मला पडलेले काही प्रश्न ;)

फार दिवसापासून काही प्रश्न पडलेत बुवा. इथल्याच काहिंनी आधी उत्तरं दिलेली आहेत, पण काही वर्षापूर्वी मिळालेली उत्तरं पुरेशी वाटेनात; आता पुन्हा नव्या दमाच्या गड्यांसमोर, काही जुन्याजाणत्यांसमोर सादर करतोय.
.
१)पिउन गाडी चालवायला मनाइ आहे अस म्हणताय, मग बीअर बारला पार्कंग स्लॉट कशाला ठेवलेत?
२)जगातलं पहिलं घड्याळ जेव्हा बनवलं तेव्हा नक्की किती वाजले होते?
म्हणजे सर्वात पहिला "वेळ" कुणी पाहिलाय?
३)जर नियम मोडल्यावर दंड भरावा लागत असेल(आणि तेव्हढच करुन सुट्णार असु, तर ) दंड म्हणजे नियम मोडाण्यची फी नव्हे काय?
Tax is fine to be correct, fine is the TAx to be wrong!!
४)आपण "पायामध्ये बूट" घालता, की बूटमध्ये पाय घालता?
नक्की काय करता? जे करता तसं का म्हणत नाही?
तुम्ही अंगात शर्ट घालता की शर्टात अंग घालता?
५)आधी अंडे की आधी कोंबडी ? जगातील सर्वप्रथम जोडप्याला पुनरुत्पादनाबद्दल कुणी सांगितलं?
६)जगातील सर्वच देश कर्जात आहेत(गंमत करत नाहिये, अमेरिका सुद्ध कर्जात आहे.) तर सर्व पैसा जातो कुठे?
७)"डॉग फूड" बनवलं जातं तेव्हा त्याचं "टेस्टंग" कोण करतं?
८)अंधाराची गती प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक आहे काय?
९)कॉपी राइट चिन्हाचं कॉपीराइट कुणाकडं आहे?
१०)कोर्‍या कागदाची झेरॉक्स काढली तर काय होइल?
११) खर तर कुत्री नुसतीच बसुन खाताना सगळीकडं दिसत असली तरी "कुत्र्यासारखं राबवलं जातय" अशी ओरड का होते?
१२)कॅल्क्युलेटर आणि फोन मधल्या बटनांचा क्रम नेमका उलट का असतो?
१३)माशांना तहान लागल्यावर ते काय करतात?
१४)पक्षी झोपेत झाडावरुन खाली पडत कसे नाहित?
१५)कॉर्न ऑइल मक्यापासुन, ,वेजिटेबल ओइल वनस्पतींपासुन मग "बेबि ऑइल" कशापासुन बनतं?
१७)स्मृती भ्रंश झालेल्या माणसाची स्मृती परत आल्यास त्याला "आपली स्मृती गेली होती "हे आठवत का? नसेल तर त्याची स्मृती परत आली असं कसं म्हणायचं?
१८)ध्वनीच्या वेगानं जाणार्‍या वाहनात तुम्ही रेडिओ कसा काय ऐकु शकता?
१९)माझ्या जमिनीच्या मालकीत खालपर्यंत्,जमिनीच्या गाभ्यापर्यंत खोद्काम मी केलं तर चालेल का?
२०)प्रेमात पडालेला प्रेमी जेव्हा अशी प्रतिज्ञा करतो की "ये कसम खाये हम हर कसम तोड दे"..ही प्रतिज्ञा त्यानं पाळाअवी का? ती पाळणं म्हणजेच ती मोडणं नव्हे काय?
"I am a liar and I am speaking lie" असं कुणी म्हणत असेल तर त्याचं म्हणणं खरं की खोटं?
२१)झोपेत मेलेल्या माणसाला आपण मेलोय किंवा मरत आहोत हे कधी कळतं ?
२२) हार्ट ट्रांन्सप्लांट प्रमाणे उद्या ब्रेन ट्रांन्सप्लांट किंवा स्मृती ट्रांन्सप्लांट होत असेल माणसाची आयडेंटिटि कुठली? ज्याची स्मृती ट्रांन्सप्लांट करण्यात आली आहे त्याचाच गत भूतकाळ त्याला आठवत राहील, स्वतःचा नाही. मग त्यानं आयुष्य कुणाचं म्हणुन जगायचं?
स्मृतीचं की त्याच्या खर्‍या खुर्‍या भूतकाळाशी निगडित?
.
तुम्हालाही असे अचाट प्रश्न असतील तर अवश्य मांडा. इथली ब्यांडविड्थ फुल्ल टू वापरुन घेउया.
प्रश्न नसतील पण उत्तरं असतील तर तीही अवश्य द्या.

--मनोबा

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

भयंकर विमान दुर्घटनेतून ब्लॅक बॉक्स वाचत असेल, तर संपूर्ण विमान त्याच धातूचं का नाही बनवत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile हाहाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'ऐसी'वर प्रतिसाद देऊन मिपाची ब्यांडविड्थ खाउया! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी की तैसी करायचा विचार है की कै Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्हालाही असे अचाट प्रश्न असतील तर अवश्य मांडा. मिपाची ब्यांडविड्थ फुल्ल टू वापरुन घेउया.

ऐसीवर मिपाची ब्यांडविड्थ? हे अचाटच आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वसंपादन काढून टाका रे! मनोबाचा निषेध, मला खोटं पाडण्याचा 'अश्लाघ्य' (म्हणजे काय?, असोच) प्रयत्न केल्याबद्दल निषेध!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अश्लाघ्य : 2 Base, mean, censurable .असो. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> मला पडलेले काही प्रश्न
प्रश्न उभे कसे राहू शकतात किंवा पडू कसे शकतात? तसेही पडेल प्रश्नांची उत्तरे देण्यात काय अर्थ? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१)पिउन गाडी चालवायला मनाइ आहे अस म्हणताय, मग बीअर बारला पार्कंग स्लॉट कशाला ठेवलेत?

फक्त चकना खाणार्‍यांसाठी Wink

२)जगातलं पहिलं घड्याळ जेव्हा बनवलं तेव्हा नक्की किती वाजले होते?

दुपारचे बारा (जेव्हा सावली कमीत कमी तेव्हा सूर्य डोक्यावर तेव्हा दुपारचे बारा वाजले असे समजले गेले असावे. कारण सध्याच्या घड्याळांआधी सौरघड्याळे होती)

म्हणजे सर्वात पहिला "वेळ" कुणी पाहिलाय?

प्रत्येकाची पहिली वेळ ही येतेच Wink

जगातील सर्वप्रथम जोडप्याला पुनरुत्पादनाबद्दल कुणी सांगितलं?

हे सांगांव थोडंच लागतं? ते नॅचरल इन्स्टिक्ट आहे. असो.

६)जगातील सर्वच देश कर्जात आहेत(गंमत करत नाहिये, अमेरिका सुद्ध कर्जात आहे.) तर सर्व पैसा जातो कुठे?

कर्ज देण्यात

७)"डॉग फूड" बनवलं जातं तेव्हा त्याचं "टेस्टंग" कोण करतं?

डॉग्स

८)अंधाराची गती प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक आहे काय?

अंधार असतो, तिथे प्रकाश येतो. त्यामुळे अंधाराला गतीच नाही. तो अनादी अनंत आहे. Wink

९)कॉपी राइट चिन्हाचं कॉपीराइट कुणाकडं आहे?

माझ्याकडे नाही

१०)कोर्‍या कागदाची झेरॉक्स काढली तर काय होइल?

कोर्‍याकागदाची झेरॉक्स नावाची कंपनी? माहित नाही ब्वॉ!

