(गेले कालचे राहून)

सन्जोप रावांचा राहून गेलेल्या गोष्टी हा लेख वाचून मनात अनेक तरंग उमटले. प्रत्येकानेच काहीतरी मोठ्ठ्या मोठ्ठ्या गोष्टी राहून गेल्याची तक्रार केली होती. कोणी म्हटलं शेती, कोणी म्हटलं गांजा, कोणी म्हटलं काय न् काय.... पण आयुष्य हे असं मोठ्या गोष्टींचं नसतं. अनेक छोट्या छोट्या घटनांनी ते भरलेलं असतं. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून लोक कुठल्यातरी भलत्या ध्येयाकडे हे राहिलं, ते राहिलं करत रडतात. माझ्या मते रोजच्या जीवनात रोज घडणाऱ्या गोष्टींतच राहून जाणाऱ्या गोष्टी खूप असतात. म्हणून जीवनाचा दृष्टीकोन कसा दहा वर्षांपूर्वीकडे बघण्याऐवजी काल-आज-उद्या कडे मर्यादित असायला हवा. यालाच लिव्हिंग इन द मोमेंट वगैरे म्हणतात.

मूळ कविता

गेले कालचे राहून, माझे घासायचे दात
नाही फिरला केसांत माझ्या कंगव्याचा हात

कालपासून कशी ती, नाही झालीच आंघोळ
उन्हाळ्याच्या दिवसात अंगाअंगाला घामोळं

विसरलो टाकायला बनियन मी धुण्यात
कालचाच उष्णगंध धुमसतो या रंध्रांत

आता बसमध्ये जागा, मिळे ऐसपैस सारी
पाणी टंचाई ना जाचे, वाढे जिण्याची खुमारी

field_vote: 
3.2
Your rating: None Average: 3.2 (5 votes)

प्रतिक्रिया

नाकाला चाप लावायचा स्मायली अ‍ॅड करायला हवा! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गेले कालचे राहून, माझे बोलायचे शब्द
नाही उरलीही शुद्ध, आली भयंकर पेंग

... अशा अर्थाचं विडंबन पाडण्याची इच्छा आवरली आहे. कोण साला बसमधे चढला होता, धड विचारही करता येईना!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गेले कधीचे राहून
माझे धुवायाचे मोजे
जवळ माझ्या बसायाला
सारी जनता लाजे
नाही वर्ज्य मला
साधे कांदा लसूण
आळसामुळे साठे
दातांवर कीटण
होता खांद्यावरुन ओणवे
का करिती लोक बंड
जवळ घेताक्षणी
तीही फिरवी तोंड |

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा... आळशी कुठले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जमलेल नाही
याच्यापेक्षाही अधीक खुमासदार करता आलं असतं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

सॉक्स अन बूट दोघेही रूममधे आल्या आल्या काढून बादली खाली झाकून ठेवले जात.
अन्यथा २ किंवा ३ पार्टनर्स असलेल्या रूमचा ग्यास चेंबर होत असे.
ते आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मस्त आहे. Smile पण शेवट सुरवातीला येऊन मिळायला हवा होता वर्जिनल काव्याप्रमाणे असं उगाच वाटलं.

पण तुमच्या विडंबनावर पु.लंच्या विडंबनाचा शैलीचा प्रभाव जाणवतो.
एक प्रयत्न -
गेले द्यायचे राहून तुझे लेखाचे देणे
माझ्यापास आता थोड्या श्रेण्या आणि बरेच प्रतिसाद.
.......
आता कळफलक घेतो कण्हत हाताला,
होतात श्रेण्या निरर्थक आणि प्रतिसाद अवांतर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता नि प्रतिसाद दोन्ही सुंदर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0