थालेपारट

वर्णमालेत एकापाठोपाठ एक येणार्‍या 'र' आणि 'ल' अक्षरांच्या उच्चारांत बरंच साम्य आहे. लहान मुलं बोलायला शिकत असताना आपल्या बोबड्या बोलीत अनेकदा 'र' चा 'ल' करतात. बर्‍याचदा प्रौढांच्या 'र'चा उच्चारही 'र' आणि 'ल'च्या मध्ये कुठेतरी होतो. वानगीदाखल ह्या बातमीचे शीर्षक पुन्हा पुन्हा, वेगाने म्हणून पहा. ['र'चा स्पष्ट उच्चार ऐकायचा असेल तर लताबाईंची काही गाणी लक्षपूर्वक ऐकावीत. उदा. जब रात नहीं कटती, सिर्फ एहसास है ये रुह से महसूस करो, प्यार को प्यार ही रेहने दो, रहें ना रहें हम इ.]

ही गत झाली भारतीय भाषांतल्या 'र'च्या उच्चाराची. स्पॅनिशमधला रोलिंग 'र' आणि फ्रेंचमधला गटरल (Guttural) आर हे स्वतंत्र लेखांचे विषय व्हावेत. भौगोलिकदृष्ट्या लगतच्या आणि (व्हल्गर) लॅटिनोद्भव असणार्‍या ह्या दोन भाषांतल्या एकाच अक्षराच्या उच्चारात इतका टोकाचा फरक कसा काय उत्पन्न झाला, हे एक कोडेच आहे.

एकाच भाषेत कालौघात किंवा एखाद्या शब्दाचा एका भाषेतून दुसर्‍या भाषेत प्रवास होत असतानाही हा र-ल बदल घडताना दिसतो. काही वेळा तो उच्चार लोप पावतो; तर काही वेळा उच्चार राहतो पण चक्क अक्षर बदलतं. इंग्रजीतल्या 'कर्नल' (colonel) या शब्दाचं उदाहरण या संदर्भात रोचक ठरावं.

ह्या शब्दाचं मूळ इटालियन. सैन्याची एखादी तुकडी एका रांगेत चालत असताना, त्या रांगेवर - इंग्लिश column, इटालियन colonna - नियंत्रण ठेवणारा अधिकारी तो कोलोनेलो (colonnello). हाच शब्द जेव्हा फ्रेंचमध्ये आला तेव्हा त्यातला 'ल' बदलून 'र' झाला आणि त्याच शब्दाचा फ्रेंच उच्चार 'कोरोनेल'च्या जवळपास जाणारा होऊ लागला. फ्रेंचमधून जे हजारो शब्द इंग्लिशने उचलले, त्यात ह्या 'कोरोनेल'चाही समावेश होता.

तत्पूर्वी एक बाब लक्षात घेतली पाहिजे. जवळजवळ सतराव्या शतकापर्यंत इंग्रजीत एकाच शब्दाची निरनिराळी स्पेलिंग्ज अस्तित्वात असणं, ही अगदी सामान्य बाब होती. दस्तुरखुद्द शेक्सपिअरनेही आपल्या नावाचे स्पेलिंग सध्याच्या प्रचलित Shakespeareप्रमाणे कधीच लिहिलं नाही. १६११ मध्ये प्रसिद्ध झालेलं 'किंग जेम्स बायबल', छपाईतल्या तंत्रातली प्रगती आणि वाढती साक्षरता ह्यासारख्या कारणांमुळे पुढे एका शब्दाचे एक ठरावीक स्पेलिंग नक्की होत गेले. ब्युबॉनिक प्लेगच्या साथीमुळे लंडनच्या दिशेने झालेल्या मोठ्या स्थलांतरामुळे इंग्लिशमधल्या स्वरांच्या उच्चारात घडून आलेल्या बदलांचाही (ग्रेट वॉव्हल शिफ्ट) यात मोठा वाटा होता.

फ्रेंचमधून पंधराव्या शतकात जेव्हा हा शब्द इंग्लिशमध्ये आला, तेव्हा अर्थातच त्याची अनेक स्पेलिंग्ज रूढ होती. पण coronel हे स्पेलिंग आणि 'कोरोनेल' हा उच्चार त्यातल्या त्यात सर्वमान्य होता. योगायोगाने याच काळात ग्रीक आणि लॅटिनमधले क्लासिक साहित्य इंग्लिशमध्ये येऊ लागले होते. १४५३ मध्ये कॉन्स्टँटिनोपलच्या (आजचे इस्तंबूल) झालेल्या पाडावामुळे तेथील ग्रीक साहित्याचे व व्याकरणाचे विद्वान, शास्त्रज्ञ, कवी, संगीतकार, खगोलशास्त्रज्ञ, वास्तुविशारद पश्चिम युरोपाकडे वळले. रेनेसान्सचा पाया रचण्याचे काम याच 'ब्रेन ड्रेन'मुळे झाले असं म्हणायला हरकत नसावी.