११) खर तर कुत्री नुसतीच बसुन खाताना सगळीकडं दिसत असली तरी "कुत्र्यासारखं राबवलं जातय" अशी ओरड का होते?

वार्‍याशी स्पर्शा करत सावज पकडणार्‍या शिकारी कुत्र्यांनी नुसतं एकाजागी बसून खाणं हेच तर राबवलं जाणं आहे नाही का? Wink

१२)कॅल्क्युलेटर आणि फोन मधल्या बटनांचा क्रम नेमका उलट का असतो?

चोप्य्-पस्ते एरर

१३)माशांना तहान लागल्यावर ते काय करतात?

पाणी पितात

१४)पक्षी झोपेत झाडावरुन खाली पडत कसे नाहित?

पंख काय उगाच दिलेत का?

१७)स्मृती भ्रंश झालेल्या माणसाची स्मृती परत आल्यास त्याला "आपली स्मृती गेली होती "हे आठवत का? नसेल तर त्याची स्मृती परत आली असं कसं म्हणायचं?

उत्तर आठवलं की सांगतो

१८)ध्वनीच्या वेगानं जाणार्‍या वाहनात तुम्ही रेडिओ कसा काय ऐकु शकता?

कानाने

१९)माझ्या जमिनीच्या मालकीत खालपर्यंत्,जमिनीच्या गाभ्यापर्यंत खोद्काम मी केलं तर चालेल का?

कोल-गेट कोल-गेट.. अजून एक फुकट स्लॉट

२१)झोपेत मेलेल्या माणसाला आपण मेलोय किंवा मरत आहोत हे कधी कळतं ?

जाग आल्यावर Wink

२२) हार्ट ट्रांन्सप्लांट प्रमाणे उद्या ब्रेन ट्रांन्सप्लांट किंवा स्मृती ट्रांन्सप्लांट होत असेल

कशाला उद्याची बात..? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!


९)कॉपी राइट चिन्हाचं कॉपीराइट कुणाकडं आहे?

माझ्याकडे नाही

"माझ्याकडे नाही" ही व्यक्ती किंवा संस्था गुगलून तरी सापदाली नाही. कुठे मिळेल ? Wink
.
उत्तर आठवलं की सांगतो

हाय क्लास
.
२१)झोपेत मेलेल्या माणसाला आपण मेलोय किंवा मरत आहोत हे कधी कळतं ?

जाग आल्यावर
मग तो पुन्हा झोपु शकतो का? की पुन्ह अमरु ह्या धास्तीने त्याची मृत्युपश्चात झोप हराम होते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

"माझ्याकडे नाही" ही व्यक्ती किंवा संस्था गुगलून तरी सापदाली नाही. कुठे मिळेल?

माझ्याकडे नाही Wink

मग तो पुन्हा झोपु शकतो का? की पुन्ह अमरु ह्या धास्तीने त्याची मृत्युपश्चात झोप हराम होते?

अनुभव घेतल्यावर इथेच येऊन टंकेन! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छ्या... बारमधुन सगळे टुन्न होउनच बाहेर पडतात असं का वाटतं लोकांना... एकदा मी आणि माझी मैत्रिण रविवारी सकाळी सकाळी ११ वाजता चायनीज नुडल्स खाउन बार मधुन बाहेर पडलेलो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नुडल्स खाल्ल्यात हे ठीक.
प्यायला काय होतं? निव्वळ पाणीच की कोल्दृंक वगैरे की अजून काही ? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नूडल बार, कॉफी बार (नेदरलंड्समधे याचा अर्थ वेगळाच होतो) असेही बार असतात. काही व्हेक्टर्सही बार घेऊन येतात. मँचेस्टर विद्यापीठात खगोलशास्त्र आणि गणित विभागाच्या इमारतीत एक 'एरर बार'ही आहे. शेवटी ज्याची त्याची समज, जाण हेच खरं; नाही का मनोबा? Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मँचेस्टर विद्यापीठात खगोलशास्त्र आणि गणित विभागाच्या इमारतीत एक 'एरर बार'ही आहे.

