झालं आणि अजयला मनापासून शुभेच्छा देऊन मी अजयचा निरोप घेऊ लागलो..

"तात्या, रूक जा थोडा टाइम. तुझे एक खास मेहेमान से मिलाना है.. अभी तक वह आए नही, लेकीन आएंगे जरूर...! "

कोण बरं हे खास मेहेमान? मग मीही तिथे जरा वेळ थांबून त्यांची वाट पाहू लागलो..

जरा वेळाने बघतो तर स्टुडियोच्या बाहेर एक पॉश गाडी येऊन उभी राहिली आणि त्यातून चक्क तुमचा-आमचा लाडका धर्मा मांडवकर, अर्थात धर्मेंद्र उतरला..! आपण तर साला जाम खूश झालो त्याला पाहून..

आतापावेतोवर बरीच मंडळी जेवून निघून गेली होती.. आम्ही अगदी मोजकीच माणसं मागे उरलो होतो.. मग धरमपापाजींनी दर्शन वगैरे घेतलं.

अजयने त्यांची माझी ओळख करून दिली.. "ये तात्या है. मेरा दोस्त है..आपका फॅन है. थाना मे रेहेता है.. "

प्रसन्न हसत धरमपापाजींनी माझ्याशी हस्तांदोलन केलं.. मंडळी, खरं सांगतो, मला त्यांची ती हाताची पकड अजूनही आठवते.. भक्कम लोखंडी पकड..!

"आप हमारे फॅन है. बहुत अच्छा लगा.. कौनसी फिल्मे पसंद है हमारी..?"

मग मी त्यांना फटाफट काही नावं सांगितली.. 'बंदिनी', 'ममता', 'अनुपमा', 'चुपके चुपके', 'गुड्डी', आणि अर्थातच वीरूचा 'शोले..!'

"वीरू पसंद आया आपको..? " Smile

मग धरमपापाजी एकदम मोडक्यातोडक्या मराठीतूनच सुरू झाले..

"तू मराठी आहे ना..? मंग तुज्याशी मराटीतच बोलतो.. " "तुला खरं सांगू काय? तसा मी कोण ग्रेट ऍक्टर वगैरे बिल्कूल नाय रे.. पण तुमचा लोकांचा प्यार एवढा भेटला ना, म्हणून तर माझी आजवर रोजीरोटी चालली..! "

अगदी हसतमुखपणे आणि प्रांजळपणे धरमपापाजी म्हणाले.. "इतके वर्ष इथे इंडस्ट्रीत हाय, पण तू माझा गुड्डी सिनेमा पाहिला ना? त्यात सांगितल्याप्रमाणे अजूनही मी स्वत:कडे त्रयस्थपणेच बघतो..'

"हमे अभी तक पुरी तरहसे राज नाही आयी ये फिल्मी दुनिया.. यकीन करो मेरा.. आप जैसे चाहनेवालो के आशीर्वाद से रोजीरोटी मिली, चार पैसे मिले.. लेकीन आज भी मै अपने आप को इस दुनिया से अलग मानता हू..! "

मग मला अचानक गुड्डी चित्रपटाअखेरचे त्याचे संवाद आठवले.. त्यात धर्मेंद्र फिल्मी दुनियेने वेडावलेल्या एका मुलीला - जया भादुरीला सांगत असतो.. "मी लहानपणी माझ्या शेतावर मस्त मोकळेपणाने उभं राहायचो तेव्हा मला किती सुरक्षित वाटायचं..पण इथे सगळं वेगळंच आहे.. जो पर्यंत तुम्ही प्रकाशझोतात आहात तोवर तुम्हाला लोक विचारतात.. नंतर तुमची अवस्था एका जळालेल्या स्टूदीयोतल्या एखाद्या मोडक्या दिव्यासारखी होते.. तो दिवा ज्याने त्या स्टुडियोत अनेकांचे चेहरे उजळले..! "

आज मला पुन्हा एकदा धरमपाजींचा हा संवाद आठवला. परवाच ए के हंगल वारले.. किती बॉलीवुडवाले होते त्यांच्या मयताला..? तीनशे-तीनशे करोडवाल्या सलमान-शाहरुखचा जमाना आहे.. कात्रिना, करीना, प्रियांकाचा जमाना आहे.. हंगलसाहेबांना कोण विचारतो? किसको टाइम है..?!

अजयच्या स्टुडीयोत मला भेटलेले धरमपापाजी मात्र मला गुड्डीतल्याइतकेच साधे आणि माणुसकी जपलेले वाटले, सादगीभरे वाटले..

धरमपापाजी.. हेमामलिनीचे "स्वत:..!" (शब्दश्रेय : रमाबाई रानडे! ) Smile

जरा वेळाने मी तेथून निघालो... त्यांच्या पाया पडलो.. त्यांनी पुन्हा एकदा मला "अरे अरे.. बस बस.. " असं म्हणून उठवला.. हात मिळवला.. "बेटा, ऐसाही प्यार रहे.. आप है तो हम है..! "

घरी परतताना त्यांच्या हाताची लोखंडी पकड जाणवत होती.. डोळ्यासमोर त्यांचा प्रसन्न चेहरा होता..

- तात्या अभ्यंकर.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (4 votes)

प्रतिक्रिया

बर्‍याच दिवसांनी तुमचा लेख वाचायला मिळाला. साधा प्रसंग तुम्ही छान खुलवून सांगितलाय! धर्मेंद्र, एक मनाने सच्चा माणूस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे वा! बर्‍याच दिवसांनी पुनरागमन!
छान फुलवला आहे प्रसंग!

आता येत रहा लिहित रहा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बाकी काही म्हणा तात्या, व्यक्तीचित्रण रेखाटावे ते तुम्हीच.

बाकी नायिकांसारखे दिसणार्‍या आताच्या हिरोंपेक्षा धर्मेंद्र कितीतरी उजवा आहे.

आमचेही बर्‍याच दिवसांनी आगमन झाले. म्हटले प्रतिसादात बोटे साफ करून घ्यावीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

अतिशय हृद्य आठवण अगदी छान खुलवली आहे

लेखन आवडलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

प्रत्येक प्रसंगी हरीतात्या त्या ठिकाणी कसे हजर होते हा प्रश्न आम्हाला त्या काळात कधी पडला नाही, आणि मोठेपणी आम्ही हरीतात्यांना कधी त्यांच्या जागृत समाधीतून जागे करण्याचा कधी प्रयत्न केला नाही. आज ध्यानात येतं की हरीतात्यांच्या कथेतला 'मी' म्हणजेच ती 'इतिहास' नावाची अदृष्य व्यक्ती!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

खिक्... करार संपला वाटतं? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0