भाषांतराच्या ह्या सुवर्णयुगात जेव्हा इंग्लिश भाषांतरकारांचे इटालियन सैनिकी साहित्याकडे लक्ष गेले तेव्हा त्यांनी 'कोरोनेल'च्या स्पेलिंगचे शुद्धीकरण करून ते मूळ इटालियन स्पेलिंगशी - colonnello शी नाते सांगणारे colonel असे केले. तेव्हापासून कर्नल हा उच्चार आणि त्याचे वरकरणी विसंगत वाटणारे colonel हे स्पेलिंग अस्तित्वात आले.

'ल' आणि 'र' मधल्या ह्या संगीतखुर्चीला भाषाशास्त्रात 'लिंग्विस्टिक डिस्सिमिलेशन' (linguistic dissimilation) अशी संज्ञा आहे. त्याचे उपप्रकार आणि अधिक उदाहरणे येथे वाचता येतील. पण ही अदलाबदली केवळ युरोपियन भाषांतच होते असं नाही. 'पूर्वरंग'मध्ये पुलंनी जपानमध्ये 'परूळेकर'चा उच्चार पालुरीकर कसा होतो, त्याचा विनोदी किस्सा सांगितला आहे. (प्रस्तुत लेखाचे शीर्षक त्याच किश्श्यातून साभार).

भारतीय भाषांतही याची उदाहरणं सापडतात. लेखाच्या सुरुवातीला लताबाईंच्या गाण्यांचा उल्लेख आहे. शेवटही त्यांच्याच एका गाजलेल्या गाण्याने करूया. या गाण्याच्या ध्रुवपदात एक नव्हे तर दोन थालेपारट झालेले शब्द आहेत. ते गाणं आणि त्यातले दोन थालेपारटी शब्द ओळखू शकाल? (उत्तरे व्यनिने कळवावीत)

हिंट - संगीतकार मदन मोहन

कोड्याचे उत्तर -

नैनों में बदरा छाये (चित्रपटः मेरा साया)
थारेपालट झालेले शब्द (ल --> र): बदरा (बादल), गरवां (गले/गलवां)

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (7 votes)

प्रतिक्रिया

मजेशीर लेख.

पटकन आठवणारं उदाहरण : "सार्सापरिला" (दुवा ) आणि "सासरा पळाला".

दुसरं उदाहरण प्रच्छन्न जातीयवादी आहे. ब्राह्मणी घरांमधे निम्नस्तरीय मानलेल्या वर्गांतल्या लोकांचं वर्णन करताना असं म्हण्टलं जातं की ते लोक "पेण आणि पनवेल" ला " पेन आणि पणवेल" म्हणतात. या उदाहरणामधली गंमत त्यातल्या छद्मीपणामुळे माझ्यापुरती संपली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

उच्चारबदलांच्या मागे काही इतिहासही असेल असं वाटलं नव्हतं.

बंगाली मित्रमंडळामुळे माझा 'र' 'ड' सारखा येतो का काय अशी कधी भीती वाटायची. यथावकाश ती नोकरी संपली, पण चॅटींगमधून वगैरे संपर्क आहे. चॅटवरच एकदा काहीतरी समजावताना मैत्रीण म्हणाली "chor". मी घाबरले, तिच्या घरात, स्पेनमधे चोर आल्याचं ही मला का सांगत्ये! थोड्या वेळानंतर ती मला "छोड" म्हणत होती हे समजलं. या र-ड ची रड नेहेमीचीच झाली आहे.
बंगालीतला दुसरा 'ड' मला कधीही जमला नाही. वेगळा काय ते ऐकूच येत नाही बहुतेक! फ्रेंच 'र'मधेही गडबड होतेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लहान मुले 'र' चा 'ल' करतात, हे बरेचदा बघण्यात येते. बाङ्ग्लात 'र' चा 'ड़' (अड़ै) होणे हेही नेहमीचेच.
पण मला आज अचानक एका मराठी लहान मुलीचे हे उदाहरण सापडले, ज्यात ती 'र' आणि 'ळ' दोन्हीला 'ड़' करून मोकळी झाली आहे ! उदा:
अरे = अडे़, घरी चोरी = घडी़ चोडी़, करता = कड़ता, तर = तड़, इ.
सकाळ = सकाड़, पळत = पड़त , कळत = कड़त. इ.

