(धडपड)

"ए हळू रे!"

"काय हळू? अशीच मजा येते!" (तुला पण येतेय ना टवळे? मग उगीच पिरपिर कशाला?)

"म्हणून काय इतकं फास्ट? (उद्या पाठ चेपून दे म्हणून माझ्याच मागे लागशील!)

"नाही तर काय? हे जेटयुग आहे म्याडम! (आणि उरकून मला म्याच बघायची आहे. तुझं काय, पडशील घोरत नेहमीसारखी!)

"जेटयुग असलं तरी तू मात्र बैल आहेस हे नक्की!" (घोडा म्हणायला पाहिजे होतं का? स्टड म्हणजे.. पण बैलही चालेल. तो कुठलासा मराठी सिनेमा आहे ना...)

"आणि तू माझी गाय" (बापरे! 'गर्ल' म्हणायला पाहिजे होतं हिला भलतीच शंका यायची...)

"पुरे! जास्त चावटपणा नको, नाही तर चिमटे घेईन मागून!" (ढेरी बघ आता मागून पण दिसायला लागलीय तुझी.. तरी स्वतःच सगळं करायची हौस काही जात नाही. वय झालं आपलं आता राजे...)

"ब्वॉर्र! राह्यलं! पण जरा अजून जवळ सरक ना. घट्ट पकडून बस ना." (मलाच किती जोर लावायला लागतोय. तुम्ही बायका च्यायला एकूण थंडच...)

"नक्को... आधीच तू सारखे दणके मारतो आहेस ते काय कळत नाहीये का मला?" (आता नक्की वोलिनीची ट्यूब शोधून ठेवायला लागणार मला...)

"हा हा हा"

"जरा हळू रे... खूप स्पीड वाढवला आहेस... मला भिती वाटतेय... (हुश्श! संपत आलं वाटतं एकदाचं...)

"काही नाही होत गं... माझा कंट्रोल................. आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ"

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

"बघ तरी तुला सांगत होते... हळू, हळू म्हणून." (आणि सगळं स्वतः करायची काय गरज होती?)

"हो गं! ओव्हरकॉन्फिडन्समधे गेलो मी."

"आता समजून काय उपयोग! त्या दिवशी समजलं असतं तर पेस्ट कंट्रोलवाल्यांना बोलवून एकाच दिवशी सगळीकडे औषध फवारुन घेतलं असतं. पण तुझी हौस! म्हणे घरच्या घरी हातपंपाने औषध मारु. बादलीतली पाईप धरुन माझे हात सोलवटले आणि तू बस आता आठवडाभर पाठ धरुन..."

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

ROFL ROFL
मस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संजोप कोंडके Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हा इथला मज पुरे फवारा? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठ्ठो!
__/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'एक चावट संध्याकाळ' डोसक्यात भिनलेली दिसत्ये.
बैलावरचा सिनेमा म्हणजे वळू का?
बायकोला गाय म्हणण्यातला धोका कळ्ला.
पण काऊ म्हट्लं तर आपण चिमणराव ठरतो.
बाकी विनोद चांगला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

धडपडीमागची धडधड जाणवली. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

'बेटी' विषयासाठी केलेल्या धडपडीचा ताण रावांच्या धडपडी जोडप्याची करामत वाचून वार्‍यासारखा नाहीसा झाला.

लगे रहो !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतकी धडपड करावी लागते तुम्हाला?
कठीण आहे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

ओरिजिनल लिखाण वाचले तेंव्हाच त्यावर असे कोणीतरी लिहिणार हे जाणवले होते. पण ते कोणीतरी म्हणजे संजोपराव ? हे नव्हतं वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रेरणा वाचता वाचताच "यावर असे एखादे विडंबन करावे असे वाटले होते".. पण धीर झाला नाही...( बरेच झाले.. असे जमलेही नसते)
गद्य विडंबन उत्तम जमले आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा !
मस्त चटपटीत चुटका !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0