रवींद्र पिन्गे यांच्या पत्राची गोष्ट

आपण एखादा लेख लिहिला आणि तो दुसèयाच्या नावावर छापून आला तर? असा प्रसंग माझ्या बाबतीत एकदा घडला होता. १९९६ सालची ही गोष्ट आहे. त्यावेळी मी औरंगाबादला दै. सामनात नुकताच रुजू झालो होतो. माझ्या मित्राने खडकाळ जमिनीवर फुलविलेल्या फळबागांवर एक लेख मी लिहिला. तो सामनाच्या फुलोरा पुरवणीत प्रसिद्ध झाला. पण लेखक म्हणून माझ्या नावा ऐवजी सामनाचा फोटो ग्राफर योगेश लोंढे याचे नाव त्यावर छापून आले! मला वाईट वाटले. खरे म्हणजे माझी फारच पंचाईत झाली होती. माझा लेख छापून आला हे मी बाहेर कोणालाही सांगू शकत नव्हतो.

गंमत अशी की, या लेखावर मराठीतील प्रख्यात साहित्यिक रवींद्र पिन्गे यांचे पत्र फळबागाच्या मालकाला आले. ‘तुमच्या बागेविषयी योगेश लोंढे यांनी लिहिलेला लेख वाचला...' अशी सुरूवात करून पिन्गे यांनी हे पत्र लिहिले होते. दु:खावर डागण्या देणे म्हणजे काय असते, हे मला त्या दिवशी कळाले.

पिन्गे यांचे हे पत्र मला परवा अडगळ स्वच्छ करताना सापडले. ते आता मी जपून ठेवले आहे.

अशी ही : रवींद्र पिन्गे यांच्या पत्राची गोष्ट

आपणही वाचा. आपला किम्वा मित्राचा असा अनुभव असेल तर सान्गा.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

इंटेलिजंट पुणे या इंग्रजी साप्ताहिकात माझ्या फलज्योतिष चिकित्सा मंडळ या ब्लॉगवर आधारित कव्हर स्टोरी आली होती. पत्रकाराने मला अगोदर ती पाठवली. त्यात प्रकाश घाटपांडे ऐवजी महेश घाटपांडे असे लिहिले होते. मी ती चूक दुरुस्त करण्यास सांगितले. पण जेव्हा पेप्रात छापून आले तेव्हा परत महेश घाटपांडे असेच छापले. मी शेवटी कपाळावर हार मारुन घेतला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

माझा असा अनुभव नाही पण आपली चिडचिड नक्की समजू शकतो Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं