बारीक लोकरीची "सॅम्प्लर" शाल

विक्टोरियन काळातल्या एका शालच्या पॅटर्नवरून केलेली लोकरीची शाल -

याला 'सॅम्प्लर शाल' म्हणतात. एकाच विणीची संपूर्ण शाल न करता प्रत्येक २०-३० ओळींवर वीण बदलून, वेगवेगळ्या विणी 'सॅम्प्लल' करायला मिळतात, म्हणून असं नाव. लेस च्या साध्या विणी सहसा ४-६ ओळींच्या असतात, पण नक्षीदार विणी २० किंवा अधिक ओळींच्याही असतात. काही विणी फक्त सुलट बाजूला वेगवेगळे टाके वापरतात; उलट बाजू ही विसाव्याची असते, फक्त साध्या उलट्या टाक्यांची. पण काही किचकट विणींना दोन्ही बाजूला निराळे टाके घातले जातात. एखादी वीण पाठ झाली की लेस विणायची लय हातात बसते, आणि त्यातला संथ आनंद जाणवतो. हातांच्या नाजूक हालचालींतून लोकरीचे जाळे हळूहळू तयार होते. ती लय बसेस्तोवर मात्र चांगलेच टेन्शन असते, कारण चूक झाल्यास लेसचे सैल, भोकदार टाके उसवणे ही भयंकर डोकेदुखी असते. अगदीच सोपी वीण असली, किंवा एकच वीण सलग शालभर असली तर कधीकधी वैतागही येतो. सॅम्प्लर शाल पॅटर्न्स करताना कंटाळा येण्याचा प्रश्न नाही, कारण वीणीची लय बसल्याबसल्याच दुसरी समोर येते. पण ही शाल टी-वी बघत बघत मात्र विणता येत नाही! प्रत्येक वीण झाल्यावर साध्या उलट ओळीवर मग एक वेगळ्या रंगाचा धागा तात्पुरता ओवला जातो - त्याला विणकरांच्या 'जार्गन' मध्ये 'लाइफलाइन' म्हणतात. म्हणजे काही चुकले, किंवा टाके निसटून सगळे उसवायला लागले, तर त्या लाइफलाइन पलीकडे उसवावे लागत नाही, सगळी शाल नष्ट होत नाही.

विक्टोरियन काळात अशा काटकोन चौकोनी शालींपेक्षा त्रिकोणी शाली जास्त लोकप्रिय होत्या - पण अशा काही सुंदर काटकोनी नमुन्यांना आधुनिक ट्विस्ट देऊन त्यांना पुन्हा विणकरांसमोर जेन सॉवर्बी या ब्रिटिश डिजाइनरने अलिकडे विक्टोरियन लेस टुडे या पुस्तकाद्वारे आणले - त्याच पुस्तकातली ही सॅम्प्लर शाल आहे.

विणलेल्या लेस मध्ये एक जादू असते - विणून झाल्यावर, सुयांवरून उतरवल्यावर ती अगदीच कशीबशी, चुरगाळलेली दिसते.

मग पाण्यात वीस-एक मिनिटं चांगली भिजवून तिला जमिनीवर ठेवून, तिला सगळीकडून छान खेचून, पिना लावून "ब्लॉक" करून वाळवावी लागते. तशा अवस्थेत विणताना वाकडे पडलेले टाके नीटनेटके होतात. आणि चुरगाळलेल्या विणी छान उठून दिसतात, शालीला पूर्ण आकार येतो. (अ‍ॅक्रिलिक सारख्या कृत्रिम लोकरीपेक्षा नैसर्गिक लोकर - बकरीच्या केसांची - या साठी अधिक योग्य असते, कारण भिजल्यावर छान सैल होऊन अधिक ताणता येते)

कितीही शाली विणल्या, लेस विणली तरी ही जादू पाहण्यासारखी असते. शंभर-एक पिना टोचण्याची चिडचिड त्या पुन्हा काढल्याकी लगेच नाहिशी होते!