(अवान्तर : या कारणामुळे नव्हे, तर मुलीचे एकूणच बोलणे ऐकून भरपूर करमणूक होईल याची १००% हमी.. आणि एका नवीन क्रियापदाची ओळखही कदाचित होईल. Biggrin )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लेख!
मी पण बालपणी र चा ल करायचे आणि अजुनही बहुतेक र-ल च्या मधेच कुठेतरी उच्चार असतो.
उत्तर भारतीयांचा ण, ळ म्हणताना होणारा गोँधळ आठवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक अवान्तर निरीक्षण :
अनेक हिन्दी गाण्यान्त जेंव्हा 'र' एका विशिष्ट जागी लाम्बत जातो, त्याचा उच्चार 'र' कधीच होत नसल्याचे दिसते. तो 'ळ' आणि 'य' च्या मधे कुठेतरी होतो.
उदा.
१. 'शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता हैं' - 'आख़िर' मधला र
२. 'तारें ज़मीं पर' - 'पर' मधला र

दोन्ही ठिकाणी र शब्दाच्या शेवटी आहे आणि लाम्बला आहे.
असा उच्चार का बदलावा आणि तो य-र च्या मधला उच्चार रूढ का व्हावा, याचे मला सुचलेले एक उत्तर असे की लाम्बलेला र हा स्पष्ट उच्चारला तर कानाला अजिबात बरा वाटणार नाही. जीभ र्रर्रर्र अशी फडफडवत ठेवावी लागेल. ज्याने कुणी ही य-र चा उच्चार करण्याची शक्कल प्रथम लढवली, त्याला सलाम.

बाकी तुम्ही दिलेली माहिती बरीच रञ्जक आहे.
'लिरिल' साबणाला 'रिलील' म्हणणारे बरेच आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त! मात्र आमचा पास...

अवांतर : म्हणा... रोडरोलर रोडरोलर रोडरोलर रोडरोलर लोडरोरर लोडलोलल...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

हे पुढचे भराभर म्हणा पाहू ..... "अप्पर रोलर, लोअर रोलर".
दोनदा जरी पुनरावृत्ती करू शकलात, तर 'पिसळालेल्या हत्तीच्या' अम्बारीतून सैर करण्याचे (विसरलेले) इनाम पुन्हा जाहीर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कच्चा पापड पक्का पापड
पाखी पाका पेपे खाय
काळे राळे....

वैग्रे वैग्रे. शिवाय तेलुगुमध्ये एक निव्वळ न हे एक अक्षर वापरून अख्खे वाक्य होते ते आमच्या आंध्रभृत्याने म्हटल्यावर कळायचं बंद झालं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे दारू पिऊन म्हणायचे आहे की न पिता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

लेख माहितीपूर्ण आणि रंजक झालेला आहे. खूप आवडला. जपानीमधे र आहे पण ल नाही. त्यामुळे लंबोदर हे आपोआप रंबोदर होते.
एका उत्तरेकडील सहपाठ्याला आम्ही 'काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले' ही ओळ म्हणायला शिकवली होती. त्याच्या तोंडून होणारा या ओळीचा उच्चार हास्यस्फोटक ठरत असे त्याची आठवण झाली.
सैन्यातला कर्नल, स्पेलिंगप्रमाणे असणारा कोलोनेल आणि उनिक्स - लायनक्स चे कर्नेल यांतले नक्की बरोबर कोण असा प्रश्न पडला होता त्याचे उत्तर आज अचानक मिळाल्यामुळे बरे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--
सस्नेह,
अदिति
जो जे वांछील तो ते लाहो| प्राणिजात||

मूळ लेखातील 'कर्नल' किस्सा अशा थालेपालट विचारासाठी लक्षणीय आहे. या संदर्भातच एक कर्नल किस्सा....Lieutenant अशा स्पेलिंगचे थालेपालट होऊन उच्चार 'लेफ्टनंट' का केला जातो हेही एक कोडेच आहे. [मूळात इंग्रजीतून वाचावा असाच असल्याने जसाच्या तसा देत आहे....}

"La-a-dy * *," exclaimed a certain Colonel, in that very original Scotch brogue which a long acquaintance with the world has not tended in any degree to diminish,
"alloo me to introduce you to my brother, Carnal M---- ----."
"What!" asked the lady, "are you both Colonels?"
"Oo--ay--La-a-dy * *, that are we, in troth; but the daff'rence is this, my brother, you see, he is _Carnal_" (Lieutenant-colonel he intended to express), "and _I_--am _fool_ Carnal!"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक नंबर किस्सा!!!!!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रञ्जक माहिती. कर्नल चा इतिहास इतका मस्त असेल असे वाटले नव्हते. आता इंग्रजी भाषेचा इतिहास वाचणे आले Smile