अशा मोठ्या 'एरर बार'च्या आतमध्ये एक छोटंसं 'डेटा पॉइंट' नावाचं रेस्टॉरंट असलं तर मजा येईल.

आमच्याइथे 'सुशी बार' देखील असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्यायला बरचं काही होतं.. पण आमचा उद्देश नॉनवेज ब्रंच होता आणि बर्याचदा नॉनवेज जिथे मिळतं तिथे बार असतोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१९)माझ्या जमिनीच्या मालकीत खालपर्यंत्,जमिनीच्या गाभ्यापर्यंत खोद्काम मी केलं तर चालेल का?

यावर मला पडलेले प्रश्नः
१. 'माझ्या मालकीच्या जमीनीत' असं म्हणायचं आहे का तुम्हाला?
२. जमिनीच्या गाभ्यापर्यंत म्हणजे नक्की कुठपर्यंत?
३. तुमच्या हातात कुदळ वा तत्सम हत्यार दिले तर कितपत खोल खड्डा पाडण्याची 'फिजिकल' कप्याशिटी हाय तुम्ची? Wink
४. हे वाक्य 'माझ्या जमिनीच्या मालकीत' असेच सगळीकडे असतानाही, मला पडलेले हे सगळे प्रश्न इतर कुणालाच का पडले नाहीत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

७)"डॉग फूड" बनवलं जातं तेव्हा त्याचं "टेस्टंग" कोण करतं?

माझे काही इंग्रज मित्र एखादी व्यक्ती, गोष्ट इ. फारच झकास असेल तर स्ल्यांगमधे he (/it) is the dog (the dog च्या जागी a dog पण चालतं.) असं म्हणत याची आठवण झाली. असा वाक्प्रयोग माझ्या बाबतीत करतानामात्र एकाने dog या शब्दाचा लिंगबदल केला आणि भरपूर हशा मिळवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्यांच्यात झोपेत उडतात..

५)आधी अंडे की आधी कोंबडी ? जगातील सर्वप्रथम जोडप्याला पुनरुत्पादनाबद्दल कुणी सांगितलं?
--ब्रेकफास्ट्ला विचारत आहात का डिनर ला त्यावर अवलंबून आहे.
--तेव्हा ईंटरनेट किंवा टी..व्ही नव्हता त्यामुळे दुसरा टाईमपास नव्हता. (यापेक्षा योग्य उत्तर सापडलं होतं पण अश्लील वाटेल. बाळाला प्लगपॉईंट मधे पिन घालायला कोण शिकवतं? )

८)अंधाराची गती प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक आहे काय?
-- दोघेही सारखेच पळतात पण प्रकाश जरा जास्तच शायनिंग मारतो.

१३)माशांना तहान लागल्यावर ते काय करतात?
-- विहीर खणत असतील.

१)पिउन गाडी चालवायला मनाइ आहे अस म्हणताय, मग बीअर बारला पार्कंग स्लॉट कशाला ठेवलेत?
--मग बारगर्ल्स कुठे गाडी पार्क करणार?

१९)माझ्या जमिनीच्या मालकीत खालपर्यंत्,जमिनीच्या गाभ्यापर्यंत खोद्काम मी केलं तर चालेल का?
--हो. पण त्याच्यापुढे एक मिमि. पण नाही.. कारण तिथून माझी जमीन स्टार्ट होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनचे प्रश्न वाचून प्रचंड हसते आहे.

खर तर कुत्री नुसतीच बसुन खाताना सगळीकडं दिसत असली तरी "कुत्र्यासारखं राबवलं जातय" अशी ओरड का होते?

ROFL ROFL हा तर खलास!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ध्वनीच्या वेगानं जाणार्‍या वाहनात तुम्ही रेडिओ कसा काय ऐकु शकता?