कलकत्त्यात फारसा हिवाळा नसतो, पण तरी या खर्‍या लोकरीच्या जाळीदार शाली कमालीच्या उबदार असतात. आज संध्याकाळी नाटकाला घेऊन जाणार आहे - नाटकगृहातल्या ए-सीत या शालीचा नक्की छान उपयोग होईल.

संपादकांकडून सुचना: काही ब्राऊझर व्हर्जन्सवर फोटो व्यवस्थित दिसण्यासाठी फोटो टाकतेवेळी तयार झालेल्या HTML कोडमधून width="" height="" टॅग काढून टाकावे लागतात किंवा योग्य ती छायाचित्रांची लांबी रूंदी द्यावी लागते याची नोंद सर्व सदस्यांनी घ्यावी. वरील लेखातील छायाचित्रांचे टॅग सुधारले आहेत

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

सही! मस्तच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शालीचा रंग आणि विविध विणी एकत्र करून झालेला आकृतीबंध हे दोन्ही सुरेख आहेत. मला भरतकामाखेरीज तशी दुसरी 'कामं' फारशी आवडत नाहीत, पण ही शाल आणि तुम्ही दिलेल्या दुव्यावरील इतर शाली पाहून विणकाम शिकावंसं वाटलं.

छायाचित्रांपैकी पहिले सर्वाधिक आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

अहा! आकृतीबंध आणि फ्रेश लाल रंग आवडला.. शेवटचे छायाचित्रही आवडले

दोन सुयांचे विणकाम करायचा बराच अयशस्वी प्रयत्न केला आहे. त्या केलेल्या झटापटीचीही आठवण झाली Wink

मात्र, त्यामनाने क्रोशाचे विणकाम सवयीने बरेच सोपे जाते पण इतके जाळीदार आणि मनमोहक आकृतीबंध साधणे अजून फारसे जमलेले नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

विणकाम फार आवडले! सादरीकरणही छान झाले आहे. विणकामात वापरल्या जाणार्‍या संज्ञांबाबत मी अनभिज्ञ असल्याने (उलटे/सुलटे) अनेक गोष्टी कळल्या नाहीत. पण एकूण किती 'गुन्तागुन्तीचे' काम आहे हे चाङ्गलेच जाणवले. तुम्ही दिलेल्या दुव्यावर एकाहून एक सरस आकृतीबन्ध आहेत. सुन्दर ! धन्यवाद.
(इतकी जाळी असून या फारच उबदार असतात, हे वाचून आश्चर्य वाटले.)
एक प्रश्न : वेगळ्या रङ्गाचा धागा आणि त्याचा आकृतीबन्ध हा चालू विणकामात आणायचा असेल, तर काम फारच क्लिष्ट होते का हो ? तुम्ही दिलेल्या दुव्यावर एक दोनच उदाहरणे सापडली म्हणून प्रश्न.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फार सुंदर आणि नाजूक झालं आहे विणकाम.
मलाही खूप आवड आहे ... पण अख्खी शाल विणण्याचा पेशन्स.... तो कुठून बरं आणायचा...?? Wink Smile

रोचना, पुढील विणकामासाठी शुभेच्छा!! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शाल आवडली - रंग आणि विणकाम दोन्ही. एकदम थंडीच्या दिवसांची आठवण आली.
अवांतरः नाट्यगृहातल्या एसीत तुमचा थंडीपासून बचाव नक्की होईल आणि अंधारात शालीचा इतरांच्या नजरेपासून! पण खरं तर तिच्यावर अनेक नजरा पडायला हव्यात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळ्यांचे मनापासून आभार!
राधिका, विणकाम शिकायचे ठरवलेस तर मला नक्की सांग - आजकाल जालावरच्या विडियो वरून खूपच सोपं झालंय. मी या बाबतीत बर्‍यापैकी "पुशर" असल्यासारखी आहे! Smile मला भरतकाम ही आवडतं, पण अलिकडे फारसं केलं नाही.
ऋ, क्रोशाचा एखादा नमुना पाहायला आवडेल! मला क्रोशा येतं पण तेवढं चांगलं जमत नाही.
अमुकः सहसा लेसच्या शाली एकाच रंगाच्या लोकरीच्या असतात, फारतर बॉर्डर वर कधीकधी वेगळा रंग दिला जातो. लेस मध्ये (म्हणजे अगदीच बारीक लोकरीच्या जाळीदार विणीत) दुसर्‍या रंगाचा धागा व्यवस्थित गोवणे कठीणच असते, पण स्वेटर, मोजे, हातमोजे इत्यादीत तेवढे क्लिष्ट नसते. या आकृतींमध्ये दोन धाग्यांच्या विणीमुळे कापड जास्त दाट होऊन उबदार होते.
चिऊ - मला ही शाल पूर्ण करायला चार वर्ष लागली! अर्थात मध्ये बरेच व्यत्यय आले, महिनोन्महिने वाइट उकाड्यामुळे तशीच पडून राहिली, पण तरी फारच लांबली. पण मला लहानपणापासूनच विणकामाचा नशा असल्यासारखाच आहे. सध्या अजून एक लाल शाल सुयांवर आहे, तिला किती वर्षं लागतील बघू!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'शाल सुयांवर आहे'