अमेरिकन आणि ब्रिटिश अ‍ॅक्सेंटमधील फरक पाहता अमेरिकन "र" चा उच्चार जरा घोळवून करतात तर ब्रिटिश तसे करत नाहीत. पण जेव्हा ब्रिटिश लोक ब्रिटन सोडून अमेरिकेस गेले १७ व्या शतकात, तेव्हा या स्थलांतरितांचे उच्चार आधीच्या उच्चारांशी जास्त मिळतेजुळते टिकून राहिले असे वाचल्याचे आठवते. त्यामुळे शिवकालीन इंग्रजीत असा र चा र्‍होटिक उच्चारच रूढ असावा असे वाटते.

बाकी जपानीत ल चा र होतो हे टेलेव्हिजन सेरीजमध्ये पाहिले आहे. एका पात्राचे नाव "एल" असते तो स्वतःची ओळख "एरु-देस" अशी करून देतो. ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी सांगितलेला किस्सा माझ्यादेखील परिचयाचा आहे. बंगाली लोक लिहिताना r लिहिले तरी उच्चार ड करतात बर्‍याचदा. त्याला बंगालीत संज्ञा पुढीलप्रमाणे:

r=र=র = बोय सुन्नो रो म्हणजे ब च्या खाली डॉट दिलेला र. याचा उच्चार आपल्या र सारखा होतो पण स्ट्रेस फारसा देत नाहीत.

d=ड=ড়= डोय सुन्नो रो म्हणजे ड च्या खाली डॉट दिलेला र. याचा उच्चार आपल्या ड सारखा होतो पण एक सूक्ष्म फरक आहे. मराठीतदेखील, "डावा" आणि "वाडा" या शब्दांमध्ये ड चा उच्चार वेगळा आहे. "डावा" मध्ये ड हा आघातपूर्ण आहे, तर "वाडा" मध्ये ड हा विदौट आघात आहे. विदौट आघातवाला ड हा तो बंगाल्यांचा ড় आहे. हिंदीत जो ड़ आहे त्याचा उच्चार असाच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जपानी भाषेतले एनेरुगी आणि आरेरुगी हे शब्द ऐकून फुटलो होतो. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लतादिदींच्या गाण्यांमधील उदाहरणे पटली नाहित.
उर्दु धर्तिच्या हिंदी उच्चारात शेवटि आलेल्या 'र' चा उल्लेख पुष्कळदा लुप्त होतो. ही लकब दीदींनी खास शिकून घेतली होती. 'जिया बेकरार है छायी बहार है..' या गाण्यातील 'र' व 'क' चा उच्चार बारकाईने ऐका. तो सहजासहजी जमणारा नाही.
बाकी थारेपालट कधी कधी विनोदी होतो खरंच. याचे एक मजेशीर उदाहरण.
लहन मुले सहसा 'र' ऐवजी 'ल' म्हणतात्.पण माझी ४ वर्षाची भाची ईशा 'ळ्'ला 'र' म्हणे. एकदा तिच्या आईने तिला सांगितले की काकूला विचार ती कणिक मळते का मी मळू. तिने जाऊन काकूला सांगितले, 'काकू, आईनं विचारलंय, तुम्ही मरताय का मी मरु ?'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलेले उदाहरण बरोबरच आहे.

जिया बेकरार है छायी बहार है... मधील क हा हिंदीमध्ये क़ असा लिहिला जातो, तो नेहमीच्या क पेक्षा वेगळा म्हणजे तोंडात जो घंटेसारखा दिसणारा प्रकार असतो, त्याला जिभेचे मागचे टोक लावून करायचा असतो, अगदी घशातून काढल्यासारखा असतो. आणि तो जो र आहे तो तमिळ मधील ழ सारखा आहे. त्याचा उच्चार हा अमेरिकन "र" सारखा होतो. ळ ऐवजी र म्हणणे रोचक आहे पण लॉजिकल आहे सिम्प्लिफिकेशन म्हणून असे वाटते. हे अर्थात चूकही असू शकते. त्यासाठी कॉलिंग भाषाशास्त्रज्ञ राधिका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लतादिदींच्या गाण्यांच्या उच्चारावरून बॅटमॅन आणि स्नेहांकिता यांच्यात चाललेली चर्चा या विषयाच्या अनुषंगाने रोचक होऊ शकेल....सोदाहरण असल्याने...असे दिसत आहे.