हे आहे का खरच?

रच्याकने, मला यातले काही प्रश्न ढकलपत्रात आले होते. मनोबाला पडलेले प्रश्न बरेच पापिलर झालेले बहुदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हा प्रश्न खरोखरच पडला आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हो.
नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मनोबांना प्रश्न पडले तेव्हा या संस्थळावर मी सदस्य नव्हतो त्यामुळे तेव्हा उत्तरे दिली नाहीत ... आता थोड्याफार प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करतो -

पिउन गाडी चालवायला मनाइ आहे अस म्हणताय, मग बीअर बारला पार्कंग स्लॉट कशाला ठेवलेत?

पिउन गाडी चालवायला मनाई आहे पिण्यासाठी येताना गाडी चालवत यायला प्रत्यवाय नाही. तेव्हा बीअर प्यायला येताना आणलेली गाडी पार्क करायला बीअर बारला पार्कंग स्लॉट ठेवलेत.

जगातलं पहिलं घड्याळ जेव्हा बनवलं तेव्हा नक्की किती वाजले होते?
म्हणजे सर्वात पहिला "वेळ" कुणी पाहिलाय?

सर्वात पहिला "वेळ" बी. आर. चोप्रानी पाहिला असावा .. आठवतयं का त्यांच्या महाभारतात एक "समय" आपल्याशी बोलायचा ते ..?

जर नियम मोडल्यावर दंड भरावा लागत असेल(आणि तेव्हढच करुन सुट्णार असु, तर ) दंड म्हणजे नियम मोडाण्यची फी नव्हे काय?
Tax is fine to be correct, fine is the TAx to be wrong!!

दंड म्हणजे नियम मोडताना आपल्याला कोणीतरी बघितलं त्याची पोचपावती .. नियम मोडण्याची फी नव्हे .

आपण "पायामध्ये बूट" घालता, की बूटमध्ये पाय घालता?
नक्की काय करता? जे करता तसं का म्हणत नाही?

आम्ही चपला वापरतो तस्मात चप्पलेत पाय सरकवतो आणि तसेच म्हणतो ...

तुम्ही अंगात शर्ट घालता की शर्टात अंग घालता?

अंगावर शर्ट चढवतो ...

आधी अंडे की आधी कोंबडी ? जगातील सर्वप्रथम जोडप्याला पुनरुत्पादनाबद्दल कुणी सांगितलं?

जगातील सर्वप्रथम जोडप्याला पुनरुत्पादनाबद्दल कुणीच सांगितलं नाही ... त्यांनीच सर्वांना सांगितलं .. आधी केले मग सांगितले ..

जगातील सर्वच देश कर्जात आहेत(गंमत करत नाहिये, अमेरिका सुद्ध कर्जात आहे.) तर सर्व पैसा जातो कुठे?

बारामतकरांना विचारा .. ते कर्जात नाहीत ...

"डॉग फूड" बनवलं जातं तेव्हा त्याचं "टेस्टंग" कोण करतं?

"डॉग फूडला टेस्ट असते ? कसं लागतं ??

अंधाराची गती प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक आहे काय?

रात्री अंधाराची गती जास्त असावी आणि दिवसा प्रकाशाचा वेग .. म्ह्णून रात्री अंधार असतो आणि दिवसा प्रकाश ..

कॉपी राइट चिन्हाचं कॉपीराइट कुणाकडं आहे?

अमेरिकेकडे असावं ...

कोर्‍या कागदाची झेरॉक्स काढली तर काय होइल?

स्वच्छ झेरॉक्स येईल

खर तर कुत्री नुसतीच बसुन खाताना सगळीकडं दिसत असली तरी "कुत्र्यासारखं राबवलं जातय" अशी ओरड का होते?

नुसतं बसून खायला पण खूप कष्ट पडतात म्हणून असेल कदाचित ..