Apt & Amusing Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सुंदर नाजूक काम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय सुंदर दिसते आहे शाल.

आणि पहिल्या फोटोतलं स्टूल एकदम जुनं असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स्टूल जुनं नाहीये! ७-८ वर्षांपूर्वीच घेतलं होतं. पण एकदा स्वच्छ करताना आडव धरलं आणि त्यावरची जाड काच मात्र फुटली. तेव्हा पासून तसेच उघडे पडले आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी नाटक कोणतं आणि कसं होतं हेही ऐकायला आवडेल Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नाटक मस्त होतं! मोहित चट्टोपाध्याय यांचं शेवटचं नाटक, "तथागत" पहायला गेलो. गौतम बुद्धाच्या जीवनावर आधारित, 'ऐतिहासिक' स्वरूपाचे होतं (म्हणजे वेशभूषा, सेट वगैरे सगळे). बुद्धाच्या जीवनातील दोन घटनांभवती नाटक बेतलं होतं - बुद्ध झाल्यावर तो पहिल्यांदा कपिलवस्तुला परतून घेतलेली यशोधराची भेट, आणि म्हातारपणी देवदत्त बरोबर संघाच्या आयोजनावरून झालेला वाद. मधे अनेक गोष्टी होत्या - अंगुलीमाल आणि जीवक, बिंबिसार वगैरेंबरोबर झालेले संवाद, आणि नंतर अजातशत्रु चे परिवर्तन.
तसे 'नवीन' असे काहीच नाही, पण मांडणी, अभिनय, आणि बुद्ध - यशोधरा - बिंबिसार - देवदत्त - अजातशत्रु यांच्या संवादातून राजकीय सत्तेची चर्चा फारच रोचक होती. बुद्धाने त्याच्या प्रसारासाठी हातात असलेल्या राजकीय सत्तेचा त्याग करून संघाचा निर्माण का केला, त्याचे फायदे-तोटे काय होते यावर चर्चा बेतली होती. (अजातशत्रु च्या सीन्स मध्ये मगध राज्याचे (आणि आजच्या भारताचे) सिंह-चक्र होते - त्या काळचे मगधच नाही तर आजच्या राष्ट्रातही सत्तेची भूक आणि पॅरानॉया जोरात आहे असे दाखवायचा त्या मागचा उद्देश्य होता असे वाटल्यावाचून राहिले नाही!) थोडीशी नृत्य-नाट्यच्या शैलीची होती - बुद्धाच्या ज्ञानोदयाच्या वेळी त्याच्या मनातील विचारांच्या द्वंद्वाची, तामसिक विचारांची फार सुरेख मांडणी केली होती. एकूण, तीन तासांचे, अवघड संस्कृतोत्पन्न बंगालीत असूनही नाटक बोजड वाटले नाही. फक्त शेवटी, गौतमाच्या परिनिर्वाणाच्या सीनमध्ये थोडासा मेलोड्रामा होता, तो फारसा भावला नाही.
खूप दिवसांनी चांगले नाटक पहायला मिळाले! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे वा! अश्या विषयांवर म्हणण्यापेक्षा अश्या पद्धतीची (पिरिएड + धार्मिक/पौराणिक) पद्धतीची नाटके मराठी रंगभुमीवर (दशावतारी सोडल्यास) फारसे होताना दिसत नाहीत.
बंगाली नाट्यचळवळ (बंगालात केवळ घटना न घडता थेट चळवळ संबोधलं जावं.. बंगाली लोकआंना आवडतं .. असा माझ्या एका बंगाली मैत्रीणीचा सल्ला लक्षात घेऊन हा शब्दप्रयोग Wink ) मराट्।ई रंगभुमीपेक्षा अधिक प्रयोगशील आहे असे ऐकून आहे.