लताचेच "राधा ना बोले ना बोले ना बोले रे....' असे जुन्या जमान्यातील एक लोकप्रिय गाणे आहे. आपल्या मराठीत 'राधा' मधील 'धा' चा 'धडाडणे, धडक्यात, धडपडणे...' धर्तीचा उच्चार होतो.. काहीसा जड...पण गाणे ऐकताना जरी थेट 'द' नसले तरी 'ध' मृदू बनले आहे असे दिसत्ये....त्यामुळे 'राधा ना बोले ना बोले....' ऐवजी 'रादा ना बोले....' असेच कानावर येते. पण दुसरीकडे रफीसाहेबांनी म्हटलेले 'मधुबनमे राधिका नाचे रे....' इथे मात्र 'राधिका' चा स्पष्ट थेट उच्चार आहे.

[स्नेहांकिता : "मी मरू का तू मरतेस ?".....वैशाली सामंतच्या भाषेत म्हणायचे तर 'भन्नाट....' आहे.]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(तुर्तास घाईत असल्याने) नंदनच्या लौकीकाला साजेसा लेख इतकेच म्हणतो आणि पोच देतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ह्यालाच इंग्रजीत Spoonerism असे नाव आहे. http://en.wikipedia.org/wiki/Spoonerism येथे त्याबद्दल बरीच मनोरंजक माहिती आणि उदाहरणे मिळतील. उदा. Three cheers for our queer old dean! (Three cheers for our dear old queen!" (विक्टोरिया राणीच्या संदर्भात), I gave him a blushing crow! (I gave him a crushing blow!)

ह्याच संदर्भात दोन संस्कृत श्लोक लगेच आठवले. व्याकरण शिकण्याचे महत्त्व - बहुधा भट्टिकाव्यात - असे सांगितले आहे:

यद्यपि बहि नाधीषे तथाऽपि पठ पुत्र व्याकरणम्।
स्वजनो श्वजनो माऽभूत्सकलं शकलं सकृत्शकृत्॥

मुला, जरी फार शिकला नाहीस तरी व्याकरण जरूर पढ. नाहीतर ’स्वजना’चा ’श्वजन’ (कुत्रा), ’सकला’चे ’शकल’ (तुकडा) आणि ’सकृत्’चे 'शकृत् (शेण) होईल.

विकटनितम्बा नावाची एक कवयित्री होऊन गेली. तिचे वर्णनः

काले माषं सस्ये मासं वदति सकाशं यच्च शकासम्|
उष्ट्रे लुम्पति षं वा रं वा तस्मै दत्ता विकटनितम्बा||

विकटनितम्बेचा नवरा कसा आहे? वेळ सांगण्यासाठी तो म्हणतो 'माष' (तीळ) आणि धान्यासाठी तो म्हणतो 'मास', 'सकाश' (जवळचे) साठी म्हणतो 'शकास' आणि 'उष्ट्र' हा शब्द उच्चारतांना 'ष' तरी गाळतो नाहीतर 'र' तरी गाळतो!

हा अजून एक श्लोक पहा:

साक्षरा विपरीताश्चेद्राक्षसा एव केवलम्|
सरसो विपरीतश्चेत्सरसत्वं न मुञ्चति}

'साक्षर'ला उलटे केले तर त्याचा 'राक्षस' होतो. 'सरस'ला उलटे केले तर 'सरस'च राहते.

(विकटनितम्बा ही संस्कृत लिखाण करणारी दुर्मिळ कवयित्री होती. अशी थोडीच उदाहरणे आहेत. तिचे उपलब्ध काव्य बहुधा नसावे. तिच्या स्तुतिपर एक श्लोक उरला आहे, हा एक 'काकुप्रश्न' rhetorical question आहे :

के वैकटनितम्बेन गिरां गुम्फेन रञ्जिता:|
निन्दन्ति निजकान्तानां न मौग्ध्यमधुरं वचः

असे कोण आहेत जे विकटनितम्बेच्या कवितागुंफामुळे रंजन झाल्यानंतर आपल्या प्रियतमांच्या मुग्ध आणि म्हणून मधुर अशा बोलण्याकडे दुर्लक्ष करीत नाहीत?

काव्य करणार्‍या स्त्रीकडे पहाण्याचा कुत्सित दृष्टिकोण कवयित्रीच्या नावातच प्रतिबिंबित झालेला दिसतो. 'विकटनितम्बा' 'विकट - मोठे नितंब असलेली' असे तिचे वर्णन करण्याचे दुसरे कारण काय असावे?