कॅल्क्युलेटर आणि फोन मधल्या बटनांचा क्रम नेमका उलट का असतो?

चौकशी करून सांगतो ..

माशांना तहान लागल्यावर ते काय करतात?

पाणी पितात .. तुम्हालापण स्विमींग पूल मधे असताना पाणी पिता येईल ..ट्राय करा कधीतरी ..

पक्षी झोपेत झाडावरुन खाली पडत कसे नाहित?

फांद्यांना धरून झोपत असावेत ..

कॉर्न ऑइल मक्यापासुन, ,वेजिटेबल ओइल वनस्पतींपासुन मग "बेबि ऑइल" कशापासुन बनतं?

बेबी मका (बेबी कॉर्न) किंवा बेबी वेजिटेबल पासून ...

स्मृती भ्रंश झालेल्या माणसाची स्मृती परत आल्यास त्याला "आपली स्मृती गेली होती "हे आठवत का? नसेल तर त्याची स्मृती परत आली असं कसं म्हणायचं?

गेलेली स्मृती परत येते .. "आपली स्मृती गेली होती" हे विसरतचं नाही तर आठवणार कसं ? (पहा : हिंदी चित्रपटात स्मृती परत आलेला हिरो / हिरॉईन मुझे पुराना सब याद आ रहा है .. मुझे सब याद आ रहा है" असं म्हणते ..)

ध्वनीच्या वेगानं जाणार्‍या वाहनात तुम्ही रेडिओ कसा काय ऐकु शकता?

कानाने ..

माझ्या जमिनीच्या मालकीत खालपर्यंत्,जमिनीच्या गाभ्यापर्यंत खोद्काम मी केलं तर चालेल का?

कुणाला ? तुमच्या मालकीची जमीन .. तुम्ही खणणार .. कुणाला चालायचा प्रश्नचं येतो कुठे ? फक्त खणत खणत गाभ्याच्या पलिकडच्या बाजूस माझ्या मालकीची जमीन आहे त्यात खोदू नका .. ते नाही चालायचं .

प्रेमात पडालेला प्रेमी जेव्हा अशी प्रतिज्ञा करतो की "ये कसम खाये हम हर कसम तोड दे"..ही प्रतिज्ञा त्यानं पाळाअवी का? ती पाळणं म्हणजेच ती मोडणं नव्हे काय?

प्रेमात पडलो की सांगू ..

झोपेत मेलेल्या माणसाला आपण मेलोय किंवा मरत आहोत हे कधी कळतं ?

मेल्यानंतर .. झोपेत असा किंवा जागे असा .. मेलोय हे मेल्याशिवाय कसं कळेल ?

हार्ट ट्रांन्सप्लांट प्रमाणे उद्या ब्रेन ट्रांन्सप्लांट किंवा स्मृती ट्रांन्सप्लांट होत असेल माणसाची आयडेंटिटि कुठली? ज्याची स्मृती ट्रांन्सप्लांट करण्यात आली आहे त्याचाच गत भूतकाळ त्याला आठवत राहील, स्वतःचा नाही. मग त्यानं आयुष्य कुणाचं म्हणुन जगायचं?
स्मृतीचं की त्याच्या खर्‍या खुर्‍या भूतकाळाशी निगडित?

आयडेंटिटि चेहर्‍यावर ठरते म्हणूनच आयडेंटिटि कार्ड वर फोटो असतो तुम्हाला काय आठवतयं त्याचा उल्लेख नाही. त्यामुळे अशा माणसानी त्याचं आयुष्य त्याचं म्ह्णून जगावं ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

ऑल मोषन इज रिलेटिव्ह- आइनिष्टाइन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

परवा मला वादळाचं स्वप्न पडलेलं अन मी स्वप्नात पडदा ओढला. तो पडदा, त्याचा दांडा बरोब्बर डावीकडे होता हे ज्ञान मला कसे झाले?
.
खरच हा प्रश्न पडलेला परवा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...