त्याबद्दल वेगळ्या लेखात विस्ताराने वाचायला आवडेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जेन ऑस्टेनच्या नायिकांची आठवण झाली. (किंवा 'हॉवर्डस एंड'मधल्या रसिक श्लेगेल भगिनी अशी 'रेट्रो' फॅशन करत असतील का, असा प्रश्न मनात डोकावून गेला.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

फुल डिस्क्लोजरः या शालीचा बराच भाग जेन ऑस्टेन च्या कादंबर्‍यांवर आधारित सीरियल व सिनेमे पाहताना विणला गेला...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किती सुरेख झाली आहे शाल रोचना! इतकं नाजूक काम आणि त्यातला सफाईदारपणा अगदी कौतुक करण्यासारखा आहे. बारीक लोकरीचं विणकाम जरा जास्त क्लिष्ट असतं का? म्हणजे लोकर जास्त ताणली जात असेल तर त्यामुळे विणीतला ताण सारखा ठेवायला जास्त कौशल्य लागतं का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थँक्स, रुची!
बारीक लोकरीचं काम वीण सारखी बदलते म्हणून क्लिष्ट असतं, पण खरंतर ताण सारखं ठेवणं लेस साठी तेवढं महत्त्वाचं नसतं. जाळी उठून दिसावी आणि ताण जास्त पडू नये म्हणून बारीक लोकरी बरोबर जाड सुया वापरल्या जातात. त्यामुळे टाके नीट सुयांवर ठेवण्याची जोखीम घ्यावी लागते, पण एकदा त्याची सवय झाली की खरं खूप सोपं आहे. आणि ब्लॉक करताना ताण व्यवस्थित होतेच. या लोकरीसाठी मी ३.५मि च्या (अमेरिकन नं. ४) सुया वापरल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजून एक लाल रंगाचीच शाल विणून झाली, म्हणून नवीन धागा काढला नाही....
faroese4

या आकाराच्या शालीला फॅरोईज शाल म्हणतात - इंग्लंड जवळील 'फॅरो' द्वीपांची पारंपारिक खासियत असलेली विणकाम शैली. फुलपाखरूच्या आकाराच्या या शालींचा 'मेरुदंड' अन्य पारंपारिक त्रिकोनी शालींपेक्षा रुंद असतो, आणि खांद्यापाशी टाके कमीजास्त करून गोलसर आकार दिलेला असतो. यामुळे खांद्यावरून या शाली घसरत नाहीत, आणि त्यांचे टोकदार 'पंख' काम करताना सहज कमरेत खोचता येतात.

faroese1

faroese3

faroese5

faroese2

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही पण शाल सुंदर आहे. पण शेवटून दुसर्‍या फोटोतल्या शालीचा रंग एवढा वेगळा कसा काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माहित नाही! वेगळ्या खोलीत काढला होता म्हणून प्रकाश वेगळा होता कदाचित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता नीट बघितल्यावर शेवटून तिसर्‍या फोटोतही बर्‍याच छ्टा दिसत आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अहा! ही शालही सुंदर आहे.

वर म्हटल्याप्रमाणे आमची प्रगती क्रोशाच्या सुयांवरच थांबल्याची खंत असं काही पाहिलं की जाणवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अतिशय उत्तम झाल्या आहेत सर्व शाली. पारणे फिटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विशाखा

थँक्स!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0