अरेबिक भाषेत 'प' आणि 'ब' मध्ये उच्चाराचा फार फरक नाही. त्यामुळेच 'पैसा' चे 'बैझा' (ओमानमधील १/१०० रियाल) होते. अरब लोक सहजपणे 'I bray five times a day' असे म्हणून जातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान. आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर ऋषिकेश यांनी म्हटल्याप्रमाणे नंदनशेठ यांच्या लौकिकाला साजेसा लेख! कर्नलची व्युत्पत्तीही मजेशीर.

र आणि ल यांचा थारेपालट होतो तसेच वर काहींनी म्हटल्याप्रमाणे बंगालीतदेखिल र आणि ड यांचा होतो. मराठीतही कोळी-आगरी यांच्या बोलीभाषेत र आणि ड यांचा थारेपालट झालेला दिसून येतो.

बाकी मराठीत अभिजन आणि बहुजन यांच्या बोलीभाषेत ल आणि ळ तसेच न आणि ण यांचा थारेपालट अगदी ठरवल्याप्रमाणे अचूक का होतो, हा भाषाशास्त्रीय संशोधनाचा विषय ठरावा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. अगदी वेगळाच पण मजेशीर विषय.

सुनीलने सांगीतल्याप्रमाणे पंजाबी, सिंधी, बंगाली, उडीया इत्यादी लोक र आणि ड ची आलटापालट करताना दिसतात. जसे पुरी ला पुडी किंवा वडापावा ला बोरापाव.
चिन्यांचीही अशीच मजा येते ती न आणि ल च्या उच्चारात. (मलेशिया - मनेशिया/ मनेनशिया) विशेषतः न आणि ल ही दोन्ही अक्षरे असलेला शब्द आला की त्यांची फार तारांबळ उडते - उदाहरणार्थ ओन्ली (ओनिन, ओल्ली, ओन्नी..). न दोन वेळा आला तरीही त्रेधा तीरपिट उडते - न्यूनाई (दुध) च उच्चार न्युलाइ असाही केला जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान!

संस्कृत व्याकरणात "ऋऌवर्णयोर्मिथः सावर्ण्यं वाच्यम्"
म्हणजे ऋ आणि ऌ हे दोन्ही "सवर्ण" आहेत. ("सवर्ण" हे विवक्षित परिस्थितीत एकमेकांच्या ठिकाणी आदलून-बदलून येतात).

कृप आणि क्ऌप् ही रूपे तसेच ह्रद्/ह्लद् वगैरे रूपे थालेपारटानेच आलेली आहेत.

जपानी भाषकांच्या इंग्रजीतला थालेपारट आहे माझ्याही मनात पटकन आला, पण ध्वनिशास्त्राच्या दृष्टीने ती खूप वेगळी बाब असावी. मूळ जपानी भाषेत ल/र ही व्यंजने नसून एकच "postalveolar flap" व्यंजन उपलब्ध आहे. ओळखीच्या या वेगळ्याच अक्षराची नवीन भाषेतील दोन वेगवेगळ्या अक्षरांशी जुळवणी लावल्याने त्यांचा गोंधळ होतो. (इंग्रजीभाषक t या त्यांच्या ओळखीच्या व्यंजनाचे मराठी शिकताना त/ट दोहोंवर मॅपिंग करतात. ते काहीसे असेच.)

इंग्रजी कर्नल, हिंदी बदरिया वगैरे शब्दांचे वेगळे आहे. या ठिकाणी थालेपारट होणारे र/ल दोन्ही वर्ण त्या-त्या भाषेच्या वर्णमालेत उपलब्ध असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीपूर्ण प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

लेखात लिहायचे राहून गेलेले एक उदाहरण म्हणजे हिंदीतला कारा/कारे हा शब्द. इथेही 'ल' चा 'र' झाला आहे. (गाण्यांची उदाहरणे - , )

तुर्की भाषेतही काळ्या रंगाला kara हा शब्द आहे (दुसरा अर्थ जमीन).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे वाचन बर्‍यापैकी आहे(म्हणजे मला असे वाटते)

पण "थालेपारट" हा शब्द कधीच ऐकण्यात्/वाचण्यात आला नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

शंका योग्य आहे, माझ्याहि मनात हाच विचार आला होता.

आत्ता गूगलवर पाठपुरावा करता असे दिसले की दाते-कर्वे कोशात हा शब्द दाखविला आहे. 'थारेपालट' ह्या नावाची एक साहित्यकृति आहे. तसेच गडकर्‍यांनी ह्याचा एकदा उपयोग केल्याचे दिसते. पहा:

'तामसवृत्तीच्या लोकांना जर रुद्र हे दैवत आवडते व सात्त्विक वृत्तीला जर विष्णू प्रिय वाटतो तर मग महिना-पंधरवडयात सारखी थारेपालट करीत असणार्‍या प्रवासशील नाटकमंडळयांना, आपल्या नाटकाचे अधिदैवत, सकाळी प्रयागी स्नान करून दोन प्रहरी कोल्हापुरास मिळविलेली भिक्षा कावेरीतीरी भक्षण केल्यावर माहुरास जाऊन झोप घेणारा दत्तात्रेय हेच असावे असे वाटणे अगदी स्वाभाविक आहे,...'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'थारणे' हे प्राकृत क्रियापद 'स्थिरावणे' ह्या अर्थाने रूढ आहे. बहुतेक तद्भव रुप असावे. 'थारा देणे' किंवा मालवणीत 'थार नसणे' (= चंचल असणे) हे त्याचेच थोडे निराळे उपयोग.

थारेपालटचा माझ्याकडील शब्दकोशातला अर्थ 'हवा खाण्यासाठी जागा बदलणे' असा आहे. (मराठी शब्दरत्नाकर - वा. गो. आपटे). वर अरविंद कोल्हटकरांनी दिलेले उदाहरण या अर्थाने चपखल आहे.

लेखात म्हटल्याप्रमाणे, थालेपारट ही पुलंनी ल आणि र च्या जागा (थार) - बदलाबद्दल (पालट) केलेली कोटी आहे (पूर्वरंग)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'थारे' हा शब्द 'स्थावर' वरून आल्याची शक्यता दिसते. 'स्थावर' म्हणजे 'न हलविता येण्याजोगे'. (उदा: स्थावर-जङ्गम मालमत्ता, स्थिरस्थावर, इ.)
त्यामुळे थारेपालट = एका जागेतून दुसर्‍या जागी जाणे (स्थलान्तर), हा अर्थ योग्य वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे वाचन बर्‍यापैकी आहे(म्हणजे मला असे वाटते)

बहुतेक पुलं सुटले वाटते Wink वाचा पूर्वरंग.. थालेपारट ही पुलंनी केलेली कोटि आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या अक्षरांच्या थारेपालटावरून एक भयानक किस्सा आठवला.
आम्ही एका प्रॉजेक्टसाठी बंगलोरला असतानाची गोष्ट. रवी नावाचा एक बंगाली (की ओडीसी.. आठवत नाही) सहकारी आमच्या बरोबर होता. त्याचा आवाज म्हणजे पुलंच्या रावसाहेबांसारखा नाजूक. आमची एकच एक मोठी प्रॉजेक्ट रूम होती. सगळे जणं त्याच रूममधे असायचे. (प्रॉजेक्टचं नाव ठेवलेलं 'फ्युजन' म्हणून 'फ्युजन रूम'.. पण प्रॉजेक्ट्च्या एकंदर स्थितीवरून त्याला आम्ही 'कन-फ्युजन रूम' म्हणत असू). तर त्या रूममधे एकदा हा महाभाग माझ्या जवळ आला आणि त्याच्या नेहमीच्या आवाजात "वी नीड मोअर हार्ड डिक्स!" असं म्ह्णाला! सगळी फ्युजन रूम हादरली. सगळे काम सोडून त्याच्याकडे बघायला लागले! त्यानंतर त्याच्या "वी डोंट हॅव एनफ स्पेस ऑन सर्वर!" या वाक्यानंतर सगळे परत आपापल्या कामात गुंतले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-------------------------------------------

असाच एक भयानक किस्सा माझ्या केमिकल इंजिनियर मित्राने सांगितला. त्याच्या कंपनीत एक ओडिया पोरगा आहे, त्याचे इंग्रजी उच्चार म्हंजे ओडिया उच्चारच, कै फरकच नै. श-ष-स सगळे एकच त्याच्या लेखी. तर एकदा कसल्यातरी केमिकलच्या रा़खेवर प्रयोग केल्यावर काळ्याची करडी रा़ख झाली असे सांगताना "माय अ‍ॅ* वॉज ब्लॅक फर्स्ट, बट देन इट गॉट ब्राऊन" असे सांगितले. सगळे हसत सुटल्यावर तो म्हणतो कसा, "नो नो , आय अ‍ॅम नॉट जोकिंग, इट रिअली हॅपन्ड"!!!!!!! Biggrin Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

डिस्क ला डिक्स म्हणण्याने आमचे काही प्रोफेश्वर्स फारच अनवस्थाप्रसंग आणत उदा. हार्ड डिस्क अँड फ्लॉपी डिस्क मध्ये वर्णविपर्यय केल्याने जो काही महास्फोट व्हायचा त्याची काय मजा सांगू महारा़जा Biggrin Blum 3 Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

'य' चा 'ज' आणि 'ज' चा 'य' होण्यामागे अश्या काही रञ्जक गम्मती आहेत का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजच सत्त्वशीला सामन्त याञ्चे लोकप्रभामधील आवळेजावळे वर्ण हे लेखन नजरेस पडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख संग्रही ठेवावा असाच आहे. त्याचा दुवा येथे दिल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद. ('जोदि तार डाक शुने केऊ ना आशे' मधला जोदि हेही एक 'य ते ज'चे चटकन आठवणारे उदाहरण.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या लेखावरून दोन गोष्टी आठवल्या त्या लिहून टाकतो.

१. बंगालीत य-चा-ज आणि व-चा-ब होतो हे सर्वांना माहिती आहेच. त्याबद्दल एके ठिकाणी "य-ज-यो: अभेदः व-ब-यो: अभेदः|" असे म्हटलेले आहे. आणि हे मागधी प्राकृताचे विशेष आहेत असेही कुठेशीक वाचलेले आठवतेय.

२. हिंदू विवाहविधीत वधूच्या तोंडी "पाप्मा मे जारः" म्हणजेच माझ्या जाराला माफ कर अशी एक ओळ असते असे आहिताग्नी राजवाड्यांच्या नासदीयसूक्तभाष्य खंड दोन मध्ये दिलेले आहे. डीटेल्स नंतर पाहून सांगीन. पण आपले पूर्वज लै खतरनाक होते हे दिसतंच आहे यावरून Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>> हिंदू विवाहविधीत वधूच्या तोंडी "पाप्मा मे जारः" म्हणजेच माझ्या जाराला माफ कर अशी एक ओळ असते असे आहिताग्नी राजवाड्यांच्या नासदीयसूक्तभाष्य खंड दोन मध्ये दिलेले आहे.
--- खी: खी: खी:, बिचार्‍या नवरोबाच्या दृष्टीने ही 'जारिंग नोट'च की Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नंदनशेठ कोटिभास्करांचा विजय असो Smile कोटी आवडल्या गेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण आपले पूर्वज लै खतरनाक होते हे दिसतंच आहे यावरून

ते सगळं काय म्हायीत नाय पण असे तपशील केवळ आठवणीतून देता येत आहेत यावरून तुम्हीही काही कमी खत्तरनाक वाटत नाहि Wink

स्वगतः अशी माहिती असणं आणि ते योग्य वेळी तत्परतेने 'ससंदर्भ' देता येणं यात नंदन, धनंजय याच्याबरोबर बॅटमॅनचाही समावेश करावा लागेलसे वाटते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

<< हिंदू विवाहविधीत वधूच्या तोंडी "पाप्मा मे जारः" म्हणजेच माझ्या जाराला माफ कर अशी एक ओळ असते असे आहिताग्नी राजवाड्यांच्या नासदीयसूक्तभाष्य खंड दोन मध्ये दिलेले आहे. >>

आहिताग्नि राजवाडयांचे नासदीयसूक्तभाष्य खंड २ मला सहजी उपलब्ध नाही. वरील उद्धृताचा संदर्भ कळल्यास राजवाडयांना काय म्हणावयाचे होते ते कळू शकेल. तोपर्यंत मी तरी त्याबाबत काहीहि विधान करू इच्छित नाही.

That said, "पाप्मा मे जारः" म्हणजेच माझ्या जाराला माफ कर" असा अर्थ होऊ शकेल काय? 'पाप्मा' हे पाप्मन् (पु.) evil, misfortune etc., (इति Monier William) ह्याचे प्रथमा विभक्तीचे एकवचन. (शेरेऽस्य सर्वे पाप्मान: श्रमेण प्रपथे हतः -ऐतरेय ब्राह्मण) ह्यावरून असे वाटते की विवाहविधीत "पाप्मा मे जारः" असे वधू म्हणत असली तर त्याचा अर्थ "मला जार हा पाप आहे, (म्हणजेच) पापासमान आहे" असा व्हायला हवा. तोच अर्थ संदर्भाशी जुळता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचे म्हण्णे बरोबर आहे-मी याबद्दल विचार केला नव्हता फारसा Sad मी स्मरणाने सांगितले, ओळ बहुधा बरोबर आहे, पण अर्थ सांगण्यात गडबड झाली असे दिसते. मी घरी गेलो की पाहून सांगीन. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं